रोजचं जगणं 'थ्रीलिंग' व्हावं यासाठी तुम्ही काय करता?????

टर्बोचार्जड फिलॉसॉफर's picture
टर्बोचार्जड फिलॉसॉफर in काथ्याकूट
7 Aug 2017 - 12:17 am
गाभा: 

लहान असताना आपल्याला जगण्यात थ्रील यावे म्हणून फार काही वेगळे करावे लागत नाही.लहानपणीचे कुतुहल,मोठ्यांचे अटेंशन,वेगवेगळे खेळ ,भुतांच्या गोष्टी अन काय अन काय.हा काळ खूपच सुखाचा असतो.अनेक गोष्टी नव्याने माहीत होत असतात,कसलीही भ्रांत नसते, त्यामुळे रोजचा दिवस आनंदाचा असतो(बर्याचदा).
थोडे मोठे झाल्यावर ,कॉलेजला गेल्यावरही आयुष्य बर्याचदा थ्रीलींग वाटते.विरुद्धलिंगी आकर्षंण ,मुव्हीज,फॅशनेबल राहणे,खाणे ,नवीन ठीकाणी फिरणे हे होत असते.नवतरुण असल्याने उत्साह दांडगा असतो.
पण जसे आपण शिक्षण सोडून नोकरी धंद्याला लागतो तसे आयुष्य साचून रहायला लागते.नाही म्हणायला लग्न झाल्यावरचे काही दिवस आनंदाचे असतात.यात लैंगिकता हा भाग आहे पण तो इथे विषय नाही.तर, हे साचलेपण यायला लागल्यावर आयुष्य कुबट होऊ लागते.जसा एखादा ओढा आटून त्याचे ड्बके झाल्यावर वास मारायला लागते तसे आपले आयुष्यही वास मारायला लागते.कसलेही थ्रील राहत नाही.
मी गेल्या काही वर्षात या परीस्थीतीतून गेलो आहे.अजुनहि बरेच साचलेपण आहे पण् आता मी त्यावर मात करायला शिकलो आहे.
मी काय केले----
१.माझी ट्रेकिंगची आवड मी पुन्हा नव्याने जोपासली.पण वेगळ्या कोनातून.
सोलो ट्रेकींग ....
मित्रांबरोबर ट्रेकींगला जाण्याऐवजी मी काही दिवसांपुर्वी दोन सोलो ट्रेक केले.एकट्याने निबीड अरण्यात फिरताना येणारा रोमांच अवर्णनीय आहे.एक वेगळीच झिंग याने येते .याची कल्पना बेअर ग्रील्सच्या मॅन vs वाइल्डवरुन मी उचलली.एकट्याने ट्रेक करण्यात धोके आहेत,पण तेच मला हवं आहे.जिथे धोका आहे तिथेच थ्रीलही आहे.
२.बाईकींगची आवड मी गेल्या काही वर्षांपासुन जोपासली आहे.माझ्या वडीलांची जुनी य्झदी बाईक मी दुरुस्त करुन् आणली.इतर गाड्या सायलेंटली जात असताना त्यामधुन वेगाने माझी यझदी धाssडधाssड आवाज करत नेण्यात एक वेगळेच थ्रील वाटते.परत ३००cc ची पावर अनुभवने हा एक वेगळाच आनंदाचा प्रकार वाटतो.
३.दारु मी कधीतरीच पितो .पुर्वी बिअर प्यायचो पण वजन वाढण्याचा धोका असल्याने हार्डड्रींक सुरु केले.पण महागडे हार्ड ड्रींक पिण्यापेक्षा मी दर आठवड्यातुन एकदा देशी दारु घेतो.नाक दाबून ती जहाल कडवट चवीची दारु प्यायची,व नंतर येणारी नशा अनुभवने फारच थ्रीलिंग वाटते.(गटारात लोळत नाही,पण एकदा लोळायचे आहे)
तंबाखु खात होतो पण त्यात काय मजा नाही म्हणून ती सोडून सिगरेट व नंतर बिडीवर आलो आहे.आवडत्या जागी आवडत्या पेया सोबत बिडीचे झुरके घेण्यात एक वेगळीच बेफीकीरी वाटते.(लेखक व्यसनांचे समर्थन करत नाही,दारु,तंबाखुचे व्यसन आरोग्याला घातक आहे.)
४.आमचे रान जिथे आहे तिथल्या ओढ्यांवर सध्या नालबंडींगचे काम चालू आहे.लोक सहभागातून.मी त्या कामात वेळ मिळेल तेव्हा मदत् करतो.गरीब ,पण रानगट कष्टकरी लोकांबरोबर काम करणे ,त्यांचे छंदीफंदी वागणे ,त्यांच्याकडून बाहेरख्यालीचे किस्से ऐकणे(स्वतःच्या आयुष्यात अंमलबजावणी चालू आहे.).हा एक वेगळा अनुभव देऊन जातो.आपले मराठी मध्यमवर्गीय आयुष्य काहि काळ विसरता येते.
तर मित्रहो, सध्यातरी आयुष्य spice up करण्यासाठी ,थ्रील येण्यासाठी मी हे धंदे करत आहे.यात काही ठीकाणी अनैतिकता जरुर आहे.पण मराठी मध्यमवर्गीय आयुष्य आपल्याला फार काही थ्रील देऊ शकत नाही या मतापर्यंत मी आलेलो आहे.
तर तुम्हाला काही प्रश्न.
१.तुमच्या आयुष्यात साचलेपण आले आहे असे तुम्हाला वाटते का?
२.आयुष्याचा प्रत्येक दिवस थ्रीलिंग असावा असे तुम्हाला वाटते का?
३.रोजच्या जगण्यात थ्रील यावे यासाठी तुम्ही काय करता?
धन्यवाद.

