दिवस ९ वा आणि दहावा.-अमृतसर, मनाली, लेह,कारगिल,श्रीनगर, जम्मू.

सतिश पाटील's picture
सतिश पाटील in भटकंती
29 Jul 2017 - 5:33 pm

पूर्वतयारी आणि दिवस पहिला - अमृतसर, मनाली, लेह,कारगिल,श्रीनगर, जम्मू.
दिवस दुसरा -अमृतसर, मनाली, लेह,कारगिल,श्रीनगर, जम्मू.
दिवस तिसरा आणि चौथा-अमृतसर, मनाली, लेह,कारगिल,श्रीनगर, जम्मू.
दिवस पाचवा आणि सहावा -अमृतसर, मनाली, लेह,कारगिल,श्रीनगर, जम्मू.
दिवस सातवा आणि आठवा -अमृतसर, मनाली, लेह,कारगिल,श्रीनगर, जम्मू.

सकाळी ८च्या सुमारास उठलो, आपण चक्क जिवंत आहोत याचा आम्हाला आनंद झाला होता, देवाचे उपकार मानले.

दिवस ९ वा-

आजचा प्रवास सारचू ते लेह शहर. २५१ किमी. ( प्रत्यक्षात पोहोचलो ते उपशी पर्यंत. लेहच्या ५० किमी आधी.)

नाश्ता वेगैरे करून आम्ही साधारण १०.३० वाजता पुढच्या प्रवासाला निघालो. त्या लडाखी धाबावाल्याचे आभार मानले. ३ महिन्यासाठी जागा मालक २०००० रुपयावर ती जागा भाड्याने देतो आणि तिथे हे लडाखी लोक व्यवसाय करतात अशी माहिती त्या धाबावाल्याकडून मिळाली.

.
हाच तो ढाबा चालक

.

.
आम्ही राहिलो तो तंबू

आजचा प्रवास जरा जास्त असल्याने लवकर निघालो. १०.३० वाजता हे लवकरच म्हणायला हवे. असो.
जास्त कुठेच न थांबता फेसबुकावर आणि लोकांना नुसता दाखवायला फोटोग्राफी करताना जास्त वेळ थांबू नका, हि सूचना पाळायची असेल तर पाळा, नाहीतर सोडा , अशी सूचना करून मी पुढे निघालो.

थंडी आणि ऑक्सिजनची कमतरता जाणवतच होती, थोड्या वेळाने 21 गाटा लुपस जवळ पोहोचलो, २१ अवघड वळणे घेऊन ७ किमीचा हा रस्ता आपल्याला अजून २ हजर फुट उंचीवर घेऊन जातो. तिथे गाडीची ताकत कमी पडू लागली, कानामागून धडधड धडधड आवाज येऊ लागला म्हणून आरशात पहिले तर बुलेट वाल्यांची ग्यांग सरळ एका रेषेत सुसाट निघून गेले, काळजात वार झाला राव. काय गाडी आहे बुलेट. मायला, आपण का नाही घेतली म्हणून खूप वाईट वाटले.

.
गाटा लुपस

मधेच कच्चे रस्ते जे शॉटकट आहेत ते न घेण्याचे आधीच ठरवले होते. थोड्यावेळाने मागून येऊन बाकीच्यांनी मला गाठले, लाचुन्ग्ला पास जवळ जरा फोटोग्राफी केली. आणि पुन्हा पुढे निघालो. पांग पर्यंत पोहोचण्याचे वेध लागले होते. वाटेत एक ढाबा लागला थोडंस चहा पाणी पोटात ढकलून पुन्हा पुढे निघालो. पुढचा रस्ता खराब होता. पांगच्याआधी आकाशाकडे पहिले तर काळे ढग जमले होते, पाऊस पडला तर काय हालत होईल याची मी फक्त कल्पनाच केली. ( आधी खूप वेळा मनाली आणि रोहतांगमध्ये हा अनुभव घेऊन झालाय.)
.

.

.

.

कसेबसे पांग आले आणि पावसाचे ढग दिसेनासे झाले. हा फक्त चकवा होता. इथेही काही विशेष नाहीच. आर्मीचा एक तळ आणि काही तंबू. बाकी सगळे सारचू सारखेच. इथून पुढे सपाट रस्ता लागणार होता म्हणून लवकर निघू आणि गाड्या पळवा अशी सूचना केली. पांगच्या पुढे थोडेसे वर जाऊन तो पठार आला. तिथून संपूर्ण सपाट रस्ता. मैदानी भाग. डोंगर हे रस्त्याच्या खूप दूर होते त्यामुळे पावसाचे येणाऱ्या पाण्याने इथले रस्ते खराब झाले न्हव्ते, तर अगदी गुळगुळीत. गाड्या सुसाट सोडल्या. बाकीचे मागे फोटो काढायला थांबले, त्यांना तसेच सोडून मी निघालो. सुसाट म्हणजे ६० चा स्पीड. गाडी त्याच्या वर पळेचना. म्हटलं काहीतरी लोचा झालाय. कदाचित क्लचप्लेट गेली असेल.

