गणेशोत्सव हायजॅक ?

Primary tabs

पगला गजोधर's picture
पगला गजोधर in काथ्याकूट
12 Aug 2017 - 11:44 am
गाभा: 

"शिवजयंती सार्वजनिक उत्सव", याचे जनक महात्मा फुले असून, तो उत्सव हायजॅक होऊन, दुसऱ्या कोणाच्या नावे प्रोपागेंडा केला जात असू शकतो काय ?, याबाबत मागे मिपावर मी एक धागा काढला होता. (रेफ: शिवजयंती हायजॅक )

असो आता "सार्वजनिक गणेशोत्सवाचे" जनक कोण ? यासाठी भाऊ रंगारी गणेश मंडळांच्या विश्वस्तांनी थेट न्यायालयात याचिका दाखल करुन न्याय मागणार असल्याचे म्हटले आहे. इतिहासाचे चुकीचे लेखन करुन, बाळ गंगाधर टिळक यांच्या नावे गणेशोत्सव सुरु केल्याचे दाखविण्यात आले असले, तरी वास्तविकता मात्र वेगळीच आहे.
गणेशोत्सव कुणी सुरू केला असा प्रश्न आला तर उत्तर तोंडपाठ…लोकमान्य बाळ गंगाधर टिळक…हे आपल्याला अगदी शाळेपासून शिकवले गेले. पण गणेशोत्सव टिळकांनी नाही तर भाऊ रंगारी यांनी सुरू केला असा दावा या गणेश मंडळांच्या विश्वस्तांनी केला आहे. गेल्यावर्षी सुध्दा या मंडळाने महाराष्ट्र सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. सरकारने त्याकडे कानाडोळा केल्यानेच अखेर भाऊ रंगारी गणपती ट्रस्टने न्यायालयात याचिका दाखल केली.

1892 साली भाऊ रंगारी यांनी सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात केली. 1892 साली आणखी 3 मंडळांकडून गणेशाची स्थापना झाली. 1893 साली गणेश मंडळांची संख्या वाढून 20-25 वर गेली. 1894 साली विंचूरकर वाड्यात लोकमान्य टिळकांकडून गणेश मंडळाची स्थापना करण्यात आली तर लोकमान्य टिळक सार्वजनिक गणेश उत्सवाचे जनक कसे? फार फार तर त्यांना प्रचारक म्हटले गेले पाहिजे नाही का ?

तुम्हाला काय वाटते ?

(जाता जाता अवांतर : नामांकित न्यूज ब्युरो च्या संदर्भाने ...
"राज्य शिक्षण मंडळाच्या सातवी व नववीच्या अभ्यासक्रमातून मुघलांचा इतिहासच वगळण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत झालेल्या बैठकीनंतर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी हा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे." या बातमी मागच्या बातमीचा वर वरील उल्लेखलेल्या हायजॅकिंगच्या घटनांमागील एम. ओ. मधे काही साम्यस्थळे आढळतात काय ?)

प्रतिक्रिया

अमरेंद्र बाहुबली's picture

12 Aug 2017 - 12:25 pm | अमरेंद्र बाहुबली

मुघलांचा इतिहास वगळला. ह्यात धक्कादायक काय?? ते तर लूटारू होते. ऊलट मराठ्यांचा इतिहास वाढवला. हे आनंददायक. सकारात्मक विचार करा.

पगला गजोधर's picture

12 Aug 2017 - 12:47 pm | पगला गजोधर

तुम्हास आमच्याकडून कोपरापसुन हात जोडून नमस्कार _/\_

अमरेंद्र बाहुबली's picture

13 Aug 2017 - 1:01 am | अमरेंद्र बाहुबली

दंडवत घाला हो. कोपरापासून हात जोडून काही होत नाही.

mayu4u's picture

14 Aug 2017 - 7:05 pm | mayu4u

मुघलांचा इतिहास वगळला, हे वाईट झाले का?

कैच्याकै, आमच्या सोलापूरचा आजोबा गणपती 1882 ला 81 ला स्थापन झालाय. 135 वे वर्ष झाले त्यांचे. तो बघून तर लोकमान्य इंस्पायरर्ड झाले असा इतिहास आहे. हा भाऊ रंगारी कोण मधेच?

पगला गजोधर's picture

12 Aug 2017 - 12:45 pm | पगला गजोधर

तेच महंतोय, मग तुम्हीपन, खरा इतिहास पुढे आना । म्हणजे असे इतिहास बदलू लोक , लोकांच्या लक्षात येतील.

अडलंय की नडलंय? ते न्यायाधीश बघून घेतील खरा इतिहास वाचून काय सांगायचे ते.
.
अस्सल वाघ असल्या याचिका बिचिका नसतात वापरत ;)

पगला गजोधर's picture

12 Aug 2017 - 1:14 pm | पगला गजोधर

अस्सल आता कोण उरलय महाराजा ?
कोल्हा आता सिंहाच कातड ओढून वावरतोय, कातड सुद्धा चायना मेड.
याचिकाबिचिकेच्या ऐवजी इतिहास / पुरावे बदलन्याकड़े कल....

थिटे मास्तर's picture

12 Aug 2017 - 1:58 pm | थिटे मास्तर

मीत्राण्णो आपन आता थंड राहुया.
पानी पीयु आनी गानी गाउ.

श्रीगुरुजी's picture

12 Aug 2017 - 3:15 pm | श्रीगुरुजी

लोकमान्य टिळक सार्वजनिक गणेश उत्सवाचे जनक कसे? फार फार तर त्यांना प्रचारक म्हटले गेले पाहिजे नाही का ?

सार्वजनिक गणेश उत्सवाचे जनक लो. टिळक असोत वा भाऊ रंगारी वा शरद पवार, जे कोण असतील त्याने आज शष्प फरक पडत नाही. नक्की कोण होते हे समजून घेण्याची उत्सुकता नाही आणि गरजही नाही.

राज्य शिक्षण मंडळाच्या सातवी व नववीच्या अभ्यासक्रमातून मुघलांचा इतिहासच वगळण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

यात काय धक्कादायक आहे? मुघलांचा इतिहास काढल्याने काय फरक पडतो? तो इतिहास शिकण्याची गरजच काय?

पगला गजोधर's picture

12 Aug 2017 - 4:19 pm | पगला गजोधर

इतिहास शिकण्याची शस्प गरज जर नाही ? कोणी त्यावेळी कोणती भूमिका घेतली, आज काय बोलत आहेत, हे जाणून घेत नाहीत, तर शालेय इतिहासाची मोडतोड़ कशाला ?
बाबरी मस्जिद चा इतिहास न जाणून घेता का ती फोडली ?
महान परंपरा, अनेक स्मृत्या का उगाळल्या जातात मग ?
नेताजिंच्या मृत्युविशयक कुजबूजी अजूनही का करतात काही लोक ?

http://www.misalpav.com/comment/953575#comment-953575

याच न्यायाने बाबरी मशीद आणि गणेशोत्सव याचा संबंध नाही.
तुम्ही मुद्दाम संबंध नसलेल्या गोष्टी लिहिल्या आहेत का?

मुघल इतिहास वगळण्यात आला आहे हे नक्की काय? तसे असेल तर त्या पुस्तकांची माहिती देऊन वेगळा धागा काढून चर्चा करा.
पाठ्यपुस्तकात मुघल इतिहास आणि गणेशोत्सव भाऊ रंगारी याचा संबंध नाही
बाबरी मशीदीचा इतिहास तुम्ही वाचून माहिती करून मांडा. मोठा विषय आहे. खटल्यामुळे बरीच माहिती लोकांपर्यंत आली आहे.
त्यावर स्वतंत्र पुराव्यानिशी चर्चा करा.
त्याचा गणेशोत्सवाशी कसलाही संबंध नाही.

पगला गजोधर's picture

14 Aug 2017 - 2:07 pm | पगला गजोधर

धागा हा गणेशोत्सवा बद्दल नाहीये, तर काही ऐतीहासिक फॅक्ट आणि सदय स्थितितिल पब्लिक परसेप्शन बद्दल आहे, आणि आपल्याकडे पब्लिक परसेप्शन फेक इन्फो / न्यूज द्वारे इतिहास म्हणून ठसवन्याची कार्यपद्धत चांगलीच फोफावलिये,
पब्लिक परसेप्शन 2 प्रकारे प्रभावित केल जात आहे, पहिली कुजबूजी यंत्रने मार्फत, जस की टिळकानी गणेशोत्सवा ची सुरुवात केली, शिवजन्मोत्सव सुरु केला, वै
आणि दूसरी शैक्षणिक इतिहासात फेरफार करुन.