प्रतिक्रिया

एकदा कोकेन आणि हेरॉईन पण घेऊन पहा. एकदम "हाय" वाटते.
व्यसनात अडकून आयुष्याची धूळधाण कशी होते ते पाहण्यात पण थ्रिल असू शकते.

टर्बोचार्जड फिलॉसॉफर's picture

7 Aug 2017 - 2:57 pm | टर्बोचार्जड फिलॉसॉफर

ये नाय चॉल्बे.फुकट किंवा नाममात्र पैसे लागतील असेच व्य्सन मी करतो.आणि फक्त व्यसनातून थ्रील येते असा माझा दावा आहे.अनेक गोष्टी आहेत.इतरांना कशात थ्रील वाटते हे जाणून घ्यायला आवडेल.

टर्बोचार्जड फिलॉसॉफर's picture

7 Aug 2017 - 2:58 pm | टर्बोचार्जड फिलॉसॉफर

व्यसनातून थ्रील येते असा माझा दावा नाही असे वाचावे.

सुबोध खरे's picture

7 Aug 2017 - 6:14 pm | सुबोध खरे

कोण म्हणतं पैसे लागतील? सुरुवातीला तुम्हाला "फुकट" थ्रिल देतील ते.
(नंतरची किंमत मात्र फार जड जाईल)

उदय's picture

7 Aug 2017 - 9:42 am | उदय

सध्यातरी आयुष्य spice up करण्यासाठी ,थ्रील येण्यासाठी मी हे धंदे करत आहे.

नि:शब्द झालो. सध्या इतकेच.

वरुण मोहिते's picture

7 Aug 2017 - 9:43 am | वरुण मोहिते

दारू पितो . मजा येते .फुल्ल थ्रिल्लिंग

पैसा's picture

7 Aug 2017 - 11:08 am | पैसा

मी सासू सासर्‍यांना रहायला बोलावून घेते! =))

प्रीत-मोहर's picture

7 Aug 2017 - 11:58 am | प्रीत-मोहर

=)) =)) =))

प्राची अश्विनी's picture

7 Aug 2017 - 2:25 pm | प्राची अश्विनी

;):):)

सस्नेह's picture

7 Aug 2017 - 6:03 pm | सस्नेह

ए, ए, ए नाय चॉलबे...!
हे थ्रिलिंग नाय, थ्रेटनिंग झाले !!

पैसा's picture

7 Aug 2017 - 6:39 pm | पैसा

=))

हाण तेज्यायला ! म्हणजे तुमच्या नातेवाईकांना नाही. :)
बायकांनी सासु सासर्‍यांना बोलावणे म्हणजे 'ब्लु व्हेल' पेक्षा पण खतर्नाक खेळ ! जबर्‍याच एकदम !

पैसा's picture

7 Aug 2017 - 8:26 pm | पैसा

अल्टिमेट थ्रिल आहे ते!

श्रीगुरुजी's picture

7 Aug 2017 - 11:15 pm | श्रीगुरुजी

मी सासू सासर्‍यांना रहायला बोलावून घेते! =))

हे सासू सासऱ्यांसाठी थ्रिलिंग आहे. यात स्वतःला थ्रिलिंग कसे वाटेल?

