सुधा मूर्ती बिझिनेस क्लास

अत्रन्गि पाउस's picture
अत्रन्गि पाउस in काथ्याकूट
28 Jul 2017 - 1:44 pm
गाभा: 

साधारण पार्श्वभूमी "

-सुधा मूर्तींनी बिझिनेस क्लास चे बोर्डिंग कार्ड घेऊन रांगेत उभे असतांना एका बाईने त्यांना "ह्यो स्पेशल क्लास हाये तुमी तिकडे जावा, आले उठून गुरांच्या कळपातले " सदृश काहीतरी बोलली
-सुधा ताई संतापल्या पण शांत राहिल्या आणि त्यांनी विचार केला तेव्हा कळले कि त्यांच्या साध्या कपड्यात त्या बिझिनेस क्लास वाल्या दिसत नव्हत्या
-आपले बोर्डिंग कार्ड दाखवून त्या बै ला शांत करण्या ऐवेजी त्या स्वत:च शांत बसल्या

ट्रान्स्फर सीन

-एक समारंभ जिथे सुधा ताई अध्यक्षा आणि ह्याच त्या बाई आता स्वतः सध्या कपड्यात अवतीर्ण झाल्या आणि सुधातैंना बघून चकित झाल्या आणि मग नियतीचा न्याय सिध्द झाला

आणि

जिकडे तिकडे चर्चेला सुरुवात झाली ...

आता आमचे काही शिम्पल प्रश्न

१. मुळात हा सगळा किस्सा घडला तो घडला, तो मिडिया पर्यंत इतका पोहोचवला कुणी ? विमान तळावर आणि त्या समारंभात दोन्ही ठिकाणी हजर असलेल्यांपैकी ह्या दोघीन व्यतिरिक्त अजून तिसरा कुणी होत? असता तर शक्यता आहे कि तो सुधा तैना तो ओळखत असावा (तसेही त्यांना चेहेर्याने ओळखणारे विमान तळावर आजूबाजूला अनेक जन असणारच पण ते असो ....
२. बिझिनेस क्लास मधल्या सोडाच पण एकोनोमित प्रवास करणारे ह्यांना चित्रविचित्र पोशाखात प्रवास करणारे सह प्रवासी बघण्याची सवय असते आणि मुळातच तिथे अपरिचित व्यक्तीला असला भोचक पणा करून कुणी फालतू सल्ले देईल अस वाटत नाही
३. त्यातून हि बऱ्याच वेळेला एखादा नवखा असेल तर त्याला मदत म्हणून अमुक करा किंवा इथून जा किंवा अस करू नका असे (भारतात तरी) नम्र पाने सांगितले जाते आणि ते कधी कधी योग्य हि असते. साध लोकल मध्ये सुद्धा फर्स्ट क्लास मध्ये शिरणारा फर्स्ट क्लास मधला "वाटत" नसेल तर त्याला समज दिली जाते, ह्यात त्याला दंड होऊ नये हि भावना (बाकीच्या स्नोबिश भावने बरोबर) असतेच
४. समजा त्या बाई पुन्हा भेटल्याच नसत्या तर सुधा तैंनी काय केले असते, त्या रागवलेल्या तशाच राहिल्या असत्या, त्यांनी एखादा लेख लिहिला असता कि अजून काही का आपल्याला हि घटना कळलीच नसती
५. बिझिनेस क्लास तसा छोटा असतो त्यामुळे त्या बाईंनी सुधातैना विमानात बघितले नसेल हे जरा कठीण वाटते.
६. अतिश्रीमंत लोकांमध्ये आम्ही एकोनोमीने प्रवास करतो असा बोभाटा करून वागण्याची मध्यंतरी लाट आली होती ह्या निमित्ताने ते परत बिझिनेस / फर्स्ट (विमानाचा फर्स्ट , वर म्हटलेला लोकल चा फर्स्ट क्लास होता) क्लास मधून जायला लागले का ते नेहेमीच तसे जात होते ...
--६.a खिशात करोडो रुपये असतांना तुम्ही एकोनोमीने जाता आणि त्याची व्यवस्थित जाहिरात करता ह्यात तुमचा साधेपणा दिसतो कि प्रसिद्धी लोलुपता ? का दोन्ही ?

