मांजर बोक्या

sudhirvdeshmukh's picture
sudhirvdeshmukh in काथ्याकूट
19 Aug 2017 - 9:38 am
गाभा: 

#मांजर_बोक्या
लहान होतो तेव्हा आम्ही एक खेळ खेळायचो मांजर बोक्या. एखादा दादा, मामा किंवा काका सारखा व्यक्ती दोन लहान मुलांना घेऊन हा खेळ खेळायचे म्हणा, नाहीतर खेळवायचे. एक मुल समोरच्या हातात व एक दूसरे दुसऱ्या हातात, एक पुढे, एक मागे, गोल गोल फिरायची व तो खेळवनारा दादा वैगरे स्वत:भोवती फिरायचा. समोरचे मुल मांजर तर मागचे बोक्या, या बोक्याला धावून धावून ती मांजर पकडायची असे. बोक्याला वाटायचे आपण त्या मांजरीला तिच्या पेक्ष्या जास्त वेगाने धावुन सहज पकडू , परंतू त्या मांजर बोक्याचे नियंत्रण त्या मोठ्या व्यक्तीच्या हातात राहायचे त्यामुळे त्याने ठरवले तर मांजर बोक्याला सहज सापडे, नाहीतर बोक्या बिचारा गोल गोल फिरत राही पण मांजर मात्र गवसायची नाही.

आयुष्य ही असेच तर नाही ना? आपण बोक्या बनून सुखाच्या मागे धावत राहतो आणि सुख मांजर बनून पुढे पुढे पड़त राहते. आपल्याला सुख गवसु द्यायचे की नाही नियती वेळो वेळी ठरवत असावी.

सुधीर
17/8/17

प्रतिक्रिया

जेम्स वांड's picture

19 Aug 2017 - 4:54 pm | जेम्स वांड

.

कारण ह्यात काथ्या नेमका काय कुटायचा तेच आम्हाला कळलेलं नाहीये.

योगेश लक्ष्मण बोरोले's picture

19 Aug 2017 - 6:59 pm | योगेश लक्ष्मण बोरोले

अहो, पहीलाच प्रतिसाद देताय, तो पण न समजल्याचा!!

जेम्स वांड's picture

19 Aug 2017 - 7:48 pm | जेम्स वांड

आम्ही रामदासी विचारांची माणसे, कळले नसूनही कळल्याचा आव आणत 'मूर्खांच्या लक्षणात' स्वतःचीच सन्माननीय भर घालण्यात आम्हाला कवडीचा रस नसतो बघा.

आता पलीकडे एका विडंबनावर श्रीगुरुजींचा सेना द्वेष कळून आला तिथे तो कळल्याची पण आपण पावती दिली आहे. जालीय चरवी घुसळून ज्ञानाचं ताक मिळवायचं आहे तर अज्ञानाची भांडी लपवून कसे चालणार?

गामा पैलवान's picture

20 Aug 2017 - 12:59 am | गामा पैलवान

कसल्या काथ्या म्हणून विचारताय वांड्राव ! अहो तुमच्या जटा उपटा आणि त्याच्याच वळा की काथ्या. फर्मास क्यांडीडेट आहेत.

-गा.पै.

जेम्स वांड's picture

20 Aug 2017 - 7:47 am | जेम्स वांड

जटांचा काथ्या, हर हर हर हर, अहो मग नारळे काय करायची....

योगेश लक्ष्मण बोरोले's picture

19 Aug 2017 - 7:29 pm | योगेश लक्ष्मण बोरोले

मला वाटते या विषयावर कुटायचाय. नियतीचा विषय निघाला कि जी. ए. आठवतात. भन्नाट कथा लिहील्यात त्यांनी. त्यांच्या बहुतांष गाजलेल्या कथांत नायक एकामागुन एक विजय मिळवत जातो फण शेवटी नियतीच वरचढ ठरते. प्रवासी, ईस्किलार, विदुषक, दुत ई कथांमध्ये नियतीचाच शेवटी विजय होतो. तसेच हिरवे रावे या त्यांच्या कथासंग्रहात, मला वाटते सर्व कथांमध्ये मानव सुरुवातीपासुनच नियतीच्या हातचे बाहुले म्हणुन दाखवला गेलाय. मी, कदाचित जी. एंच्याच प्रभावामुळे नियतीलाच बलवान मानतो. सुधिर काकांनी सांगितल्याप्रमाणे बोक्या-मांजराच्या खेळाप्रमाणे फक्त एकाच वर्तुळात न फिरवता नियती आपल्याला वेगवेगळ्या दिशांनी फिरवत असते. आपण फक्त वेगवेगळ्या वेगात पळत राहतो व त्या वेगालाच आपला नियतीवरील विजय मानत जातो. दिशा बदलण्याची ताकद नियतीतच असते त्यामुळे ठरावीत फेर्‍यांनतर आपल्याला 'आपण का धावतोय?' वगैरेंसारखे प्रश्न पडतात, पण धावणे सुटत नाही.

योगेश लक्ष्मण बोरोले's picture

19 Aug 2017 - 7:32 pm | योगेश लक्ष्मण बोरोले

ते धागे वाचायला आवडतील. जाणत्यांनी माहीती दिल्यास मदत होईल.

पगला गजोधर's picture

19 Aug 2017 - 7:43 pm | पगला गजोधर

तुमच्या नियतिमधे असल्यास तुम्हाला धागे सापडतील.

जेम्स वांड's picture

19 Aug 2017 - 7:50 pm | जेम्स वांड

ठो ठो ठो!!!
:D:D:D:D

योगेश लक्ष्मण बोरोले's picture

19 Aug 2017 - 7:59 pm | योगेश लक्ष्मण बोरोले

नियतीने काय वाढुन ठेवलेय काय माहीत. आपण पळण्याचे काम मनोभावे करायचे.

पगला गजोधर's picture

19 Aug 2017 - 8:03 pm | पगला गजोधर

नियतीने काय वाढुन ठेवलेय काय माहीत. आपण पळण्याचे काम मनोभावे करायचे.

हं आता कसं, कर्मयोगावर आलाकी नै !

इथे काही कथा आहेत
http://www.gakulkarni.info/pages/main.htm

पुनरावूत्त न होणाऱ्या लेखनाचा (आणि लेखकांचा) आणखी एक चाहता
~ मनो

योगेश लक्ष्मण बोरोले's picture

20 Aug 2017 - 7:45 am | योगेश लक्ष्मण बोरोले

कोणी वांडपणा करो कि पागलपणा, नशिबात असेल ते मिळतच!

जेम्स वांड's picture

20 Aug 2017 - 7:50 am | जेम्स वांड

कोणाच्या वांड अथवा पागलपणाचा 'आपल्या नशिबावर' फरक पडेल हे समजणे म्हणजे वैचारिक गरिबी होय, मस्करी सहन न होऊन जाळ झाला असल्यास बोरोलेन क्रीम लावून घ्यावे.

पगला गजोधर's picture

20 Aug 2017 - 8:00 am | पगला गजोधर

ब्वॉर

आता दुवे मिळाल्यावर तरी, वाचायचे "कर्म" करणार ??? की ते सुद्धा नियतीवर सोडून मोकळे होणार ??

कपिलमुनी's picture

19 Aug 2017 - 8:39 pm | कपिलमुनी

O

Ram ram's picture

6 Sep 2017 - 4:11 am | Ram ram

Vakat rend mund naal aar vaid zakuek