पैसा's picture

7 Aug 2017 - 11:39 pm | पैसा

पर्वतारोहण, जंगल सफारी, पाण्यात डुबक्या मारणे, वगैरे सगळे एकदम केल्यासारखे सगळे थ्रिल अनुभवायला मिळते. तुमच्या सासूबाईंना रहायला बोलावून बघा!

श्रीगुरुजी's picture

7 Aug 2017 - 11:45 pm | श्रीगुरुजी

टफि,

शिका यातून काही.

अप्पा जोगळेकर's picture

8 Aug 2017 - 11:22 am | अप्पा जोगळेकर

हे सासू सासऱ्यांसाठी थ्रिलिंग आहे. यात स्वतःला थ्रिलिंग कसे वाटेल?
छे. बायकोने साउ-सासरे यांना बोलावणे हे नवरे लोकांसाठी थ्रिलिंग आहे.

श्रीगुरुजी's picture

7 Aug 2017 - 11:19 am | श्रीगुरुजी

रोज एक नवीन फालतू धागा प्रसविणे यापेक्षा जगात जास्त थ्रिलिंग काहीही नाही.

३.रोजच्या जगण्यात थ्रील यावे यासाठी तुम्ही काय करता?

तुम्हाला बुळकांडी लागून तुम्ही कधी रतीब घालायला येताय त्याची वाट बघतो.

स्मिता.'s picture

7 Aug 2017 - 1:36 pm | स्मिता.

आयुष्य spice up करण्यासाठी मी मिपा वाचते, काही धागे वाचून अगदी थ्रिल्लिंग वाटतं!

हेमंत८२'s picture

7 Aug 2017 - 1:48 pm | हेमंत८२

आयुष्यात काहीतरी थ्रिल्लिंग हवे असेल तर मिपा वाचावे असे माझे म्हणणारे आहे..त्यातल्यात्यात लोक कसे उखाळ्या-पाखाळ्या कश्या काढतात... हे पाहून खूप मजा येते..

आंतरजालावर इतके बिनधास्त आणि प्रामाणिक आहात हे देखिल थ्रिल आहे.
==================
थ्रिल हे वन टाईम असतं, सवय नव्हे.

टर्बोचार्जड फिलॉसॉफर's picture

7 Aug 2017 - 3:01 pm | टर्बोचार्जड फिलॉसॉफर

आय डिफर.थ्रील हे वन टाईम असते असे काही नाही.जगात करोडो गोष्टी आहेत ज्या आपल्याला थ्रील देऊ शकतात.रोजचं नवे थ्रील अनुभवता येते.
मला फक्त जाणून घ्यायचे आहे what others do to spice up their life.

माझी यझदी धाssडधाssड आवाज करत नेण्यात
नॉईज पोल्यूशन म्हणतात याला. आजूबाजूच्या रहिवाश्यांना त्रास द्यायचे उद्योग आहेत.

बाहेरख्यालीचे किस्से ऐकणे(स्वतःच्या आयुष्यात अंमलबजावणी
वा वा, किती हा प्रामाणिकपणा!

तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्याची गरज नाही पण थ्रील वाटण्यासाठी देते. ;)
१.तुमच्या आयुष्यात साचलेपण आले आहे असे तुम्हाला वाटते का?
हो, कधीतरी वाटतं की! नॉर्मल आहे ते!

२.आयुष्याचा प्रत्येक दिवस थ्रीलिंग असावा असे तुम्हाला वाटते का?
अज्याबात नाही. लैच दमणूक आहे ती!

३.रोजच्या जगण्यात थ्रील यावे यासाठी तुम्ही काय करता?
रोज काहीतरी अचरटपणा करायला नाही जमणार.
घरातील मुलेबाळे सकाळी झोपेतून उठली की आख्खा दिवस थ्रिलींग वाटतो.

टर्बोचार्जड फिलॉसॉफर's picture

7 Aug 2017 - 5:23 pm | टर्बोचार्जड फिलॉसॉफर

विषयाला धरुन हा पहीला प्रतिसाद .रेवाक्कांचे आभार.
माझ्यामते men are designed to go out and shoot things.बायकांना थ्रील कशात वाटते हे कि अजिबातच वाटत नाही याविषयी बायकाच सांगू शकतील.

