एका माणसाचा कट्टा - फुडोग्राफी २०१७ भेट

Primary tabs

अनुप देशमुख's picture
अनुप देशमुख in जनातलं, मनातलं
30 Jul 2017 - 10:22 am

डिस्क्लेमर – जास्त फोटो नसल्याने जळजळ होण स्वाभाविक आहे पण आयोजन कर्त्यांच्या नियमात बसत नसल्याने फोटो काढता नाही आले. तरी सुद्धा मिपा चे नाव वापरून जाण्याची खुण म्हणून चार दोन फोटो काढले आहेत ते गोड मानून घ्या आणि जमल तर प्रदर्शनाला जाऊनही या.

मिपा, फोटोग्राफी आणि खाद्य अस आवडत त्रिकुट केदारभाऊंच्या पोस्ट मध्ये दिसलं आणि लागलीच फुडोग्राफी इव्हेंट फेबु कॅलेंडर मध्ये टाकून ठेवला.

एका उनाड दिवस म्हणून ठरवूनच आज सकाळी उठलो आणि इतर काम उरकून भल्या दुपारी बालगंधर्वच्या गेटवर जाऊन थडकलो.
balgandharv

सगळीकडे नुसती लगबग चालू होती, मनात आल मिपाचा सिक्रेट कट्टा होतोय कि काय ;-) समोर कळाल कि एका शुभारंभाचा प्रयोग चालू होता. त्याची जंगी तयारी बघून पुढे गेलो आणि तिकीट खिडकीच्या पलीकडे कला दालनाचा बोर्ड दिसला.
फुडोग्राफी

पहिल्या मजल्यावर अत्यंत आटोपशीर अस प्रदर्शन मांडल होत.
प्रदर्शन
वीकांत असल्याने निवांत होतोच आत जाताच एक एक फोटो मन लावून बघायला सुरुवात केली आणि सुरु झाला एका अप्रतिम विश्वाचा प्रवास. फोटोग्राफीमधल थोडफार कळत असल्याने प्रत्येक फोटोमागे घेतलेली मेहनत दिसायला लागली. पदार्थाची मांडणी, लाईट, त्याला पूरक अशी पार्श्वभूमी, पदार्थाचा पोत, मूळ पदार्थाच्या बाजूला असलेली सामग्री अहाहा जन्नत ! थोड्या वेळापूर्वी नसलेली भूक जागृत झाल्याचा भास झाला आणि पृथ्वीवर आलो.

प्रदर्शन

ऐन श्रावणात शाकाहारी मांसाहारी पदार्थ मांडीला मांडी लावून पंगतीत (बोर्डावर) बसलेले बघून मन भरून आल. अच्छे दिन अच्छे दिन ते हेच.
नावानुसार क्रम असल्याने पहिल्यांदा फोटो होते अंगद जोशी यांचे. जवळ जवळ एक भिंत व्यापून टाकणारा हा माणूस कमाल फोटो काढतो. फाईन डाइन कुझीनचे फोटो निव्वळ लाजवाब. रेलिंग असल्याने नाहीतर हातात घेऊन खाऊन टाकू कि काय असं वाटत होत. बर पदार्थ हि असे कि क्या कहने. चोकलेट, बिस्कीट, पुडिंग, अहाहा!

थोड जवळून

भरली वांगी आणि पातळ खोबर्याच्या कापाने केलेली सजावट, ठेल्यावरची पानांची आकर्षक मांडणी, चहाच्या पेल्यावर ठेवलेली भजी, कल्याण भेळची पाणीपुरी शेवपुरी, महादेव पॅटीसवाल्याचे कढई भरून गुलाबजाम इंडियाना ग्रील ची मिसळ, मटन धन्सक अशा विविध पदार्थांची लज्जत चाखत चाखत आणि आभासी पोट भरत पुढे आलो ते थेट केदार्भौंच्या फोटोसमोर. ज्जे बात मानल केदार भाऊ. हार्दिक अभिनंदन. हा घ्या फोटो.