इतिहासात फेरफार करुन बाबरी मस्जिद ही राम जन्म भूमि होती, हे काही फार अवघड राहिले नाही, भलेही रामायण हे साहित्य आहे, इतिहास नाही.
उद्या काय तर हल्दी घाटतील लढाई अकबर हरला, अस पिल्लू सुद्धा सोडून देण्यात येईल, काय भरावसा ? पुढे तसाच इतिहास ही शिकवाला जाईल.

आय होप आता तरी धाग्याचा मुद्दा लक्षात आला असेल.

मैत्र's picture

14 Aug 2017 - 2:59 pm | मैत्र

"चुकीचा इतिहास लिहिला आहे किंवा प्रसार केला आहे" अशी मुद्दाम खोटी बोंब करून सामान्य जनतेची दिशाभूल करणे, मुद्दाम वादंग निर्माण करणे, वातावरण कलूषित करणे, जातीय कॉमेंट करणे, sweeping statements करून, वैयक्तिक मते तथ्य म्हणून ठोकून देणे.
ही ब्रिगेड ने तयार केलेली proven modus operandi आहे.

ब्रिगेड एक मुद्दा plan करून कुजबूज मोहीम सुरु करते. मग वर्तुळात विरोध निर्माण करते. नंतर वाद उभा करते.

याचा पुरावे देऊनही उपयोग होत नाही कारण मूळ समाज विघटन, दुहीचा हेतू साध्य झालेला असतो आणि त्यांना पुरावे सोयीचे आणि खोटे हवे असतात.

राजकारणासाठी समाजातील शांतता आणि सौहार्द बिघडवणे हे केवळ मानसिक नीचपणाचे आहे. महाराष्ट्रात असे लोक आहेत हे भयानक दुर्दैवी आहे

थिटे मास्तर's picture

12 Aug 2017 - 3:35 pm | थिटे मास्तर

मुघलांचा इतिहासच वगळण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

आजचे बी ग्रेडी त्यावेळच्या खंडोजी खोपडे आनी सुर्याजी पिसाळांणा मागे टाकनार. काल आणखी कुठल्यातरी बी ग्रेडी ला देवगिरी च्या वैभवात आनखी काहितरी दिसल होत :)) अर पावन्या देवगिरी चे साम्राज्य कवा व्हुत... देवगिरी चा भुई कोट किल्ला कुठ हाय..खिलजी चे आक्रमन कवा झालते...
दे ठोकुन काय बी कदिबी वाचलेल नसतांना. तुम्हि जे वाचता तेच तुमच्या लीखानात दिसते... तुम्हि वाचलेला ईतिहास पवारां पासुन सुरु होउन ...मुंबै च्या मोर्चात संपतो.
मा.म. केकाटे

पगला गजोधर's picture

12 Aug 2017 - 4:22 pm | पगला गजोधर

मास्तर, मुद्दा तुमच्या नीट लक्षात आलेला नाहीये !
तुम्ही बहुतेक मनुस्मृतिचे मास्तर असाल बहुतेक.

गामा पैलवान's picture

12 Aug 2017 - 5:16 pm | गामा पैलवान

पगला गजोधर,

तुम्हाला टिळकांनी गणेशोत्सव वाढवला हे मान्य का होत नाहीये? जरी सार्वजनिक असला तरी असे कितीसे लोकं साजरा करंत होते? उत्सव वाढवणे हे काम टिळकांचंच ना? भाऊसाहेब रंगारी यांच्याबद्दल नीईईईईईईईईताद्र बाळगूनही एक प्रश्न करावासा वाटतो. तो म्हणजे रंगारी लोकनेते होते का?

तुम्ही लावता त्या न्यायाने आधुनिक काळातला गणेशोत्सवाचे जनक रामदासस्वामी म्हणायला पाहिजेत. सुखकर्ता दु:खहर्ता आरती त्यांनीच लिहिलीये.

तुमचा तर्क आजून एका ठिकाणी लावतो. लोकमान्यांना भारतीय असंतोषाचे जनक म्हणायचे (इति व्हयालेंटाईन शिरोल). तर हा असंतोष काय टिळकांनी थोडाच उत्पन्न केला होता? तो तर इंग्रज सरकारच्या मनमानी कारभारामुळे उत्पन्न झाला होता. मग टिळकांना भा.अ.ज. म्हणावेच कशापायी?

आ.न.,
-गा.पै.

गामा पैलवान's picture

12 Aug 2017 - 5:24 pm | गामा पैलवान

कृपया नीईईईईईईईईताद्र म्हणजे नितांत आदर असे वाचावे.
धन्यवाद!
-गा.पै.

पगला गजोधर's picture

12 Aug 2017 - 5:44 pm | पगला गजोधर

"इतिहासाचे चुकीचे लेखन करुन, टिळक यांच्या नावे गणेशोत्सव सुरु केल्याचे दाखविण्यात आले असले, तरी वास्तविकता मात्र वेगळीच आहे. त्यामुळे टिळक सार्वजनिक गणेश उत्सवाचे जनक नसून, फार फार तर त्यांना प्रचारक म्हटले गेले पाहिजे" या मंडलाच्या दाव्याला तुमचा पाठिम्बा आहे, असे दिसते.

थिटे मास्तर's picture

12 Aug 2017 - 5:20 pm | थिटे मास्तर

मास्तर, मुद्दा तुमच्या नीट लक्षात आलेला नाहीये !
अरे नहि रे पगलैट ;) मुद्दा काहि नाहिच आहे त्याच्यात. तुम्हि तोच केर काढताय जो गेले ३ वर्षे अनेक लेख पाडुन काढताय.
Keep It Up. 2024 ला खुप टैम है अभी.

तुम्ही बहुतेक मनुस्मृतिचे मास्तर असाल बहुतेक.
नाय बा, हा मन्या कोन म्हनायचा. पन आमास्नि पगलैट तुम्हि मा.म.स्मृतिचे कर्मठ अभ्यासक दिसता. केकाटायन चा अभ्यास भी जबरीच म्हनायचा कि तुमचा.

पगला गजोधर's picture

12 Aug 2017 - 6:46 pm | पगला गजोधर

कोपरापासुन

गामा पैलवान's picture

12 Aug 2017 - 5:23 pm | गामा पैलवान

पगला गजोधर,

विकिवर टिळकांनी गणेशोत्सवाचं पुनरुज्जीवन केलं असंच लिहिलं आहे. हा उत्सव आधीपासूनच चालू होता. तर मग टिळकांचं नाव हटवून कोणाला नक्की काय हेतू साध्य करायचा आहे, असा प्रश्न पडतो.

याच धर्तीवर इ.स. १८९३ मध्ये त्यांनी जुन्या काळापासून प्रस्थापित गणेशोत्सवाचे नव्या स्वरूपात पुनरूज्जीवन केले. हिंदूंमध्ये घराघरांत गणेशोत्सव अनेक शतकांपासून साजरा केला जात असे. पण टिळकांनी त्याला एका दहा दिवस चालणार्‍या सामाजिक महोत्सवाचे स्वरूप दिले.

आ.न.,
-गा.पै.

चौथा कोनाडा's picture

12 Aug 2017 - 5:59 pm | चौथा कोनाडा

+१११११

पगला गजोधर's picture

12 Aug 2017 - 6:44 pm | पगला गजोधर

भाऊ रंगारीनीच सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केल्याचे अनेक दाखले आहेत. याशिवाय राज्यसरकारनेही ते मान्य करुन त्या विषयिचा अहवाल दिला आहे, असे असताना सार्वजनिक गणेशोत्सवाला मागील वर्षिच १२५ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे पुन्हा १२५ वे वर्ष साजरे करण्याचे काहीच कारण नसताना, सध्याच्या महापौरानींच हा वाद उकरुन काढल्याचा आरोप रंगारी ट्रस्टचे अध्यक्ष सुनील कुलकर्णी यांनी केला

थिटे मास्तर's picture

12 Aug 2017 - 7:04 pm | थिटे मास्तर

अर्र
आडनाव बोल्ड करण्यावरुनच लक्षात येतोय किती पराकोटिचा मत्सर आहे ते , लिहिता वाचणार्यांचा म्हणजेच शिकलेल्यांचा ब्रेनवॉश जर असा असेल तर .......
घ्या तुमच्या नावावर गणेशोत्सवाचि सुरुवात केल्याच श्रेय.

बोल्ड करणं मंजे मत्सर कसा? दोन ब्राह्मणांतील विशुद्ध असा इतिहास संशोधनातील रस कशा स्वरुपाचा असतो हे मांडलं आहे.

