मराठी मालिका चर्चा - वाहता धागा

अत्रे's picture
अत्रे in काथ्याकूट
15 Aug 2017 - 6:26 am
गाभा: 

या धाग्याचा उद्देश नुकत्याच पाहिलेल्या नव्या/जुन्या मराठी मालिका/त्यांचे एपिसोड्स यावर मत व्यक्त करणे/चर्चा करणे. चांगल्या मालिकांची ओळख करून देणे, भरकटलेल्या मालिकांवर विनोद करणे असा आहे.

प्रतिक्रिया

अत्रे's picture

15 Aug 2017 - 6:37 am | अत्रे

मालिका - रुद्रम
चॅनेल - झी मराठी

या मालिकेचा पहिला एपिसोड पहिला. मुक्त बर्वे आणि इतर स्टार मंडळीं असल्यामुळे सीरिअल भारी असणार असे वाटत होते. पण पहिला एपिसोड बघून ठीकच वाटली.

हिरोईनला (मु.ब.) व्हिलनचा बदला घ्यायचा असतो. गेले काही महिने टी त्याचा प्लॅन करते पण तिचा प्लॅन लकवरच अवलंबून असतो. थोडंपण डोकं लावलेल दिसत नाही. तिचा किडनॅपिंग प्लॅन सक्सेसफुल होतो कारण - व्हिलन आपला मोबाईल स्वत:हुन बंद करतो आणि नंतर तिला चालवायला गाडी देतो. यातली एक जरी गोष्ट झाली नसती तर तिचा प्लॅन फेल गेला असता. असा भंगार प्लॅन बनवायला तिला चार महिने का लागले असावेत?

कॉमेडी डायलॉग -
व्हिलनची बायको तिचा रात्रपाळीवरच्या पोलीस भावाला फोन लावते - सदा, यांचा मोबाईल लोकेशन ट्रेस कर ना!
सदा - ताई, ते फक्त महत्वाच्या कामांसाठीच करता येत.
व्ही.बा. - मग मी महत्वाची नाहीये का!?

असे इमोशनल डायलॉग :)

सॉरी - चॅनेल चे नाव. झी युवा

अभिजित - १'s picture

15 Aug 2017 - 5:01 pm | अभिजित - १

कानातला फालतू डूल / रिंग खून केलेल्या गाडीत पडलीय हे मुक्ताला घरी गेल्यावर लक्षात येते. तो घ्यायला ती परत खून केलेल्या ठिकाणी येते !! जसे काही १०/२० रुपयात कुठेही मिळणाऱ्या त्या डूल वरून पोलीस हिच्या घरी पोचणार होते. बकवास .. मालिका भांडयात काही अर्थ नाही हे ठरवले ..

मराठी कथालेखक's picture

15 Aug 2017 - 5:18 pm | मराठी कथालेखक

मलाही तेच वाटले कानातल्या डुलाकरिता पोलिसांना तोंड दाखवून आली बाई !!
बाकी मुक्ता बर्वेचा अभिनय पण अतिरेकी वाटला..

अत्रे's picture

15 Aug 2017 - 5:58 pm | अत्रे

थांबा. आत्ताच पुढचे ४ एपिसोड्स पाहिलेत (थोडा सेंटीमेंटल भाग फास्ट फॉरवर्ड करत). सीरिअलीची क्वालिटी सुधारली आहे, कथानकात फार चुका करत नाहीएत आणि मिस्टरी जमून येत आहे.

आगाशे डॉक्टरांची ऍक्टिंग आणि मुक्ता - तिची आई यांची जुगलबंदी पाहण्यास मजा येते.

गम्मत-जम्मत's picture

23 Aug 2017 - 11:20 am | गम्मत-जम्मत

हि चर्चा वाचून मला हि असाच वाटायला लागलं कि मुक्ता काही प्लांनिंग न करताच सगळं करणार कि काय!! पण नाही ह, कालचा एपिसोड या आणि अशाच अजून काही शंका दूर करतोय. (२२ ऑगस्ट )

ज्योति अळवणी's picture

15 Aug 2017 - 8:16 am | ज्योति अळवणी

शेवटची मनापासून आवडलेली आणि प्रामाणिकपणे बघितलेली मालिका म्हणजे असंभव! रहस्यमयता शेवटपर्यंत टिकवून ठेवत आणि वेळेत संपवत या मालिकेने खूप TRP मिळवला होता. सर्व कलाकारांनी खूपच सुंदर काम केलं होतं. अलीकडे TV पहाणे अजिबात होत नाही. आणि आता आवड किंवा इच्छा देखील नाही.