काय म्हणता ?

प्रतिक्रिया

गॅरी ट्रुमन's picture

28 Jul 2017 - 2:09 pm | गॅरी ट्रुमन

मागे सुधा मूर्तींच्या पुस्तकातील एक उतारा मूर्ती दांपत्य कित्ती कित्ती साधे आहे म्हणून ई-मेलवर स्कॅन करून पाठवला होता (व्हॉट्सअ‍ॅप येण्यापूर्वीचे दिवस होते ते). सुधा मूर्ती लिहितात-- "मी बाहेर जाते तेव्हा भाज्या आणि फळे विकत घ्यायला लागतील इतकेच पैसे बरोबर ठेवते. जर का काही विकत घ्यावेसे वाटले तर ड्रायव्हरकडून पैसे उसने घेऊन ती वस्तू विकत घेते आणि घरी परत आल्यावर ड्रायव्हरला त्याचे पैसे परत देऊन टाकते". त्या स्कॅनमध्ये इतरही अनेक उल्लेख होते पण सगळ्यात महत्वाचा हा उल्लेख मला वाटला.

या प्रकाराला साधेपणा म्हणणे अगदीच हजम झाले नव्हते. शोफर ड्रिव्हन गाडीने बाहेर जाणे हे काही साधे असल्याचे लक्षण असेल (निदान भारतात) असे वाटत नाही. बरं खरोखरच जर तुम्ही साधे असाल तर भाज्या आणि फळे सोडून इतर काही विकत घ्यावेसेच का वाटते? आणि त्याउपर आम्ही किती साधे याची पुस्तके लिहून जाहिरात करणे हे खरोखर साधे असल्याचे लक्षण कसे असू शकते?

हा प्रकार नुसता खटकलाच नाही तर खरं सांगायचं तर या ढोंगाची चिड आली होती. त्यानंतर मात्र सुधा मूर्तींचे कुठलेही पुस्तक वाचायची इच्छा झाली नाही. अर्थात त्यामुळे घंटा कोणाला फरक पडत नसला तरी मला मात्र त्यांचे एकही पुस्तक वाचू नये असेच वाटले.

खिशात करोडो रुपये असतांना तुम्ही एकोनोमीने जाता आणि त्याची व्यवस्थित जाहिरात करता ह्यात तुमचा साधेपणा दिसतो कि प्रसिद्धी लोलुपता ? का दोन्ही ?

मला वाटतं की प्रसिध्दी लोलुपता. खरोखर साधे असाल तर असली जाहिरात करायची गरज का पडावी?

अत्रन्गि पाउस's picture

28 Jul 2017 - 2:34 pm | अत्रन्गि पाउस

म्हणजे भाज्या फळे वगैरे घेऊन अजून काही घ्यायला लागणारे पैसे हात उसने, ते हि मूर्ती कुटुंबियांना, देण्या इतके वरकड पैसे तो ड्रायव्हर बाळगू शकतो इतका पगार त्याला मिळतो

वा !!

सौन्दर्य's picture

28 Jul 2017 - 10:37 pm | सौन्दर्य

आपण बाजारात जाताना आवश्यकतेपेक्षा थोडे जास्तच पैसे घेऊन जातो असे मला वाटते. कारणे अनेक असू शकतात, उदा. भाजीपाल्याचे भाव अचानक वाढले, एखादी वस्तू घ्यायची आहे हे अचानक आठवले, वाटेत एखाद्याला पैशाची गरज भासली तर त्याला मदत करता यावी म्हणून, भूक लागली म्हणून हॉटेलात पाय वळले तर असावेत म्हणून वगैरे. अगदी मोजकेच पैसे बरोबर घेऊन जायचे आणि मग ड्रायव्हरकडे मागायचे हे काही चांगल्या management चे लक्षण आहे असे मला वाटत नाही.

