कोटक बँक आणि RBS /ABN AMRO कार्ड्स

IT hamal's picture
IT hamal in काथ्याकूट
22 Aug 2017 - 2:36 pm
गाभा: 

८/१० दिवसापुर्वी मला कोटक बँकेचा ई-मेल आलाय.. एक एक्सेल sheet पाठवली ...ज्यात २००७-२०११ चे क्रेडिट कार्ड चे statement आहे... माझे नाव/पत्ता काहीही नाही त्या एक्सेल sheet मध्ये.. ५/६ दिवसापासून सारखे कॉल्स ही येताहेत... नाव माझेच सांगतात ( त्याच्या डेटा मध्ये माझे middle नाव नाहीये ...) आणि address ही माझाच सांगत आहेत.. RBS ने त्यांचा business phoenix arc ला आणि phoenix arc ने कोटक ला विकलाय असे सांगत आहेत.. आणि त्या क्रेडिट कार्ड बॅलन्स नुसार १ लाख रुपये माझ्याकडे येणे आहेत असे म्हणत आहेत.. मी त्यांना सांगतोय कि जर मी असे काही कार्ड घेतलेच नाही तर पैसे का भरू? त्यांनी मला ID आणि ऍड्रेस प्रूफ मेल ने पाठवा असे सांगितले...मी ते नाही पाठवले...कारण हे लोक काही misuse करतील असे वाटतेय.. काल त्यांचा माणूस घरी येऊन माझे documents चेक करणार होता...पण दिवसभरात ४/५ वेळेस वेगवेगळे time सांगून ही नाही आला.. मी त्यांना सांगितले होते कि मी कुठल्याही document ची कॉपी तुम्हाला देणार नाही...फक्त तुम्ही तुमच्या कडील क्रेडिट कार्ड अँप्लिकेशन फॉर्म वर असलेले डिटेल्स ( पूर्ण नाव , फोटो, pan नंबर , जन्मतारीख , ऍड्रेस प्रूफ इत्यादी ) माझ्या documents शी पडताळून बघा... पण त्यांचा माणूस नाही आला... ईमेल " कोटक.कॉम " अश्या खऱ्या डोमेन वरून आलीये...आणि त्यात कोटक बँकेचा नगर रोड पुणे चा खरा पत्ता ही आहे ( signature मध्ये) पण phone करतांना ते लोक कायम mobile वरून करत आहेत... कुणा मिपाकरांस असा काही अनुभव आलाय का? मी आता ते सगळे नंबर ब्लॉक केलेत आणि ए-मेल ला उत्तर देणे बंद केले आहे...

प्रतिक्रिया

पैसा's picture

22 Aug 2017 - 7:00 pm | पैसा

डॉक्युमेंट्स देऊ नका. Phishing प्रकार असावा. कोटक बँकेकडे तक्रार करून ठेवा. Official site एकदा बघून complaints section शोधून काढा.

६-१० वर्षापूर्वीचे येणे असे एकदम कोणतीही बँक मागत नाही. Overdue होताक्षणी मागायला सुरुवात करतात. हा १००% fraud आहे. गरज पडल्यास पोलिसांकडे तक्रार नोंदवून ठेवा. पोलीस तक्रारीचा अन्य काही उपयोग नाही, पण पुन्हा त्यांचे फोन आल्यास आपणच उलट धमकी देऊ शकतो.

क्रेडिट कार्ड dues साठी फोन मोबाईल नंबर वरून कोणतीही बँक करणे अशक्य आहे. सगळे तपशील दिल्याबद्दल धन्यवाद. यामुळे इतर कोणी सावध होतील.

सुबोध खरे's picture

22 Aug 2017 - 7:37 pm | सुबोध खरे

जवळच्या पोलीस स्टेशनचा पत्ता द्या आणि म्हणावं कि मी फारसा घरी नसतोच पण पोलीस स्टेशनला कधीही या सकाळी आठ ते रात्री ११ पर्यंत. मी तेथेच ड्युटीला असतो.

वाल्मिकी's picture

22 Aug 2017 - 8:42 pm | वाल्मिकी

स्वतः पोलीस आहे असे सांगणे गंभीर गुन्हा आहे ,करू नका

मोदक's picture

22 Aug 2017 - 9:01 pm | मोदक

गुन्हा कोण दाखल करणार?

गामा पैलवान's picture

23 Aug 2017 - 12:49 am | गामा पैलवान

पोलीस स्टेशनात ड्युटी आहे म्हणजे मी पोलीस थोडाच झालो? माझी चहाची टपरी असू शकते. पोलीस स्टेशनात कायमस्वरूपी सेवादायी पोऱ्या म्हणून मी असू शकतो.

-गा.पै.

सुबोध खरे's picture

23 Aug 2017 - 8:37 pm | सुबोध खरे

सिद्ध कसा करणार?
पोलीस फार तर NC ( अदखलपात्र) गुन्हा म्हणून नोंद कारण सोडून देतील.
इथे "हगत्याला लाज कि बघत्याला लाज" असा प्रकार आहे.

स्वतः पोलीस आहे असे सांगणे गंभीर गुन्हा आहे ,करू नका

+१

कुठलीही बँक एक्सेल शीट ईमेल मधून पाठवत नाही. इंटरनेट बँकिंग मधून एक्सेल शीट फॉर्मॅट मध्ये डाटा मिळतो.

तेव्हा हा फिशिंगचा प्रकार आहे.

मनिमौ's picture

26 Aug 2017 - 12:54 pm | मनिमौ

फसवणुकीचा प्रकार आहे. बॅन्क कसलेच स्टेटमेंट एक्सेल शीट्स मधे पाठवत नाही. कायम पीडीएफ फार्म मधे असते. बॅन्केत एक लेखी तक्रार दाखल करा आणी त्याची फोटोकआॅपी तक्रार मिळाली असे लिहून घेऊन तुमच्याकडे ठेवा. पोलिसांच्या सायबर सेल ची काही मदत होऊ शकते का ते पहा

प्रमोद देर्देकर's picture

26 Aug 2017 - 3:04 pm | प्रमोद देर्देकर

ज्या बँकेतूं मेल आली आहे त्या बँकेत सर्व कागद पत्र घेवुन धडाका ना. हाकानाका

८/१० दिवसापुर्वी मला कोटक बँकेचा ई-मेल आलाय..

मेल आयडी जसाच्या तसा कॉपी पेस्ट करून इथे टाकू शकता का?

Chintan Umarani's picture

11 Sep 2017 - 4:37 pm | Chintan Umarani

हा fraud आहे. कोणतेही डॉकमेंट्स देऊ नका KOTAK.COM च्या ई-मेल वरून ई-मेल करणे खूप अवघड गोष्ट नाही
जुजबी हॅकिंग येणाऱ्या माणसाला ई-मेल masking करून हे करता येईल.

परत फोन आल्यास मी स्वतः कोटक मध्ये जाऊन आलो आहे...आणि चालू असेलेला कॉल रेकॉर्ड करत आहे असे सांगा.
आणि...अँड्रॉइड फोन मध्ये कॉल रेकॉर्डिंग अँप वापरून तो कॉल रेकॉर्ड कराच