पगला गजोधर's picture

12 Aug 2017 - 7:24 pm | पगला गजोधर

पुढील पिढीला विशुद्ध संशोधन करता येईल का ? जर बदलेला इतिहास पुढे आला तर ?

अगोदर महात्मा फुले असं ऐकलं होतं. आता फुल्यांना बामनी देवाचा विटाळ झाल्याचं पुरोगाम्यांना चालणार नाही म्हणून रंगारी? उजव्या चळवळीला आज करोडो समर्थक आहेत, तरी यांची प्रत्येक चाल परिणामकारक ठरते. ज्यावेळी या चळवळीत जीवच नव्हता त्यावेळेस काय काय कारस्थाने झाली असतील?

थिटे मास्तर's picture

12 Aug 2017 - 7:19 pm | थिटे मास्तर

अगोदर महात्मा फुले असं ऐकलं होतं.
तुम्हि जोशी, तुम्हिच सगळा चुकिचा ईतिहास लिवला बि अन भोळ्या भाबड्या जंतेस शीकवला बी.
तुम्हि म्हंतायसा त्यावर बी सरां नी आपले नौईतिहासकारी ईचार मांडलेयत.
http://www.misalpav.com/node/32487

पगला गजोधर's picture

12 Aug 2017 - 7:35 pm | पगला गजोधर

अगोदर महात्मा फुले असं ऐकलं होतं

महात्मा फुले यांनी सार्वजनिक शिवजयंती, तर या धाग्यात
भाऊ रंगारीनीच सार्वजनिक गणेशोत्सव सुरु केला, अस लिहिलेले आहे. घाईत प्रतिक्रिया देण्याच्या नादात तुमची नजर चूक झाली असावी.

घाईत प्रतिक्रिया देण्याच्या नादात तुमची नजर चूक झाली असावी.

हूं. शिवजंयती नि गणेशोत्सव मधे गल्लत झाली खरी.

पगला गजोधर's picture

12 Aug 2017 - 8:13 pm | पगला गजोधर

असु देत, गल्लत ही सर्व मानवाकडूनच होते. नो प्रोब्लेम..

थिटे मास्तर's picture

12 Aug 2017 - 7:29 pm | थिटे मास्तर

जसा राम गणेश गडकरींचा पुतळा काहि चिंधी चोरांनी रात्रीतुन फोडला मग ज्या भुरट्यांनी फोडला त्यांचे नवधर्म संस्थापक आले न्युज चँनल वर बाजु मांडायला, पहिलाच बॉंब अँकर ने टाकला कि गडकरी तुम्हि समजता तसे ब्राम्हण नव्हतेच. तेज्यायला आलेल्या गुंठामंत्र्याचा चेहरा असा काहि झाला होता बास.

पगला गजोधर's picture

12 Aug 2017 - 7:38 pm | पगला गजोधर

तुमच्या प्रतिक्रियेत सार्वजनिक गणेशोत्सवासंदर्भात काहीच आढळत नाहीये ? कदाचित तुमची गल्ली चुकाली असावी ....

तुमचा प्रतिसाद
तुम्ही या गल्लीतून त्या गल्लीत उड्या मारत राहताय का?

गल्ली बरुबर हाय मर्दा आज लय येळ हाय गड्या खर्चायल माह्याकड... नेहमि असल्या हागणदर्या टाळतो, आज म्हनल आज आपुन बि जरा सुवासीक साहित्याचा वास घ्यावा.

पगला गजोधर's picture

12 Aug 2017 - 8:04 pm | पगला गजोधर

नै मास्तर हम्हारा चुकयाच् ...

तुमच्या सर्व प्रतिक्रिया या, धाग्या च्या विषयला धरुनच हैत, शिवाय कुठेही तुमची जातीयवादी मानसिकता दिसत नाही, उलट दिसते ते विशुद्ध प्रेम इतर समाजघटकाबद्दल ...
फक्त आम्ही व्यक्त झालो, की आम्ही मनुग्रेडि, वै वै

थिटे मास्तर's picture

12 Aug 2017 - 8:10 pm | थिटे मास्तर

मनु ने त्याच्या स्मृति ला घेवुन महाड च्या चवदार तळ्यात तुमचे ईतिहासकार स्वारी नवसंशोधक जन्मण्या अगोदरच आत्महत्या केली.

पगला गजोधर's picture

12 Aug 2017 - 8:21 pm | पगला गजोधर

आत्महत्या केली तरीही,
त्याच्या आत्म्याला शांती लाभो, अशीच विश्वचरणी प्रार्थना.

नै, उगाच परत 21 व्या शतकात काहीजनांच्या, आंगात परत त्याच्या आत्मयाने संचारुन, धुडगुस नको घालायला, म्हणून काळजी..

21 व्या शतकात काहीजनांच्या, आंगात परत त्याच्या आत्मयाने संचारुन, धुडगुस नको घालायला, म्हणून काळजी..

अत्यंत सयंत, सन्मानपूर्वक एक प्रश्न आहे. आणि वरच्या विधानाच्या अनुषंगानेच आहे - बंदिस्त करणे ही पुरेशी सजा आहे का? आणि अन्य सजांची प्रावधान करणारे हे पापी का?

पगला गजोधर's picture

12 Aug 2017 - 8:49 pm | पगला गजोधर

सजा किंवा सूड़ नको,
प्रबोधन हवे.

थिटे मास्तर's picture

12 Aug 2017 - 9:03 pm | थिटे मास्तर

एकट्या मनु ने नाहि तर त्याच्या स्मृति ने पण आत्महत्या केलिय त्यामुळे तुमचे वाक्य असे पायजेल.
""त्याच्या व तिच्या आत्म्याला शांती लाभो, अशीच विश्वचरणी प्रार्थना.""

उगाच परत 21 व्या शतकात काहीजनांच्या, आंगात परत त्याच्या आत्मयाने संचारुन, धुडगुस नको घालायला, म्हणून काळजी.
आता मनु त्याच्या स्मृति ला घेउन अजुनहि कित्येक लोकांच्या स्वप्नात येतो मग लोग आपापल्या उपद्रव शक्ति प्रमाणे धुडगुस घालतात, काहि पुतळे फोडतात, काहि भांडारकर सारख्या संस्थांवर हल्ले करतात, काहि पिवळि पुस्तके लिहिल्या प्रमाणे संशोधन करुन ईतिहास लिहितात...वग्रे वग्रे. आन नाहिच काहि जमल तर मिपा आहेच एक नविन हायजॅक धागा काढायला.
गजोधर भौ हा तुमचा शिवजयंति हायजॅक वरिलधागा आणि त्यावरिल डॉ. खरे साहेंबाचि एक प्रतिक्रिया, आणि त्यावरील आपले उत्तर :)
http://www.misalpav.com/comment/732386#comment-732386

खरे साहेब :- जाता जाता हे पण सांगून टाका कि गणेशोत्सव कुणी चालू केला आणी गणपती हा देव आहे हा शोध कुणी लावला?

गजोधर भौ :-
"शिवजयंती कोणी सुरु केली ?" असा प्रश्न होता सर.
"सार्वजनिक गणेशोत्सव कोणी सुरु केला ?" असा नव्हता.

मग नेक्ष्ट धागा हा का ?
गणपती हा देव आहे हा शोध कुणी लावला? त्याच्या अंगात जान्हवे का घालतात ?

चालु द्या. तेव्हढिच आमचि हि हि करमणुक.

टर्बोचार्जड फिलॉसॉफर's picture

12 Aug 2017 - 7:50 pm | टर्बोचार्जड फिलॉसॉफर

टिळकांनी सार्वजनिक गणेशौत्सव सुरु केला याला कसलाही पुरावा नाही.ज्याच्यकडे आहे त्याने सादर करावा.
सार्वजनिक शिवजयंती महात्मा ज्योतिबा फुले यांनी व सार्वजनिक गणेशोत्सव भाऊसाहेब रंगारी यांनी सुरु केले आहेत.
(लिहून ठेवतो ,कारण उद्या इतिहास बदलायची खुमखुमी असलेले नागपुरी बोरुबहाद्दर काहीही ठोकून देतील)

टिळकांनी या दोन्ही अनिष्ट प्रथांना जोरकस विरोध केला असं देखिल लिहा. आणी नागपूरचे सगळेच बोरू कापायचं कंत्राट नागपूर इंप्रूवमेंट ट्रस्टला काढायला सांगू.

