साडी नेसणे ही आदिम ,कालबाह्य प्रथा स्त्रीयांनी बंद करावी का????

टर्बोचार्जड फिलॉसॉफर's picture
टर्बोचार्जड फिलॉसॉफर in काथ्याकूट
14 Aug 2017 - 8:23 pm
गाभा: 

साडी!!! कुणी साडी म्हणतात,कुणी लुगडं ,कुणी आंग्लाळलेले सारी म्हणतात.पण प्रकार एकच.नेसण्याच्या पद्धती अनेक असल्या तरी कुठलीच पद्धत स्त्रीयांना कंमर्टेबल असेल असे वाटत नाही.नौवारी,पाचवारी,गुजराती एक ना एक अनेक नेसण्याच्या पद्धती.
तर!!! विषय डोक्यात यायला कारण म्हणजे मागच्या आठवड्यात पुण्याला गेलो होतो.गाडी नेली न्हवती त्यामुळे बसने प्रवास करत होतो.एका बस स्टॉपवर उभा होतो.बाजुच्या टपरीवरुन सिगारेट घेऊन ती ओढत शहरी लोकांची धावपळ बघत उभा होतो.शेजारी हालचाल जाणवली ,बघितले तर एक ललना बसची वाट बघत चलबिचल करत उभी होती.हातात मोठी पर्स होती, वैतागलेली वाटत होती याअर्थी नक्कीच कुठेतरी कामाला असणार ,तिथुन सुटल्यावर तिची घराकडे जायची घाई चालली होती.
एक बस लांबुन येताना दिसली ,तशी ती थोडी पुढे होऊन लगबग करायला लागली.पुणेरी वायझेड पीएमटी वेगात येऊन फक्त थांबल्यासारखि करत निघायला लागली तशी ती ललना धावतच चढायचा प्रयत्न करण्यासाठी बसकडे झेपावली.पुढच्या क्षणाला तिचा पाय साडीत अडकून तिचा कपाळमोक्ष झाला.तिला ' उठवायचे ' निमित्त करत दोन तीन पन्नाशीचे काका लोक सरसावले.कशासाठी सरसावले हे लिहीत नाही .अश्यावेळी हात साफ करुन घेणारे आंबटशौकीन फार असतात,त्यातलेच हे होते.मी सिगरेट हातात असल्याने लांबच थांबुन हे बघत होतो.बस केव्हाचीच निघुन गेली होती.उठुन उभे राहील्यावर तिने पाणि पिले.एव्हाना माझी सिगरेट संपत आल्याने मी ती विझवली व तिच्याशी संवाद साधायला तिच्याजवळ गेलो.
मी.-- लागलं का मॅडम?
ती- नाही,थोडंसं हाताला लागलं
मी--साडीत पाय अडकून पडलात ना?
ती-- हो.
मी--ड्रेस असता तर पड्ला नसतात!(ड्रेस-पंजाबी या अर्थी)
ती-- हो ना,
मी-- ड्रेस का वापरत नाही ?
ती-- घरी चालत नाही ड्रेस घातलेलं.
संवाद आता खाजगीत चालला होता ,अशावेळी मी काहीतरी निराळेच पचकतो म्हणून आवरते घेतले.माझी बस आली तसा मी बसमध्ये चढलो.मागे वळून बघितल्यावर तिने फक्त स्मित केले.
मग विचार करु लागलो,कुठल्या वायझेडने पुरुषांना धोतर व बायकांना साडी हा प्रकार सुरु केला असेल.? काय आहे या पेहरावात मिरवण्यसारखे? .एक कापड ज्याला ना कसली शिलाई आहे ना आकार उकार.ते अंगावर गुंडाळुण फिरायचे.पुरुषांनी कामाचे निमित्त करुन धोतरातून सुटका करुन घेतली.पण बायका मात्र त्याच आदिम वेशभुषेला चिकटून राहील्या आहेत.न्हवे त्यांना तसे रहावे म्हणून फोर्स केले जाते.
काम करणार्या स्त्रीयांनीच फक्त कंम्फर्टेबल वेशभुषा करावी असा काही दंडक नाही.घरात असणार्या स्त्रीयानीही पंजाबी अथवा तत्सम कपडे वापरले तर काय वाईट आहे.? घरात साडी नेसुन स्वयंपाक करताना पदर पेटून आजवर कीती स्त्रीया मेल्या आहेत याची तर गणतीच नाही.
तर संस्थळावरील स्त्री पुरुष दोघांनीही या विषयी चर्चा केलेलि आवडेल.
१.साडी नेसने हे तुम्हाला आदिम वाटते का ?
२.साडीमध्ये कंम्फर्ट नसावा/ नाही असे माझे मत आहे.आपले काय मत आहे.?
३.साडीला संस्कृतीशी का जोडले जाते? म्हणजे साडि नेसणारी सुसंस्कृत व इतर वेशभुषा करणारी स्त्री ही बदफैली वा चालू असते!!
(पंजाबि ड्रेस,जिन्स टीशर्ट कंफर्टेबल आहे स्त्रीयांसाठी असे माझे मत आहे.लेगिंग्ज मला प्रोव्होकेटीव्ह वाटतात ,त्यावर एक धागाही काढला होता.कृपया त्यावरुन विषयांतर नको)

प्रतिक्रिया

पगला गजोधर's picture

14 Aug 2017 - 8:48 pm | पगला गजोधर

तुम्ही साड़ी हा विषय घेऊन धागा काढला, त्यामुळे काही कंपू इकडे खचितच फिरावे, त्या ऐवजी तुम्ही बुरखा हा विषय घेऊन धागा काढला असता तर, तुमच्या समर्थनार्थ एवहाना टोळ धाड़ आली असती.

टर्बोचार्जड फिलॉसॉफर's picture

14 Aug 2017 - 8:58 pm | टर्बोचार्जड फिलॉसॉफर

दोन आठवड्यापुर्वी काढला होता.प्रशासनाने उडवला.

