महाराष्ट्रात इंधनचोरीचे रॅकेट,आपण काय करु शकतो??????

टर्बोचार्जड फिलॉसॉफर's picture
टर्बोचार्जड फिलॉसॉफर in काथ्याकूट
28 Jul 2017 - 5:08 pm
गाभा: 

सध्या महाराष्ट्रात पेट्रोलचोरीचं रॅकेट उघडकीस येत आहे.पुर्वी पेट्रोलमध्ये भेसळ करत होते ,आता तो मार्ग बंद झाल्यावर हा नवीन प्रकार सुरु झाला आहे.
काय आहे प्रकरण???
गाडीत इंधन सोडताना ते मोजण्यासाठी इलेक्ट्रॉनिक सिस्टीम बसवलेली असते,ज्यावर आकडे दिसतात त्याच्याआत ही सिस्टीम असते.सध्या या सिस्टीममध्ये गडबड करुन काही मीलीलीटर इंधनाची चोरी करुन रोज लाखात नफा कमावला जात आहे.यात सगळेच पेट्रोलपंपचालक सामील आहेत.लोक सुटं पेट्रोल घ्यायला कॅन घेऊन आल्यास त्यांना मात्र योग्य पेट्रोल दिले जाईल अशी खबरदारी घेऊन हा गोरखधंदा चालू आहे.यात वरपर्यंत पैसा पुरवून प्रकरणं दाबली जात आहेत.
आपण काय करु शकतो?
शक्य असल्यास तक्रार करावी पण त्याचा उपयोग होईल याची गॅरंटी नाही.
या धाग्यावर तुम्हाला शंका असलेल्या अश्या चोरचिलटांचा जाहीर उल्लेख करुन इतरांना सतर्क करता येईल.
शक्यतो सुटे पेट्रोल वा डीझेल घ्यावे,यात बराच कुटाणा असला तरी हे रॅकेट जो पर्यंत संपत नाही तो पर्यंत हाच पर्याय आहे.
ग्राहकहीतासाठी सादर.धन्यवाद.

प्रतिक्रिया

मी सायकल वापरतो #मिपाफीटनेस

चोरी पकडली जाईल म्हणून की काय बाटलीमध्ये सुट्टे पेट्रोल देण्यावर बंदी आणली होती का?

+शक्यतो सुटे पेट्रोल वा डीझेल घ्यावे+

हे तरी कुठे अधिकृत आहे हो लेखक?
नियमाने असे विकणे गुन्हा आहे कारण सुटे प्लास्टिक कॅनमधले पेट्रोल धोकादायक आहे॥

७० सालाच्या काळात मुंबईत काही दंगलीत पेट्रोल भरलेल्या बाटल्या फेकल्या होत्या.
गाडीतल्या टाकीतून कोणी पेट्रोल काढून वापरले तर त्याची जबाबदारी पंपावर नसते.

दीपक११७७'s picture

28 Jul 2017 - 6:02 pm | दीपक११७७

मला वाटते पाण्यावर गाडी चालवण्याचा शोध लाउन टाकावा

ना रहेगा बास न बजेगी बांसुरी. काय म्हणता?