पण या लेखाच्या निमित्ताने परत असंभव आठवली. धन्यवाद!

पाहिली नाही ही मालिका. ऑनलाईन लिंक असेल तर पाठवा. धन्यवाद.

मराठी कथालेखक's picture

15 Aug 2017 - 5:07 pm | मराठी कथालेखक

मला यातली उर्मिला कानिटकर त्यावेळी तिच्या पाणीदार डोळे आणि चंद्रकोरीसारखी टिकली यामुळे आवडायची . बाकी मालिका पकावू वाटलेली, कधीच मन लावून बघावशी वाटली नाही, आता आठवतही नाही. शीर्षक गीत छान होते, ते आहे माझ्या संग्रही.

ज्योति अळवणी's picture

15 Aug 2017 - 9:11 am | ज्योति अळवणी

YouTube वर आहे.

http://www.youtube.com/playlist?list=EL7nYxa2aHW0Y

नक्की आवडेल. सुरवातीचे दिग्दर्शन सतीश राजवाडे यांचे आहे. मग त्यांनी ही मालिका सोडली होती.

सुचिता१'s picture

19 Aug 2017 - 11:54 pm | सुचिता१

धन्यवाद !!!

मराठी कथालेखक's picture

15 Aug 2017 - 5:16 pm | मराठी कथालेखक

फुलपाखरु (झी युवा) सध्या ठीक वाटते आहे, मी पुर्वीपासून पाहिली नाही अलिकडचे २-३ भाग पाहिलेत. मानस आणि वैदेहीचं हळूवार प्रेम काहीसा खट्याळपणा , थोडी भावूकता बघायला मजा येत आहे

अभिदेश's picture

15 Aug 2017 - 10:38 pm | अभिदेश

एकही मराठी मालिका किंवा भारतातल्या कोणत्याच मालिका ह्या पाहण्याच्या लायकीच्या नाहीत, खास करून जेव्हा आपण परदेशी मालिकांशी तुलना करतो तेव्हा. सर्वसाधारण प्रेक्षकांचे वय ८-१० वर्षे आहे हे समजून बनवलेल्या बिनडोक , कथाहीन कौटुंबिक / पौराणिक मालिका लोक बघतात तरी कसे ? कौटुंबिकच मालिका बनवायची असेल तर निदान त्याला काहीतरी कथानक असायला नको का ? पूर्वी 'प्रपंच' नावाची कौटुंबिक मालिका होती अल्फा वाहिनीवर , उत्तम अभिनय , कथानक , दिग्दर्शन. अशी मालिका असेल तर कोण तक्रार करेल ? शेवटची जमलेली कौटुंबिक मालिका म्हणजे 'एका लग्नाची दुसरी गोष्ट ' ...थोडीशी लांबली , पण उगाच परातभर पाणी नाही घातले त्यात. असो. आताशा भारतीय मालिका बघणे बंद केले आहे. जय हो 'गेम ऑफ थ्रोन' , 'बिग बँग थियरी' की ....

जातवेद's picture

19 Aug 2017 - 1:05 pm | जातवेद

गेम ऑफ थ्रोन पण आजकाल बिनडोकपणा कडे झुकत आहे.
• त्या नाईट किंग कडे साखळ्या कुठून आल्या?
• डनेरीस इतकी पॉवरफुल असताना अचानक सरसी ची मनधरणी का करू लागली? घेतले असते थ्रोन आणि बघितले असते आर्मी ऑफ डेड कडे. तसेही ते १ मैल अंतर जायला 1 महिना घेतात.
• विंटरफेल मध्ये बराच पोरकटपणा चालू आहे. ब्रान का गप्प बसलाय सगळे माहीत असून?
• डेड ची एवढी लाखोंची फौज असताना हे ७ जण काय म्हणून व्हाईट ला पकडणार होते? बकवास प्लॅन.
• युरोनच्या आयर्न फ्लीट आणि ग्रेवर्म च्या अनसलीड आर्मी चे काय चाललंय देव जाणे.
• लै फास्ट पळवाल्यात या सिझन मधी.

पण सगळे भाग अत्यंत देखणे. हॉलीवूड च्या चित्रपटांना सुद्धा लाजवतील असे.