केदार भाऊंचा फोटो

काही फोटोंच्याच्या खाली मूळ छायाचित्रकारांची नाव लावण्याच काम चालू असल्याने नक्की केदार यांचे फोटो किती हा प्रश्न अनुत्तरीत राहिला. आशा आहे आज काम पूर्ण झाल असेल.
पुढे फिरताना आयोजकांपैकी मंदार कोल्हापुरे या इसमाशी ओळख झाली. फ्लाय सोलो कंपनीचा हा मालक. हि कंपनी टी शर्ट बनवते. मूळ सिविल इंजिनिअर असून छंद म्हणून फोटोग्राफी करतो. लागलीच त्याचाही फोटो घेतला आणि आपसूक अजून काही फोटो काढायची परवानगी मिळवली आणि पुढे सरकलो.

आयोजक

आता जवळपास सर्व फोटो दोनदा पाहून झाल्याने मूळ खादाडीच्या उद्देशाकडे मोर्चा वळवला. आमच्याच गावचे मोदी पेढेवाल्यांच्या स्टॉलवर पेढ्यांची फ्री सॅम्पल चाखले आणि एक नवीनच पदार्थ बघितला. रातराणीची बर्फी. पण रातराणी आणि साप यांचा संबंध असल्याने हात आखडता घेतला. पुढे मालपाणी यांचे क्रीमरोल, बाकरवडी ठेवले होते पण खाण्याची इच्छा संपल्याने इलुसा टुकडा खाऊन माझी भेट संपवली.

पेढा आणि बर्फी

जाता जाता प्रथेप्रमाणे कॅफे गुडलकला भेट दिली आणि दारातच हि गर्दी पाहून थबकलो. थोडे अपमान पदरात पाडून घेत चहा आणि बनमस्का मागवला आणि आमचेही चार आणे म्हणून फोटोग्राफी ट्राय केली.

गुडलक बन मस्का आणि चहा

जाता जाता वाटतंय कि मिपाकरांना अचानक कट्टा करण्यासाठी ब्येष्ट ठिकाण आहे. पुण्यातल्या मिपाकारांनी जरूर लाभ घ्यावा.

पाकक्रियाछायाचित्रणप्रतिक्रियाआस्वादसमीक्षा

प्रतिक्रिया

पैसा's picture

30 Jul 2017 - 11:34 am | पैसा

मला फोटो दिसत नाहीयेत पण! :(

अनुप देशमुख's picture

31 Jul 2017 - 6:55 am | अनुप देशमुख

मला फोटो दिसत आहेत, आणि बरीच काथ्याकूट करून टाकलेत फोटो. सं मं मदत करेल काय?

फक्त पहिला फोटो दिसत आहे. इतर फोटोंना तुम्ही पब्लिक शेअर केलेलं नाहीये बहुतेक. गुगल फोटोंचा हा प्रॉब्लेम नेहमीचाच आहे. दुसऱ्या ब्राऊजरमधून गुगल मधून साइन आउट करून फोटो दिसायला पाहिजेत. दिसत नसतील तर ते पब्लिक शेअर नाहीयेत.

अनुप देशमुख's picture

31 Jul 2017 - 12:49 pm | अनुप देशमुख

प्रयत्न करतोय!

केडी's picture

31 Jul 2017 - 11:09 am | केडी

प्रदर्शनाला भेट दिल्या बद्दल धन्यवाद. मला देखील तुमची लेखातले फोटो दिसत नाहीयेत. माझ्या ह्या पाककृतीचा फोटो प्रदर्शनात होता.
कोकोनट बियर ब्याटर श्रिम्प/प्रांन्स

फक्त पहिला फोटो दिसतोय.

यशोधरा's picture

1 Aug 2017 - 6:10 pm | यशोधरा

मलाही.

