'सोपा मराठी अभियांत्रिकीकोश'

उपयोजक's picture
उपयोजक in तंत्रजगत
20 Aug 2017 - 3:11 pm

अभियांत्रिकीतली बरीचशी सखोल माहिती ही इंग्लिश भाषेमधे आहे.अभियांत्रकीतल्या संज्ञांचा मराठीतला अर्थ सांगणारे काही शब्दकोशही आहेत.यापुढे जाऊन विविध विषयांवरील पारिभाषिक संज्ञाकोशही महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केले आहेत.पण या पारिभाषिक संज्ञाकोशांचा म्हणावा तितका उपयोग होत नाही.यातले बरेचसे शब्द हे संस्कृत भाषेचा वापर करुन बनवले आहेत.शासनाने त्यांचं काम व्यवस्थित पूर्ण केलेलं आहे.
पण यामुळेच हे शब्द व्यवहारात वापरणं बर्‍याचदा सहज होत नाही.हे शब्द उच्चार करायला थोडे कठीण जातात.
उदा.शासनाच्या यांत्रिकी अभियांत्रिकी अर्थात मेकॅनिकल अभियांत्रिकीच्या परिभाषा कोशात दिलेले हे शब्द पहा.

Geared lathe = दंतचक्रीत कातनयंत्र
A C Generator = प्रत्यावर्ती जनित्र
Backing belt = व्युत्क्रमी पट्टा

असे अनेक शब्द आहेत हे उच्चारण्यास सहजसाध्य नाहीत.काही शब्द सोपेही आहेत.पण संख्या कमी आहे.

कारखान्यांमधे काम करणारे कामगार,यंत्रचालक किंवा गाड्या दुरुस्त करणारे मेकॅनिक किंवा टेप,टिव्ही,रेडीयो दुरुस्त करणारे लोकांशी आपला बर्‍याचदा संपर्क येतो. हे लोक जेमतेम शिकलेले असतात किंवा इंग्रजी संज्ञांचा फारसा परिचय नसलेले असू शकतात.मग हे लोक उच्चारायला सोपी अशी काहीतरी नावं त्या संज्ञांसाठी,हत्यांरांसाठी देऊन आपलं काम सोपं करतात.हे पूर्वीपासून चालत आलेलं आहे.

उदा. स्क्रू ड्रायव्हर = मार्तुल
Wrench = पाना

आता या सगळ्यात ते कोणता निकष वापरतात तर तो शब्द किंवा ती संज्ञा उच्चार करायला सोपी असणे.संज्ञेमधे अक्षरे माफक असणे.हे शब्द वर दिलेल्या कोशातल्याप्रमाणे लांबलचक नसतात.

अभियांत्रिकीची पार्श्वभुमी असणारे लोक इंग्रजी संज्ञा सहजपणे वापरु शकतात कारण त्यांच्या अभियांत्रिकीच्या अभ्यासक्रमात त्यांचा अंतर्भाव असतो.बर्‍याचदा वाचल्या,लिहिल्या जातात.

पण मराठीचा म्हणजे आपल्या भाषेचा विचार करता या इंग्रजी संज्ञांचं मराठी रुपांतर करता आलं तर? किंवा या संज्ञांसाठी वरीलप्रमाणे लांबीला छोटे आणि उच्चारायला सोपे असे शब्द निर्माण केले तर?

आता याचा उपयोग काय होईल?

१)अभियंते आणि अल्पशिक्षित कामगार यांच्यामधला तांत्रिक संवाद सहजपणे होईल.
२) मराठी भाषेतल्या तांत्रिक शब्दसंग्रहात वाढ करण्यास आपलीही थोडी मदत.उदा.मराठीत चेंडू आकाराने गोल असतो आणि बांगडीसुध्दा गोलच असते.पण प्रत्यक्षात दोन्हींच्या दिसण्यात फरक असतो. Climate,weather,atmosphere असे विविध छटा दाखवणारे शब्द इंग्रजीत असताना मराठीत मात्र सर्रास वातावरण हाच शब्द वापरला जातो.असे जवळपास सारख्याच वाटू शकणार्‍या अर्थछटांसाठी स्वतंत्र शब्द निर्माण करता येतील.
३)सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे शब्द सुचवताना होणारा अभ्यास.आपल्याला समजलेली संकल्पना अचूक समजलेली आहे की आपण आजपर्यंत समजत होतो त्यात आणि मूळ संकल्पनेत काही फरक आहे हे ही समजून येईल.आकलन नेमके होईल.

मिपाने या आधीच विदा,रच्याकने,धन्स असे शब्द निर्माण केले आहेत.नेमका संदर्भ आठवत नाही पण एका मराठी साहित्य संमेलनात Hardware आणि Software साठी अनुक्रमे 'यंत्रणा' आणि 'मंत्रणा' असे शब्द सुचवल्याचे स्मरते.

स्वा.सावरकरांनी काही इंग्रजी शब्दांचे मराठी रुपांतर करुन मराठीला उत्तम अशी शब्दसंपदा दिलीय.हाच प्रयत्न आपण पुढे नेऊ शकतो का? हेच प्रयत्न करुन पहायचे आहे.

हे करताना वर सांगितल्याप्रमाणे लांबीला कमी आणि उच्चारायला सोपा असा शब्द असला पाहिजे.शक्य असल्यास त्या संज्ञेमागची संकल्पनाही सोबत सांगित्यास अधिक उत्तम!