मागे (अंदाजे २००८च्या आसपास) इमेलद्वारे एक मेसेज पसरवला जात होता. त्यात अरविंद केजरीवाल व त्याचे काही अनुयायी एका रेल्वेस्टेशनवर फलाटावर एक न्यूजपेपर अंथरून झोपले आहेत असा एक फोटो होता. त्यावेळी मला वाटते 'आप' पार्टी अजून जन्माला यायची होती पण अण्णा हजारे, किरण बेदी, केजरीवाल वगैरे प्रभूतिनी देशासाठी काहीतरी करायची इच्छा दर्शवली होती. त्या फोटोत केजरीवाल किती 'साधे' आहेत आणि सामान्य जनतेसारखे गाडीची वाट पाहत ते रेल्वे स्टेशनवर जमिनीवर झोपतात वगैरे हायलाईट केले गेले होते. माझ्या माहितीप्रमाणे त्यावेळी ते एक 'IAS' अधिकारी व इन्कमटॅक्सचे कमिशनर होते (चूकभूल द्यावी घ्यावी). मला वाटते इतक्या हुशार माणसाला न्यूजपेपर अंथरून platformवर झोपावे लागले ह्यात त्यांचा साधेपणा दिसत नसून lack of proper planningच दिसून येते. अगदी जमिनीवर झोपायचे असेल तर एखादी सतरंजी किवा चादर अंथरून झोपता येतच. बरं, काही कारणाने गाडी लेट झाली तर बाकांवर झोपावं की माणसाने, उगाच जमिनीवर झोपून काय साध्य करायचे आहे ?

दशानन's picture

28 Jul 2017 - 10:41 pm | दशानन

फोटो काढायचा फक्त!
असे अनेक देशभक्त पाहिले, वाईट एवढेच की लोकं फोटोवर विश्वास ठेवतात व त्याला खरं समजतात :(

रमेश आठवले's picture

29 Jul 2017 - 10:35 am | रमेश आठवले

केजरीवाल IAS परीक्षा कधीच पास झाले नाहीत. ते IRS मध्ये होते आणि कमिशनर पेक्षा कमी पदावर होते. तेथेही काम न करता टिवल्या बावल्या करण्यातच वेळ घालवीत असत असे त्यांच्या वरिष्ठांचे मत होते. स्वतःची प्रसिद्धी आणि इतरांची नालस्ती ही त्यांची जुनी स्टाईल आहे.

म्हणजे यूपीएस्सी परीक्षा न देताच आयआरएस झाले? ते कसे काय?

यूपीएससी देणारच ना त्याशिवाय आयआरएस कसे होतील? रँकिंग पे डिपेंड रहता .

आदूबाळ's picture

29 Jul 2017 - 6:37 pm | आदूबाळ

मग हे काय होतं?

केजरीवाल IAS परीक्षा कधीच पास झाले नाहीत.

रमेश आठवले's picture

29 Jul 2017 - 7:41 pm | रमेश आठवले

IAS व IFS साठी दरवर्षी एक क्वोटा असतो. दरवर्षी त्या प्रमाणे जास्त मार्क असलेल्याना त्यात आधी चान्स देतात. बाकीचे पास झालेले पण IRS , IPS वगैरे सर्व्हिसेस मध्ये भरती केले जातात.

चिगो's picture

31 Jul 2017 - 3:55 pm | चिगो

दिखाऊपणाचा जमाना आहे, साहेब.. ओरीजनल पोस्टनुसार कपडे आणि पैसा ह्यांवर कसा 'क्लास' ठरत नाही, ह्याबद्दल सुधाबाईंचे विवेचन आहे. असो.

सध्या स्वतःच्या साधेपणाचे धोल-ताशे वाजवण्याचे दिवस आहेत. केजरीवालांनी ते 'एन्कॅश' करण्याचे भरपुर प्रयत्न केलेत आणि त्याचा त्यांना राजकीय लाभदेखील झाला. पंतप्रधानदेखील आपल्या 'फकीरपणा' बद्दल बोलत असतात. ज्यांना आपल्या साढेपणाचे किंवा कामाचे प्रदर्शन मांडण्याची गरज नाहीये, आणि 'अनॉनिमिटी' हा ज्यांच्या सेवेचा पाया आहे, असे अनेक आयएएस, आयपीएस अधिकारी देखील आजकाल सोशल मिडीयात आपले खड्डे करतांना, रस्ते झाडतांना, कुणाला तरी मदत करतांना वगैरे फोटो टाकतात. एकंदरीत, 'आम्ही कित्त्ती कित्ती साधे बाई' हे सांगितल्याशिवाय आणि इतरांनी त्याचे कौतुक केल्याशिवाय अनेकांना बरं वाटत नाही..