कालच जाऊन आले प्रदर्शनाला. छानच होते.
सर्व फोटो बघताना मिपावर सुंदर फुड फोटो टाकून पाकृ पेश करणाऱ्या सानिकाची अतिशय आठवण येत होती. तिचे एकसे एक फोटो या प्रदर्शनात बघायला आवडले असते.
* प्रदर्शनकर्त्यांचे फोटो वर्कशाॅप विकांताला असणार आहे.
* तिथे मस्त मिसळ आणि मॅड ओव्हर डोनट्सचे डिस्काउंट कुपन्स अगदी आग्रहाने आणुन दिले!
* मोदींची पान फ्लेव्हर मिठाई छान होती!

अरे हो! केडीचा हा फोटो पाहिला पण तो केडीचा आहे लक्षात आले नाही तिथे. हा धागा आधी वाचला असता तर आधी मिपावर पाहिलाय हा फोटो म्हणून लेकासमोर मिरवले असते ;)

अनुप देशमुख's picture

31 Jul 2017 - 10:55 pm | अनुप देशमुख

फुडोग्राफी चा बोर्ड

प्रदर्शन १
.

प्रदर्शन २
.

अंगद जोशी यांचे फोटो
.

केदार भाऊंचा फोटो
.

आयोजक मंदार आणि त्याचे सहकारी
.

फ्री फ्री
.

बन मस्का - कॅफे गुडलक
.

रुस्तम's picture

31 Jul 2017 - 11:58 pm | रुस्तम

नाही दिसत..

चांदणे संदीप's picture

1 Aug 2017 - 6:54 pm | चांदणे संदीप

हुश्श . हे पण दिसले नाहीत. (तेवढंच आजच इनो उद्यावर!)

Sandy

डॉ सुहास म्हात्रे's picture

1 Aug 2017 - 9:32 pm | डॉ सुहास म्हात्रे

असे करून पहा...

१. प्रथम ज्या अल्बममध्ये फोटो आहेत त्याला पब्लिक अ‍ॅक्सेस द्या.

२. नंतर फोटो पूर्ण आकारात उघडून (थंबनेल नव्हे) मग मिळणारा कोड तो फोटो इथे टाकण्यासाठी वापरा.

छान.. इथे शेअर केल्याबद्दल धन्यवाद!

पिलीयन रायडर's picture

1 Aug 2017 - 1:28 am | पिलीयन रायडर

बालगंधर्वचा सोडुन एकही दिसत नाही.
प्रतिसादातलेही.

अनुप देशमुख's picture

1 Aug 2017 - 7:29 am | अनुप देशमुख

करून परत प्रकाशित करता येईल का?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 Aug 2017 - 7:55 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मूळ धाग्यात ते फोटो संपादक टाकतील.

-दिलीप बिरुटे

अनुप देशमुख's picture

1 Aug 2017 - 5:41 pm | अनुप देशमुख

परत प्रतिसाद देतो

अनुप देशमुख, पहिला फोटो 530 kBचा आहे म्हणून दिसतो आहे. परंतू इतर फोटोंच्या लिंक्स थंबनेलच्या आहेत! ( 1 ,1.5kB size !)

मराठी_माणूस's picture

1 Aug 2017 - 8:37 pm | मराठी_माणूस

फक्त पहीला फोटो दिसतो

उदय's picture

1 Aug 2017 - 9:31 pm | उदय

एकदम सुरुवातीला हा धागा टाकला होता तेव्हा सगळे फोटो दिसत होते, मी स्वतः बघितले आहेत. 'फ्लाय सोलो'चा टी-शर्ट घातलेला + तुमचा फोटो आणि चहा-बन चा फोटो आठवतोय.

प्रणित's picture

3 Aug 2017 - 3:40 am | प्रणित

बालगंधर्वचा सोडुन एकही दिसत नाही.

नीलमोहर's picture

3 Aug 2017 - 12:54 pm | नीलमोहर

प्रतिसादातील फोटो आधी दिसत होते. त्यांची लिंक घेऊन धाग्यात टाकणारही होते, पण ते परत दिसेनासे झाले.
इमेजेसना पब्लिक अ‍ॅक्सेस दिलायत का परत तपासून पहा. फोटोंच्या लिंक्स सा.सं आयडीला व्यनि अथवा खरडीने पाठवा.