थिटे मास्तर's picture

15 Aug 2017 - 12:32 am | थिटे मास्तर

ट.फि. आय डी ने धागा काढायचा अन पहिलाच परतीसाद दुसर्या हाय डी ने मज्जाय ;)
डोक्यावर हुड अन उघडे बुड हे नविन टायटल घेवुन धागा काढा ताम्हनकर.

सूड's picture

15 Aug 2017 - 9:50 am | सूड

ताम्हनकर

परिकथेतल्या राज्याचं काय झालं?

दशानन's picture

14 Aug 2017 - 8:59 pm | दशानन

पहिल्यांदा तुमच्या या विषयावरील लेखाबद्दल आभार!
स्त्रियांनी खरोखर विचार करावा या प्रश्नावर.

ज्योति अळवणी's picture

14 Aug 2017 - 9:27 pm | ज्योति अळवणी

साडी नेसणे आदिम वाटत नाही

साडीची किती सवय आहे यावर कंफोर्ट अवलंबून असतो

साडीला 'दुर्दैवाने' संस्कृतीशी जोडले जाते

ही तुमच्या प्रश्नांची उत्तरे

आता माझे मत: भारत देशात वस्त्र हे पुराणकाळापासून गुंडाळण्याची प्रथा आहे. शिवण ही कला खूप नंतर आली. पुराणकाळात शकुंतला दुष्यंताला बघते आणि यौवनातील भावनेमुळे तिची चोळी घट्ट झाल्याचे तिला जाणवते. त्यावेळी ती तिच्या सखीला चोळी सैल करायला सांगते. याप्रसंगातून हे लक्षात येते की त्यावेळी स्त्रिया वक्ष झाकण्यासाठी देखील वस्त्र गुंडाळायच्या. आणि पुरुषांप्रमाणे धोतर असायचे. पूर्वी अशा प्रकारच्या वस्त्रांना उत्तरीय आणि अधनिय म्हणत. पुरुष देखील धोतर आणि वर ओढणी सदृश उत्तरीय घेत. त्याकाळी घोड सवारी, घनदाट जंगलातील फिरणे याच पोशाखात होत असे. पण त्यावेळी अधनियचा 'काचा' इतका घट्ट असे की कोणतीही कृती अवघड वाटत नव्हती.

त्यानंतर इतिहास काळाचा विचार केला असता स्त्रिया नऊवारी साडी नेसत. हा पेहेराव देखील extention of धोतर असं म्हणता येईल. मुळात पुराण आणि इतिहास काळातील 'धोतर' जर व्यवस्थित नेसले तर ते अजिबात त्रासदायक होत नाही.

परंतु त्यानंतर हळूहळू नऊवारी साडीची जागा पाचवरीने घेतली. अर्थात माझे मत देखील हेच आहे की पाचवारी साडी uncomfortable असते. कितीही नीट नेसले तरी जरा हात वर केला तर पोट दिसते. धावताना अडचण होते. अर्थात पासचवरी साडी हे नऊवारीच्या विरुद्ध म्हणजेच तात्कालीन समाजाच्या विरुद्ध बंडखोरीचे द्योतक आहे. जसे पुढे पाचवरीला नाकारून पंजाबी ड्रेस आला आणि आता जीन्स आणि टॉप हे देखील अगदी पन्नाशी साठीच्या शहरी स्त्रिया सहज घालायला लागल्या आहेत.

त्यामुळे पाचवारी नेसणे अनिवार्य नसावे. परंतु साडी नेसण्यात एक eligence आहे... तो ज्यांना आवडतो आणि अशी साडी सांभाळता येते त्यांनी जरूर साडी नसावी

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 Aug 2017 - 9:43 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मला व्यवस्थित चापुन चोपुन साडी नेसलेल्या स्त्रीया मनापासून आवडतात. बाकी, ज्याचं त्याचं स्वातंत्र्य...काय नेसायचं ते नेसा.... विषय संपला. :)

अवांतर : आपली पाठ दिसत तर नसेल ना,या वेडापायी काही स्त्रीया सारखे त्या साडीला वर ओढ़त असतात इतकं विचित्र दिसतं ना ते की विचारु नका. पण सांगेल कोण आणि ऐकणार कोण. :(

-दिलीप बिरुटे

विशुमित's picture

14 Aug 2017 - 10:06 pm | विशुमित

+१

थिटे मास्तर's picture

15 Aug 2017 - 1:00 am | थिटे मास्तर

वाह प्रा.डॉ. रशिक सुद्धा हैत.
सर ते श्रीगणेश मालिकेत पाली भाषेतला लेख लिवायच घ्या की जरा मनावर.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

15 Aug 2017 - 5:21 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>>> वाह प्रा.डॉ. रशिक सुद्धा हैत.
लै रसिक आहे हो. पण सध्या जगरहाटीत जाम गुंतलोय. सालं तितकं यायला आणि लिहायला नीट जमना. :(

बाकी,पाली भाषेचा आणि माझा काय संबंध नाय हो.कुठे तरी चर्चेत आम्ही पुस्तकातुन त्या पाली भाषेवर गप्पा मारल्या होत्या असे आठवते.

च्यायला, मिपावर आलो नाय तर लोक माझा पुतळाही उभा करतील. आणि खाली लिहितील मिपा कारकीर्द इस. २००६ ते २०१७. ;)

-दिलीप बिरुटे

हैकीनै सर, उगी परेशान व्हु नका ओ,
द्या उगी एक च्यकच्यकच्यकच्यक असा कंटिन्यु चोप्य्पस्ते लेख. मधे मधे स्पेसा आणि प्यारेग्राफ टाका उगी शोला.
हितं कुनाला येते वाचाया पाली?
पुतळा उभाराय्ची आय्ड्या मात्र जबर हाय.
आजच निधी जमवायला चालू करतो.