जाता जाता :- IAS ची स्पेशल अशी कुठलीच परीक्षा नसते. 'सिविल सर्व्हीसेस एक्झाम' मधेच IAS, IPS, IFS (Foreign Service), IRS इत्यादी अनेक सेवांसाठी चयन करतात, आणि रँकीग व वर्गवारीनुसार कुठल्या सेवेत जाल, हे ठरते..

भीडस्त's picture

3 Aug 2017 - 4:57 pm | भीडस्त

जाता जाता :- IAS ची स्पेशल अशी कुठलीच परीक्षा नसते. 'सिविल सर्व्हीसेस एक्झाम' मधेच IAS, IPS, IFS (Foreign Service), IRS इत्यादी अनेक सेवांसाठी चयन करतात, आणि रँकीग व वर्गवारीनुसार कुठल्या सेवेत जाल, हे ठरते.

तुम्हाला काहीही माहिती दिसत नाही यातली हे उघड आहे . काही अभ्यास आहे का तुमचा ??

तुम्हीही तुमच्या कार्यालयात काम न करता टिवल्या बावल्या करण्यातच वेळ घालवीत आहेत असे दिसते. तुमच्या वरिष्ठांना याबद्दल मत विचारायला हवे..

सर हलके घ्यालच.. _/\_ _/\_

कपिलमुनी's picture

3 Aug 2017 - 7:04 pm | कपिलमुनी

चिगो , वळख असू द्या !
( ना जणो उद्या एखाद्या राज्याचे शीयम् व्ह्यायचे :) )

पिलीयन रायडर's picture

29 Jul 2017 - 2:18 am | पिलीयन रायडर

बरं झालं नाही वाचलीत पुस्तकं, सुमार आहेत अगदी. मी कशी बशी २ वाचली. अरेरे.. वेळ वाया गेला.

त्या साध्या असतीलही, पण मी त्याचय बद्दल आता इतकं ऐकलंय की त्याचाही वैताग यायला लागलाय. त्यांच्या बद्दलचे हे किस्से फेमस करतं कोण हा प्रश्न आहेच. वरच्या प्रसंगातही उगाच कुणी असला भोचकपणा करणार नाही. शिवाय त्याच विमानात दिसल्या नाहीत आणि बरोब्बर नंतर एका कार्यक्रमात "अध्यक्षा" म्हणुन दिसल्या हे फारच फिल्मी झालं नाही!

मोदक's picture

29 Jul 2017 - 12:09 pm | मोदक

.

जाऊ द्या हो.. सुधा मूर्तींचे बरेचसे लेखन कसे असते माहिती आहे ना? मी ह्याला मदत केली...त्याला शिक्षण दिले.. पण ती /तो विसरला..मला ओळखले नाही...मदतीची जाण ठेवली नाही....ज्याला/जिला २०-२५ वर्षे आधी शिष्यवृत्ती देऊन मोठे केले तो/ती सोन्याने मढवून माझ्याजवळून गेला/गेली पण मला ओळख दाखवली नाही... मात्र नंतर तो/ती मनातल्या मनात कानपटला असावा..म्हणून परत माझ्यासमोर आला नाही .. इत्यादी इत्यादी ....सगळे असेच असते... आजकाल पैसेवाले लोक असे सगळे " इव्हेंट" घडवून ते ब्रॉडकास्ट करण्यात पटाईत झालेत... आपण निरागसपणे ते वाचायचे , ऐकायचे ...आणि गप्प बसायचे... कशाला अजून त्यांना हवी असलेली प्रसिद्धी मिळवून द्यायची?

अत्रन्गि पाउस's picture

28 Jul 2017 - 2:32 pm | अत्रन्गि पाउस

तुमचा आयडी लई म्हणजे लैच आवडलाय ....

