कायदेविषयक माहिती हवी आहे

निलम बुचडे's picture
निलम बुचडे in काथ्याकूट
3 Aug 2017 - 8:06 pm
गाभा: 

नमस्कार
माझ्या माहितीच्या एका कुटुंबात ४ माणसं राहतात. त्यात आई वडील आणि एक मुलगा व एक मुलगी असे आहेत. त्यातील जे वडील आहेत ते स्वतःच्या बायको मुलांचा द्वेष करतात आणि स्वतःच्या भावा-बहिणींच्या मुलांचे, इतर लोकांच्या मुलांचे लाड करतात. स्वतःच्या बायकामुलांबरोबर या ना त्या कारणाने भांडण करून त्यांना वेगळे ही ठेवले होते. त्यांचे भाऊबहिणीही या बायकामुलांना त्रास देत असतात. जी आई आहे तिच्याकडे हे सगळं सहन करण्याशिवाय काहीच पर्याय नाही कारण तिचा सख्खा भाऊ तिच्या विरोधात तिच्या नवऱ्याला मिळालेला आहे. वाचकांना हे सगळं खोटं वाटत असेल तर निदान काही क्षणांसाठी तरी हे खरं मानून यावर काही कायदेशीर उपाय सुचवावा.

प्रतिक्रिया

निलम बुचडे's picture

3 Aug 2017 - 8:59 pm | निलम बुचडे

जर कुणी कायदेविषयक माहितगार असतील. तर सांगा. म्हणजे त्यांना व्यक्तीगत संदेश पाठवून बोलता येईल.

मोदक's picture

3 Aug 2017 - 9:16 pm | मोदक

त्या बाई कमावतात का..?

आणि मुलांची वये काय..?

निलम बुचडे's picture

4 Aug 2017 - 10:41 am | निलम बुचडे

त्या बाई कमावतात का..? - नाही
आणि मुलांची वये काय..? - २२ मुलगा - शिकत आहे
आणि २५ - मुलगी - थोडे फार कमवते.

कोणत्याही कायदेशीर (कोर्ट) उपायाचे पर्यवसन घटस्फोटात होईल असे वाटते. तेच पाहिजे का त्यांना? कि कोर्टाची नोटीस आली की त्यांचे स्वभाव बदलणार असे वाटते?

बाय द वे - "बेकायदेशीर"/समजुतीचे उपाय काय काय केलेले आहेत?

निलम बुचडे's picture

4 Aug 2017 - 10:46 am | निलम बुचडे

घटस्फोट या उपायाला त्या बाई मानसिकरित्या तयार होतील असे वाटत नाही. कारण त्यामुळे त्यांना काहीच फरक पडणार नाही. त्या बाईला कुठेही आसरा नाही.

भरपूर समजावून झालय पण काही फरक पडला नाही.

कंजूस's picture

4 Aug 2017 - 8:50 am | कंजूस

याप्रकरणांत कायदेशिर सल्ल्यांचा वकिलांनाच फायदा होईल.
असा कोणता कायदा आहे की नवय्राला त्याच्या वागण्यापासून अडवू शकेल? कोणताही नाही.
मानसिक छळ यामुद्यावर खटला लढणे ही एक वकिलांची खेळी असते. सिद्ध करणे अवघड. नवय्राचे वडिलोपार्जित इस्टेटीत हिश्शावरून काही प्रकरण असावे

निलम बुचडे's picture

4 Aug 2017 - 10:50 am | निलम बुचडे

सिद्ध करणे अवघड. हे अगदी खरे आहे. वडिलोपार्जित अशी काहीच संपत्ती नाही.

कायदेशीर उपाय जाणकार देतीलच(कौटुंबिक हिंसाचार कायद्यांतर्गत कारवाई होऊ शकेल असे वाटते.) मात्र जो व्यावहारिक उपाय वाटतो तो सांगतो. मुलाने आणि मुलीने लवकरात लवकर आर्थिकदृष्ट्या सुस्थीर व्हावे. आईला या छळापासून वाचवणे त्यांच्याच हातात आहे. आईला घेऊन मुलगा आणि मुलीने वेगळे रहावे.

सौन्दर्य's picture

4 Aug 2017 - 8:58 pm | सौन्दर्य

सौरा जी, अगदी योग्य उपाय सुचविलात. मुला-मुलींची वये बघता त्यांच्या वडिलांच्या स्वभावात काही बदल घडेल अशी शक्यता कमीच दिसते. कौटुंबिक कलहात, कोण बरोबर कोण चूक हे ठरवणे फार कठीण असते. वरील प्रकरणात चूक-बरोबर कोणीही असोत, जर मानसिक छळ कमी करायचा असेल तर वेगळे राहणे हाच त्यावर उपाय आहे आणि वेगळे राहण्यासाठी आर्थिक स्वावलंबन अगदी महत्त्वाचे आहे.