अभ्या..'s picture

12 Aug 2017 - 8:52 pm | अभ्या..

ओ नाई नाई.
अर्धा भाग बरोबर आहे.
भाऊसाहेब रंगारींची सुरुवात व्हायच्या आधी आजोबा गणपती होता. आमचे ग्याझेट पण तेच म्हणतेय आणि रंगारीचे म्हणाल तर त्यांना १२५ वर्षे झालीत, आजोबा गणपतीला १३५ वर्षे.
Ganapati Festival is carried out with great pomp and gaiety. Ajoba Ganpati is 100 years old Ganpati. Even before Tilakji started the Ganesh festival, it is said that Tilakji got inspired by the Ajoba Ganpati celebrations from Solapur and later Ganesh festival now is national Festival.

पगला गजोधर's picture

14 Aug 2017 - 10:59 am | पगला गजोधर

आजोबा गणपति मंड़ळ / कार्यकर्ते, यानी काही, याबाबत दावा केला आहे का ? तुमच्या वरच्या प्रतिक्रियेचा संदर्भ देता का प्लीज ? आजोबा गणपतिने सार्वजनिक उत्सव सुरु करण्या मागे कशाची प्रेरणा होती ? कोण होते या गणपतिचे सार्वजनिक उत्सवात रूपांतर करण्यात, पुढाकार घेणारे ? कोण होते या मंडळ मागचे प्रणेते, की ज्यांच्यापासून टिळकांनी ही प्रेरणा घेतली... संधर्भ दया वाचायला आवडेल .

इथे पण आडनांवं बघून भूमीका ठरवणार का..?

mayu4u's picture

14 Aug 2017 - 7:18 pm | mayu4u

पूर्वेतिहास तरी हेच सांगतो.

थिटे मास्तर's picture

12 Aug 2017 - 8:20 pm | थिटे मास्तर

नागपूर इंप्रूवमेंट ट्रस्ट हागवण थांबवण्यासाठी खास एरंडेल हि बनवते. पत्ता द्या पाठवतो.

arunjoshi123's picture

12 Aug 2017 - 8:28 pm | arunjoshi123

कोण सचिन?

थिटे मास्तर's picture

12 Aug 2017 - 8:43 pm | थिटे मास्तर

सचिन पगारे उर्फ ट.फि.

विशुमित's picture

12 Aug 2017 - 8:53 pm | विशुमित

धाग्यावर ब्राह्मण्यवाद चवताळला..!! चालू द्यात टॉयलेट एक प्रेम कथा स्पॉन्सरड बाय नागपूर ब्रिगेड..!!

टॉयलेट नाय हागणदारी....बायकांच्या डोक्यावर तर ह्यांना पदर पाहिजे....पण त्या बिचार्‍या कश्या आपलि लाज झाकत हागणदारीत जातात ते ह्यांना नाहि दिसत.
आणि ब्राह्मण्यवाद ह्याचा विषयच नाहिये. हे नागपूर ब्रिगेड काय आहे हे ही नाहि माहित पण तु मे रि खुजा मै तेरि खुजाता हु असय ते. इथे एक गोष्ट लक्षात आलिये कि हागणदरी वाल्यांना त्यांच्या भाषेतच बोलायच.

...आणि स्वत:ला बिचारा बळीराजा असे संबोधून सहानुभुतीचा ओघ स्वतःकडे वळवून घेता येतोच.

थिटे मास्तर's picture

12 Aug 2017 - 9:12 pm | थिटे मास्तर

ह्या धाग्यावर वर जाल तर माझि आणखि एक प्रतिक्रिया दिसेल तुम्हाला.
काल आणखी कुठल्यातरी बी ग्रेडी ला देवगिरी च्या वैभवात आनखी काहितरी दिसल होत :)) अर पावन्या देवगिरी चे साम्राज्य कवा व्हुत... देवगिरी चा भुई कोट किल्ला कुठ हाय..खिलजी चे आक्रमन कवा झालते...
दे ठोकुन काय बी कदिबी वाचलेल नसतांना. तुम्हि जे वाचता तेच तुमच्या लीखानात दिसते... तुम्हि वाचलेला ईतिहास पवारां पासुन सुरु होउन ...मुंबै च्या मोर्चात संपतो.
मा.म. केकाटे

तुमच्याच पारखी नजरेला बरा दिसून आला!

धर्मराजमुटके's picture

12 Aug 2017 - 9:01 pm | धर्मराजमुटके

आपण भारतीय नेहमीच भुतकाळातच रमतो त्यामुळेच आपल्याला वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ असत नाही !

पगला गजोधर's picture

12 Aug 2017 - 9:27 pm | पगला गजोधर

बरोबर आहे । उदा.
आता भूतकाळात रमणे, म्हणूनच
मस्जित पाडुन मंदिर बांधने,
बॉम्बे चे मुंबई नामकरण,
वेदांचे दाखले देउन गोमांस राजकरण करुन, लोकांचा जीव घेणे। पद्मावती चित्रपटाचा सेट जाळणे ....
अश्या सर्व गोष्टी आल्या

मैत्र's picture

14 Aug 2017 - 1:25 pm | मैत्र

बरोबर?

mayu4u's picture

14 Aug 2017 - 5:30 pm | mayu4u

:)

बांवरे's picture

12 Aug 2017 - 9:56 pm | बांवरे

अभ्या. धन्यवाद. नवीन माहिती कळाली.
मला शिकवलेल्या इतिहासानुसार सार्वजनिक गणेशोत्सवाचा वापर जनजागृतीसाठी लो. टिळकांनी केला.

मनिमौ's picture

12 Aug 2017 - 10:21 pm | मनिमौ

ला जोरदार अनुमोदन तस पाहिल तर आमचा आजोबा गणपतीच प्रणेता म्हणायला हवा सार्वजनिक गणेशोत्सवाचा. भाऊ रंगारी फार नंतरची गोष्ट आहे. पण ईतकी वर्षे रंगारी मंडळाने काहीच हरकत घेतली नाही ते का बरे

पगला गजोधर's picture

12 Aug 2017 - 10:32 pm | पगला गजोधर

आजोबा गणपति मंड़ल / कार्यकर्ते, यानी काही दावा केला का ? संदर्भ देता का प्लीज ? आजोबा गणपतिने सार्वजनिक उत्सव सुरु करण्या मागे कशाची प्रेरणा होती ? कोण होते पुढाकार घेणारे ? वाचायला आवडेल .

सुबोध खरे's picture

12 Aug 2017 - 10:41 pm | सुबोध खरे

या धाग्याचा नक्की हेतू काय आहे?

mayu4u's picture

14 Aug 2017 - 5:29 pm | mayu4u

... नसते वाद उकरून काढणे,आणि जमलंच तर इतिहासाचे पुनर्लेखन.

झेन's picture

13 Aug 2017 - 2:04 pm | झेन

आम्हाला पूर्वीच्या आक्रमण कर्त्यांबद्दल तेवढा राग नाही आज चिन, पाकिस्तानचा राग नाही, आजच्या काळात "चोटीकटवा" वर आम्ही विश्वास ठेवू पन जातीपाती, राजकीय पक्ष म्हनलं की तिच्या... एकदम एकमेकांच्या ऊरावर बसायला तयार.

पगला गजोधर's picture

13 Aug 2017 - 10:58 pm | पगला गजोधर
टिळकांच्या नावाने गणेशोत्सव सुरू झाला

कालचा गोंधळ बरा होता...

बाकी तुमचें चालू दया _/\_

गामा पैलवान's picture

14 Aug 2017 - 12:58 pm | गामा पैलवान

प.ग.,

त्याचं काये की जे मोठमोठे तत्त्वचिंतक होऊन गेलेत ना म्हणजे विवेकानंद, टिळक, जिद्दु कृष्णमूर्ती, इत्यादि; त्यांच्या लेखनातून एक गोष्ट ठळकपणे जाणवते. ती म्हणजे, आपण नवं काहीतरी सांगताहोत, अशी त्यांची स्वत:ची धारणा आजिबात नव्हती. ते जे काही बोलले ते अगोदर इतरांनी सांगितलेलंच होतं. फक्त ते ते प्रेषित जरा वेगळ्या आणि लोकांना पटेल अशा शब्दांत तीच तीच सत्ये परतपरत मांडत असंत.

गणेशोत्सवात टिळकांचं योगदान काय आहे हे तुम्हाला कळले असेलशी आशा आहे. पटलं तर पहा, अन्यथा सोडून द्या.

आ.न.,
-गा.पै.