आयटी हमाल ...हाहाहा

IT hamal's picture

28 Jul 2017 - 4:27 pm | IT hamal

भारतात IT मध्ये काम करणारे सर्व लोक कुठल्यातरी प्रकारची हमालीच करतात हे मी माझ्या २० वर्ष्याच्या IT industry मधील बनवलेले खरेखुरे मत आहे ...... काही लोक मान्य करतात तर काही लोक ही वस्तुस्थिती मान्य करत नाहीत !!! तुमचा ही ID छान आहे... श्रावण महिन्यापुरता "सतरंगीं पाऊस " असा बदल केला तर अजून छान होईल -:)

IT hamal's picture

28 Jul 2017 - 4:28 pm | IT hamal

* IT industry मधील अनुभवावरून ....

अत्रन्गि पाउस's picture

28 Jul 2017 - 5:21 pm | अत्रन्गि पाउस

आयटी वालेच
आयटी मुकादम म्हणा हवं तर

श्रीगुरुजी's picture

28 Jul 2017 - 2:31 pm | श्रीगुरुजी

सुधा मूर्ती लेखिका म्हणून सर्वसाधारण आहेत. परंतु मूर्ती दांपत्य, विशेषतः सुधा मूर्ती, नक्कीच साधेपणाने राहतात. त्यांच्या साधेपणाची जाहिरात करण्यात माध्यमेच आघाडीवर आहेत. ते ज्या साड्या नेसतात त्या खूपच साध्या असतात हे प्रत्यक्ष पाहिलेले आहे. मूर्ती दांपत्याचा फारसा बडेजाव नसतो हे देखील पाहिलेले आहे.

अपा, असल्या फालतु काथ्याकुटात कशाला वेळ वाया घालवताय..? संगीत किंवा वाचनाबद्दल लिहिण्यासारखे बरेच काही आहे. ते लिहा.

दीपक११७७'s picture

28 Jul 2017 - 5:13 pm | दीपक११७७

ईमेज मॅनेजमेंट ह्या सगळ्या गोष्टी करतात, हे करताना ते तुमच्यातील छोटा गुण सुध्दा मोठा करुन दाखवतात व जगा कडुन त्यावर शिक्का मोर्तब करुन घेतात. कुणा कडे असतो भरपुर पैसा, मग त्यांना वाटतं मी जे चांगल काम केल त्याला जगाने appreciate करावे, दाद द्यावी, जाऊद्या.

धागालेखक ईमेज मॅनेजमेंट शी रिलेटेड नाही ना. नाही तर प्रतिक्रीयेचा उपयोग ईमेज बिल्डींगसाठी.................................................

अभिजीत अवलिया's picture

29 Jul 2017 - 8:37 am | अभिजीत अवलिया

मी बाहेर जाते तेव्हा भाज्या आणि फळे विकत घ्यायला लागतील इतकेच पैसे बरोबर ठेवते. जर का काही विकत घ्यावेसे वाटले तर ड्रायव्हरकडून पैसे उसने घेऊन ती वस्तू विकत घेते आणि घरी परत आल्यावर ड्रायव्हरला त्याचे पैसे परत देऊन टाकते

जर त्या असे करत असतील तर हा अत्यंत फालतूपणा आहे. ऐनवेळी गरज पडली तर असावेत म्हणून बाहेर कुठेही जाताना गरजेपेक्षा ४ पैसे अधिक घेऊन जाणे गरजेचे आहे आणि जवळपास प्रत्येकजण करतो. ही केवळ प्रसिद्धीलोलुपता असावी.

आणि केवळ मोजके पैसे जवळ बाळगल्याने तुम्ही साधे होता किंवा जास्त बाळगल्याने साधे होत नाही हे कसे ते समजले नाही.

सिरुसेरि's picture

29 Jul 2017 - 9:20 am | सिरुसेरि

त्यांच्या पुस्तकांना ईन्फोसिस या नावाचे वलय आहे . त्यामुळे भाबडी लोकं ती पुस्तके आवर्जुन वाचतात आणी त्यातल्या कथांवर नाटक , सिनेमे बनवतात किंवा बघायला जातात .

स्वधर्म's picture

31 Jul 2017 - 12:51 pm | स्वधर्म

ह्या लोकांना अापण काही असहमती दाखवली, तरी पटत नाही.