शक्यतो सुटे पेट्रोल वा डीझेल घ्यावे

सोमनाथ खांदवे's picture

30 Jul 2017 - 8:06 am | सोमनाथ खांदवे

ईश्वर पंप (bpcl), कोंढवा रोड , पुणे . 2 वर्षा पूर्वी ची घटना .
1800 रु चे सोडायला सांगितले तर 500 रु चे टाकल्या नंतर नोझल बाहेर काढून पेन ने खुड खुड करायला लागला व शून्य करून आता 1300 चे सोडतो म्हणाला . मी सांगितले ओक्के सोड व नंतर मी आधीचे आकड़े पाहिले नाही असे सांगून त्याच्या हातावर 1300 च टेकवले . हा वाद मालका पर्यन्त गेला असता मालक थयथयाट करायला लागला , मी माघार घेतलीच नाही पण पोलिसांची वागणूक माहित असल्या मुळे तक्रार केली नाही .
महीना उलटल्या नंतर सुद्धा तो पंप मालक डोक्यातून जात नव्हता . नंतर पुन्हा त्याच पंपा पेट्रोल भरायला गेलो असताना टॉयलेट अत्यंत घाणेर्ड्या अवस्थेत दिसले , त्या टॉयलेट चे फ़ोटो, ईश्वर पंप च्या बोर्ड चा फ़ोटो आणि bpcl च्या झोनल मॅनेजर चे नाव व मेल असलेला फ़ोटो दिले pmo office व bpcl च्या ट्वीटर वर पाठवून , " स्वछ भारत की ईश्वर पंप पे ऐसी की तैसी " या स्लोगन वर . स्वराज म्याडम मुळे ट्वीटर चे महत्व समजलेच होते . दहाच मिनटा मध्ये bpcl हेड ऑफिस व pmo offic मधून फोन यायला लागले व तुम्ही तक्रार माघे घेवू नका आम्ही करवाई करतो म्हणाले .दुसऱ्या दिवशी पंप मालकाने भेटायला बोलवल्या नंतर गेलो असता त्याने सरळ पाय च धरले . 30 % कमीशन कपात , 15000 रु चा दंड व त्या नंतर लायसन्स रद्द असे bpcl कडून आलेले मेल दाखवले असता मी " अब ईश्वर पेट्रोल पंप में टॉयलेट साफ है " असा bpcl ला मेसेज पाठवल्या नंतर त्यांनी लायसेंस रद्द नाही केले पण कमीशन कपात व दंडा ची कार्रवाई केलीच .
आता त्या पंप वर मालका सकट सगळे सलाम ठोकतात .

सोमनाथ खांदवे's picture

30 Jul 2017 - 8:06 am | सोमनाथ खांदवे

ईश्वर पंप (bpcl), कोंढवा रोड , पुणे . 2 वर्षा पूर्वी ची घटना .
1800 रु चे सोडायला सांगितले तर 500 रु चे टाकल्या नंतर नोझल बाहेर काढून पेन ने खुड खुड करायला लागला व शून्य करून आता 1300 चे सोडतो म्हणाला . मी सांगितले ओक्के सोड व नंतर मी आधीचे आकड़े पाहिले नाही असे सांगून त्याच्या हातावर 1300 च टेकवले . हा वाद मालका पर्यन्त गेला असता मालक थयथयाट करायला लागला , मी माघार घेतलीच नाही पण पोलिसांची वागणूक माहित असल्या मुळे तक्रार केली नाही .
महीना उलटल्या नंतर सुद्धा तो पंप मालक डोक्यातून जात नव्हता . नंतर पुन्हा त्याच पंपा पेट्रोल भरायला गेलो असताना टॉयलेट अत्यंत घाणेर्ड्या अवस्थेत दिसले , त्या टॉयलेट चे फ़ोटो, ईश्वर पंप च्या बोर्ड चा फ़ोटो आणि bpcl च्या झोनल मॅनेजर चे नाव व मेल असलेला फ़ोटो दिले pmo office व bpcl च्या ट्वीटर वर पाठवून , " स्वछ भारत की ईश्वर पंप पे ऐसी की तैसी " या स्लोगन वर . स्वराज म्याडम मुळे ट्वीटर चे महत्व समजलेच होते . दहाच मिनटा मध्ये bpcl हेड ऑफिस व pmo offic मधून फोन यायला लागले व तुम्ही तक्रार माघे घेवू नका आम्ही करवाई करतो म्हणाले .दुसऱ्या दिवशी पंप मालकाने भेटायला बोलवल्या नंतर गेलो असता त्याने सरळ पाय च धरले . 30 % कमीशन कपात , 15000 रु चा दंड व त्या नंतर लायसन्स रद्द असे bpcl कडून आलेले मेल दाखवले असता मी " अब ईश्वर पेट्रोल पंप में टॉयलेट साफ है " असा bpcl ला मेसेज पाठवल्या नंतर त्यांनी लायसेंस रद्द नाही केले पण कमीशन कपात व दंडा ची कार्रवाई केलीच .
आता त्या पंप वर मालका सकट सगळे सलाम ठोकतात .

खूप छान. टॉयलेट त्यांनी खरोखरच साफ केली होती का?

गामा पैलवान's picture

31 Jul 2017 - 1:13 am | गामा पैलवान

प्लस वन! अभिनंदन!
-गा.पै.