सुबोध खरे's picture

7 Aug 2017 - 6:16 pm | सुबोध खरे

असं कसं असं कसं?
तुम्ही एकदा "हेरॉईन" घेऊनच पहा. जगातील अत्त्युच्च सुख आणि थ्रिल त्यात आहे. उगाच का एवढे लोक त्याचा अनुभव घ्यायला मरमर करतात?

सुबोध खरे's picture

7 Aug 2017 - 6:21 pm | सुबोध खरे

पण महागडे हार्ड ड्रींक पिण्यापेक्षा मी दर रोजचं जगणं 'थ्रीलिंग' व्हावं यासाठी तुम्ही काय करता
आठवड्यातुन एकदा देशी दारु घेतो.
याने रोजचं जीवन कसा थ्रिल्लिंग होणार?
उरलेले सहा दिवस "हातभट्टी" घेऊन पहा
एखादे वेळेस मिथाईल अलकोहोल मिश्रित पिणे झाले तर आंधळेपण येईल आणि मग रोजचंच आयुष्य थ्रिलिंग होऊन जाईल.
हा का ना का.

टर्बोचार्जड फिलॉसॉफर's picture

7 Aug 2017 - 7:39 pm | टर्बोचार्जड फिलॉसॉफर

@खरे ,थ्रील आणि थ्रेट यातला फरक समजत नसेल तर इथे नाही लिहले तरी चालेल.

सुबोध खरे's picture

7 Aug 2017 - 8:09 pm | सुबोध खरे

रोजचं जगणं 'थ्रीलिंग' व्हावं यासाठी तुम्ही काय करता हे आपल्या धाग्याचे शीर्षक
आठवड्यातुन एकदा देशी दारु घेतो.
मग इतर सहा दिवस थ्रिल कसे येणार हो? तुम्ही विचारलं म्हणून मी सांगितलं.
हे थ्रिल साठी हातभट्टी घेणारे लोकसुद्धा मी पाहिले आहेत "म्हणूनच" सुचवलं.
राहिली गोष्ट इथे नाही लिहले तरी चालेल.
हाच सल्ला मी आपणास दिला तर चालेल का?
नाही म्हणजे बरेच लोक असा सल्ला आपल्याला आपल्या बहुसंख्य धाग्यांवर देत आहेत म्हणून म्हणतो हो.
बाकी आपला हा धागा काढण्याचा हेतू आपल्याला परखड शब्दात सुनावण्याचा मोह मी तूर्तास टाळतो आहे इतकेच.

दशानन's picture

7 Aug 2017 - 9:32 pm | दशानन

मी सकाळ सकाळी आईला तिला व्यवहार कसे कळत नाहीत यावर लेक्चर देतो... मग ती माझा दिवस उद्धार करते.. मग बाकी किकची गरज राहत नाही... पण गरज पडलीच तर बायकोला आम्ही कसे भारी व तुम्ही कसे तेच... इत्यादी सुनवतो.. पुढील 4 तास एक शब्द देखील बोलावा लागत नाही!

या किक मला पुरेश्या आहेत बॉ!

अभिदेश's picture

7 Aug 2017 - 10:21 pm | अभिदेश

तुम्ही एक गोष्ट लिहायचे विसरलात वाटत , मी मिपा वर अर्थहीन धागे काढतो आणि त्यावरच्या प्रतिक्रिया वाचतो. .....

वनफॉरटॅन's picture

8 Aug 2017 - 7:46 am | वनफॉरटॅन

फेसबुकवर सारकॅझम सोसायटी, सॅव्हेज किंवा मदर ऑफ सारकॅझम अशी पेजेस लाईक करा. त्यावरच्या पोस्ट्सवर लोकांच्या मतांविरुद्ध एक मत उगीच टंका. एन्जॉय.

श्रीगुरुजी's picture

8 Aug 2017 - 10:09 am | श्रीगुरुजी

नानासाहेब,

उद्या मुंबईला जा. जबरदस्त थ्रिल अनुभवता येईल.

रघुनाथ.केरकर's picture

9 Aug 2017 - 10:48 am | रघुनाथ.केरकर

किंवा आठवडाभर मुम्बैला येउन रहा. आणी दररोज सकाळी वसइ टू अन्धेरी, किन्वा कल्याण ते दादर प्रवास करा.

प्रत्येक क्षणाला थ्रील अनुभवायला मीळेल.