पिवळा डांबिस's picture

29 Jul 2017 - 10:42 am | पिवळा डांबिस

काही वर्षांपूर्वी त्यांचे वरील पुस्तक विकत घेतले.
वाचून साफ निराशा झाली, मिसेस मूर्ती प्रत्यक्षात भेटल्या तर आयच्यान ते पुस्तक त्यांच्या तोंडावर फेकून मारीन पैसे पाण्यात गेले म्हणून!
ह्यांच्यापेक्षा ते शिरीष कणेकर बरे, ते अधूनमधून क्वचित का होईना, हसवतात तरी!!!!

जेम्स वांड's picture

29 Jul 2017 - 9:35 pm | जेम्स वांड

ते पुस्तक मलाही आवडले नाही अजिबात म्हणून प्लस वन, अन तोंडावर फेकून मारीन वगैरे पटत नाही म्हणून उणे एक, लेखकांस/लेखिकेस वाचक म्हणून पत्रही पाठवता येईल पुस्तक आवडलेलं नाही असं सांगणारं, उगाच चिडक्या स्वभावाचं मार्केटिंग कश्याला, अर्थात हा ज्याच्यात्याच्या संस्काराचा भाग झाला. ते एक असोच.

पिवळा डांबिस's picture

1 Aug 2017 - 10:08 am | पिवळा डांबिस

हा ज्याच्यात्याच्या एक्सप्रेशन टाईपचा प्रश्न आहे.
तुम्ही लेखिकेला नापसंतीचे पत्र पाठवा, बघा काही उपयोग होतो का ते! तुम्हाला शुभेच्छा.
पण आमच्या श्रमाने मिळवलेल्या दिडक्या पाण्यात गेल्या तर त्याबद्दल संताप व्यक्त केला तर आम्हाला तो करू द्या की, त्यात तुम्हाला हरकत घेण्याचा अधिकार काय ते कळले नाही.
बाकी 'चिडक्या स्वभावाचं मार्केटिंग' आणि 'संस्कारांचा भाग' वगैरे फाट्यावर मारत आहे, ते एक असोच.

पद्मावति's picture

29 Jul 2017 - 11:09 pm | पद्मावति

बर्‍यापैकी 'आय' स्पेशालिस्ट आहेत त्या. मलाही त्यांचा ' मी किती सिंपल, माझा ड्राइवर किती सिंपल, माझा शेफ किती सिंपल, माझ्या बंगल्यात मी माझी खोली कशी शेणाने सारवते'' असा एकूण आविर्भाव वाटतो.

रुपी's picture

30 Jul 2017 - 1:25 am | रुपी

हा हा..
पद्मावति, तुझ्या आत्तापर्यंतच्या मिपावरच्या प्रतिसादांमध्ये हा सर्वांत 'कठोर' असा प्रतिसाद असावा.. ;)

बाकी, खरं तर बरेच सिलिब्रिटीज आपण किती साधे आहोत हे सांगायचा प्रयत्न बर्‍याचदा करतात .. आपल्याला वरणभातच कसा प्रिय आहे, किंवा मी कश्या सामान्य कुटुंबातून आले/आलो आहे हे बर्‍याच मुलाखतींमध्ये असतं. खरं तर साधेपणापेक्षा आजकाल बर्‍याच पी.आर. चा फोकस एखादी सेलिब्रिटी कधी डिप्रेशनमध्ये गेली, किंवा तिला कुठल्या तरी अ‍ॅब्यूजला सामोरं जावं लागलं अश्या बातम्या पसरवण्यात जास्त असतो असं माझं तरी निरीक्षण आहे.

पिलीयन रायडर's picture

30 Jul 2017 - 3:08 am | पिलीयन रायडर

चारदा नाव वाचलं! तुझा आयडी हॅक झाला की काय!!

पद्मावति's picture

30 Jul 2017 - 4:40 am | पद्मावति

रुपी, पिरा =))
मला पण जरा वेळाने माझाच प्रतिसाद वाचल्यावर आहे अरे हे मीच लिहिलंय?? असे झाले :)

खरं तर साधेपणापेक्षा आजकाल बर्‍याच पी.आर. चा फोकस एखादी सेलिब्रिटी कधी डिप्रेशनमध्ये गेली, किंवा तिला कुठल्या तरी अ‍ॅब्यूजला सामोरं जावं लागलं अश्या बातम्या पसरवण्यात जास्त असतो असं माझं तरी निरीक्षण आहे.