पगला गजोधर's picture

14 Aug 2017 - 1:46 pm | पगला गजोधर

पै,
टिळक, कृष्णमूर्ति यांच्या लेखना बाबत, किंवा टिळकांचे प्रचार योगदान नाकारण्याच्या इथ विषयच नाहीये.
तुमच्यासाठी पुन्हा विशद करु इच्छितो, की एकंदरीत बनवून देण्यात आलेले पब्लिक परसेप्शन व फॅक्ट, यांच्यात प्रथम दर्शनी तफावत आढळते आहे, आणि काय आहें नै, की पब्लिक परसेप्शनलाच पुढे इतिहास म्हणून ठसवन्यात काही भक्त लोक तरबेज आहेत. आता तरी धाग्यामधले उद्गम, तुम्हाला कळले असेल आशी आशा आहे. पटलं तर पहा, अन्यथा तुमचा अनअपडेटेड प्रचार प्रसार तसाच चालू राहुन द्या.

भाषांतरकार ज्ञानेश्वरांबद्दल असंच म्हणायला हवं. कोण्या यकःश्चित भाषांतरकाराचा इतका उदोउदो?

गीतेतली आणि बुद्धाच्या तत्त्वज्ञानातली अहिंसा देखिल लोक आपल्या नावाने चेपतात काय म्हणावं!!

मराठी_माणूस's picture

14 Aug 2017 - 11:51 am | मराठी_माणूस

हा उत्सव पहील्यांदा बंद करण्याचा मान कोण मिळवणार ?

पगला गजोधर's picture

14 Aug 2017 - 12:44 pm | पगला गजोधर

कदाचित सुप्रीम कोर्ट ..... हु नोज़ !!!

पैसा's picture

14 Aug 2017 - 1:57 pm | पैसा

पण हे काय म्हणतात बघा,

Shree Sarvajanik Ganeshotsav Sanstha had also hosted freedom fighter Lokmanya Bal Gangadhar Tilak in 1901. Tilak had first started Ganeshotsav celebrations in Maharashtra. The Sanstha is known as the pioneer of Mumbai’s Ganeshotsav. The residents of Keshavji Naik Chawl in Mumbai and Shri Bhau Rangari, Shri Khajgiwale, and Shri Ghotwadekar in Pune had first started celebrating Ganeshotsav publicly in 1893, after an appeal by freedom fighter and statesman Bal Gangadhar Tilak. The celebration was begun to provide a platform for national awakening, uniting people and social education. Lectures by eminent personalities and performances by ‘Mela’, a group of singers, including men and women, were the programmes which used to be organised during the festival.

पैसा's picture

14 Aug 2017 - 2:03 pm | पैसा

सोलापूर चा आजोबा गणपती त्याहून जुना असेल तर या उत्सवाद्वारे लोकांना एकत्र करता येईल ही प्रेरणा लोकमान्यांनी सहज घेतली असेल.

निदान शंभर सवाशे वर्षांनी कोणीतरी एखाद्या ट्रोल आयडीप्रमाणे आपण उत्सव हायजॅक केल्याचा आरोप करील हे त्यांना माहीत असते तर बिचारे या लोकजागृती, असंतोष फैलावणे वगैरे भानगडीत पडलेच नसते. गणित आणि खगोलशास्त्र हे त्यांचे पाहिले प्रेम होते. त्याचे अध्ययन अध्यापन करत त्यांनी गप्प बसायला हवे होते. टिळकांचं चुकलंच ते!

पगला गजोधर's picture

14 Aug 2017 - 2:20 pm | पगला गजोधर

ताई,
टिळकांचे योगदान नाकारण्याच्या इथ विषयच नाहीये.

तुमच्यासाठी पुन्हा विशद करु इच्छितो, की एकंदरीत बनवून देण्यात आलेले पब्लिक परसेप्शन व फॅक्ट, यांच्यात प्रथम दर्शनी तफावत आढळते आहे.

इंटरनेट वर कित्येक समकालीन उल्लेख पुरावे उपलब्ध आहेत.
http://changeforbetter.org.in/briefing/413-the-making-of-ganesh-utsav
उदा. हा एक लेख.

थोडे थांबायची आणि न चिं केळकर यांच्या टिळक चरित्रावर विश्वास ठेवायची तयारी असेल तर त्यातले गणेशोत्सवाबद्दलचे स्क्रीनशॉट्स देऊ शकेल.

पण माफ करा, मला असल्या ट्रोल सदृश लिखाण आणि वादात आता काही रस राहिला नाही. तुम्हाला खरा इतिहास जाणून घ्यायचं असेल तर समकालीन चरित्रे, लिखाण यांचा अभ्यास करा ही विनंती. टिळकांनी उत्सव हायजॅक केला वगैरे भाषा मला पेलवणारी नाही तेव्हा मी इथून रजा घेणे योग्य.

पुण्यातल्या एका इतिहास संशोधकाने लोकसत्ता ला सांगितले की टिळकांनी सांगितल्यावरून 1893 ला खाजगीवाले घोटवडेकर रंगारी, नातू, पटवर्धन, दगडूशेठ हलवाई यांच्या पुढाकाराने पुण्यात 3 ठिकाणी आणि मुंबईत केशवजी नाईक चाळीत सार्वजनिक गणेशोत्सव सुरू झाले. पण या संशोधकाने आपले नाव घेऊ नका कारण आपण लोकांना भितो असेही म्हटले. आम्ही त्या भिणाऱ्या लोकांपैकीच एक आहोत. तेव्हा गणेशोत्सव ब्रिटिश सरकारने सुरू केला असे म्हटलेत तरी मला काही प्रॉब्लेम नाही. मी तेव्हा नव्हते हे एक आणि आता या उत्खननातून अस्मिता गळवे सुजण्यापालिकडे काहीही साध्य होणार नाही.

अजून जरा शोधले तर ग्वाल्हेर येथेही 1891 पूर्वी गणेशोत्सव सुरू होता असे दिसते. तेव्हा असे अजून काय उल्लेख सापडतात ते कृपया शोधा. शुभेच्छा!

अभ्या..'s picture

14 Aug 2017 - 4:52 pm | अभ्या..

ag

पगला गजोधर's picture

14 Aug 2017 - 4:55 pm | पगला गजोधर

धन्यवाद, नवीन माहिती, मुद्देसूद पुढे आणली.

पैसा's picture

14 Aug 2017 - 5:13 pm | पैसा

धन्यवाद! शक्य असेल तर श्रद्धानंद समाजाच्या सोलापुरातील इतिहासाबद्दल कधीतरी जरूर लिहा.

१ पुण्यात बहुतेक लोकांना भाऊ रंगारी मंडळ माहिती आहे. पहिले पाच मानाचे गणपती आहेत तसे शेवटी तीन आहेत भाऊ रंगारी, मंडई आणि दगडूशेठ. हे कित्येक दशके चालू आहे.आणि हा मान असतो.

२. गणेशोत्सवाला शंभर वर्षे झाली तेव्हा मी एका उपक्रमात सहभागी होतो. केसरी वाड्यात मोठे ग्रंथालय आहे तिथे बसून माहिती शोधली होती.
जुनी वृत्तपत्रे आणि पुस्तके होती.
तेव्हा स्मरणिकेत स्पष्ट लिहिले होते की भाऊ रंगारी यांनी प्रथम गणपती बसवला. पुढच्या वर्षी टिळकांनी विंचूरकर वाड्यात गणपती बसवला आणि त्याला उत्सवी स्वरूप दिले. मग त्यांच्या पुढाकाराने मंडळे वाढली.

ही माहिती केसरी वाड्यात मिळाली. म्हणजे इतिहास बदलला वगैरे धादांत खोटा कांगावा आहे.

पुण्यात बहुतेक लोकांना हे माहिती आहे. नवीन शोध काही नाही.
गणपती बघत फिरताना असंख्य लोक आवर्जून भाऊ रंगारी मंडळाची मूर्ती बघायला जात असत.

तरीही गणेशोत्सवाचे प्रणेते टिळक मानले जात, त्यांच्या भूमिका आणि उद्देशामुळे.
शतक महोत्सवात काही वाद झाला नव्हता. मग आता काय कारण?
तेव्हा कारभारी कलमाडी होते. आता मुक्ता टिळक आहेत.

टिळक परिवार यापूर्वी कायम कॉंग्रेस मध्येच आणि तेही मोठ्या पदावर राहिला आहे. त्यामुळे टिळक, गणेशोत्सव याचा आणि धाग्यावर बळंच ओढून आणलेल्या नागपूरचा काहीही संबंध नाही.

टिळकांनी उत्सव सुरू केला नाही असे ठाम मत असेल तर पुरावे द्यावेत. १८९३-९४ चे पुरावे आहेत.