.

.

बराच वेळ गेल्यानंतर देखील यांचा अजून काहीच पत्ता न्हवता. रस्ता सुमसाम. कोणीच नाही. म्हटले थांबूया. तसं यांच्या गाड्यांचा स्पीड नेहमी माझ्यापेक्षा जास्तच असतो नेहमी, मग अजून का नाही आले म्हणून मी त्यांची वाट पाहत बसलो. बराच वेळ झाल्यावर देखील हे आले नाहीत , मग मागे जाऊन त्यांना शोधण्याचा विचार करू लागलो. जवळजवळ अर्ध्या तासाने जुलीची गाडी दूरवर दिसली. तो आला. बाकीचे अजून मागेच. कुठ होतात म्हणून विचाराले, तर फोटो काढत होतो म्हणून सांगितले. मी काहीच बोललो नाही. थोड्या वेळाने बाबा आणि जेम्सही आला. पुन्हा फोटोग्राफी झाली. आणि पुढे निघालो.
त्यांच्या गाड्याही ७० च्या पुढे पळत न्हवत्या, शेवटी समजले, ऑक्सिजन कमी असल्याने पेट्रोल नीट जळत नाहीये, त्यामुळे गाडीला पावर कमी पडतीये.

.

.

तो मस्त रस्ता संपून आता मातीचा रस्ता सुरु झाला. मातीचा म्हणजे चाळणीने बारीक चाळलेल्या मातीसारखा रस्ता. यांच्या अवेंजर ग्रीप पकडत न्हवत्या कारण बटन टायर यांच्या गाड्यांना मिळाले न्हवते.. त्यामुळे चढण चढता येत न्हवती. आता आम्ही आगीतून निघून फुफाट्यात अडकणार होतो. सारचू म्हणजे आग आणि टांग लांग ला पास म्हणजे फुफाटा.
पुन्हा मातीचा रस्ता संपून डांबरी रस्ता सुरु झाला. प्रचंड थकवा वाटू लागला, म्हणून गाडीवरून उतरायचा निर्णय घेतला. गाडीवरून उतरताना पुन्हा दम लागला. थोडावेळ त्या टांग लांग ला पास कडे पहिले. आणि पुन्हा निघालो.
टांग लांग ला पास जवळ येता येता आकाशात काळे ढग दिसले आणि त्या काळ्या ढगांच्या खाली पांढरे धुके. गाड्या थांबवल्या. जुलीने विचारले अरे पप्या पाऊस पडतोय का?
एक दीर्घ श्वास घेऊन त्याला म्हटले, नाही रे पाऊस नाही पडत आहे. तो म्हणाला मग ते पांढरे काय दिसतंय?
मी म्हटले ते होय? ते बर्फ पडतोय, जो रोज आपल्या ग्लासमध्ये पडतो न, तो आकाशातून पडतोय.

माझी आतून फाटली होती, पण मी तसे दाखवले नाही परंतु यांचे चेहरे मात्र रडवेले झाले. क्षणात रंग उडाला सगळ्यांच्या चेहऱ्याचा.
जेम्स म्हणाला आता काय करायचे? कारण अंधार सुद्धा पडत आला होता. ५ मिनिटात काळोख पडणार होता.
म्हटले काही नाही. गपचूप रेनकोट घाला. पुन्हा गाडीवरून उतरलो आणि सुरु झाली धावपळ.

आणि इतक्यात पावसाला सुरुवात झाली, तापमान आधीच कमी होते आणि आता पावसाने अजूनच कमी झाले, सोसाट्याचा वारा सुटला, थंडी अक्षरश बोचू लागली,१ किमी समोर तो टांग लांग ला पास दिसत होता, आकाशात काळे ढग आणि त्या ढगांच्या खाली कोसळणारा पांढरा शुभ्र बर्फ, खुप सुंदर. मी रेनकोट ब्याग्मध्ये वरच्या बाजूलाच ठेवला होता, तो काढण्यासाठी मला हाताचे ग्लोस काढावे लागले, हाताची बोट थंडीने आकाडली होती, हळूच रेनकोट घालून अजिबात न घाबरता न गडबड करता घालू लागलो, तिकडे बाबा चमत्कार त्या डोंगराच्या आडोशाला उभा राहून वर काहीतरी बघत होता, जेम्स नुसताच खिशात हात घालून काय करू असं विचार करत उभा होता, बाबाला तिथे वेड्यासारखे उभे पाहून जुली भडकला,
जुली- ( केविलवाणा आणि राग अश्या दोन्ही भावात ) – अरे बाबा XXXX , काय करतोस तिकडे ? काय XXXX गिरी लावलिये चल न आटप लवकर...
बाबा –( राग रंग उडालेल्या आणि फुटभर फाटलेल्या अवस्थेत ) अरे.....येतो थांब...
त्यांची अवस्था बघून मला हसू येत होते, ते कसेबसे दाबले, आणि बाजूला पहिले तर जेम्स चक्क टी शर्ट काढायचं प्रयत्न करत होता, मी ते जुलीला दाखवलं, म्हटला तो बघ आत्महत्या करतोय,
जुली- ( पुन्हा केविलवाणा आणि राग अश्या दोन्ही भावात ) – अरे जेम्स XXXX , टी शर्ट कशाला काढतोयस? पप्या ने सकाळीच सांगितलं होत न कि घालून चल थर्मल , मग का नाही ऐकत तू?
जेम्स- (नुसताच केविलवाण्या स्वरात )– अरे मी आतमध्ये थर्मल वेअर नाही घातले, २ मिनिटात मी ते घालतो नाहीतर माझी वाट लागेल रे प्लीस घालू दे न पप्या सांग न रे त्याला...