सहमत आहे. तू म्हणतेस तसं डिप्रेशन, ड्रग अब्यूस आणि त्याचबरोबर अजुन एक आलंय ते म्हणजे सेलेब्रिटीज सांगतात त्यांना सहन कराव्या लागलेल्या बॉडी शेमिंग बद्दल. आत्ताच कधीतरी श्वेता बच्चनने पण मुलाखत दिली होती अशा प्रकारची. पी.आर.चा फोकस बदलत असतो सारखा. आजकालच्या इंटेन्स स्पर्धेच्या युगात जिथे नित्य नवीन सेलेब्रीटी तारा उगवतो अशा वेळी पी. आर. वाल्यांना आपली स्ट्रॅटजीही त्याच वेगाने बदलत राहावी लागते.

सतिश गावडे's picture

1 Aug 2017 - 8:11 am | सतिश गावडे

Celebrities who were sexually abused/molested

पहील्या क्रमांकावर अगदी ताजी बातमी आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

31 Jul 2017 - 10:35 pm | डॉ सुहास म्हात्रे

'आय' स्पेशालिस्ट =)) =))

"मराठी" भाषेला एक नवीन शब्दप्रयोग बहाल केला आहे तुम्ही :)

दशानन's picture

29 Jul 2017 - 11:21 pm | दशानन

पुस्तक आवडले तर संग्रही ठेवावे नाहीतर दुसऱ्याला द्यावे फुकट!
सिंपल!!

योगी९००'s picture

31 Jul 2017 - 8:18 am | योगी९००

सुधा मुर्तींच्या साधेपणाची जाहीरात खूप होते असे वाटते पण त्या खरोखरच तश्या असाव्यात असे वाटते. त्यांनी समाजसेवासुद्धा खूप केलेली आहे.

पण आजच मटा मध्ये असे वाचले की त्यांनी गेले २१ वर्ष नवी साडी घेतली नाही. विश्वास ठेवायला खूप जड जात आहे. म्हणजे अजून त्या २१ वर्षांपुर्वीच्या साड्या वापरत असाव्यात (तसे त्यांच्या कोठल्याच फोटोवरून वाटत नाही) किंवा कोणी त्यांना नियमितपणे साडी भेट म्हणून देत असावेत.
http://maharashtratimes.indiatimes.com/india-news/sudha-murti-buy-last-s...

बाकी मध्यंतरी त्यांची आणि नीता अंबानी यांची तुलना करणारा एक व्हीडीओ वॉट्सअ‍ॅपवर आला होता. सुधा मुर्ती एकदम साध्या तर नीता अंबानी एकदम उधळपट्टी करतात असे दाखवले होते. दोघींची भुमिका एकदम टोकावरची वाटली. नीता म्हणे एकदा वापरलेले ड्रेस, पर्स, चपला परत कधी वापरत नाही. तिचे ड्रेस म्हणे ला़खात असतात ...कायच्या काय. पण सुधा मुर्तींचा एकदम साधेपणा त्यात दाखवला होता आणि समाजसेवेवर पैसा जास्त खर्च करतात असे दाखवले होते. माझ्यामते नीता अंबानी सुद्धा खूप समाजसेवा करतात आणि स्वःताची हौसमौज करून घेतात. त्यांच्या अशा अती का होईना पण उधळपट्टीमुळे कदाचित काहीजणांचा संसार चालला असावा. त्यामुळे मला त्या व्हीडीओमध्ये सुधामुर्तींचे कौतूक काही वाटले नाही.

पण त्यांची पुस्तके, लिखाण मला आवडले. थोडाफार मी पणा होता त्यांच्या लिखाणात पण त्यात तेवढे काही वावगे वाटले नाही.

