आणि दानव बाहेर येतो..

हेमंत ववले's picture
हेमंत ववले in भटकंती
27 Jul 2017 - 6:46 pm

Not the way to be happy
काल मढे घाटात जाण्याचा योग आला. व मढे घाटाची लागलेली वाट पाहुन त्वरीत घरची वाट पकडली...

अंदाजे ७-८ वर्षापुर्वी पहिल्यांदा तिकडे गेलो असीन , तेव्हाचा मढे घाट व आत्ताचा यात जमीन आस्मानाचा फरक आहे. माहीती तंत्रज्ञान, सोशल मीडीया मुळे माहीती लवकर प्रसारीत होत आहे. त्या काळी हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच पर्यटक तिथे येत, सध्या वीकयेंड ला किमान ४०० मोटारगाड्या, ५०० ते ६०० मोटारसायकली येत आहेत. म्हणजे दिड ते दोन हजाराच्या आसपास पर्यटक येत आहेत. यामुळे स्थानिकांना रोजगार मिळाला हे खरे पण ज्या सुंदर निसर्गाच्या पर्यटनाचा आनंद घ्यायला लोक येतात, त्या निसर्गाचे इतके नुकसान करीत आहेत की येत्या ५-१० वर्षात, मढे घाट दारुच्या, बीयरच्या, प्लास्टीक बाटल्या, प्लास्टीक पिशव्यांचा खच असलेला कचरा डेपो होईल की काय अशी भीती वाटते आहे.

किती घाणेरडे प्रकार पर्यटनाच्या नावाखाली होत आहेत की ते पाहुन तळपायाची आग मस्तकात जाते. मोटारसायकल स्वार, तरुण अतिउत्साही इतके निसर्गाच्या प्रेमात पडतात की त्यांनी दिलेल्या आरोळ्या, किंचाळ्या, आरडणे ओरडणे यामुळे बाकीचे पर्यटकच नाही तर पशु, पक्षी दगड धोंडे सुध्दा क्रुध्द होतील..
दुसरा प्रकार पाहायला मिलतो तो म्हणजे, मढे घाटात येऊन दारु पार्टी करणा-यांचा..यांचा सरंजाम एवढा भारी की हे लोक्स एखादा टेंपो घेऊन, त्यात गॅस सिलींडर, मटण, भाज्या, भांडी आणी सर्वात म्हहत्वाचे म्हणजे अमर्याद दारु, घेऊनच येतात. मग हे लोक्स घाटमाथ्यावर कुठ तरी राहुटी लावुन साग्र संगीत पार्टी करतात.
तिसरा प्रकार कार मधुन येणारे पण थोडे शिकलेले लोक्स, गाडी मधील मुझ्यिक सिस्टम मोटःया आवाजात लावुन रस्त्यात मधोमध , लाज सोडुन हिडीस नाच गाणे करणारा हा प्रकार...

आणि एक प्रकार आहे, तो म्हणजे पावसाने भिजलेल्या माता भगिनींकडे वासनांध नजरेने पाहणारा, मध्येच बीभत्स कॉमेम्टस पास करणारा......

व सर्वात केविलवाणी पर्यटकांचा प्रकार म्हणजे वरील सर्व प्रकारच्या लांडग्यांपासुन स्वतःची व स्वःतसोबत असलेल्या स्त्रियांची काळजी वाहत, दबुन दबुन, हळु हळु, जमले तर निसर्गाचा आनंद घेणारा सामान्य पर्यटक..

माणसांनी खरच का स्वतःच्या उरात एवढ्या भावंनांना दाबुन ठेवलेले असते की संधी मिळताच, किंवा आपल्या ओळखणारे इथे कोणी ही नाही असे दिसताच, पोलीस नाही असे दिसताच ह्या भावनांच उद्रेक असा व्हावा की मानवाच्या आत दडलेला दानव च बाहेर यावा?

टिप - मढे घाटाचे अप्रतिम फोटो पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
http://nisargshala.in/madhe-ghat-camping-near-pune/

