माझ्या वाचनखुणा

mayu4u's picture
mayu4u in काथ्याकूट
13 Aug 2017 - 7:13 pm
गाभा: 

माझ्या वाचनखुणा

संदर्भ: http://www.misalpav.com/node/40580

नमस्कार!

संदर्भामध्ये दिलेल्या धाग्याच्या अनुषंगाने टेलिग्राम वर झालेल्या चर्चेत मिपा वरचे आपल्या आवडीचे लेख असा विषय झाला. त्यानुसार मिपा वरचे मला आवडलेले काही लेख/लेखमाला आणि त्यांचे दुवे:

पिसि .जेसि .आणि आउट. (रामदास)
http://www.misalpav.com/node/1708

राक्षस रसायनाची गोष्ट. (रामदास)
http://www.misalpav.com/node/2458

दलाल स्ट्रीटची काही वर्षं. (रामदास)
http://www.misalpav.com/node/3056

अगोचर. (रामदास)
http://www.misalpav.com/node/3022

काटेकोरांटीची फुलं. (रामदास)
http://www.misalpav.com/node/4488

चॉकलेट (जव्हेरगंज)
http://www.misalpav.com/node/36385
क्लिक! (कथा) (जव्हेरगंज)
http://www.misalpav.com/node/36409
डबलक्लिक!! (जव्हेरगंज)
http://www.misalpav.com/node/36432
गोरखधंदा (जव्हेरगंज)
http://www.misalpav.com/node/38448
(या चार कथा एकाच मालिकेतल्या आहेत, पण अन्य मालिकांसारखी यांना अनुक्रमणिका उपलब्ध नाहीये. आणि त्यामुळे पुढले भाग प्रकाशित झाले असल्यास मला कल्पना नाही. पुढील भाग आले असल्यास प्रतिसादात कृपया त्यांचे दुवे देऊन माझा दुवा घ्या!)

गँगस्टर (जव्हेरगंज)
http://www.misalpav.com/node/39275

बोटीवरील जीवन (स्वीट टॉकर)
http://www.misalpav.com/node/35243

१९९६ माऊंट एव्हरेस्ट (स्पार्टाकस)
http://www.misalpav.com/node/27279

मोसाद (बोका-ए-आझम)
http://www.misalpav.com/node/34116
द स्केअरक्रो (बोका-ए-आझम)
http://www.misalpav.com/node/31642

ऑपरेशन थंडरबोल्ट - एंटबे होस्टेज रेस्क्यू (मोदक)
http://www.misalpav.com/node/33582

या व्यतिरिक्त अनेक आवडलेले लेख आणि लेखमाला आहेत. दुर्गविहारींची अनवट किल्ले लेखमाला, ट्रुमन यांच्या ताज्या घडामोडी आणि त्यावरचे अभ्यासपूर्ण प्रतिसाद, आणि अनेक… प्रतिसादांमधून भर घालत राहीन.

तुम्हाला आवडलेल्या लेखांविषयी प्रतिसादांमधून जरूर कळवा.

धन्यवाद!

प्रतिक्रिया

उपयोजक's picture

13 Aug 2017 - 7:47 pm | उपयोजक

चांगला उपयुक्त संग्रह आहे हा!

mayu4u's picture

13 Aug 2017 - 7:54 pm | mayu4u

तुम्हाला आवडलेल्या लेखांविषयी प्रतिसादांमधून जरूर कळवा.

Nitin Palkar's picture

13 Aug 2017 - 7:53 pm | Nitin Palkar

Really good 'Ready Recknor'.

Nitin Palkar's picture

13 Aug 2017 - 7:54 pm | Nitin Palkar

Really good 'Ready Recknor'.

Nitin Palkar's picture

13 Aug 2017 - 7:54 pm | Nitin Palkar

Really good 'Ready Recknor'.