पगला गजोधर's picture

14 Aug 2017 - 3:01 pm | पगला गजोधर

धन्यवाद,
अतिशय मुद्देसुद, विषयला धरुन, मला ब्रिगेड़ी/ट्रोल, अशी दूषणे न देता, मिळालेला प्रतिसाद आहे हा.
दूसरी बाजू समजावून सांगितल्या बद्दल बिग थैंक्स.

तुमच्या वरील प्रतिक्रीयेनुसार

स्मरणिकेत स्पष्ट लिहिले होते की भाऊ रंगारी यांनी प्रथम गणपती बसवला..............

परंतु वृत्तपत्रातील बातमी नुसार , महापौरांचे वेगळेच मत आहे ...

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हेच सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक आहेत. त्यासाठी ऐतिहासिक पुस्तकात असलेले संदर्भ श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टने तपासून पहावे, असे मत महापौर मुक्ता टिळक यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. यंदाचे सार्वजनिक गणेशोत्सवाचे 125 वे वर्ष नसून 126 वे वर्ष असल्याचे सरकारी कागदपत्रांमध्येच नमूद असताना शासन 125 वे वर्ष साजरे करत आहे, हा विरोधाभास असल्याचे ट्रस्टच्या पदाधिकार्‍यांनी सांगितले.
त्या पार्श्‍वभूमीवर बोलताना महापौर म्हणाल्या, लोकमान्य टिळक हेच निःसंशय सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक आहेत.

महापौरांनी कदाचित केसरी वाड्यात असलेली (जिचा उल्लेखास आपण वरील प्रतिक्रियेत केलाय) कागदपत्रे अभ्यासली नसावीत.
त्या समोरच्याच पार्टीला कागदपत्रे तपासा असा जाहीर सल्ला देत आहेत.
आणि आम्ही मिपावर हे नम्रपणे सांगू इच्छितो, कि तरीही त्यांना कोणी ट्रोल वैगरे संबोधू नये...

भाऊ रंगारी, खाजगीवाले आणि तिसरे नाव घोटावडेकर (तिसरे नीट लक्षात नाही. कर होते नक्की) ही नावे आहेत .
पण त्याला सार्वजनिक स्वरूप नव्हते. ते टिळकांनी दिले.
हेही स्मरणिकेत लिहिले होते.

टिळक हे सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक किंवा प्रणेते आहेत.
पहिला गणपती बसवणारे नाहीत.
ही दोन्ही विधाने खरी आहेत.

त्यामुळे वाद नाहीये. उकरून काढू नका.
हवे असल्यास केसरी वाड्यात जाऊन शोध घ्यावा. मुक्त प्रवेश असतो.

जयंत कुलकर्णी's picture

14 Aug 2017 - 3:45 pm | जयंत कुलकर्णी

संपादक महाशय,
या असल्या धाग्यांनी मिपावरचा वावर कमी झाला आहे. ज्या गोष्टींची समाजाला गरज नाही असे वाद उकरून समाज प्रबोधन करतोय असे भासवून इतरांच्या डोक्याला ताप द्यायचा या वृत्तीला काय म्हणतात हे माहीत नाही पण हा नतद्रष्टपणा आहे हे निश्चित. काव्य शास्त्र विनोदेन हा मिपाचा उद्देश असफल होतो आहे की काय असा मला आता संशय येऊ लागला आहे.
मला वाटते काथ्याकूट हा विभाग बंद केला तरी चालण्यासारखं आहे. संपादक मंडळांनी हे असले खोडसाळ धागे त्वरित उडवावेत. एक दोन सभासद कमी झाले तरी हरकत नाही. कारण मी अनुभवले आहे या असल्या धागाकर्त्यांच्या सगळ्या प्रश्नाला पुराव्यासकट उत्तरे दिली तरी ते मान्य करत नाहीत कारण त्यांचा छुपा हेतू वेगळाच असतो. या धाग्यावर तो साध्य झालाय असे मला वाटते.

पगला गजोधर's picture

14 Aug 2017 - 4:52 pm | पगला गजोधर

संपादक महाशय,
जुने पुराणे झडून जावे,

ही वाटे पानझड जरी,ती असते चाहूल वसंताची,
बहरणे आणिक झडणे,ही तर रीत निसर्गाची
चुकला कुणास नियम निसर्गाचा सांगावे
अन,पुन्हा बहरण्यासाठी झाडाने झडून जावे
@कवयित्री -मंजिरी पाटील,पुणे

या ओळींतून प्रेरणा घेऊन मी तर असे म्हणीन की

अन,पुन्हा बहरण्यासाठी मिपाझाडाने झडून जावे,
जख्ख पिकली, जुनी पुराणी, पाने ही झाडून जावो, नवयुगाच्या नवं विचारांनी मिपा पुन्हा बहरो ...

मैत्र's picture

14 Aug 2017 - 5:07 pm | मैत्र

दीनानाथ मंगेशकर आणि मूळव्याध याची आठवण झाली.

शैलेन्द्र's picture

14 Aug 2017 - 5:20 pm | शैलेन्द्र

बरेचसे डुप्लिकेट आय डी झडले तरी मजा येईल, डुप्लिकेट आय डी या प्रकाराने मिपाचे फार नुकसान केलंय.

पगला गजोधर's picture

14 Aug 2017 - 5:29 pm | पगला गजोधर

आय अग्रि

mayu4u's picture

14 Aug 2017 - 5:28 pm | mayu4u

संक्षींसोबत जशी कठोर पण गरजेची कार्यवाही केली गेली तशी करायची गरज पुन्हा निर्माण झालीये असे वाटते.

पगला गजोधर's picture

14 Aug 2017 - 5:33 pm | पगला गजोधर

सर्वसमावेशक प्रकारच्या धागा आयडी यांच्यावर कारवाई व्हावी, एकांगी पूर्वग्रहदूषित कारवाईने घेट्टोकारण होईल.

नाही का?

शिवाजी महाराज - काही रेखाटने या धाग्यात मी खालील प्रतिक्रिया लिहिली आहे तीच इथे देत आहे.

"आज जातीजातीत द्वेष आहे. संधीसाधू पुढारी त्यात तेल ओतत आहेत. मेडिया फालतू पुढाऱ्यांना आणून आगीत तेल ओतणाऱ्या चर्चा घडवून आणत आहेत. समाजाला योग्य दिशा दाखवणारा आज कुणीच दिसत नाही.
मिपावर देखील चांगले , कसदार साहित्य, कला फार कमी बघायला मिळायला लागलेय. त्याऐवजी द्वेषमुलक चर्चा जास्त दिसतात."

बबन ताम्बे's picture

14 Aug 2017 - 6:05 pm | बबन ताम्बे

शंभर सव्वाशे , दोनशे ,तीनशे वर्षांपूरवीचं काहीतरी खोदून काढायचं आणि समाजमने कलुषित करायची हे उपदव्याप महाराष्ट्रात खूप वाढलेत हल्ली.
फेसबुकवर नितेश राणेंचे भाषण पाहिले. वा वा, काय ते विचार आणि काय ती प्रगल्भता! हे असले पुढारी महाराष्ट्राला भविष्यात कुठे नेऊन ठेवणार आहेत हे खरोखर काळजीचे कारण आहे.

पगला गजोधर's picture

14 Aug 2017 - 6:12 pm | पगला गजोधर

सहमत,
नितेश राणे, कोकाटे, प्रवीण तोगडिया, अभय वर्तक, झाकीर नाईक, नथुराम इ इ
सर्वच एका माळेचे मणी.

नक्की कोणती माळ आणि हे मणी कसे ओवलेत ते?

जयंतरावांशी मी पूर्ण सहमत आहे.
या धाग्याचा मूळ हेतू काय आणि शेवटी निष्कर्ष काय निघाला हे पहा.
सर्वात पहिला गणेशेत्सव लोकमान्य टिळकांनी चालू केला असे कुणाचेही म्हणणे नव्हते तर त्यांनी उत्सवाला "लोकजागृतीसाठी" सार्वजनिक स्वरूप दिले असाच इतिहास आहे आणि तोच शिकवला गेला होता किंवा जात आहे.
केवळ खोडसाळ पण किंवा दुसराच अंतर्गत हेतू ठेवून धागा काढला गेला असेच वाटते.

मैत्र's picture

14 Aug 2017 - 6:20 pm | मैत्र

डॉक्टर
http://www.misalpav.com/comment/953889#comment-953889

हा धागा कर्त्याचा स्पष्ट हेतू आहे. गणेशोत्सव इतिहास हा नाही.

... केवळ गणपतीची आरती रचली; कारण त्यात स्पष्ट लिहिलंय, रघुकुलटिळक रामदासा अंतरी...