अत्रे's picture

31 Jul 2017 - 8:30 am | अत्रे

अरेच्चा. पेट्रोल पंप वाल्यांनी टॉयलेट स्वच्छ ठेवलं नाही तर आपण तक्रार करू शकतो हे माहीतच नव्हते!

अनुप ढेरे's picture

31 Jul 2017 - 10:37 am | अनुप ढेरे

फुकट हवा भरण्याची सोय नसेल तरी करु शकतो बहुधा.

पाटीलभाऊ's picture

31 Jul 2017 - 11:46 am | पाटीलभाऊ

अभिनंदन...!

सोमनाथ खांदवे's picture

31 Jul 2017 - 12:26 pm | सोमनाथ खांदवे

त्याने माझ्या साठी चहा , कॉफी , कोल्डड्रिंक्स पाण्या ची बाटली व कुठले तरी खाद्यपदार्थ चे पार्सल मागवले होते , मी हेल्थ कॉशन्स चे कारण सांगून फक्त पाणी पिलो . त्याने आलेले सगळे मेल , 15000 हजार चा डी डी दाखवला . एकाच दिवसात टॉयलेट ला दिवाबत्ति , रंगरंगोटी केलेली . जवळ जवळ दोन तास पंपा वरील सगळ्या सिस्टीम दाखवत असताना मला आता टॉयलेट स्वच्छ आहे अस ट्वीट करायला सांगत होता . त्याची ती दयनीय अवस्था बघून शेवटी मी त्याच्या समोरच ट्वीट करून ती केस संपवली .
पण त्याच पंप वर जाण्या चा मोह मला सारखा होत होता .

लूटालूट चा दूसरा मार्ग .
काही दिवसानंतर 1200 रु पेट्रोल सोडायला सांगितले , आउट लेट डिसप्ले वर 1200 रु च दिसले होते . पण क्रेडिट कार्ड स्वाइप करताना कामगार ने 2200 रु फीड केले होते , मी पासवर्ड टाकला , मला मेसेज आला पण तो मेसेज मी त्या पंपा पासून 4 / 5 किलोमीटर दूर गेल्या नंतर बघितला . पुन्हा डोके तापायला सुरवात झाली , पूर्वी च्या केस मुळे मालकाचा फोन नं होता त्याला तो मेसेज फॉरवर्ड करून सगळी श्टोरि सांगितली तर त्याने मी आहे त्याच ठिकाणी 10 मिनटात 1000 + सर्विस टैक्स चे पैसे पाठवले .
अजुन सुद्धा मी तिथेच जात आहे .

दहात एक तुमच्यासारखा नागरिक असला तरी पुरे, आपण कित्येक विकसित देशांच्या पुढे जाऊ.

संदीप-लेले's picture

31 Jul 2017 - 6:57 pm | संदीप-लेले

शाब्बास आहे तुमची !

पण एवढे राजरोस पणे गैरव्यवहार होतात तरी त्याच ठिकाणी का जाता हे कळले नाही.

सोमनाथ खांदवे's picture

31 Jul 2017 - 10:30 pm | सोमनाथ खांदवे

पंप वाल्या च्या तुलनेत मी किस झाड़ की पत्ती !
पण त्याच्या कडून सलाम ठोकुन घ्यायला बर वाटतंय हो .
आणि माझ्या कडून झालेल्या उपद्रवा मुळे कदाचित सुधरेल .

संदीप-लेले's picture

31 Jul 2017 - 7:16 pm | संदीप-लेले

१. सुटे इंधन घेणे कायद्यानुसार शक्य नाही.
२. Dispenser Meter मध्ये जर लुडबुड होत असेल तर ते पेट्रोल कंपनी च्या संगनमताशिवाय होणे शक्य वाटत नाही. याचे कारण असे की त्या सर्व यंत्रणेची देखभाल [maintenance, calibration] करण्यासाठी तांत्रिक फौजफाटा लागतो. त्यामुळे हे देखभालीचे काम एकेकटा मालक करत असण्याची शक्यता कमी. हे काम ती ती कंपनीच करत असते. निदान काही वर्षांपूर्वी तरी तसे होते. आणि तसे सध्या नसेल तरी हे डिस्पेन्सर व्यवस्थित काम करतात की नाही हे पाहण्याची जबाबदारी त्या कंपनीची असते.