बरेच लिखाण मी ऑनलाईन न वाचता, सेव्ह करुन वेळ मिळेल तसे ऑफलाईन वाचत असतो, त्यामुळे वाचनखुणा देणे शक्य होणार नाही पण मला मि.पा.वर आवडलेले लेखन आणि मालिका सांगायला आवडतील.
मिपावरचे जुने घागे मी उत्सुकतेने खणुन काढल्यानंतर बरीच रत्ने हाती आली. तात्या अभ्यंकर, रामदास, जयंत कुलकर्णी, पिवळा डांबीस, प्रभाकर पेठकर, बोका ए आझम, पैसा ताई, रेवती ताई, यशोधरा ताई, पिरा ताई यांचे लिखाण म्हणजे निव्वळ मेजवानी. कोणताही धागा उघडा आणि वाचा.
टवाळा आवडे विनोद असे समर्थ सांगुन गेले असले तरी आपणाला बुवा विनोदी लिखाण प्रंचड आवडते. धमाल मुलगा, टाराझन, स्नेहांकिता ताई, मोजी, पियुषा यांनी प्रचंड हसविले आहे. बर्‍याच निराश क्षणांना यांनीच सुसह्य केलेले आहे. यांचा केवळ ऋणी राहिन. फारएन्ड यांचे चित्रपट परिक्षण मुळ पिक्चरपेक्षा भारी.
राजकारण या प्रांताची केवळ नफरत होती. पण क्लिंट्न, श्रीगुरुजी, विकास आणि त्यांचा बरोबर चर्चेचा किस पाडणारे संदिप डांगे, आनंदी गोपाळ आदी प्रभ्रुती यांनी माझी राजकीय समज वाढवली हे नक्की. यासाठी याना खुप धन्यवाद.
तंत्र विषयक लिखाण हा आणखी एक आवडीचा प्रांत. वेल्लाभट यांची एक्सेलची मालिका, ट्वाळ कार्टा व कॅप्टन जॅक स्पॅरो, परिकथेतील राजकुमार यांचे लिखाण जबरदस्त आहे. सध्या अनिकेत कवठेकर चांगले लिहीत आहेत.
अजया ताई, सुबोध खरे यांचे वैद्यकिय विषयावरचे लिखाण खुपच चांगले आहे. या विषयावर आणखी लेख येण गरजेचे आहे.
जॅक डॅनियल्स यांची सर्पविषयक मालिका जबरदस्त, खरेतर त्यातील लेख सर्वांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे. सुबोध खरे यांची पुर्वेच्या समुद्रात सुध्दा मला फार आवड्ली. स्पार्टाकस यांचे लिखाण कसे विसरता येईल. सायकल विश्वाची सफर घडवून आणुन अनेकांना सायकलींग करायला प्रवृत्त करणारे मोदक यांचे लिखाण, किंवा वाटेल तसे फोटो काढणार्‍या आम्हा ढ मंडळीना फोटोग्राफी म्हणजे काय ते शिकविणारी एस यांची मालिका फारच महत्वाची आहे. अतृप्त आत्मा यांचे गुरुजींचे विश्व मुळे एका नवीन जगाची ओळख झाली. स्पा यांच्या भयकथाही अफलातुनच. या शिवाय तुमचा अभिषेक, अभ्या, महामाया, आदित्य कोरडे यांचे ही लिखाण मस्तच. सध्या ऑस्ट्रॉनॉट विनय, जव्हेरगंज, माहितगार यांच्याही लेखनाचा मी चाहता आहे. वरूण मोहिते यांनी त्यांचे अनुभव आणखी शब्दबध्द करावे.
भटकंती आणि ईतिहास हा तर जिव्ह्याळ्याचा विषय. किंबहुणा त्यामुळे तर मिपावर आलो. वल्ली ( प्रचेतस) , बॅटमन, मालोजीराव, मन१, जयंत कुलकर्णी यांचे लिखाण कोणत्याही जड्जंबाळ पुस्तकापेक्षा विषय सोपा करुन सांगतात. पैकी बॅट्मन, मालोजीराव आता लिहीत नाहीत याची खंत आहेच. स्वच्छंदी मनोज, सुहास झेले, बजरबट्टू, सतिश कुडतरकर यांचे रॉक क्लाईम्बिगवरचे थरारक लिखाण, मनराव, गणपा, सह्यमित्र, अप्पा जोगळेकर ,हृषिकेश पांडकर,कंजुस ह्या सर्वांचे लेख भटकंतीसाठी उपयोगी पडतील असेच आहेत. डॉ. सुहास म्हात्रे यांनी त्यांचे लेखणाचे पुस्तक करावे. ते सर्वांनाच प्रंचड उपयोगी पडेल यात शंका नाही.
या शिवाय असंख्य कथा आणि ललित लेखनाने आंनद दिलेला आहे. कदाचित हे मिपा व्यासपीठ नसते तर ह्यांचे साहित्य ओळखीचे होउ शकले नसते. हा प्रतिसाद मी माझ्या आठवणीवर विसंबुन लिहीलाय, अजुन बर्‍याच जणांच्या लेखणाने खुप आनंद दिलाय, पण कदाचित माझ्याक्डून नाव लिहायचे राहिले असेल. मात्र आठवल्यानंतर मी आणखी एक प्रतिसाद देउन त्यांना जरुर दाद देईन. याच दर्जाचे लिखाण मि.पा.वर उत्तरोत्तर येत राहो. आणि असा घागा काढून स्मरणरंजन केल्याबध्द्ल मी mayu4u यांना धन्यवाद देतो.

