श्रीगणेश लेखमाला २०१७!

Primary tabs

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in जनातलं, मनातलं
27 Jul 2017 - 12:20 am

नमस्कार मिपाकरहो,

म्हणता म्हणता बाप्पांचे आगमन अवघ्या एका महिन्यावर येऊन धडकलंय. त्यांच्या स्वागतासाठी सजावटीचा थाटमाट, आरत्यांचा दणदणाट, मोदकांची रास याचबरोबर अजुन एक गोष्ट असतेच ती म्हणजे आपली श्रीगणेश लेखमाला!!!

यावर्षी श्रीगणेश लेखमाला सुरू होतेय अर्थातच गणेश चतुर्थीच्या दिवशी २५ ऑगस्टला. या लेखमालेत नेहमीप्रमाणेच दर्जेदार लेखांची रेलचेल असणार आहे. तर मिपाकरहो बाप्पाचे नाव घ्या आणि येऊ द्या तुमच्याकडून एक से एक उत्तम लेख. आम्ही वाट पाहतोय या मेजवानीची.

केवळ 'मी' ह्या विषयावर माजलेल्या तुंबळ रणाच्या पार्श्वभुमीला देऊ आता ऑफिशिअल स्वरुप. यंदाची गणेश लेखमाला आहे "मी" स्पेशल.
बोला तुमच्या मनातले बोला, तुम्हा स्वतःबद्दल बोला. कळू द्या आम्हा सर्वांना काही मिपाकरांचा जिगरी बाणा. बिनधास्त गाजवा "मी" पणा. आम्ही सर्वच तयार आहोत वाचायला, प्रतिसाद देऊन कौतुक करायला. लेख देण्याची मुदत आहे १२ १८ऑगस्ट. आपले लेख साहित्य संपादक या आयडीवर व्यनी करावेत.

तर कसा गाजवाल हा "मी"पणा?
माझा मी जन्मलो फिरुनी (आयुष्यात घडलेली चूक अन काढलेला मार्ग)

ह्या विषयावर येऊ द्या तुमची 'स्पेशल स्टोरी, अगदी तुमची ओन स्टोरी'

संस्कृती

प्रतिक्रिया

अरे वा! मस्तच, रोचक विषय आहे. दरवर्षीप्रमाणेच याही वेळी भारी लेख वाचायला मिळणार!

बापाचा नैवेद्य असणार की नाही या वेळी?

जेनी...'s picture

27 Jul 2017 - 12:30 am | जेनी...

' मी ' पण

साहित्य संपादक's picture

4 Aug 2017 - 5:27 pm | साहित्य संपादक

नक्की लिहा जेनी...

इडली डोसा's picture

27 Jul 2017 - 1:04 am | इडली डोसा

लेख वाचायला आवडतील.

प्रचेतस's picture

27 Jul 2017 - 7:18 am | प्रचेतस

शुभेच्छा.
नेहमीप्रमाणेच उत्तमोत्तम लेख वाचायला मिळतील.

ज्योति अलवनि's picture

27 Jul 2017 - 8:40 am | ज्योति अलवनि

मस्त. 'मी' पण लिहिणार

साहित्य संपादक's picture

4 Aug 2017 - 5:22 pm | साहित्य संपादक

ज्योति नक्की लिहा. वाट पाहतोय.

स्नेहांकिता's picture

27 Jul 2017 - 11:10 am | स्नेहांकिता

लेखमालेला शुभेच्छा !

माम्लेदारचा पन्खा's picture

27 Jul 2017 - 3:44 pm | माम्लेदारचा पन्खा

काहीतरी लेखन करू लागतो . . . .

साहित्य संपादक's picture

4 Aug 2017 - 5:26 pm | साहित्य संपादक

माम्लेदारचा पन्खा, आपल्या लेखाच्या प्रतीक्षेत आहोत.

अप्पा जोगळेकर's picture

27 Jul 2017 - 5:41 pm | अप्पा जोगळेकर

हा विषय आवडला नाही. इथे मी पणा खूप ऐकला आहे. पण गणेश लेखमाला जरा भारी असावी अशी अपेक्षा होती.
असो. या निमित्ताने संक्षी सरांना बोलवा आता परत अशी एक सूचना करावीशी वाटते.

अभिजीत अवलिया's picture

27 Jul 2017 - 6:30 pm | अभिजीत अवलिया

सहमत. विषय तितकासा खास वाटत नाहीये. तरीपण लेखमला वाचल्यानन्तर माझे हे मत खोटे ठरावे असे मनोमन वाटतेय.

(आयुष्यात घडलेली चूक अन काढलेला मार्ग)

हा प्रकार मोटीवेशनल वाटत असला तरी मिपावर किती लोकं खर्‍या आयडीने हे लिहायला तयार होतील याची शंका आहे.