पैसा's picture

14 Aug 2017 - 10:39 pm | पैसा

आदिम अवस्थेत कपड्यांचा शोध लागला नव्हता.

टापटीप नेसलेल्या असतील तर खरोखरच साडी शोभते. काहीजणी बळंच गुंडाळून येतात, त्यापेक्षा ड्रेस घाला. काही मात्र नऊवारीपण इतकी व्यवस्थित carry करतात की बस रे बस!!

साडी नेसल्यावर गौर सजवल्यागत ठाण मांडून एकाजागी बसणार्‍यांनी मात्र झेपत नसेल तर करु नये ते धाडस.

आणि हो, साडीचा आणि संस्कृतीचा संबंध तुम्ही लावलाय किंवा तो आहे असं तुम्हाला वाटतंय.

थिटे मास्तर's picture

15 Aug 2017 - 2:04 am | थिटे मास्तर

हेला काकांची संस्कृती पोहायला शिकली का बुडाली?

योगेश लक्ष्मण बोरोले's picture

15 Aug 2017 - 5:06 pm | योगेश लक्ष्मण बोरोले

मला स्वतःहा धोतर घालायला आवडते. सुट्टिच्या दिवशी घरी व बाहेरही दिवसभर धोतरात रहायला आवडते. पत्नीलासुध्धा साडीत (९ /५ वार) फिरायला आवडते. बर्‍याचवेळा आम्ही या पोषाखांमध्ये जीवाची मुंबई करायला बाहेर पडतो व लोकल, बस पायी कम्फर्टेबली भटकुन येतो.
संस्कृृतीचे म्हणाल तर आजी, आजोबा हाच पोषाख घालायचे त्यामुळे असा पोषाख घातल्यावर त्यांच्याशी नाळ जुळुन असल्याची भावना मनात येते. ईतर पोषाख (पंजाबी, जीन्स ई) बदफैलीपणा दर्शवतात असे म्हणणे मुर्खपणाचे आहे. मात्र काॅलेजात असल्यापासुन, धोतर घातले कि कुठल्याही प्रकारचा अवखळपणा करायला माझे मन धजत नाही, हे मात्र अनुभवलेय. कदाचित आजोबा वगैरेंच्या छबीमुळे असेल. बाकि प्रत्येकाला त्यांच्या सोयीनुसार, प्रसंगानुरुप व सामाजीक नितीनियमांना धरुन आपापल्या आवडीचे पोषाख घालायचे स्वातंत्र्य हवेच. स्त्री असो वा पुरुष.

जेम्स वांड's picture

15 Aug 2017 - 5:14 pm | जेम्स वांड

मला माझ्या आजोबांशी नाळ जोडलेली फील करायला धोतरे नाही घालू वाटली कधी, त्यांना त्या वयात त्यांच्याशी खेकसून न बोलता, दिवसभराच्या धावपळीतुन पंधरा वीस मिनिटे गळ्यात पडले तरी नाळ घट्ट असल्याचे जाणवते, हे आमचं वैयक्तिक मत होय.

योगेश लक्ष्मण बोरोले's picture

15 Aug 2017 - 8:09 pm | योगेश लक्ष्मण बोरोले

??

जेम्स वांड's picture

15 Aug 2017 - 10:27 pm | जेम्स वांड

आजी आजोबा जिवंत असताना त्यांना भरपूर वेळ दिला, ते रुग्णाइत होते तेव्हा त्यांची सेवा केली, म्हातारा म्हातारीने अतिशय शांतपणे डोक्यावरून हात फिरवून माया केली होती जायच्या आधी, जायच्या आधीच त्यांनी कितीवेळा 'आम्ही तृप्त मनानं जाऊ' बोलून दाखवलं होतं, त्यामुळे त्यांच्या आशीर्वादाने आजही माझी त्यांच्याशी नाळ जुळलेली आहे(च) धोतरे न नेसता!,

गेलेलं मनुष्य जातंच हो, नंतर धोतरे नेसून उपयोग नसतो हे आमचं प्रांजळ मत, असं पेहराव अन सवयी उचलून नाळ जुळते म्हणणे मला वैयक्तिक पटत नाही इतकंच, तुम्हाला तसं मानायचं स्वातंत्र्य आहे(च) अन मला त्याचा आदर आहे(च) :)

आम्ही सेवा केली ते बरंच झालं, आमचं म्हातारं तंबाकू खायचं, च्यायला नाळ जोडायला फुकट बार भरायला लागला तर आम्ही फ्लॅट होऊन जाऊ ::))

मराठी कथालेखक's picture

15 Aug 2017 - 6:07 pm | मराठी कथालेखक

साडीत कम्फर्ट किती हे प्रत्येक स्त्री अवानुभवानेच सांगू शकेल. पण अनेक स्त्रिया सक्ती नसतानाही हौसेने अधूनमधून / वरचेवर साडी नेसतात. (गिरीजा ओकला बघा हवं तर फेसबूकवर.. प्रत्येक साडीच कौतूक मिरवत असते).
बाकी साडी नेसणार्‍या काही स्त्रिया (सगळ्या नव्हे) सतत एका हाताने साडीला वर धरुन चालतात, हे मात्र मला खटकतं. ज्या पोशाखाला सावरण्याकरिता केवळ सतत एक हात व्यस्त रहात असेल तो पोशाख न घालणेच योग्य असं मला वाटतं.