अभिदेश's picture

22 Aug 2017 - 1:14 am | अभिदेश

ह्या सीजन मध्ये खूपच फास्ट चाललंय. मला वाटत पुढचा शेवटचा सीजन असल्यामुळे कथा गुंडाळत असावेत. पण आता नाईट किंगकडे ड्रॅगन आहे , तो काय करेल ? आगीच्या ऐवजी बर्फ ओकेल का ?? एकूण जीवन आणि मृत ह्यांच्या संघर्ष महत्वाचा , त्यापूढे थ्रोन हे गौण आहे हे डनेरीसला कळलंय. त्यामुळेच तिने सरसी कडे प्रस्ताव पाठवला. माझया मताप्रमाणे , जेमी आणि सरसी ह्या दोघात संघर्ष अटळ आहे.तसेच डनेरीस ही शेवटपर्यंत जगेल असा वाटत नाही.

पगला गजोधर's picture

22 Aug 2017 - 8:18 pm | पगला गजोधर

• त्या नाईट किंग कडे साखळ्या कुठून आल्या?

त्यांच्याकडे पहिल्यापासून होत्या , त्यांच्या मानवी जन्मापासून

• डनेरीस इतकी पॉवरफुल असताना अचानक सरसी ची मनधरणी का करू लागली? घेतले असते थ्रोन आणि बघितले असते आर्मी ऑफ डेड कडे. तसेही ते १ मैल अंतर जायला 1 महिना घेतात.

वडिलांच्या येड झ पणामुळे, तिला लोकांना त्रासात न पाडता, आपण परकीय-आक्रमणकारी अशी इमेज होऊ न देता राज्य घ्यायचा, नैतर तिच्यात व सर्सीत काय फरक ?

• विंटरफेल मध्ये बराच पोरकटपणा चालू आहे. ब्रान का गप्प बसलाय सगळे माहीत असून?

ब्राच्या डोक्यात इन्फॉर्मेशन चा महापूर आलेला असून, तो आता ब्रॅन हे व्यक्तिमत्व उरले नसून , त्याच्या आत्म्याची टाइम डायमेन्शनशी रोज स्क्रम मिटिंग होते.

• डेड ची एवढी लाखोंची फौज असताना हे ७ जण काय म्हणून व्हाईट ला पकडणार होते? बकवास प्लॅन.

त्यांना फक्त १ श्याम्पल नग आणायचा आहे, स्टेकहोल्डर डेमो साठी

• युरोनच्या आयर्न फ्लीट आणि ग्रेवर्म च्या अनसलीड आर्मी चे काय चाललंय देव जाणे.

कास्टर्ली रॉक मध्ये ते अडकून पडलेत , युरॉनने त्यांची परतीची जहाजे जाळून टाकलीत

पिलीयन रायडर's picture

20 Aug 2017 - 2:42 am | पिलीयन रायडर

मला बिग बँगचं एक आश्चर्य वाटतं.. त्यात stephen hawking ची केवढी थट्टा करतात. पण कुणालाही त्याचं काही वाटत नाही.

पण एका एपिसोडमध्ये माधुरी दिक्षीतसाठी "लेप्रस प्रॉस्टिट्युट" असाही शब्द वापरलाय. मला जाम धक्का बसला होता ते ऐकुन.

अभिदेश's picture

22 Aug 2017 - 1:18 am | अभिदेश

मलाही धक्का बसला होता , पण एकूणच शोची जातकुळी बघता , त्यात आश्चर्यकारक काही नाही.

आदूबाळ's picture

22 Aug 2017 - 7:56 pm | आदूबाळ

हाईट म्हणजे जे गाणं पाहून शेल्डन आणि राजमध्ये ही चर्चा चालू आहे ते गाणं "कहो ना प्यार है" हे अमिषा पटेल असलेलं आहे!

हि पण छान मालीका आहे. आणी ह्यावेळेस अस्स्ल मालवणीच्या जवळ्पास उच्चार आहेत.

एकदा बघुन घ्या.

जी पात्रं उभी केलीयत ना, तस्शी माणसं तळ-कोकणात जवळपास सगळयाच गावांत वाड्यांत बघायला मीळतात.

थोडी माल्गुडी डेज टायप वाटते.

पण मजा येता गाववाल्यानु. एकदा अमच्या ह्या गावातल्या गजालीक येउन बघा तरी

धन्यवाद. दोन एपिसोड पाहिले, चांगली आहे. थोडी प्रेडिक्टेबल आहे पण विषय गमतीचे आहेत. मुख्य म्हणजे प्रत्येक एपिसोड वेगळा आहे, या प्रकारच्या मालिका बघायला मजा येते.