म्हटल काय धमाल आहे, एवढं सकाळीच सांगितलं होत कि थर्मल वेअर घालूनच चला स्वेटर घाला, पण असो... म्हटलं अरे जेम्स फक्त २ मिनिट लागतील तुला मारायला, शर्ट काढून बघ नाही मेलास तर...
सगळ आटपेपर्यंत अंधार पडलाच, सगळे गाडीवर बसलो आणि आता वरून बरसणाऱ्या पावसाने बर्फाचे रूप घेतले, मऊ कापूस सारखा बर्फ तरंगत खाली येत होता, आमच्या गाडीच्या पांढर्या शुभ्र उजेडात जणू काही अक्षता पडत आहेत असा भास होत होता, खूप सुंदर दृश्य होत ते. क्यामेरात का कैद नाही करू शकलो याची अजूनही खेद वाटतो मला.
गाडी सुरु केली आणि पुढे निघालो समोर पांढर्या रंगाशिवाय काहीच दिसत न्हवते, गाडीचा पांढरा उजेड आणि त्यात पांढरा बर्फ तरंगत होता. जसा जसा पुढे निघालो तसा तसा बर्फ वाढला, रस्ता दिसायचं कमी झालं. हेल्मेटच्या काचेत दव तयार होऊन साठले. त्यामुळे दिसायचं आणखी कमी झालं, काच उघडली तर डोळे गोठतील कि काय एवढं थंडगार वारा तोंडावर आला. पुन्हा काच लावली आणि तशाच स्थितीत निघालो, सगळे एकदम चिडीचूप.

.
टांगलांगला च्या थोड आधी.

साला आपल्या लायीफ मध्ये काहीच एक्सायटिंग होत नाही, एवढ्या लांब आलो पण काहीच नाही यार, जिंदगी झंड आहे आपली, असे सुरुवातीला बोम्बलणारा जेम्साकडे पहिले तर वाटले कि आता थोड्याच वेळात हा धाय मोकलून रडायला सुरवात करेल कि काय असे वाटत होत. त्याला तशीच चालत्या गाडीवर आठवण करून दिली ,” जेम्स कालची रात्र आणि आजची हि अवस्था , अजून एक्सायीतमेंट पाहिजे का? आणि एकटाच हसायला लागलो, सगळ्यांना वाटले कि, हा बहुतेक वेडा झालाय, परिस्थिती काय आणि याला फालतू जोक सुचतायत.

१०-१५ मिनिटे गेली बर्फ कमी व्हायचा नाव घेईना, गाडीच्या टाकीवर, हातावर, खांद्यावर बर्फ साचला आमच्या, जुलीला म्हटले बघ ए बर्फ, गोळा करून घे रात्री तुला दारूत टाकायला बऱ पडेल. पुन्ह मी एकटाच हसलो ख्या ख्या ख्या.

एका गोष्टीचे मात्र वायीट वाटले आणि रागही आला , कि मी रात्री गाडी चालवतोय, अंधारात काय घंटा दिसतंय लदाख? अजून कमीत कमी ३ तास अंधारात गाडी चालवावी लागणार, आजूबाजूचे सौंदर्य चुकवले मी. कालही रात्री गाडी चालवली आणि आजही चालवतोय. त्या अंधारात टांग लांग ला पास हा जगातील सर्वात उंचीवरचा २ ऱ्या क्रमाकांचा रस्ता कधी निघून गेला कळलेच नाही. न डोळ्यात साठवू शकलो न क्यामेरात.