असं नवसंशोधन लौकरच प्रसिद्ध होऊ शकेल, अशी शंका आहे.

अभ्या..'s picture

14 Aug 2017 - 5:50 pm | अभ्या..

अतिच हे,
फार मनस्ताप होतोय का पाहिजे तसा इतिहास खरोखर तसा नाहीये म्हणून?

तूच एक समजू शकला माही दर्दभरी कहाणी!

पैसा's picture

14 Aug 2017 - 5:58 pm | पैसा

कारण त्यात टिळक आणि रामदास अशी दोन त्याज्य नावे आहेत. इतिहासाबरोबरच इतर सर्व साहित्याचे शुद्धीकरन ही काळाची गरज आहे.

पगला गजोधर's picture

14 Aug 2017 - 6:08 pm | पगला गजोधर

ताई,

इतिहासाबरोबरच इतर सर्व साहित्याचे शुद्धीकरन ही काळाची गरज आहे

अवांतर :- "शुद्धीकरण करणे " अशी मानसिकता ठेवणाऱ्या लोकांना, उदा. मौजीबंधनावरून छोट्या लेकरांची, शुद्धीपत्रके मागणारी मनोवृत्ती,

टिळकांनी दुसऱ्या धर्मीय व्यक्तीच्या घरी चहा प्यायला, म्हणून प्रायश्चित शुद्धी मागणारी जमात, यांना शुद्धीकरणाचे अप्रूप,

तसल्या लोकांना सान्गा कृपया.

सुबोध खरे's picture

14 Aug 2017 - 6:11 pm | सुबोध खरे

पगला गजोधर
तुमचा मूळ चेहरा आता समोर येत आहे असेच मी म्हणेन

पगला गजोधर's picture

14 Aug 2017 - 6:16 pm | पगला गजोधर

असोच

mayu4u's picture

14 Aug 2017 - 6:18 pm | mayu4u

सर, हा धागा आला तेव्हाच कळायला हवं होतं...

पैसा's picture

14 Aug 2017 - 6:24 pm | पैसा

मी सिरीयस आहे. माझा तुम्हाला पूर्ण पाठिंबा आहे. कारण तुम्ही इतिहास वाचला आहे हे या प्रतिसादावरून दिसतंय. मग जी माहिती सहज उपलब्ध आहे तिचा शोध न घेता "टिळकांनी उत्सव हायजॅक केला" वगैरे भडकाऊ भाषा का वापरावीत? प्रामाणिकपणे उत्तर द्या.

जर तुम्हाला खरोखर मिपाकरांकडून निकोप चर्चा हवी होती तर हा चर्चा प्रस्ताव नीट भाषेत लिहिता आला असता ना? असली भाषा वापरणाऱ्या लोकांच्या दाहशतीपुढे आम्ही सपशेल लोटांगण घालतो कारण आम्हाला हुतात्मा व्हायचे नसते. थोडक्यात म्हणजे "तू मोठा, तू बरोबर" म्हणून बाजूला होणे मला तरी शहाणपणाचे वाटते.

मी जरा कडक भाषेत लिहीत आहे तरी अजून ताई म्हणता आहात, म्हणून जाहीर रीत्या हे सांगितले. नाहीतर दुर्लक्ष करून गेले असते. जयंत कुलकर्णी यांच्यासारखे अभ्यासू सदस्य जेव्हा काहीतरी सांगतात तेव्हा ते सकारात्मक घ्या. मिपाची काळजी खरोखर असेल तर असली भाषा यापुढे टाळा.

दुसरा काही अजेंडा असेल तर मात्र हे सगळे सांगणे फुकट आहे. अधिक उणे बोलल्याबद्दल क्षमा असावी.

पगला गजोधर's picture

14 Aug 2017 - 6:40 pm | पगला गजोधर

अहो ताई,
"टिळकांनी उत्सव हायजॅक केला" असे मी लिहिलंय हा पूर्वग्रह जरा बाजूला ठेवून,

"टिळकांच्या नावाखाली कोणी, त्यांच्या पश्चात, उत्सव हायजॅक केला असू शकतो का ?"
(कारण त्यांना तसं करायचं असतं तर मैत्र म्हणतायेत त्या प्रमाणे स्मरणिकेत फेरफार आढळला असता, नाही का ?)
असं लिहिलंय समजून परत व्यक्त व्हा बरे.

कुठलेही कारण नसताना मी कोणाशीही अभद्र शब्दात प्रत्युत्तर दिलेलं नाही, परंतु माझ्यावर विनापुरावा ब्रिगेडी किंवा आणखी बरंच फैरी झडतात, त्याबद्दल मात्र
शांतता दिसतेय इथे.

असो, तुम्ही क्षमा मागण्याचा संबंध नाही, कारण तुम्ही कठोर शब्दात तुमचं मत व्यक्त केलंय.
उलट अजाणता हिट ऑफ मोमेन्टमधे माझी चॉईस ऑफ वर्ड चुकली असेल, तर मला क्षमा करा

पैसा's picture

14 Aug 2017 - 6:56 pm | पैसा

या शब्दाच्या अर्थापासून सुरुवात करा बघू. आपण शाळेत जे शिकलो, या धाग्यावर अनेकजण जे सांगत आहेत, तत्कालीन लिखाणात जे अनेकांनी निसंदिग्ध लिहून ठेवले आहे की लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेने मुंबई आणि पुण्यात 1893 साली सार्वजनिक गणेशोत्सव सुरू झाले. रंगारी गणेशोत्सवाच्या विसर्जनाच्या मिरवणुकीत लोकमान्य हजर होते आणि ते लोकांना कळताच तिथे मोठ्या संख्येने लोक जमा झाले इत्यादी उल्लेखही आहेत; या सगळ्याचा अर्थ काय?

स्वतः लोकमान्यांनी लोकांना सांगितले का माझ्या नावावर खपवा? का ब्रिटिशांचाही हायजॅक च्या कटात भाग होता?

जर सुरुवातीपासून हे लिखित उल्लेख आहेत, आणि सोलापूरच्या उल्लेखवरून दिसते की ती लोकमान्यांची प्रेरणा आहे, तर हा वाद आता उकरायचे कारण काय? तुम्ही इथे बाबरी वगैरे संबंध नसलेले लिहिले त्याबद्दल तर मी बोलताच नाहीये.

हायजॅक चे उदाहरण पाहिजे असेल तर संभाजी राजांची प्रतिमा त्यांच्या मृत्यूनंतर लोकात बिघडवणे हे त्यांच्या विरोधक लोकांकडून इतिहासाचे हायजॅक होते.

जी घटना घडली त्या दिवसापासून जे वर्णन समकालीन लिखाणात दहा लोकांकडून आले आहे ते स्वीकारले पाहिजे. त्याला तुम्ही हायजॅक म्हणून नाकारत असाल तर त्यामागे इतर काही कारण असणार हा साधा हिशेब आहे.

पगला गजोधर's picture

14 Aug 2017 - 7:29 pm | पगला गजोधर

हायजॅक म्हणजे जे आपलं नाही त्याचे हरण करणे.

आता तुम्ही कसे बघताय धाग्याकडे त्यावर अवलंबून आहे, अभ्या यांनी सांगितले सोलापूरचा गणपती पहिला, व त्या संधर्भात त्यांनी काही मटेरियल ही पुरवले, या धाग्यावर अश्या प्रकारच्या प्रतिक्रिया मला अपेक्षित होत्या.
आता राहिलं बाबरी वैगरे चा उल्लेख, तो मी काही शून्यातून केलेल नाही, त्या आधीच्या प्रतिक्रिया कश्या होत्या त्यानुसार मी दिलेलं उत्तर होत. जिथे मला प्रतिक्रिया (माझ्या मता विपरीत असली तरीही ) योग्य वाटली, तिथे मी धन्यवाद सुद्धा दिलेले आहे, याकडे सोईस्कर रित्या दुर्लक्ष होऊ नये. जर हागणदारी वैगरे शब्दयुक्त प्रतिक्रिया आल्या तर, मी बौद्धिक चिंतन वैगरेला फाटा देऊन उत्तर दिलेल आहे, देत राहीन, आरेला कारे मी करणारच, पण त्याच बरोबर आपल्या सारख्या वडीलधाऱ्या मेम्बरांनी कडक शब्दात प्रतिक्रिया दिल्या, तरीही मला तुमच्या बद्दल कुठलेही मनात कलुषितपणा नाही, याची मी आपल्याला ग्वाही देतो.