mayu4u's picture

13 Aug 2017 - 10:14 pm | mayu4u

... आता तुम्ही उल्लेखलेले लेख वाचायला घेतो! :)

अमरेंद्र बाहुबली's picture

13 Aug 2017 - 9:27 pm | अमरेंद्र बाहुबली

www.misalpav.com/node/22461
कालच संपुर्ण मालीका वाचली. खरच खूप छान.

Munich Massacre ... हिची आठवण केल्याबद्दल धन्यवाद!

पैसा's picture

13 Aug 2017 - 10:38 pm | पैसा

मी मिपावर एवढे वाचले आहे की कोणाचे नाव घ्यावे अन कोणाचे नाही हे ठरवू शकत नाही. खूपदा प्रतिसादसुद्धा अतिशय वाचनीय असतात. तेव्हा प्रतिसादाना वाचनखूण का नाही याची हळहळ वाटते. या धाग्यालाच वाचनखूण करून ठेवले तर मोठे काम होईल!

mayu4u's picture

14 Aug 2017 - 10:39 am | mayu4u

प्रतिसादाना वाचनखूण का नाही याची हळहळ वाटते.

सहमत!

या धाग्यालाच वाचनखूण करून ठेवले तर मोठे काम होईल!

:)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 Aug 2017 - 3:58 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मिपावरील लेखक, लेखन प्रतिसाद एक अद्भुत खजिना आहे.

आपल्याला आवडतं त्या लेखांना शोधायचं. वाचायचं आनंद घ्यायचा आणि पुढे जायचं. राहवलेच गेलं नाही तर प्रतिसाद द्यायचा. कोणा नवं लेखकाला लेखन करायची प्रेरणा मिळाली तरी अशावेळी खुप आनंद होतो.

बाकी, त्यामुळे इथे स्पेशल काय आहे, हे सांगू शकत नाही. सर्वच स्पेशल आहे त्यासाठी अशा आयजीच्या जीवावरचा बायजीचा धागा काही पटला नाही, हे लम्रपणे सांगू इच्छितो. पुलेशु. :)

-दिलीप बिरुटे
(स्पष्ट)

mayu4u's picture

14 Aug 2017 - 8:29 pm | mayu4u

शुभेच्छा!

अमरेंद्र बाहुबली's picture

14 Aug 2017 - 5:47 pm | अमरेंद्र बाहुबली

काही माहिती हवी असेल तर मी विकिपीडिआ एवजी मिसळपाव वर शोधतो.