मराठी कथालेखक's picture

15 Aug 2017 - 6:12 pm | मराठी कथालेखक

साडीत कम्फर्ट किती हे प्रत्येक स्त्री स्वानुभवानेच सांगू शकेल

राही's picture

15 Aug 2017 - 6:37 pm | राही

साधारण दहाव्या शतकाच्या आगेआगे सरळसोट विणलेल्या कापडाचे तुकडे जोडून 'कपडे' (क्लोद्स) शिवण्याची कला अवगत आणि प्रचलित झाली असावी असे मानतात. अर्थात सुरुवातीला ही सोय फक्त राजे रजवाडे किंवा धनवान लोकांपुरतीच मर्यादित असावी. लाकडाच्या सुया कापड जोडण्यासाठी उपयुक्त ठरल्या नसाव्यात. चामड्याचे तुकडे जोडण्यासाठी कदाचित लाकडी किंवा हाडापासून बनवलेली सुईसदृश हत्यारे उपयुक्त होती. जेव्हा मेटॅलर्जी प्रगत झाली तेव्हा बारीक आणि न गंजणार्‍या शिवाय बारीक नेढे असलेल्या लोहशलाका बनवल्या जाऊ लागल्या. सूचि हा शब्द जुन्या काळी इतर प्रकारच्या सुईसदृश हत्यारासाठी वापरला जात असावा.
तरीही सर्वसामान्यांसाठी कपडे दुष्प्राप्यच होते. याचे कारण हाताने कपडे शिवणे हे काम मोठे कटकटीचे होते, अजूनही आहे. म्हणूनच पाच पाखी चोळीपेक्षा नऊ पाखी (नऊ तुकड्यांची) चोळी शिवणे हे फार कुशलतेचे काम मानले जाई. यामुळे धोतर आणि लुगडी बराच काळ वापरात राहिली. शिवाय काचा मारून कामासाठी सज्ज होण्याची सोयही त्यात होती. पण शिलाईयंत्राच्या शोधामुळे पेहेरावात आणि वस्त्रोद्योगात क्रांती झाली. कुठल्याही प्रकारचे जाडेभरडे कापड जोडता येऊ लागले. लांबलचक ताग्याची आवश्यकता उरली नाही. थोडक्या कापडात कपडे बनू लागले.
आज मोठ्या शहरांतील झोपडपट्ट्यांत अथवा छोट्या सदनिकांत साड्या वाळत घालण्याइतकी जागा नाही. साड्या धुणे त्रासदायक आणि वेळखाऊ ठरते. तेव्हा आपसूकच साडी मागे पडत चालली आहे. मोठ्या प्रमाणात बनल्यामुळे किमतीने कमी असणार्‍या तयार कपड्यांचा वापर वाढला आहे. गावांत प्रौढ बायका अजूनही साडी वापरतात. पण शहरात साडी कालबाह्य ठरली आहे. त्यासाठी कोणी काही प्रयन केलेले नाहीत. हे आपोआपच घडले आहे. शिवाय सुती कपडेही सर्वसामान्यांच्या वापरातून जात चालले आहेत. कृत्रिम धाग्याच्या कपड्यांना मागणी आहे. सुती कपडे ही श्रीमंतांनाच परवडणारी चैन ठरू लागली आहे.
साडी नेसणे मुद्दामहून किंवा मोहीम काढून बंद करण्याची आवश्यकताच नाही. साडी आपोआपच कालबाह्य झाली आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

15 Aug 2017 - 9:24 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>>साडी आपोआपच कालबाह्य झाली आहे.

नाही. साडी अजुन कालबाह्य झालेली नाही,होणार नाही. माझ्या सारखे चोखंदळ साडी रसिक जीवंत आहेत तो पर्यन्त
साडीला मरण नाही. आणि तुमच्या जिद्दीवर माझ्या मैत्रिणीला साडी कंपलसरी करेन. (मिसेस ला नै, कोण घेईल फुकटचा पंगा) :)

-दिलीप बिरुटे
(साडी नेसणा-या (सुंदर)महिलांचा फ्यान) :)

सुईसारखी दिसणारी वस्तू हडप्पा येथिल उत्खनात सापडली आहे. तरीही, तत्कालीन भारतात शिवणकला नव्हती असे मानायला जागा आहे कारण तसे इतर कोणतेच पुरावे (मूर्ती, भित्तीचित्रे) यावर दिसत नाहीत. बहुधा ती वस्तू अन्य कुठल्या कारणाकरीता (कोरीवकाम इ.) वापरली जात असावी.

शिवलेले कपडे वापरायची प्रथा गुप्तकाळात (३ रे शतक) सुरू झाली असे मानतात. अर्थात, सदर प्रथा फक्त वरच्या वर्गातच प्रचलीत असावी कारण कपडे शिवणे महाग होते.

परंतु, त्याहीपेक्षा महत्वाचा मुद्दा हा की, विणलेले कापड "एका मापात सगळे" ह्या न्यायाने, घरातील अनेक जण वापरू शकत. याउलट शिवलेला कपडा हा त्या-त्या व्यक्तीच्या अंगाच्या मापाने शिवलेला असल्यामुळे (त्याच्या सारखी अंगकाठी असलेले सोडून) अन्य कुणीही वापरू शकत नसत.

वस्त्रप्रावरणे आणि व्यक्तीस्वातंत्र्य यांचा जवळचा संबंध आहे!

साडी हजारो वर्षात कालबाह्य नाही झाली. आताही होणार नाही.
रोज किंवा सणावाराला साडी नेसून डोंबिवली सिएसटी लोकल प्रवास तेही खच्चुन भरलेल्या लोकलमधून करणाऱ्या असंख्य हौशी ललना बघत आले आहे.बघते आहे. साडी व्यवस्थित नेसलेली असेल तर धडपडायला होत नाही. किंवा सुटत नाही. तो एक डौलदार वस्त्र प्रकार आहे. तसाच कॅरी करायला हवा !