त्यामुळे या इंधनचोरीवर अर्थातच वैयक्तिक कामगिरीचा व्यापक परिणाम होणे शक्य नाही. त्यासाठी तेवढीच मोट्ठी व्यापक चळवळ हवी.

पण आपण एक करू शकतो. प्रत्येक पेट्रोल पंप वर इंधनाचे काही गुणधर्म तपासण्याची सोयअसते आणि ग्राहक म्हणून तशी तपासणी करून देणे त्यांना बंधनकारक असते. विशेषतः जे पंप ISO Certified आहेत त्यांची तशी पद्धत असते. यात इंधनाची घनता आणि डिस्पेन्सर ची अचूकता यांचा समावेश होतो. डिस्पेन्सर ची अचूकता सहज मोजण्यासाठी एका २० लिटरच्या भांड्यात पेट्रोल घेऊन मीटर २० लिटर दाखवते की नाही हे पाहिले जाते.

अर्थात ही काही निर्णायक पद्धत नाही. पण काहीच नसण्यापेक्षा एवढे तरी होऊ शकते.

सोमनाथ खांदवे's picture

31 Jul 2017 - 11:12 pm | सोमनाथ खांदवे

डिस्पेंसर मीटर मधील लुड बूड़ पकड़ावी म्हणून मायबाप सर्कार आपण भरलेल्या टयाक्स मधून ' वजन माप निरीक्षक ' नां पगार देत अस्त. प्रत्येक वर्षी प्रत्येक डिस्पेंसर मीटर परफेक्ट आवुट पुट देतोय का बघून styamp करण्याच काम वजन माप विभाग कड़े असते . एका निरीक्षक च्या विभागात किमान 4 / 5 पेट्रोल पंप असतात आणि त्या त्या निरिक्षका ची चार चाकी गाड़ी पंपा वर फुकट top up करून दिली जाते ( पंप मालकाने दिलेल्या माहिती प्रमाणे ) , मग कशाला मरायला कोण ईमानदारी ने चेक करणार ?. दूसरी गोष्ठ अशी की आता जे 80 च्या आसपास सेटिंग वाले पंप पकडले गेले ते up च्या पोलिसां मुळे आपल्या नाही . आणी अजुन एक वजन माप विभाग , fda हे दोन्ही विभाग आपल्याच सन्माननीय हिरवा देठ वाले मंत्री साहेबा कडे आहेत . वजन माप विभाग ची कार्यक्षमता आपण पंप , मॉल , किराना दुकानात बघतोच आणि पिवळी जर्द केळी व आतून काळे पडलेले हापुस आंबे बघताच fda ची कार्यक्षमता दिसते
पैसे मोजून रासायनिक फळे खातों व पेट्रोल फसवणूक करून घेतो कारण सर्कार कोणाचे ही असो सिस्टीम मधील सगळ्या चे पोट भरण्या ची काळजी मंत्री च घेतात .

आदूबाळ's picture

31 Jul 2017 - 8:16 pm | आदूबाळ

पण गाडीतल्या फ्युएल इंडिकेटरवर अ‍ॅनॉलॉग मीटरपेक्षा लिटरचे आकडे दाखवणं अशक्य आहे का? (कारखान्यांत लिक्विड टाक्यांवर त्या किती भरल्या आहेत, आतल्या द्रव्याची व्हिस्कॉसिटी काय वगैरे दर्शवणारे मीटर्स असतात की.)

कोणी कंपनी ही टेक्नॉलॉजी का आणत नाही?

दशानन's picture

31 Jul 2017 - 9:01 pm | दशानन

कोस्टिंग वाढतो हो, आणि लोकांना कंपनीने 30000 ची एअरबॅग दिली नाही तर चालेल पण 20000चे फ्री(?) असेसरी दिली की खुश ;)
असेसरी मध्ये किमान 40% कॉस्ट ही गाडीवरील ग्राफिक/स्टिकरची असते :P
म्हणून आता प्रत्येक कारमध्ये एअरबॅग असणे कंपल्सरी करणार आहेत म्हणे मोदी.