...हमने इश्क किया है.(१)

झेंडूच्या उफाड्यावर
दिवसभर,
निलाजरी पुंडाई
करणारा उनाड चतुर.
नाईलाजाच्या वाटेने घरी येतो.
तसा मी येतो तिनसांजेला.
तेव्हा...
तुझ्या ओंजळीतली गुलबाक्षी
चिंबून गेली असते.
बावळट...
*****
अशीतशी इथे तिथे
वाट बघू नको माझी.
का? का? का?..
तुझ्या सात्वीक ओठाची
गुलबाक्षी थरथर.
(मी वसूल करतो माझी भ्रष्ट निराशा)
का? काय बावळट..
का?..का? का? का?..
कारण..
का? का?..
कावळ्याची
असते नजर -गस्त
पिकत्या पपईवर.

वा, हाहाहा!

भारीच रामदास भौ!
(चतुर)बेसनलाडू

याचा अर्थ

याचा अर्थ काय ?

कावळ्याची
असते नजर -गस्त
पिकत्या पपईवर.

अनिरुद्ध

अंमळ लहान

अंमळ लहान आहात.

कळेल पुढे कावळे झाल्यावर किंवा ...........

जैनाचं

Rolling On The Floor

जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आमचा ब्लॉग

मस्त !

झेंडुच्या उफाड्यावर आणि निलाजरी पुंडाई हे शब्द फारच आवडले..

भारी कविता !
--लिखाळ.

३०

http://vipravani.wordpress.com/
३० व्या वर्शी तर धुमकुळ घातला असेल ह्या बाबाने.

अरे वा.

अरे वा. आवडली कविता.
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

३० व्या

३० व्या वर्शी तर धुमकुळ घातला असेल ह्या बाबाने.
Rolling On The Floor Rolling On The Floor Rolling On The Floor

रुदादे

रुदादे मुहोब्बत क्या कहिये
कुछ याद रहा कूछ भूल गये

मस्तच!

तुझ्या ओंजळीतली गुलबाक्षी
चिंबून गेली असते.

वा! अतिशय

वा! अतिशय सुंदर काव्य...!

तात्या.