सहमत. अगदी खुप नाही पण समाजासाठी काही करण्याचा सुधा ताईंचा गुण नक्कीच प्रत्येकाने घ्यायला हवा. अगदी टोकाचा साधेपणाही योग्य वाटत नाही. शेवटी आपण ज्या समाजात रहातो तिथे कपड्याला महत्व दिले जातेच. उगाच खादीचा पोशाख करुन कुठल्या आय.टी. कंपनीच्या ईंटरव्ह्युला जाउन चालेले? सेल्समनाला तर टापटीप रहाणे भागच आहे, शेवटी त्याच्या व्यवसायाचा तो प्रश्न आहे.
निता अंबानीसारखी जीवन शैली तर स्वप्नवतच आहे. पण त्यांनी स्वताच्या कष्टाने कमाविलेला पैसा आहे आणि तो कसा खर्च करायचा हा त्यांचा प्रश्न आहे. बाकी तो ते खर्च करतात म्हणून कुणाचा तरी संसार चालेल याच्याशी सहमत. माझ्या आठवणी प्रमाणे ९/११ च्या हल्ल्यानंतर अमेरीकेची विस्कटलेली आर्थिक घडी सावरण्यासाठी जॉर्ज बुशनी लोकांना खरेदीचे आवाहन केल्याचे आठवते.

कुठल्या का ? त्यांच्याच इन्फी मध्ये जर का ड्रेस कोडं नसेल पाळलेला तर सिक्युरिटी आत सोडायची नाही नाही म्हणे ...

गवि's picture

31 Jul 2017 - 12:29 pm | गवि

साधेपणा आणि गरीबपणा मेंटेन करणं अत्यंत खर्चिक असतं. दुधाला बकरी, बकरीला न्यायला फुल रेल्वेडबा असंही होऊ शकतं.

गामा पैलवान's picture

3 Aug 2017 - 8:20 pm | गामा पैलवान

गवि,

कळ्ळं हो कुणास उद्देशून आहे ते! :-D

आ.न.,
-गा.पै.

विमानतळावर काही लोक फार आढ्यतेने वागतात. मला "व्हॉट डू यू थिंक यू आर डूइंग?", "यू क्लम्झी मॅन" असे प्रेमवचन बरेचदा ऐकायला लागलेत.

रघुनाथ.केरकर's picture

31 Jul 2017 - 1:03 pm | रघुनाथ.केरकर

साध लोकल मध्ये सुद्धा फर्स्ट क्लास मध्ये शिरणारा फर्स्ट क्लास मधला "वाटत" नसेल तर त्याला समज दिली जाते, ह्यात त्याला दंड होऊ नये हि भावना (बाकीच्या स्नोबिश भावने बरोबर) असतेच

अत्रन्गि पाउस's picture

31 Jul 2017 - 1:09 pm | अत्रन्गि पाउस

लोकल फर्स्ट क्लास ने ३ ४ महिने नित्य जाऊन पाहणाऱ्याला समजू शकेल

सामाजिक स्तर हा मोपदा थेट व्हिजिबल असतो.

मराठी_माणूस's picture

31 Jul 2017 - 4:36 pm | मराठी_माणूस

सुधा मूर्तींनी बिझिनेस क्लास चे बोर्डिंग कार्ड घेऊन रांगेत उभे असतांना एका बाईने त्यांना "ह्यो स्पेशल क्लास हाये तुमी तिकडे जावा, आले उठून गुरांच्या कळपातले " सदृश काहीतरी बोलली

एखादा फिरंगी , अर्ध चड्डी , टी शर्ट, स्लीपर अशा अवतारात रांगेत असता तर त्याला सुद्धा ती बाई असे बोलली असती का ?

पद्मावथी, काय झालं अचानक? तुझ्या दृष्टीने फारच शाब्दिक कापाकापी केलीस. ;)
सुधाताईंची दोन पुस्तके विकत आणली. आवडली नाहीत. त्यांनी म्हणे एका सिरियलीचे लेखनही केलेय.
आणखी न आवडलेली म्हणजे आमचा बाप आणि आम्ही, वाटचाल. हृदयस्थ बरे होते.
इडली ऑर्कीड आणि मी बरे आहे पण आणखी चांगल्या भाषेत लिहायला हवे होते.

पिलीयन रायडर's picture

3 Aug 2017 - 6:36 pm | पिलीयन रायडर

इडली, ऑर्किड आणि मी तर विठ्ठल कामतांचे आहे ना. त्याचे काय आता?

असं कसं म्हणता तुम्ही रेवथीतै? ;)