हतोळकरांचा प्रसाद's picture

16 Aug 2017 - 10:14 pm | हतोळकरांचा प्रसाद

हेच म्हणायचे आहे. दोन चार मोठ्या शहरात नौकरीनिमित्त बाहेर पडणाऱ्या स्त्रियांनी साडी नेसणे सोडले म्हणजे साडी कालबाह्य झाली? अजबच तर्कट आहे. जरा शहरांच्या बाहेर पडून बघितलं तर कळेल. शिवाय कम्फर्ट कमी म्हणून साड्या नेसत नाहीत की फॅशन नाही साड्यांची म्हणून देवच जाणे. काही दशकांपूर्वी सर्रास वापरला जाणारा अनारकली कि काय तो ड्रेस मध्ये बरीच वर्षे गायब होता आता परत सर्रास दिसू लागला आहे. असे म्हणतात की फॅशन रिपिट्स इटसेल्फ, कोण जाणे परत सर्रास साड्या दिसू लागतील.

मराठी कथालेखक's picture

16 Aug 2017 - 12:22 am | मराठी कथालेखक

अनेक स्त्रियांच्या बाबत दैनंदिन जीवनातून साडी कालबाह्य झाली आहे हे खरेच आहे. फक्त सणासुदीला , हौस म्हणून , मिरवायचे म्हणून अनेक स्त्रिया साड्या नेसतात. कोणत्याही कार्यालयात बघा हवं तर , सामान्य दिवशी (म्हणजे कसलाही सण्/समारंभ नसताना) एखादी जरी मुलगी /स्त्री साडी नेसून आली तर फारच आश्चर्य वाटते.
आणि दर पिढीगणीक हे प्रमाण वाढत जाईल.
बाकी विशेष दिवशी नेसण्याचे वस्त्र म्हणून धोतरानेही अजून अस्तित्व टिकवलं आहेच..

मराठी कथालेखक's picture

16 Aug 2017 - 12:26 am | मराठी कथालेखक

पुढे जावून मी म्हणतो की आता ओढणी (पंजाबी कुर्ता आणि ओढणी) हे पण कमी होवू लागलंय.. ओढणीची कटकट नको असणारे वेगळ्या प्रकारचे कुर्ते नेसण्याकडे (म्हणजे जीन्स वा तत्सम पाश्चात्य पोशाख करायचा नसेल तेव्हा) मुलींचा कल वाढत आहे.

रोज न नेसणे म्हणजे कालबाह्य कसे म्हणता येईल? अजूनही सणासुदीला उत्सवाला साडी नेसाविशी वाटतेय तोवर साडी राहणार आहे समाजात.

जेम्स वांड's picture

16 Aug 2017 - 7:31 am | जेम्स वांड

नैमित्तिक वापर अजूनही असून रोज वापरण्याचे प्रचलन बऱ्यापैकी कमी झाले आहे , असे म्हणले तर चालावे बहुतेक

(एकदम मिपास्टाईल हुच्च साहित्यिक काहीतरी लिहिल्यासारखं वाटलं)

प्राची अश्विनी's picture

16 Aug 2017 - 9:28 am | प्राची अश्विनी

गेले दीड वर्षं कामावर जाताना बहुतेक वेळा साडी नेसते. Western outfit इतकंच साडी आवडते. आता सवय झाल्याने सोयीचं वाटतं.
पण रोज साडी नेसणा-यांचं प्रमाण कमी होतंय खरं.

टर्बोचार्जड फिलॉसॉफर's picture

16 Aug 2017 - 9:50 am | टर्बोचार्जड फिलॉसॉफर

सर्व प्रतिसादकर्त्यांचे आभार.
ज्योती ताई व राही यांचे विशेष आभार.

धकाधकीच्या जीवनात साडी वापरणे कमी झाले आहे हे मान्य केले तरीहि साडी कालबाह्य झाली आहे हे पटत नाही.
सौंदर्याच्या दृष्टीने पाहायला गेले तर साडीतील सालंकृत ललना अतिशय सुंदर दिसते. साडी हि स्त्रीच्या शरीर रचनेला पूरक अशी आहे. कमरेखाली साडी आणि कमरेवरती काही नाही आणि वर पदर यामुळे स्त्रीची वळणदार आकृतीला जास्त(accentuation of figure) उठाव येतो आणि ती जास्त खुलून दिसते. शिवाय पदर हवा तसा घेता येत असल्याने छाती झाकण्याची सोयही जास्त चांगली असते विशेषतः लोकांच्या अवांछित नजरेपासून(unwanted attention).
साडी हि शालीन आणि सोज्वळ/ मोहक दिसते. त्याच वेळेस पदर घेण्याच्या आणि चालण्याच्या पद्धतीने मादकही दिसू शकते.
शिवाय सुदृढ/ अतिविशाल स्त्रियांचे नितम्ब झाकले गेल्यामुळे बेढब आकृती ( फिगर) व्यवस्थित झाकली जाते. यामुळे साडी नेसून चवळीच्या शेंगेपासून अतिविशाल महिला आपल्या सौंदर्यात वाढ करू शकतात आणि आपली वैगुण्ये झाकू शकतात.
जीन्स आणि टॉप मध्ये मधला भाग जाड असलेल्या महिला वैगुण्ये झाकू शकत नाही हि वस्तुस्थिती. त्यातून अति विशाल महिला लेगिंग्स घालतात (त्यात तर आमच्या वैद्यकशास्त्राच्या पुस्तकात सेंट्रल ओबेसिटी वर लिहिल्याप्रमाणे दोन टाचण्यांवर लिंबू ठेवल्यासारखे)
हि वस्तुस्थिती आहे स्त्रीमुक्तीवादी यावर राळ उठवणार असतील तर "असो"

स्थितप्रज्ञ's picture

16 Aug 2017 - 11:11 am | स्थितप्रज्ञ

माझे मत: साडी वापरण्याचे ऑप्शन असावे. सक्ती नसावी. फुल्ल स्टॉप.

एक प्रश्न उगाच मनात आला.....