चौथा कोनाडा's picture

9 Aug 2017 - 5:25 pm | चौथा कोनाडा

:-))))

हे भलतंच थ्रील आहे ! अजून काय काय .... ? वाचायला आवडेल !

सौन्दर्य's picture

8 Aug 2017 - 8:11 pm | सौन्दर्य

'थ्रील' (मराठीत 'झिंग' चालेल का ? ) हे व्यक्तीसापेक्ष असते. प्रत्येकाला ते कमी अधिक प्रमाणात वेगवेगळ्या गोष्टींत वाटू शकते. मला खालील गोष्टी करण्यात थ्रील वाटते.

१) कॅमेरा घेऊन जंगलात किंवा एखाद्या गर्दीच्या ठिकाणी जाऊन फोटो काढणे व ते घरी कॉम्प्युटरवर कसे आले आहेत ते पाहणे.
२) डोक्यात एखादे कथानक सुचले की त्यावर लिहून ते लिखाण मित्र मैत्रीणीना मत प्रदर्शनासाठी पाठवणे आणि येणारी मते वाचणे.
३) बर्थ डेज, गेट टुगेदर किंवा इतर सोशल कार्यक्रमात लोकांना खेळता येतील, त्यातून आनंद घेता येईल असे गेम्स निर्माण करणे. हे गेम खेळताना उत्तेजित झालेले चेहरे पाहणे.
४) लहान मुलांबरोबर खेळणे, त्यांच्याशी बोलणे वगैरे. ही मुले कोणत्या प्रश्नाला काय उत्तर देतील हे बघणे खरंच थ्रिलिंग असतं.

सध्यातरी एव्हढेच आठवले आहे.

एक कळकळीची विनंती - कृपया थ्रील अनुभविण्यासाठी व्यसन, चुकीच्या किंवा अनैतिक, किंवा विनाकारण जीव धोक्यात येईल अश्या गोष्टी करू नका. त्याचे जीवनावर वाईट आणि दूरगामी परीणाम होऊ शकतात.

चष्मेबद्दूर's picture

9 Aug 2017 - 8:24 pm | चष्मेबद्दूर

हे म्हणजे जरा अतीच होतंय नाही का? कशाला हवाय हरेक दिन थरारक? केवळ थरार अनुभवण्यासाठी कैईच्या काई करणं म्हणजे व्यसनाला आमंत्रण. आता जर व्यसनच करायचं असेल तर गोष्टच वेगळी. असं म्हणतात कि काही लोकांमध्ये एक risk taking factor जास्त प्रमाणात असतो. तसं असावं बहुतेक टफी तुमच्यात.

कवितानागेश's picture

10 Aug 2017 - 12:55 pm | कवितानागेश

गळ्यात दोरी ना बांधता माकड पाळावे! एकदम थ्रिलिंग!

ज्ञानोबाचे पैजार's picture

10 Aug 2017 - 3:31 pm | ज्ञानोबाचे पैजार

"स्वतःच्या"
हा शब्द राहिला आहे बहुतेक प्रतिसादामधे.
पैजारबुवा,

अमरेंद्र बाहुबली's picture

10 Aug 2017 - 3:30 pm | अमरेंद्र बाहुबली

व्हाट्स अप वर नाँनवेज विनोद नको त्या गृप ला पाठवा. आणी थ्रील अनुभवा.

चौथा कोनाडा's picture

10 Aug 2017 - 10:49 pm | चौथा कोनाडा

काई उपेग न्हाय. कोनिच ओब्जेक्स्क्न घेत नाय (वेन्जोय कर्त्यात अन सोडुन देत्यात) कसलं बी थ्रील न्हाय त्यात.

विशुमित's picture

10 Aug 2017 - 11:00 pm | विशुमित

आमच्या एका मित्राला आलाय अनुभव हा.

चुकून भलताच व्हाट्सअप केला होता एका ग्रुपवर आणि झोपच उडाली होती त्याची. ११,३० वाजल्यानंतर १०-१२ अंगठे आणि खो खो हसणारी तोंडे येयला लागली,

प्रशांत लेले's picture

18 Aug 2017 - 5:49 pm | प्रशांत लेले

स्वतः कार चालवत रोज कामावर जाणे व परत येणे. ते सुद्धा मुंबईच्या ट्रॅफिक मध्ये याच्या सारखे थ्रील नाही.

अजून एक थ्रिल म्हणजे आवडीचे "पेय" पित पित मिपा वरील लेख वाचणे.