महत्वाचे आणि वैयक्तीक डिटेल्स गाळायचे असे म्हटले तर लेखाचा बाज सांभाळला जाईलच असे नाही. माझेही हे मत खोटे ठरावे अशी खूप खूप इच्छा आहे.

अेशियन पेंट्स चे डबे भरुन वाहतील, विषयाचा पुन्हा विचार व्हावा :)

स्रुजा's picture

3 Aug 2017 - 9:01 pm | स्रुजा

सासं मंडळ नेहमीप्रमाणे निवडीचा हक्क राखीव ठेवत असेल ना? लेखमालेसाठी अनुचित वाटलेले लेख, लेखमालेनंतर लेखक स्वतःच्या जबाबदारीवर मेन बोर्डावर प्रकाशित करु शकतातच.

काय विषय ठेवावा हा सा. सं. चा प्रश्न आहे. पण आधी मी, मी करणारे कमी आहेत का? त्यातल्या त्यात एखादं संतुलित लिखाण आलं तर नक्की वाचून पोचपावती देऊ. आम्ही काही विशेष उजेड पाडलेला नसल्याने लिखाण काही जमायचं नाही. सजावटीला काही मदत लागली तर सांगा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

27 Jul 2017 - 6:49 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लिहिलं तर खुप चांगला विषय आहे. सा.सं. एक चांगली संधी दिली आहे असे वाटते.
लिहायचं ठरवलं आहे, लिहिलं की टपालाने पाठवीनचं.

उपक्रमास शुभेच्छा....! गंपती बप्पा मोरया....!

-दिलीप बिरुटे

प्रा.डॉ. सर आपण पाली भाषेचे अभ्यासक आहात. या मालिकेत आपण पाली भाषेत लिहावे अशी विनंती करतो.

आपलाच पुरातन मिपा गंँग मधला
मास्तुरे

साहित्य संपादक's picture

4 Aug 2017 - 5:23 pm | साहित्य संपादक

प्रा.डॉ. वाट पाहतोय.

थिटे मास्तर's picture

5 Aug 2017 - 10:49 pm | थिटे मास्तर

डी.बि. डॉन देताय ना मग पाली भाषेत लेख. काय म्हणता.

पिलीयन रायडर's picture

27 Jul 2017 - 7:11 pm | पिलीयन रायडर

विषय आवडला नाही. एक तर विषयाची मांडणी आवडली नाही. एक संक्षी जरा मी मी पणा करत होते पण ती काही मिपाची सिग्नेचर स्टाईल नाही, होऊ सुद्धा नये. (बरं ज्यामुळे त्यांना बॅन केलंय त्याच गोष्टीला गणेशमालेचं ओपनिंग म्हणुन वापरावं?!) संक्षी सुद्धा केवळ मी मी पणामुळे ओळखले जावेत असेही नाही. त्यांचे इतर लेखन चांगले असायचे. (आताही त्यांना का बॅन केलं ते कळालेलं नाही.) "माझ्या आयुष्यातले संघर्ष" असे काही विस्ताराने मांडले असते तर जास्त संयुक्तिक वाटले असते.

दुसरं म्हणजे गेले २-३ वर्ष झाले मिपा गणेशमाला अशाच विषयांच्या भोवती का फिरते? मी, माझा व्यवसाय, माझा छंद... म्हणजे सदस्यांनी स्वतःविषयी लिहीणे हा एक समान धागा मागच्या २-३ लेखमालांमध्ये दिसतोय. आता थोडं इनोव्हेट करायला हवं होतं.

असो, वाचायला उत्सुक आहेच. शुभेच्छा!

अभिजीत अवलिया's picture

27 Jul 2017 - 8:48 pm | अभिजीत अवलिया

"माझ्या आयुष्यातले संघर्ष" असे काही विस्ताराने मांडले असते तर जास्त संयुक्तिक वाटले असते

सहमत.

डॉ सुहास म्हात्रे's picture

27 Jul 2017 - 8:32 pm | डॉ सुहास म्हात्रे

अरे वा ! बर्‍याच विश्रांतीनंतर एका नव्या उपक्रमाची मेजवानी गणेश लेखमालेच्या निमित्ताने मिळणार !

शक्य असेल तर विषय बदला प्लिज!

वरुण मोहिते's picture

27 Jul 2017 - 8:58 pm | वरुण मोहिते

लिहिणार नाहीत . तरी ज्याचे त्याचे संघर्ष समजतील . मग ते कुठल्याही विषयातले का असेना .
दुसरी गोष्ट ज्यावर लेखमाला व्हावी असा अजून विषय उद्योजकीय संघर्ष आणि माझ्या उद्योग जगतातील कल्पना हा विषय अजून संयुक्तिक आहे असे वाटते . निरनिराळ्या क्षेत्रातील संघर्ष समजेलच शिवाय नवीन कल्पनांचा फायदा कोणालाही होऊ शकेल .