विनोद वाघमारे's picture

16 Aug 2017 - 5:58 pm | विनोद वाघमारे

ही मलिका सुद्धा बघन्या सारखी आहे

पैसा's picture

19 Aug 2017 - 8:25 pm | पैसा

आला का धागा! खुखुखु आणि कादिप चे अपडेट्स द्या बुवा कोणीतरी. म्हणजे आठवड्यातून एखाददा सुद्धा बघायला नको. त्या मानबा मध्ये नागपुरी ठसका आज दिसेल उद्या दिसेल म्हणून बरेच दिवस सहन केली. पण 'सवत माझी लाडकी' च्या जवळपास सुद्धा जाईना.

मराठी कथालेखक's picture

21 Aug 2017 - 1:26 pm | मराठी कथालेखक

खुखुखु नाही हो.. खुकखू.. मी पण पाहिली नाही ८-१० दिवसांत.
मला त्यात फक्त एक उत्सुकता आहे इशाचे खरेखुरे वडील कोण आहे ते दाखवतील का
मला पुसटशी अशी शंका येते की ईशाचा जो कुणी बाप आहे त्याचा आणि विक्रांतच्या काकाचा (मोहन नाव ना ?) काहीतरी संबंध असावा ...बघूयात..

पैसा's picture

21 Aug 2017 - 3:53 pm | पैसा

त्यातल्या यड्या लोकांची संख्या बघून कोणीतरी त्याचे नाव खुलता खुळी खुलेना असं ठेवलं होतं. तेच डॉक्यात फिट्ट बसलंय.

गम्मत-जम्मत's picture

22 Aug 2017 - 11:23 am | गम्मत-जम्मत

खुलता 'खुळी' खुलेना हाहाहा ... आवडलय हे!!

मराठी कथालेखक's picture

21 Aug 2017 - 12:51 pm | मराठी कथालेखक

सध्या चांगली वाटत आहे. मुख्य आटोपशीर असेल अशी आशा ?
कुणी बघत आहे का ? काय वाटते ? कोण असेल सगळ्या गोष्टींच्या मागे ?

माझा मुख्य संशय सध्या मालतीवर आहे, सोबत दुर्गा मॅडम आणि हणम्या पण सामील असतील बहूधा.

ही सीरिअल तीन एपिसोड ठीक वाटली होती - पण नन्तर फार भंकस वाटली म्हणून बघायचे बंद केले. ओव्हरएक्टिंग आहे आणि डायरेक्टर ला नेमके कोणत्या दिशेला कथेला न्यायचे आहे हे कळत नाही.

गम्मत-जम्मत's picture

22 Aug 2017 - 11:19 am | गम्मत-जम्मत

काही महिने आधी संपलेली 'बनमस्का ' चांगली होती. ओढून ताणून शेवट झालेला पण refreshing वाटली.
झी युवा बऱ्या सिरिअल्स देत आहे. झी मराठी च्या तुलनेत.

अत्रे's picture

23 Aug 2017 - 9:58 am | अत्रे

+१

गम्मत-जम्मत's picture

22 Aug 2017 - 11:31 am | गम्मत-जम्मत

रुद्रम सध्या तरी छान वाटत आहे. नंतर कंटाळवाणी करून दिग्गज कलाकारांची वाट लावली नाही म्हणजे मिळवलं.
मुक्ता चा अभिनय अप्रतिम. यातले संवाद कुणी लिहिलेत माहिती नाही, पण उत्तम जमलेत. रोजच्या व्यवहारात बोलावेत तसे आहेत. खास करून वंदना गुप्ते आणि मुक्ता यांच्यातले संवाद.

ती आत्महत्येचा प्रयत्न करते तेव्हाचे तिचे आणि वंदनाताईंचे सिन्स अफाट आहेत. संवाद तर अगदी रोजच्या बोलीतले. सहज- उस्फुर्त अभिनय. मी ही मालिका सुरुवातीपासून बघायची आहे म्हणून ठेवलिये.