म्हटलं तर विरंगुळा,म्हटलं तर ज्ञानरंजन! मग करा सुरुवात,बघा तुम्हाला असे कोणकोणते शब्द बनवता येतात ते!

प्रतिक्रिया

अनिकेत कवठेकर's picture

20 Aug 2017 - 3:29 pm | अनिकेत कवठेकर

अजून काही येउद्या..!

अत्रे's picture

20 Aug 2017 - 3:43 pm | अत्रे

http://www.loksatta.com/mumbai-news/heavy-rains-across-the-state-marathw...

ही हेडलाईन घ्या. किती जणांना विसर्ग शब्द माहित असतो?

विसर्ग च्या ऐवजी "पाणीसोडण" असा सोपा - अर्थ लगेच लक्षात येईल असा शब्द सुचवतो.

उपयोजक's picture

20 Aug 2017 - 3:53 pm | उपयोजक

छान! अजून येऊ द्यात!

उपयोजक's picture

20 Aug 2017 - 3:51 pm | उपयोजक

सिम(subscriber identity module) कार्ड मधल्या suscriber identity साठी ग्राहक अोळख असे शब्द आहेत.पण module साठी कोणता शब्द वापरावा?
जेणेकरुन अाद्याक्षरं घेऊन सिमसाठी समर्पक शब्द बनवता येईल.

mayu4u's picture

20 Aug 2017 - 4:13 pm | mayu4u

?

उपयोजक's picture

20 Aug 2017 - 4:42 pm | उपयोजक

यंत्रणा हा बहुधा System साठी वापरतात.

... module आणि सिस्टिम हे interchangeable आहेत असं वाटत.

interchangeable = परस्परबदलू?

mayu4u's picture

23 Aug 2017 - 1:59 pm | mayu4u

परस्परपरिवर्तनीय!
(हायला, भारीच!)

उपयोजक's picture

20 Aug 2017 - 4:12 pm | उपयोजक

CFL साठी सुप्रदीपअसा शब्द वापरता येईल का?
Compact Fluroscent Lamp
Compact साठी सुगठीत असा शब्द वापरता येईल.

(1. सुंदर गठनवाला; जो अच्छी तरह गठा हुआ और सुडौल हो 2. अच्छी तरह, योजनाबद्ध रूप से निर्मित किया हुआ; सुयोजित।)

Fluroscence साठी प्रतिदिप्ती असा शब्द आहे.

दिप = दिवा

mayu4u's picture

20 Aug 2017 - 4:18 pm | mayu4u

... पेचकस म्हणतात. screw ला मराठीत मळसूत्र असं शाळेत शिकलेलो, पण त्याला पेच हा अधिक चपखल प्रतिशब्द वाटतो. आणि पेच कसायला (आवळायला/ घट्ट करायला) वापरतात तो पेचकस.

उपयोजक's picture

20 Aug 2017 - 4:44 pm | उपयोजक

समर्पक

उपयोजक's picture

20 Aug 2017 - 4:40 pm | उपयोजक

हा शब्दकोशही चांगला आहे संदर्भग्रंथ म्हणून!

http://dspace.vpmthane.org:8080/jspui/bitstream/123456789/3965/1/116Padm...

बबन ताम्बे's picture

21 Aug 2017 - 3:16 pm | बबन ताम्बे

काही मेकॅनिक (फीटर) स्कृ ड्रायव्हरला ढिसमिस म्हणतात.
नाहीतरी थ्रेडस्ना मराठीत आटे म्हणतात. आणि नेलला खिळा. मग बोल्टला आटेखिळा म्हणायला काय हरकत आहे?
नटला नटच राहू दयावे असे वाटते :-)

उपयोजक's picture

21 Aug 2017 - 4:23 pm | उपयोजक

मस्तच! योग्य शब्द आहे. नट सोपा अ‍ाहे.राहू दे तसाच!

हामच्या हिकडं थ्रेड घासून झिजून गेलेल्या नटबोल्टाला आट्याबोळ म्हनतेत.

उपयोजक's picture

23 Aug 2017 - 9:12 pm | उपयोजक

मग तो बट्ट्याबोळ झाला!

उपयोजक's picture

21 Aug 2017 - 4:27 pm | उपयोजक

शॉकअॅब्सॉरबर साठी धक्काशोषक कसा वाटतो?

जसे की चहा गाळायला लागणारी ती गाळणी, स्वयंपाक घरात पातेले पकडायला वापरतात ती पकड - असे सुटसुटीत शब्द हवेत.

mayu4u's picture

23 Aug 2017 - 1:57 pm | mayu4u

शॉक ऍबसॉरबर कुठे सुटसुटीत आहे?

अमरेंद्र बाहुबली's picture

21 Aug 2017 - 6:17 pm | अमरेंद्र बाहुबली

मला कोणी "तरफ" (आर्किमिडीज ने शोध लावलेल्या) ला इंग्रजीत काय म्हणतात सांगेल का??

बबन ताम्बे's picture

21 Aug 2017 - 6:26 pm | बबन ताम्बे

.

अमरेंद्र बाहुबली's picture

23 Aug 2017 - 8:45 pm | अमरेंद्र बाहुबली

धन्यवाद!