मराठी_माणूस's picture

4 Aug 2017 - 11:56 am | मराठी_माणूस

त्यातील जे वडील आहेत ते स्वतःच्या बायको मुलांचा द्वेष करतात आणि स्वतःच्या भावा-बहिणींच्या मुलांचे, इतर लोकांच्या मुलांचे लाड करतात.

हे थोडे अपवादात्मक आहे. अशा वागण्या मागची कारणे जाणण्याचा प्रयत्न केला आहे का ?

गामा पैलवान's picture

4 Aug 2017 - 1:59 pm | गामा पैलवान

मराठी_माणूस,

प्रकरण अपवादात्मक आहे या निरीक्षणाशी सहमत. अगदी बाईंचा सख्खा भाऊही नवऱ्याला 'जाऊन मिळालेला' आहे. त्यामुळे थेट कौटुंबिक न्यायालय गाठण्याआधी काहीतरी उपाय सापडेलसं वाटतं.

आ.न.,
-गा.पै.

सहमत आहे, नाण्याच्या दोन्ही बाजु बघाव्यात असे वाटले उगीचच.
उगीचच म्हणजे एक उदाहरण असेच प्रत्यक्क्ष पाहिलेले. फक्त बाप बर्‍यापैकी सज्जन होता. दुर्दैवाने त्याला त्याच्या धंद्यात खोट आली. पैशाने जरा डाउन झाली कंडीशन. पण बायको कजाग. रोज त्याचा उध्दार होई. त्यातच तिने माहेरहुन काही पैसे दिलेले असावेत. ते परत द्या म्हनून रोज लकडा. मुले पण आईचे बघुन बापाला घालून पाडून बोलायला शिकली. बाप म्हणून तर काही किंमत ठेवलीच नाही वर समाजात त्याचेबाबत काहीही सांगितले जाऊ लागले. डोक्यावर परिणाम झालाय, वेडेत ते अशा पध्दतीने ट्रीट केले जाऊ लागले. मुलांच्या आजोळच्या लोकांनी पण त्यात तेल घातले. आम्ही पोसतो फॅमिलीला असा आव आणला. एक मामा जरा बरा होता तो त्या गृहस्थाला बोलायचा वगैरे पण त्यालाही त्याच्याच घरातून विरोध सुरु झाला.
एक दिवस फास लावून घेतला अन सुटला. कुटुंबाला बरेच पैसे मिळाले पॉलिस्या बिलिस्यातून, धंदाही चालू लागला, घरच्यानाही विषेष वाईट वाटले नाही. नवल म्हणजे घरात त्याचा मोठा फोटो दिमाखात आहे. मला मात्र तो गॅलरीच्या कोपर्‍यात बसून चोरासारखी घाबरत घाबरत बिडी ओढतानाचा आठवतो.

वकील साहेब's picture

4 Aug 2017 - 12:52 pm | वकील साहेब

त्या महोदयांच्या तशा वागण्या मागची कारणे शोधून त्याचे निरसन करण्याचे प्रयत्न करावेत. तसेच आई व मुलांनी खंबीर व स्वावलंबी होण्याचा प्रयत्न करावा. कारण कायद्याचा धाक किंवा अन्य मार्गाने मारून मुटकून बदल घडवलेला माणूस मनातून खरोखरच बदलून चांगला वागेलच ही अपेक्षा धरणे चुकीचे आहे.
कौटुंबिक हिंसाचार कायद्या अंतर्गत पत्नीला व मुलीला पोटगी दाखल दर महिन्याला काही ठराविक रक्कम कोर्टा कडून मंजूर करून घेता येऊ शकते. ही रक्कम त्या व्यक्तीच्या उत्पन्नावर ठरते. मुलाला काही मिळेल असे वाटत नाही. कारण मुलगा सज्ञान आहे. मुलगी जरी सज्ञान असली तरी तिच्या विवाहा पर्यंत तिच्या पालन पोषणाची जबाबदारी तिच्या वडिलांची आहे. अनेकदा असेही पाहण्यात आले आहे की कोर्ट कारवाई करायला सुरवात केल्यावर किंवा 1-2 तारखा पडल्यावर अशा व्यक्ती अचानक सुता सारख्या सरळ होतात. बाकी कोर्टात जाण्या न जाण्याचा निर्णय संबंधितांनी आपापल्या परिस्थितीचा विचार करून मगच घ्यावा. कौटुंबिक केसेस मध्ये एका केस चा निकाल दुसर्‍या केस ला सरसकट लावता येत नाही.