उपशी, लेहच्या आधी ५० किमीवर एक ठिकाण. तिथे पोहोचायला रात्रीचे ११.३० वाजले. लेह ऐवजी इथेच मुक्काम करावे असे ठरले, कारण लेहला पोहोचायला आम्हाला निदान रात्रीच 1 वाजला असता, अणि एवढ्या रात्री कुठे लोकांना उठवत होटल शोधायच म्हणून इकडेच मुक्काम. २०० रुपये प्रत्येकी याप्रमाणे ४ खाटा मिळाल्या, होटल अगदी ऐसपैस अणि स्वच्छ होते. नदीच्या अगदी किनारयाला जेवणाची सोय होती पुन्हा तिथे बसायचा कार्यक्रम झाला, मी एक वाजता झोपायला निघून गेलो.

.
उपशी मधल्या होटेल्चे रेस्टोरंट.

दिवस दहावा- उपशी -लेह ५० किमी.

आजचा प्रवास जास्त नसल्याने जरा अरामातच उठलो. साधारण ११ वाजता उपशी सोडले. लेहमधे १ वाजता पोहोचून ७०० रुपये एक दिवसाचे या प्रमाणे एक होटल ठरवले. चांगले ऐसपैस होते, टिव्ही न्हवता पण वायफाय होता. जेवून वेगैरे जरा आराम केला गाड्यांची सर्विसिंग केली. नाकातून रक्त येने अजुन चालूच होते म्हणून डॉक्टर कड़े गेलो. तिथे खाजगी दवाखाने दिसले नाहीत शेवटी एक स्थानिकाने सरकारी रुग्नालायत जाण्याचा सल्ला दिला. सरकारी असले तरी रुग्णालय खुपच चांगले वाटत होते.डॉक्टरच्या पुढ्यात बसल्यावर सर्दीमुळच नाकातून रक्त येतेय हे त्याने सांगितले. उद्या खार्दुन्गला पास जाण्याचे ठरले होते त्यावर डॉक्टरच सल्ला असा होता की मी गाड़ी चालवण्याऐवजी मागे बसून जावे.
अणि संध्याकाळी शांति स्तुपा पहायला गेलो. खुपच सुंदर जागा होती अणि तिथून डोंगरावरून लेह शहराचा छान नजारा दिसत होता.
त्यानंतर तिथेच मार्केटमधे फिरून जेवण वेगैरे केले. आता करण्यासारखे जास्त काही न्हवते म्हणून लवकर झोपी गेलो, सकाळी खार्दुन्गला पास ला जायचे होते.

काही छायाचित्रे.

.
शांति स्तूप

.

.

.

.

.

.

.

.

.

प्रतिक्रिया

छान लिहित आहात, पण फोटो दिसत नाहीयेत.

नि३सोलपुरकर's picture

29 Jul 2017 - 6:16 pm | नि३सोलपुरकर

फोटो दिसत नाही आहेत ,पाटील साहेब .
छान लिहिले आहे .
पुलेशु .

कंजूस's picture

31 Jul 2017 - 9:54 am | कंजूस

dropbox मधल्या फोटोच्या लिंक्स चुकल्या आहेत अथवा पब्लिक अॅक्सेस दिला नाही.

लेखमालिका छान!

सतिश पाटील's picture

31 Jul 2017 - 11:27 am | सतिश पाटील

द्रोपबोक्स मधे पब्लिक एक्सेस कसा द्यावा ? कुणी सांगेल का?

फोल्डर सेटिंग मध्ये जाऊन पब्लिक करा प्लिज.

सतिश पाटील's picture

3 Aug 2017 - 5:29 pm | सतिश पाटील

आता बघा बरे दिसतायत का फोटो?

आदूबाळ's picture

3 Aug 2017 - 5:41 pm | आदूबाळ

एकदम टकाटक.

सतिश पाटील's picture

4 Aug 2017 - 2:46 pm | सतिश पाटील

धन्यवाद आदुबाळ.. फोटो चिकटवन्यासाठी मदत केल्याबद्दल.

यशोधरा's picture

4 Aug 2017 - 8:11 pm | यशोधरा

मस्त! दिसले एकदाचे फोटो!

बाकी सगळे ठीक आहे पण हिमालयात आणि त्यातही लेहला जाऊन दारू बिरू पिणे पटलेले नाही.

डीहायड्रेशन झाले असते तर नक्की कुणी कुणाला सावरले असते..?

सतिश पाटील's picture

5 Aug 2017 - 10:59 am | सतिश पाटील

असा एकही दिवस गेला नाही की यांनी दारू नाही पिली.
अद्दल घड़वन्यासाठी एकदा मनाली ते केलोंग यांना सोडून एकटाच निघून गेलो पुढे. मी जाऊ नए म्हणून अक्षरशः रडले होते.
परंतु तरीही फरक नाही पडला त्यांना.
चुकीचे सहकारी घेउन गेलो होतो. त्यानंतर आजगायत यांच्यासोबत कुठेच गेलो नाहीये.