ते ५०शीतले आंबटशौकीन "हात साफ" करायला आलेत हे माहित असताना तुम्हाला सिगरेट टाकून द्यावी आणि (तुमच्या मनात असे काही नाही असे गृहीत धरून) त्या पडलेल्या बाईंना मदत करावीशी वाटली नाही का? पंधरा का सतरा रुपयांची सिगरेट एखाद्या स्त्रीच्या आत्मसंमानापेक्षा अधिक महत्वाची नक्कीच नाही यावर तुमचेही दुमत नसावे. तरी तुम्ही सिगरेट संपेपर्यंत बघत बसलात आणि नंतर फक्त साडी पेक्षा ड्रेस कसा कम्फर्टेबल असतो यावर चारचा करत बसलात हे अनाकलनीय आहे (No bad blood intended). असो!

या सिग्रेटवरून यावरून एक किस्सा आठवला (हलके घ्या). मी काम करत असलेल्या एका जुन्या कंपनीत आमचा (चेनस्मोकर) मालक मधेच (आठवड्यातून एकदातरी) आम्हाला सगळ्यांना केबिन मध्ये बोलवायचा. मग स्प्रिंगच्या आरामखुर्चीवर ती मागे रेटून जवळ जवळ आडवा होऊन आम्हा फ्रेशर्सना ओळीने कंपनीच्या खर्चात पुढचा ट्रेनिंग प्लॅन (जो दिल्ली, चेन्नई, इ ठिकाणी असायचा) सांगायचा.
उदा. (नावे काल्पनिक आहेत)
१. नरेश, तू दिल्लीला जा. तिथे CNC च ट्रेनिंग घेऊन ये.
सिगरेटचा एक झुरका
२. अर्जुन, तू चेन्नई ला जा. तिथे PLC च ट्रेनिंग घेऊन ये.
सिगरेटचा अजून एक झुरका
(वास्तविक कंपनीचे पुण्यातील ७-८ कर्मचारी वगळता पुण्याबाहेरही कोणीही नव्हते)

आम्ही जोमात यायचो आणि आपल्याला काहीतरी भन्नाट ट्रेनिंग मिळणार या आशेने खुश होऊन जायचो. बाहेर १६ वर्षांपासून त्याच कंपनीत काम करणारा पियुन आम्हाला बघून हसायचा आणि पुढील संभाषण काहीस असं व्हायचं
पियुन: काय, ट्रेनिंगला जाणार काय?
आम्ही (जोमाने): होssss
पियुन: दिल्ली आणि चेन्नईला का?
आम्ही: बरोबर
पियुन: साहेब हे सांगताना धूर सोडत होते का?
आम्ही (काहीसे दबकून): हो
पियुन (खिदळून): अरे मग ते ट्रेनिंग गेलं धुरात. तुम्ही कुठं जात नाय.
(आणि खरंच जोपर्यंत तिथे आम्ही होतो तोपर्यंत कोणीही कुठल्याही ट्रेनिंगला गेलं नाही).

टर्बोचार्जड फिलॉसॉफर's picture

16 Aug 2017 - 12:08 pm | टर्बोचार्जड फिलॉसॉफर

सिगरेटच्या धुराचा त्रास इतरांना होऊ नये म्हणून मी बराच मागे थांबलो होतो.पन्नाशीचे काका अधिच जवळ जाऊन लगट करण्याचा प्रयत्न करत होते.पण तो विषय नाही चर्चेचा म्हणून इथेच थांबतो.

मराठी कथालेखक's picture

16 Aug 2017 - 2:01 pm | मराठी कथालेखक

पंधरा का सतरा रुपयांची सिगरेट

सिगरेटच्या वाढत्या किंमतींबद्दलही एकदा चर्चा व्हायला हवी.
पंधरा वर्षांपुर्वी मी जेव्हा सिगरेट ओढायला सुरुवात केली तेव्हा २८ रुपयांना मोठ्या गोल्ड फ्लेकचे १० सिगरेट्सचे पॅकेट मिळत असे. किंवा एक घेतली तर तीन रुपये, आता एक सिगरेट १५-१६ रुपयांना मिळते. सिगरेट महाग झाली की ती न ओढणार्‍यांना खूप आनंद होतो.. (सिगरेट जाळत नाही, पण सिगरेट पिणार्‍यावर जळत असतात) .. तर असो.
बाकी Mond नावाची एक बारीकशी सिगरेट मिळते ती बरीच स्वस्त आहे (फ्लेवरप्रमाणे १२०/१४० ला २० चा पॅक ) आणि उगाच खूप वेळ धूर काढण्यापेक्षा थोड्या वेळात संपते.

सुबोध खरे's picture

18 Aug 2017 - 9:28 am | सुबोध खरे

सिगरेट महाग झाली की ती न ओढणार्‍यांना खूप आनंद होतो.. (सिगरेट जाळत नाही, पण सिगरेट पिणार्‍यावर जळत असतात)
पूर्ण गैरसमज
कोणीही सिगरेट पिणार्यावर जळत नसतो. उलट त्याची दया येत असते.
सिगारेट महाग झाली कि न पिणार्यांना आनंद होण्याचे काहीच कारण नाही उलट एखाद्याने सिगारेट सोडली तर नक्कीच आनंद होतो.
आपल्या पैशाने आपल्याच आरोग्याचा आणि पैशाचा धूर करणाऱ्या आणि इतरांना उग्र घाणेरड्या वासाचा, धुराचा त्रास, निकोटीन आणि कॅन्सर देणाऱ्या कांडी बद्दल हेवा वाटावा असे काय आहे?

मराठी कथालेखक's picture

18 Aug 2017 - 3:05 pm | मराठी कथालेखक

सिगरेट महाग झाल्याचं बातमीत दिसलं की "बरं झालं.. अजून महाग झाली पाहिजे" अशा प्रकारची प्रतिक्रिया न फुंकणार्‍यांकडून मी अनेकदा ऐकली आहे म्हणून मी ते म्हंटलं.