कादिप बघणे बंद केलेय. वाईट मालिका आहे.
खुखुखु बघत नव्हते पण लॉकरचा कोड शोधण्याचं काहीतरी चाललं होतं म्हणून सुरुवात केली. आता तर ईशाचा जनक एंटरलाय.
एकूणातच बीनडोकपणाचा कळस आहे. सगळे हुच्च्शिक्षित दाखवलेत पण वागणुकीतून तसं दिसत मात्र नाही.
एकत्र कुटुंबात स्वयंपाक पाणी करून जावा जावा दमत नाहीत का? नेहमी नीटनेटक्या आणि बथ्थड दाखवतात.
मुलाच्या आयुष्यात इतकी संकटे आलियेत तर वडील म्हणजे संजय मोने तसे शांत दाखवलेत.
उलट आत्यानेच दरवेळी पुढाकार घेतलेला दिसतोय.
मानबा पाऊन माझे नागपुरी प्रेम उतरणीला लागेल असे दिसतेय. बीनडोक प्रकार आहे.
आपल्या मुलाबद्दल सिरियस तक्रारी ऐकून वडील एकदाही शंका घेत नाहीत हे पाहून अवर्णनीय आनंद झाला.
राधिकाही पतीभक्तीमध्ये बुडून गेलिये. आता अठवड्यातून एकदाच ती मालिका पाहणार आहे.
तुझ्यात ज्यू रंगला ही मालिका नुकतीच सुरु केलीये. त्यातील शेवटची पाच मिनिटे पाहिली तरी पुरते.
शिक्षणमंत्री झालेल्या माणसाचा अभिनय व शाळेतील मुलांचे डायलॉग्ज आवडतात.
रानादा लैच्च भोळा सांब दाखिवलाय. बाकी काही पहात नाही.
एकूण रोज पंधरा मिनिटात जेवढं मावेल तेवढच प्रेम मालिकांवर करते.

गम्मत-जम्मत's picture

23 Aug 2017 - 11:13 am | गम्मत-जम्मत

कसलं हो नागपुरी, एक हि पात्र धड नागपुरी ढंगाचं मराठी बोलत नाही. सगळ्या क्रियापदानंतर 'राहिले' वापरलं कि नागपुरी मराठी असं वाटत त्यांना. :):)
सासू सासरे आले कि हि सिरीयल पाहतात. त्यामुळे डोक्यात जाणारे संवाद ऐकावे लागतात :D

काही वर्षांपूर्वी चार दिवस सासूचे जे सुरु झालेत, ते अजून संपायचे नाव नाही. आता दुःखानी म्हणायला लागतं की सासू माझी सिरीयल किलर.
इतक्या बथ्थड , बिनडोक मालिका आणि ते बघत समोर बसलेले तितकेच बिनडोक प्रेक्षक. हे चित्र बहुतेक बदलणार नाही असं दिसतंय.
फार पूर्वी सई परांजपे ची चाळवा चाळव चुकवायचो नाही.
असो. त्यामानाने मराठी चित्रपट चांगले आणि सर्वात महत्वाचे 3 तासांत संपणारे म्हणून बघवेसे वाटतात.

अभिदेश's picture

23 Aug 2017 - 8:50 pm | अभिदेश

सई परांजपे ची नव्हती. विनय आपटे दिग्दर्शक होते. खूप छान होती. ह्यातले अनेक कलाकार आत्ता मोठे स्टार झाले आहेत. उदा. सचिन खेडेकर , सुनील बर्वे

चष्मेबद्दूर's picture

23 Aug 2017 - 10:18 pm | चष्मेबद्दूर

दिग्दर्शक विनय आपटे असतील.
पण विषय मस्त आणि फार छान मांडला होता.

अभिदेश's picture

24 Aug 2017 - 12:50 am | अभिदेश

विवेक आपटे लेखक होते. सई परांजपेंनी मराठी सिरीयल केल्याचा आठवत नाही. त्यांनी सगळ्या हिंदी मालिकाच केल्या.

सगळे तगडे कलाकार, उत्तम कथानक, मस्त नेपथ्य, आणि दिग्दर्शन. सगळं काही उत्तम जमून आलं होतं या मालिके साठी. अजून एक अशीच दादा मालिका म्हणजे आभास. डॉ. गिरीश ओक, कीर्ती शरद, डॉ. उत्कर्ष नाईक, आणि सुहास पळशीकर यांची हि एक उत्तम मालिका. राजन वाघधरेयांचे दिग्दर्शन त्या नंतर फारसे पाहायला मिळाले नाही. रुद्रम जर त्यांनी दिग्दर्शित केली असती तर एका वेगळ्याच उंचीवर नेली असती.

मला श्वेतांबर पण आवडली होती आणि गजरा या मालिकेचे काही भाग फारच मस्त जमून आले होते.

जाहिरात फिरतेय.
राधिका: पुढच्या वर्षी गणपती बसायच्या आत शनाया आमच्या आयुष्यातून गेलेली असेल.

तात्पर्य: मालिका अजून किमान एक वर्ष चालण्याची शक्यता आहे.