मोदक's picture

4 Aug 2017 - 2:25 pm | मोदक

+११

निलम बुचडे's picture

4 Aug 2017 - 2:56 pm | निलम बुचडे

सर्वांच्या प्रतिक्रियांशी सहमत. हे प्रकरण अपवादात्मक आहे हाच खरा प्रॉब्लेम आहे. कुणाला विश्वासात घेऊन सांगायचं ? कारण कुणाचा विश्वासच बसणार नाहीये.
मिपाकरांनी यावर विश्वास ठेवला याबद्दल धन्यवाद... त्या महाशयांच्या वागणूकीची कारणं समजायला काहीच मार्ग नाही. ते असे का वागतात हे विचारणार कोण ?? ते आपल्या बायकोमुलांशी धड बोलतही नाहीत. कायद्याची मदत घेणं कठीणच वाटतंय. त्यामुळे आता एकच मार्ग उरतो तो म्हणजे मुलांनी आपल्या पायावर उभे राहणे.
खरंतर हे लिहावं की लिहू नये अशा संभ्रमात आहे, तरीपण लिहितेय. " सर्व मिपाकरांना विनम्र आवाहन करतेय की जर कुणी त्या मुलांना नोकरी मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन करू इच्छित असेल, तर कृपया मला व्यक्तीगत संदेश पाठवा. म्हणजे मला त्या मुलांची शैक्षणिक माहिती देता येईल."
किंवा अशी शैक्षणिक माहिती याच धाग्यावर दिली गेली तर ते योग्य ठरेल का? हेदेखील सांगावे.
मला काय करावं ते सुचत नाहीये.

पुष्करिणी's picture

4 Aug 2017 - 4:15 pm | पुष्करिणी

२०-२५ वर्षांची मुलं आहेत म्हण्जे ५०+ वय असावं नवरा-बायकोचं.

ते बायकामुलांचा 'द्वेष' करतात म्हण्जे नक्की काय करतात? हिडीस-फिडीस करतात / बायकोचा सतत अपमान करतात / अन्न-वस्र्त-निवारा-शिक्षण या गरजा भागतील अशी आर्थिक जबाबदारी घेत नाहीत / मारतात वगैरे / प्त्नीच्या चारित्र्यावर शंका घेणे / संशयी स्वभाव ?

हे कधीपासून चालू आहे? सध्या बायका-मुलं राहतात ते घर कोणाच्या नावावर आहे?
बायकोनं मुळू-मुळू रडणं सोडून द्यावं , इतर काही स्किल्स असतील तर घरगुती उद्योग चालू करावेत - डबे देणे, शिवणकाम, पाळणाघर इ. कमीपणा मानू नये.
मुलांनीही लवकरांत लवकर पायावर उभं रहावं.

वकील-कोर्ट फक्त 'द्वेष' करतात म्हणून काही करू शकतील असं वाटत नाही

माहितगार's picture

5 Aug 2017 - 7:43 am | माहितगार

वकील मंडळींचे प्रतिसाद आले आहेतच. -तशी धागा ल्खीची इतिशी झालेली आहे - तरीपण वकील महोदयांनी सल्याची केलेली सुरुवात "त्या महोदयांच्या तशा वागण्या मागची कारणे शोधून त्याचे निरसन करण्याचे प्रयत्न करावेत." इथून आहे आणि त्याभागाकडे धागा लेखक दुर्लक्ष करु इच्छितात असे त्यांच्या प्रतिसादावरुन दिसते.

त्यांनीहीही द्वेष करतात, त्रास देतात म्हणजे नेमके काय ? हे ह्या धागा लेखातून क्लिअर होत नाही, भावा बहीणीच्या मुलांशी नेमक्या कोणत्या पक्षपाताचा आरोप आहे हेही धागा लेखातून स्पष्ट होत नाही. या संबंधाने धागा लेखात माहितीची पोकळी आहे. पत्नीचे लाड तीच्या वाढत्या वयाचा विचार न करता केले जातात. पण मुलांसाठी केवळ बालपणातच 'लाड' शब्द वापरला जातो. -मोठेपणी प्रेम, जिव्हाळा, इत्यादी- काही बाप मुलांवर लहानपणापासूनच शिस्तीचा बडगा उगारतात तर काही मुले वयात आल्या नंतर शिस्तीचा बडगा उगारतात, काही दुर्लक्ष करणारे आणि काही अती मऊ सुद्धा असतात. सज्ञान झालेल्या मुलांबाबत 'लाड' या शब्दाची धागा लेखकाची अपेक्षा समजलेली नाही.

"इतर लोकांच्या मुलांचे लाड करतात." असे धागा लेखक म्हणतो इतर परक्यांच्या मुलांचे लाड करु शकणारा माणूस वाईट असून असून किती वाईट असेल ? त्यात मेव्हणा सुद्धा त्याची बाजू घेतो असे म्हटले आहे. अशा स्वभावाची माणसे असू शकतात आणि अशा स्वभावाचा विनाकारण जळफळाट करुन घेणार्‍या स्त्रिया आणि कुटूंबीयही असू शकतात. त्यामुळे का कोणजाणे अभ्या यांच्या प्रतिसादातील महोदय अती मऊ असावेत आणि धागा लेखात वर्णीत माणूस खंबीर असावा असण्याची शक्यता तपासण्याची गरज असावी पण धागा लेखक हे कितपत करु शकतील ह्याची शंका वाटते.