इतरांना उग्र घाणेरड्या वासाचा, धुराचा त्रास, निकोटीन आणि कॅन्सर देणाऱ्या कांडी बद्दल

अहो आजकाल अनेक ठिकाणी नो स्मोकिंग आहे (कार्यालय, हॉटेल ई) त्यामुळे फुंकणारे बिचारे दूर कुठेतरी एकांतात (किंवा समव्यसनी मित्र/मैत्रिणींसोबत) फु़ंकत असतात त्यामुळे कुणाला त्रास होण्याचं फारसं कारण नाही. घरातही आजकाल फारसं कुणी सिगरेट ओढत नाही... बहूतेकांना सिगरेट बायकोपासून लपूनच ओढावी लागते.

बाकी यावरुन एका मित्राची आठवण झाली. तो सिगरेट ओढत नसे पण त्याला सिगरेट ओढणार्‍या कंपूबरोबर बाहेर उभं रहायला आवडे कारण धुराचा वास त्याला आवडत असे.

आपण ४ दिवस घालून फिरवे नंतर विचार प्रकट करावे.

राही's picture

17 Aug 2017 - 12:24 am | राही

साडी नेसणे न नेसणे ही जिची तिची निवड . पण आज मुंबईसारख्या मोठ्या शहरात तरी साडी ही केवळ ओर्नॅमेंटल स्वरूपात उरली आहे. जपानमध्ये किमोनो जसा रोजच्या वापरातून जाऊन केवळ समारंभ आणि शिष्टाचारापुरता उरला आहे तसेच साडीचेही होत आहे. पस्तिशीचाळिशीपर्यंतच्या पिढीने साडीला रोजच्या वापरातून हद्दपार केले आहे . उगीच कुठेतरी साडी डे किंवा ट्रॅडिशनल डे किंवा नवरात्र गणपतीसारखे सणसमारंभ इतक्यापुरताच साडीचा वापर उरला आहे हे नक्की.

समीर वैद्य's picture

18 Aug 2017 - 12:32 am | समीर वैद्य

पण तेवढ्यात पुण्याला शिव्या घालण्याची खाज मिटवून घेतलीत टफी.......

जेम्स वांड's picture

18 Aug 2017 - 8:42 am | जेम्स वांड

१. टफी पुण्यात आले त्याचा उल्लेख अन
२. वायझेड पीएमटी

इतके लिहिले आहे त्यात 'शिव्या देण्याची खाज मिटवून घेतली' वगैरेचे खरंच प्रयोजन काय असावं?

साडी नेसणे .... हि प्रथा आहे अस मला वाटत नाही , कुठेही नेसावीच अशी सक्ती , नियम पाहिले नाहीत.
जगाच्या दृष्टीने साडी हे वस्त्र कदाचित भारत ,पाकिस्तान,नेपाल,श्रीलंका याच देशात परिधान केले जाते अशी मान्यता आहे.

काल स्थळ परत्वे , म्हणजे अगदी ऋषी मुनींच्या काळात सुद्धा अंगभर वस्त्रे होतीच .... त्या मागे केवळ ऋतू बदलातील परिस्थिती ( हवामान / तापमान ) शी सामना करता यावा किंवा त्यापासून शरीराचे संरक्षण व्हावे यासाठी ति अंगभर घालत्या येण्या जोगी डिझाईन झाली असावीत.
उत्तरोतर नवनवीन शोध लागत जाऊन त्यात झपाट्याने बदल झाले
भारता मध्ये अगदी काश्मीर ते कन्याकुमारी आणि राजस्थान ते आसाम , नेपाल पर्यंत फार पूर्वी पासून स्त्रिया अंगभर वस्त्र घालत आलेल्या आहेत

विकास झपाट्याने झाला , दळणवळणा ची साधने बदलत गेली , त्याप्रमाणे पायघोळ असलेली साडी हळूहळू कमी वजनाची ,कमी फेऱ्यांची,,नेसायला ,चालायला सोपं पडाव यासाठी बदलत गेली.

आत्ता मेट्रो सिटी मध्ये इतक्या वेगवान जीवनात वावरताना जुन्या साडीचे बदलते स्वरूप आपण पाहतच आलोय ( ९ वारी ते ५ वारी) अशा गर्दीत साडी नेसून सहजतेने हालचाल करणे खरच कठीण आहे ,
परंतु मी पंजाबी लोकांचे आपणावर अनंत उपकार आहेत असे मानतो

हिंदी फिल्म सृष्टी चे सिनेमे जेव्हा आपल्या आधीच्या पिढ्या पाहायला लागले आणि तेव्हा पंजाबी ड्रेस ८० च्या दशकात सर्वात लोकप्रिय केला . साडीला उत्तम पर्याय म्हणून पंजाबी ड्रेस ची लोकप्रियता प्रथम क्रमांकावर आहे

आजुबाजूच विश्व बदललं पण पेहराव बदलला नाही तर अशी कुचंबणा होते , आणि पूर्वी हि झाली असेल म्हणूनच साडीचे स्वरूप सातत्त्याने बदलत आले आहे.

साडीत तरुण स्त्री खरोखर सुंदर दिसते .... पण म्हणून साडीच नेसली जावी असा आग्रह धरणे हे यापुढे वेडेपणाचे ठरू शकते , सणासुदीला च साडी नेसणे सोयीचे वाटते , त्या मुळे साडी हि कालबाह्य झाल्याचे जाणवायला लागले आहे.

जपानमध्ये किमोनो जसा रोजच्या वापरातून जाऊन केवळ समारंभ आणि शिष्टाचारापुरता उरला आहे तसेच साडीचेही होत आहे.

राहिंच्या वरील निरीक्षणास सहमत

असेच काहीसे ९ वारी चे आणी भारतातील विविध पोशाखांचे झाले आहे.