प्रतिक्रिया

खरे आहे तुमचे! बहुतेक ऑफबीट जागांचे असेच झाले आहे. मी २००२ ते २०१० पर्यंत कासला दरवर्षी जायचो. आता तिकडे जावेसे वाटत नाही. काही नवीन जागा शोधल्यात, पण अर्थात त्यावर कधीही लिहीणार नाही. खुध्द कास परीसरात काही धबधबे आहेत, पण लोकांची वॄत्ती पहाता त्यांचीही वाट लागायला वेळ लागणार नाही.
कधी कधी अनवट किल्ले हि मालिका लिहावी कि नको असे मला वाटु लागलय. लवकरच माझ्या निसर्गसंपन्न सह्याद्रीची वाट लागणार याची खंत आहे.
अर्थात सारेच काही वाईट चाललेले नाही. सह्याद्री प्रतिष्टाण, दुर्गवीर सारखे वाहुन घेतलेले गट उत्तम कार्य करित आहेत. त्यांना शक्य ती मदत करणे ईतके तरी आपण करु शकतो.
बाकी दारू पिणारे आणि ईतर अनिष्ट बाबी करणार्‍यांसाठी पोलिस अपुरे पडतात, बर काही स्वंयसेवी संस्थानी हे कार्य करावे तर संस्कृतीरक्षकांच्या नावाने बोंब सुरु होते. लोकांना वाटेल तो धुड्घूस घालायचा आहे मात्र नियंत्रण कोणतेच नको. अवघड आहे.

हेमंत ववले's picture

28 Jul 2017 - 1:11 pm | हेमंत ववले

मी देखील प्रयत्न केले मढे घाट परीसरात स्थानिकांच्या मदतीने. पण अपुरे पडताहेत. दुर्दैव.

विशुमित's picture

7 Aug 2017 - 12:25 pm | विशुमित

<<<<काही नवीन जागा शोधल्यात, पण अर्थात त्यावर कधीही लिहीणार नाही. खुध्द कास परीसरात काही धबधबे आहेत, पण लोकांची वॄत्ती पहाता त्यांचीही वाट लागायला वेळ लागणार नाही.>>>

+111

इरसाल कार्टं's picture

27 Jul 2017 - 10:19 pm | इरसाल कार्टं

आणि बघवतही नाही.

माम्लेदारचा पन्खा's picture

27 Jul 2017 - 10:21 pm | माम्लेदारचा पन्खा

सगळ्या पर्यटनस्थळांचं हेच झालं आहे . . . . . जायचं तरी कुठे असा प्रश्न पडतो . . .

निसर्गाची अपरिमित हानी तर होतेच आहे . . . माणूस पशूच्याही खाली घसरलेला आहे . . . . . अशी हुल्लडबाजी करणारे जेव्हा एकेकटे असतात तेव्हा मुकाट मान खाली घालून असतात . . . . जथ्थ्याने बाहेर पडले की झालंच जनावर जागं . . .

माम्लेदारचा पन्खा's picture

27 Jul 2017 - 10:21 pm | माम्लेदारचा पन्खा

सगळ्या पर्यटनस्थळांचं हेच झालं आहे . . . . . जायचं तरी कुठे असा प्रश्न पडतो . . .

निसर्गाची अपरिमित हानी तर होतेच आहे . . . माणूस पशूच्याही खाली घसरलेला आहे . . . . . अशी हुल्लडबाजी करणारे जेव्हा एकेकटे असतात तेव्हा मुकाट मान खाली घालून असतात . . . . जथ्थ्याने बाहेर पडले की झालंच जनावर जागं . . .

लोनली प्लॅनेट's picture

28 Jul 2017 - 11:45 am | लोनली प्लॅनेट

या जगात खरे सुशिक्षित लोक किती असतील..माझ्या मते 1% पेक्षाही कमी..यावरून एक अप्रतिम आणि 100% खरा विचार आठवला..
" मानव हा सुशिक्षित प्राणी आहे हा त्याने केलेला दावा तोपर्यंतच खरा आहे जोपर्यंत अन्य कुण्या प्राण्याने तो केलेला नाही"

पीपल गेट द गव्हर्नमेंट दॅट दे डिझर्व.
पीपल गेट द फॅसिलिटीज दॅट दे डिझर्व.
पीपल गेट द कल्चर दॅट दे डिझर्व.
इंडियन्स डिझर्व धिस.

विनटूविन's picture

7 Aug 2017 - 12:10 pm | विनटूविन

अधिकच वाईट वाटले.
आधीच सज्जनांना सदैव दुय्यम नागरिकत्व मिळतेय
आणि
प्रारब्ध आहे हे असे वाटतानाच
तुम्ही असेही म्हणताय की आपली लायकीच मुळी ती आहे....

पैसा's picture

7 Aug 2017 - 7:54 pm | पैसा

सगळीकडेच हे प्रकार चालू आहेत.

विशुमित's picture

7 Aug 2017 - 9:48 pm | विशुमित

बहुतेक अनाहिता तर टुरिस्ट प्लेस ला अर्धा वेळ गॉड कणसे खायला आणि उरलेला वेळ दातात अडकलेले काढण्यात घालवतात.

पैसा's picture

7 Aug 2017 - 11:08 pm | पैसा

त्या कधी आणि कुठे भेटल्या तुम्हाला?