वाद मी उकरून काढला नसून, न्यायप्रविष्ट वादाबद्दल माझ्या कुतूहलापोटी हा धागा काढलाय. हा धागा मी काढला नसता तर मला अभ्या यांनी दिलेली माहिती, कि जी मला पूर्वी अज्ञात होती, माहिती झाली नसती.

माझा साधा थीओरम होता, वर्ग संघर्षामध्ये ज्या वर्गाच्या हाती सत्ता असते, तो आपल्यास अनुकूल इतिहास ठेवतो, प्रतिकूल इतिहास बदलण्याचा प्रयत्न करतो किंवा इतिहास दाखले नष्ट करण्याचा प्रयत्न करतो, उदा. आयसिस सीरियामधील सर्व ग्रंथगृहें म्युसिअम नष्ट केली प्लास्टिक एक्सप्लोसिव्ह वापरून. आणि हो संभाजी राजांच्या चरित्र कलुषित करणाऱ्या मास्टर माईंड शक्तींचा चेहेरा खरंच जगापुढे येवो अशी माझीही विश्व चरणी प्रार्थना आहेच.

सार्वजनिक गणेशोत्सव हायजॅक झाला नाही. अशी चर्चासुद्धा पहिल्या ११० -२०वर्षात झाली नाही आणि टिळकांच्या पश्चात नव्हे तर त्यांच्या हयातीत पुणे आणि मुंबईच्या अगदी पहिल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचे प्रेरणा म्हणून श्रेय त्यांच्या विरोधकांनी सुद्धा त्यांना दिले होते.

इथे वर्गाकलह वगैरे कुठे आला?

पगला गजोधर's picture

14 Aug 2017 - 8:04 pm | पगला गजोधर

तेच तर म्हणणे आहे,
सत्ता व परिघातील वर्ग , हा त्यापरिघाबाहेरील वर्गावर नियंत्रण राहावे म्हणून, (नेहमीच नाही पण बहुतेक वेळा )प्रतिकूल इतिहास बदलतो किंवा नष्ट करतो किंवा तसा प्रयत्न करतो, असं मला वाटतं (मी चूकही असू शकेन).

आता नका याच वेळी हा विवाद का उपस्थित व्हावा , आधी का नाही झाला ?

मला दोन शक्यता वाटतात (इथेही मी चूकही असू शकेन)

शक्यता १. आत्ता जनमानसात जे चित्र आहे ते ऐतिहासिक दृष्ट्या बरोबर आहे, पण आता काही नतद्रष्ट लोक इतिहास अपडेट करण्याचा प्रयत्न करा आहे .
किंवा
शक्यता २. खरंच इतिहासात फेरफार झालेला आहे, व पूर्वी काही कारणामुळे तो उघडकीस नाही आला, किंवा पूर्वी त्याला दाबून ठेवण्यात, दाबून ठेवणाऱ्याला यश आले, पण सध्या सत्ता समीकरण बदलल्यामुळे, आता ह्या गोष्टींना त्यांना नियंत्रणात ठेवता आल्या नसल्यामुळे, सध्या हा प्रश्न उपस्थित झाला / करता येऊ शकला असेल.

अजून फुकट घालवायला माझ्याकडे वेळ नाही. तुमचे चालू द्या. इतिहासात फेरफार या केसमध्ये झालेला नाही. आरडाओरडा करून तुम्ही लोकांना तसे कबूल करायला भाग पाडू शकाल कदाचित पण जगात सगळीकडे विखुरलेले पुरावे कोणालाही नाहीसे करता येणार नाहीत.

पगला गजोधर's picture

14 Aug 2017 - 8:43 pm | पगला गजोधर

"आरड़ा ओरडा" या तुमच्या शब्दला माझा आक्षेप असला तरी, एक गोष्ट सखेद नमूद करतो, की जर पुन्हा पुन्हा तेच मान्य करायला सांगणे, हे एका बाजून होताना दिसत नाहीये.

असोच

पैसा's picture

14 Aug 2017 - 8:06 pm | पैसा

हायजॅक शब्दाला माझा अजूनही आक्षेप आहे. जी गोष्ट आहे की नाही हे तुम्हाला माहिती नाही त्याबद्दल पूर्वग्रह ठेवून लिहिणे थांबवा.

पगला गजोधर's picture

14 Aug 2017 - 8:10 pm | पगला गजोधर

तुम्ही समर्पक शब्द सुचवा, मी तो मान्य करेन.

mayu4u's picture

14 Aug 2017 - 6:57 pm | mayu4u

मग

http://www.misalpav.com/comment/953909#comment-९५३९०९

यावर तुमचं मत सांगा पाहू.

मैत्र's picture

14 Aug 2017 - 7:17 pm | मैत्र

अहो तुम्हाला माहिती सह नीट सांगितलं की केसरी वाड्यासह कोणी ही फेरफार, तुमच्या भाषेत हायजॅक केले नाहीये.
पुण्यात लोकांना भाऊ रंगारी माहिती आहेत.

तुम्ही हे मान्य करायचे सोडून त्या माहितीचा मुद्दाम विपर्यास करताय.
परत लिहिले की रंगारी गणपती आधी होता तरी * सार्वजनिक *
उत्सव प्रणेते टिळक होते आणि हेही शतक महोत्सवात मांडले होते. तेव्हा वाद झाला नाही.

आता उकरून वाद निर्माण केला जातो आहे.
मग तुम्हाला म्हणायचे का की ब्रिगेड तेव्हा नव्हती म्हणून वाद नाही झाला. बहुधा बोलविता धनी राष्ट्रवादी पण नव्हती.

राजकारण म्हटले तर टिळक कुटुंब कॉंग्रेस चे, तेव्हा पंचवीस वर्षे पूर्वी सत्ता कॉंग्रेस ची. ना त्यांना अडचण आली, ना विरोधी भाजपला, ना राज्य सत्ता असलेल्या पवारांना.
मग आत्ता हा मुद्दा करून काय साध्य केले जात आहे?

तुमचा चॉईस ऑफ वर्ड समजून उमजून वाटतो आहे.
125 वर्षे जुने संदर्भ आत्ता कोणी पाच दहा वर्षांत हायजॅक केले असे म्हणणे हास्यास्पद आहे.

वातावरण मुद्दाम कलूषित करणे टाळा

जयंत कुलकर्णी's picture

14 Aug 2017 - 6:47 pm | जयंत कुलकर्णी

जाऊ देत ! त्यांना आनंद मिळतोय ना ...चालू देत...

:-)

जयंत कुलकर्णी's picture

14 Aug 2017 - 6:57 pm | जयंत कुलकर्णी

पग,
"तसल्या लोकांना सांगा कृपया...'' तसले लोक म्हणजे कोणते आणि कसले? आणि तसले लोक आता तसे वागतात का ? मग तिनशे वर्षापूर्वीचा उदा. आत्ता देऊन तुम्ही काय साधत आहात हे कळेल का? ही जमात कुठली?

पगला गजोधर's picture

14 Aug 2017 - 7:01 pm | पगला गजोधर

तसले म्हणजे, समोरच्याला विनापुरावा "ब्रिगेडी" म्हणणारे.

जयंत कुलकर्णी's picture

14 Aug 2017 - 7:28 pm | जयंत कुलकर्णी

पगसाहेब,
तुमचा पूर्ण प्रतिसाद वाचा आणि मग उत्तर द्या. वेळ घेतला तरी चालेल. कारण ते कळल्याशिवाय तुम्ही कोण आहात हे कळणार नाही. तुम्हाला येथील बहुसंख्य लोक ब्रिगेडी समजत नाहीत पण तुमचे धागे वाचून आता सगळ्यांना तसा संशय येत चालला आहे हे मात्र खरं...
:-)
बरं असो. हा शेवटचा प्रतिसाद कारण जमात इ. हे शब्द वाचणे माझ्या कुवतीपलीकडे आहे.... तुमच्याच भाषेत सांगायचे झाल्यास, " असोच". :-)

सुबोध खरे's picture

14 Aug 2017 - 8:46 pm | सुबोध खरे

पैसा ताई आणि जयंतराव
पहिल्यांदा हा धागा यांनीखोडसाळपणे काढला आणि त्यानंतर खरा चेहरा समोर आल्यावर ते सोलापूर आणि अभ्याच्या मागे लपण्याच्या प्रयत्न चालू आहे.आणि आव मात्र गंभीर इतिहास संशोधकाचा आहे.
यांचे वितंडवाद श्री केजरीवालांची आठवण करून देणारे आहेत.
उगाच यांच्या नादाला लागणे हा कालापव्यय आहे.

पैसा's picture

14 Aug 2017 - 8:51 pm | पैसा

:)

... पाल खायचा हट्ट करणारा मुलगा आठवला. असो.