सुविधा व्हावी म्हणून विद्यमान साडीच्या लांबी रुंदी मध्ये एखादे नवीन वर्जन आले तर त्याचा स्वीकार करणे एवढेच आपल्या हाती आहे.

त्यामुळे साडी कालबाह्य होऊ नये अशी इच्छा व्यक्त करतो

मराठी कथालेखक's picture

18 Aug 2017 - 3:34 pm | मराठी कथालेखक

या एकाच धाग्यात टफींनी समजातल्या अनेक अनिष्ट बाबींवर कळत नकळत टीका केलीय, तसेच त्यांच्या व्यक्तीमत्वातले अनेक गुण इथे आपल्याला आढळून येतात ... ह्या धाग्याचे अनन्यसाधारण असे सामाजिक महत्व बघता संपादकांनी मुखपृष्ठावर या धाग्याची शिफारस लवकरात लवकर करावी हि टफी फॅन्सची (म्हणजे कोण ते विचारु नका) जोरदार मागणी आहे..विषय तरी बघा
१) आंग्लाळलेले शब्द

कुणी आंग्लाळलेले सारी म्हणतात

२) शहरातील जीवनात काम आणि व्यक्तिगत आयुष्य यातील बिघडलेला समतोल

वैतागलेली वाटत होती याअर्थी नक्कीच कुठेतरी कामाला असणार ,तिथुन सुटल्यावर तिची घराकडे जायची घाई चालली होती

३) उत्तम निरिक्षण क्षमता

शेजारी हालचाल जाणवली ,बघितले तर एक ललना बसची वाट बघत चलबिचल करत उभी होती

, झालंच तर वैतागलेल्या स्त्रियांबद्दल सहानुभूती वगैरे...
४) थांब्याला नीट न थांबणारी वायझेड पी एम टी (पीएमपीएमल म्हणायला हवे .. पण टफी अजून मनाने जुन्या काळात रमत आहेत.. नॉस्टेलजिया !!)
५) आंबटशौकिन गृहस्थ
६) टफींचे आयुष्य रंगबिरंगी आहे आणि त्यांनी मोठ्या मनाने आंबटशौकिन गृहस्थांच्या 'हात साफ करण्यात' अडथळा आणला नाही (आपल्याला मिळणारा आनंद इतरांनाही मिळू द्यावा ही उदात्त भावना )
७) वाय न दवडणे - सिगरेट संपत आल्यावर विझवली , उगाच पंधरा-सतरा रुपयांची सिगरेट एका स्त्रीला मदत करण्यासाठी अर्ध्यात वाया घालवली नाही.
८) समोरच्याला बोलतं करण्याची हातोटी

संवाद आता खाजगीत चालला होता

९) स्वतःतल्या उणीवा जाणणे तसेच स्वयंनियंत्रण

अशावेळी मी काहीतरी निराळेच पचकतो म्हणून आवरते घेतले

१०) ललनेला प्रभावित करणारे व्यक्तिमत्व

मागे वळून बघितल्यावर तिने फक्त स्मित केले

बाकी साडीवगैरेबद्दलही काही लिहिलं आहेच त्यांनी...

टर्बोचार्जड फिलॉसॉफर's picture

18 Aug 2017 - 4:04 pm | टर्बोचार्जड फिलॉसॉफर

१०) ललनेला प्रभावित करणारे व्यक्तिमत्व
>>मी दाखवलेल्या आत्मीयतेने व थोड्या आधीच पन्नाशीच्या आंबट लोकांचा अनुभव आल्याने तिने माझ्यात चांगला माणुस पाहीला(जो मी नाहीए) .म्हणून तिने स्मित केले असावे.

विशुमित's picture

18 Aug 2017 - 5:55 pm | विशुमित

+१
ये मारा ११ ...

स्थितप्रज्ञ's picture

23 Aug 2017 - 2:50 pm | स्थितप्रज्ञ

Marathon on Saree

बरेच काही सांगून जाते हे चित्र. यांनी साडीवर अख्खी मॅरेथॉन धावली.

समाधान राऊत's picture

23 Aug 2017 - 4:16 pm | समाधान राऊत

मागे एकदा टफी तूच लेगिंग वर धागा काढला होता न ?? ते वापरू नये लय कस तरी होतं..वैगेरे आशयाचा धागा होता..आणि आता म्हणे साडी पण नेसू नये.. काय प्रोब्लेम काय रे तुझा ??

टर्बोचार्जड फिलॉसॉफर's picture

23 Aug 2017 - 4:52 pm | टर्बोचार्जड फिलॉसॉफर

लेगिंग प्रोव्होकेटीव्ह आहे असे मला वाटते म्हनून तो धागा काढला होता.

लेगिंग प्रोव्होकेटीव्ह आहे ( असं तुम्हाला वाटतं) आणि साड्या आदिम आहेत ( असं तुम्हाला वाटतं) म्हणून धागा काढलात, कमाल आहे.

अभिजीत अवलिया's picture

24 Aug 2017 - 3:36 pm | अभिजीत अवलिया

साडी अयोग्य, लेगिंग अयोग्य. मग तुम्हीच एखादे नवीन वस्त्र डिझाईन करा पाहू. कशी आहे कल्पना ?

हो ना राव..मला तर टफीभाऊंच्या पुढच्या धाग्यची भीती वाटतेय..कदाचित ते असंही लिहितील..

"वृक्षवल्लींनी बाहेर टाकलेला प्राणवायू भीक म्हणून नाकावाटे शरीरात घेण्याची आदिम आणि कालबाह्य प्रथा मानवाने बंद करावी का? मानव याबाबतीत स्वयंपूर्ण कधी होणार?"

इरसाल's picture

24 Aug 2017 - 4:27 pm | इरसाल

चिनार्‍या.......उं !!!!!!!!