बाप्पाचा नैवेद्यः काजू मोदक आणि काजूकतली

अनन्न्या's picture
अनन्न्या in पाककृती
27 Aug 2017 - 9:08 am

काजू मोदक

गणपतीसाठी खास सोपी आवडती झटपट आणि घरी केल्यामुळे खूपच स्वस्त अशी रेसिपी!

साहित्य:
एक वाटी काजूगर,
अर्धी वाटी साखर,
पाव वाटी पाणी,
वेलची पावडर,
अर्धा चमचा तूप,
मोदक साचा

कृती:

काजूगर मिक्सरला थांबून थांबून फिरवावे, आणि पावडर करावी. सलग फिरवले तर तेल सुटेल पण पावडर बारीक होणार नाही.
कढईत अर्धा चमचा तूप घ्यावे. गॅस मंद ठेवावा. आता त्यात साखर आणि पाव वाटी पाणी घालून साखर विरघळेपर्यंत ढवळत राहावे.
साखर पूर्ण विरघळली की काजू पावडर मिसळावी. पाच मिनिटे शिजवावे. वेलची पावडर घालावी.
गोळा होऊ लागला की खाली उतरून घोटावे. घट्ट गोळा झाला की साच्याला तूप लावून त्यात छोटे गोळे भरून मोदक करावेत.
.

1
.
.
1
.
.
1
.
.

तेव्हढाही वेळ नसेल तर ताटाला तुपाचा हात लावून मिश्रण थापावे. काजूकतली तयार आहे.
.
.
1

प्रतिक्रिया

मदनबाण's picture

27 Aug 2017 - 11:41 am | मदनबाण

मस्त ! :)

[काजूकतली प्रेमी ]
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- अल्लड सीनू... ;):- Alludu Seenu

पैसा's picture

27 Aug 2017 - 12:31 pm | पैसा

सोपी आणि टेस्टी पाककृती!

स्वाती दिनेश's picture

27 Aug 2017 - 5:27 pm | स्वाती दिनेश

छानच झालेत काजू मोदक आणि काजूकतलीही..
स्वाती

सविता००१'s picture

27 Aug 2017 - 5:51 pm | सविता००१

झक्कास गं अनन्न्या.
ते मोदकांनी काढलेले २१ खूप आवडले.

+१, अगदी, हेच म्हणणार होतो, मस्त आहे!

साचा आवडला. एकाच वेळी सिक्सर लगावयची सोय..

रेवती's picture

27 Aug 2017 - 10:24 pm | रेवती

छोटे क्यूट मोदक आवडले.

दीपा माने's picture

28 Aug 2017 - 12:42 am | दीपा माने

सुबक, सुंदर आणि चविष्ट.

विशाखा राऊत's picture

28 Aug 2017 - 2:39 am | विशाखा राऊत

वाह किती मस्त आहे ही रेसेपी.. आवडली

अनन्न्या's picture

28 Aug 2017 - 7:05 am | अनन्न्या
अनन्न्या's picture

28 Aug 2017 - 7:06 am | अनन्न्या

बाप्पाला खाऊ घालाच या वर्षी!

किती निगुतिन करतै ग ताई जाम भारी :)

सानिकास्वप्निल's picture

31 Aug 2017 - 4:21 pm | सानिकास्वप्निल

मस्तं दिसतायेत मोदक.
मी सुद्धा यावर्षी आमच्या घरच्या गणपतीला खवा-पिस्त्याचे मोदक बनवले होते.
पायरी-पायरीचे फोटो नाही काढले पण पाकृ देईन नक्की.

अनन्न्या's picture

31 Aug 2017 - 5:45 pm | अनन्न्या

फोटो, मांडणी मस्त असते, अलीकडे नेत्रसुख हरवलंय!

पूर्वाविवेक's picture

1 Sep 2017 - 4:06 pm | पूर्वाविवेक

मस्त प्रकार आहे. सुबक आणि चविष्ट.

जुइ's picture

7 Sep 2017 - 11:21 pm | जुइ

काजूचे मोदक पहिल्यांदाच पाहत आहे. सजावटही कल्पक आहे!!

मनिमौ's picture

8 Sep 2017 - 7:00 am | मनिमौ

सजावट. तुझ्या रेसिपी वाचल्या की करून बघता येईल असा विश्वास वाटतो

अनन्न्या's picture

8 Sep 2017 - 9:45 am | अनन्न्या

करून पहा नक्की

सही रे सई's picture

8 Sep 2017 - 11:36 pm | सही रे सई

खुपच सोपी दिसत्ये.. नक्की करून बघेन