माहितगार's picture

5 Aug 2017 - 5:01 pm | माहितगार

"तशी धागा लेखाची इतिश्री" असा बदल करण्यास संपादकांनी मदत करावी हि विनंती

मार्मिक गोडसे's picture

5 Aug 2017 - 12:32 pm | मार्मिक गोडसे

@ माहितगार , यू सेड इट.

निलम बुचडे's picture

5 Aug 2017 - 12:50 pm | निलम बुचडे

तुम्हा सर्वांच्या शंकांचे निरसन मी करू शकते. कारण त्या कुटुंबातील मुलगी माझी बालमैत्रीण आहे, त्यामुळे खूप जवळून बघितलय मी सगळं. माझ्याजवळ बर्याचदा मन मोकळं करते ती. पण बाहेर कुणाला काहीच सांगायची सोय नाहीये म्हणून म्हटलं मिपावर लिहावं. जेणेकरून जेव्हा खरोखरच ही कहाणी जगासमोर येईल तेव्हा लोकांच्या प्रतिक्रिया, शंका आणि प्रश्न कशाप्रकारचे असतील याची निदान कल्पना तरी येईल.
तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद सर्व प्रकारच्या प्रतिसादाबद्दल . तुम्हा सर्वांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे माहित असूनही तिच्या परवानगीशिवाय ती उत्तरे मी देऊ शकत नाही त्याबद्दल क्षमस्व.. फक्त एवढेच सांगू शकेन की परिस्थिती खूप भयानक आहे...

तुम्हा सर्वांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे माहित असूनही तिच्या परवानगीशिवाय ती उत्तरे मी देऊ शकत नाही त्याबद्दल क्षमस्व.. फक्त एवढेच सांगू शकेन की परिस्थिती खूप भयानक आहे.

होय असे असेल तर ते न सांगणेच योग्य ठरेल. मात्र मारझोड, हिंसा होत असेल तर बेलाशक कायद्याची मदत घ्यायला हवी असे वाटते. त्यासोबतच बहिणभावांनी लवकरात लवकर स्वतःच्या पायावर उभे रहावे.

त्यासोबतच बहिणभावांनी लवकरात लवकर स्वतःच्या पायावर उभे रहावे.

हेच खरे सोल्यूशन. सज्ञान लोकांना पटत नाही तर स्वतःच्या पायावर उभे टाकून वेगळे होणे हा चांगला पर्याय (मानसिक आजारी आणि अपंगांची गोष्ट निराळी).

यात मुलीच्या विवाह होण्याच्या शक्यतेबद्दलही आपल्या धागा लेख आणि प्रतिसादातून माहितीची पोकळी आहे.

पुतळाचैतन्याचा's picture

7 Aug 2017 - 5:34 pm | पुतळाचैतन्याचा

भारतीय दंड संहिता सेक्शन १२५ नुसार मेन्टेनन्स चा अधिकार (हिंदू) बायको ला आहे. अगदी नवर्याच्या पगाराच्या 40% पण मागू शकतात. त्यांनी वेगळे ठेवले होते/ हाकलले होते याचे पुरावे तयार करा आणि सहन करण्या पेक्षा वकिली सल्ला लवकर घेऊन पोलीस केस करा. पोलीस केस मध्ये जो आधी केस करतो त्याला महत्व असते. दुसऱ्या पार्टीने आधी केस केली तर तुमची केस counter-केस म्हणून स्टॅन्ड होणार नाही. म्हणून चर्चा करून मिटेल या आशेवर बसू नका. तुमचे कायदेशीर नुकसान होईल. भांडण करतात यात शारीरिक मारहाण झाली असेल/होत असेल तर वेळीच पोलीस तक्रार करा. शक्यतो ४८ तासात. घर कोणाच्या मालकीचे आहे? बायकोचा हिस्सा म्हणून घटस्फोट न घेता 50% हक्क मागू शकता. कोर्टाच्या ऑर्डर ने पाहुण्यांना घरी येण्यास बंदी करू शकता. आई चे वय सिनियर citizen मध्ये बसत असेल तर हॅरॅसमेंट ऑफ सिनियर सिटीझन टाकू शकता. आधी भरपूर पुराव्यांची जुळणी करा आणि वरील पैकी किती गोष्टी टाकता येतील हे पहा...मुलींना शारीरिक त्रास दिला तर विनयभंग, अत्याचार पैकी जे लागू असेल ते करावे. जास्त माहिती दिल्यास मुद्देसूद उत्तरे देता येतील.