मला वाटत अनाहिता महिला दिन विशेषांक नंतर हाच उपक्रम आलाय.

शुभेच्छा!

लीलाधर's picture

28 Jul 2017 - 10:08 am | लीलाधर

लेखमालेची सुरुवात श्री. गणेशाच्या कहाणीने झाली तर उत्तमच. करता करविता बाप्पा आहेच.

श्री.गणेशाय नम:!

अप्पा जोगळेकर's picture

28 Jul 2017 - 10:38 am | अप्पा जोगळेकर

इथे खेळाडू, शास्त्रज्ञ, राजकारणी, कलाकार यांच्याबद्दल या ना त्या निमित्ताने खूप लिखाण झाले आहे.
यावेळी १० वेगवेगळ्या अंतराळ वीरांच्या किंवा यशस्वी अथवा फसलेल्या अंतराळ मोहिमांच्या कहाण्या किंवा दर्यावर्दींच्या कथा किंवा अम्युननसेन सारखे ध्रुवीय मोहिमांचे नायक किंवा १० पॅरालिंपिक पटू असे काहीतरी वाचायला आवडले असते.
दर्जा घसरतोय हे खेदाने लिहितो.
खरोखरच सकस असे काही वाचायला मिळाले तर माझे शब्द मागे घेईन.

गॅरी ट्रुमन's picture

29 Jul 2017 - 10:31 am | गॅरी ट्रुमन

लेखमालेला शुभेच्छा. पण या लेखमालेच्या विषयाच्या निमित्ताने काही प्रश्न पडले आहेत.

एकतर या विषयावर लिहिलेल्या लेखात आपलाच बराच उदोउदो होणार. म्हणजे 'मला पहा आणि फुले वाहा' असा प्रकार नाही म्हटले तरी होणारच. तसे करणे सगळ्यांना प्रशस्त वाटेलच असे नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अनेकदा संकट आले की त्याला तोंड देण्यावाचून गत्यंतर नसते. अशावेळी आपण अशा काही गोष्टी करू शकतो यावर आपलाच विश्वास बसणार नाही अशा गोष्टी आपण प्रत्यक्ष करतो. पण बर्‍याचदा ते तात्कालिक असते. एकदा एखादी सुपरह्युमन गोष्ट केली याचा अर्थ तो माणूस सुपरमॅन झाला असा होत नाही. सामान्य परिस्थितीत आपण एखादी गोष्ट ज्या पध्दतीने करतो त्यात आणि संकटप्रसंगी आपण तीच गोष्ट ज्या पध्दतीने करतो त्यात बराच फरक असू शकतो. पण अनेकदा होते असे की एखाद्याने असे काही लिहिले की त्या माणसाकडे बघायचा सगळ्यांचाच 'नजरीया' बदलतो. आणि मग त्यातून वेगळा परिणाम होऊ शकतो. मिपाच्या संदर्भात कुठल्यातरी चर्चेत एखादा प्रतिसाद त्या माणसाने दिला आणि तो त्या 'सुपरह्युमन' प्रतिमेला साजेसा नसेल तर सामान्य प्रसंगातील एखाद्याची वर्तणूक आणि संकटकाळातील वर्तणूक यातील फरक लक्षात घेतला नाही तर मग मुळातील ती सुपरह्युमन प्रतिमा खरी होती की उगीच फेकंफेक होती हा संभ्रम अनेकांच्या मनात निर्माण व्हायची शक्यता आहे. कदाचित मी फार जास्त विचार करत असेनही.

दुसरे म्हणजे एखाद्याने एखादी गोष्ट लिहिली तर भविष्यात त्याचा स्कोअर सेटलिंगसाठी वापर होऊ शकतो. मागे एकदा एखादी गोष्ट करायची होती पण ती करता आली नाही तर कशी रूखरूख वाटते यावर मिपावर एक लेख आला होता. त्यावर मी एक प्रतिसाद दिला होता. काहींना तो प्रतिसाद बराच आवडला पण महाराष्ट्रातील एका राजकीय पक्ष समर्थक आय.डी ने त्याचाच वापर माझ्याविरूध्द दोन-अडीच वर्षांनंतर स्कोअर सेटलिंगसाठी केला होता. तसेच अन्य एका चर्चेच्या संदर्भात मी आणखी एक गोष्ट लिहिली होती त्याचा वापरही स्कोअर सेटलिंगसाठी त्या आय.डी ने त्याच चर्चेत केला होता. आता ते स्कोअर सेटलिंगवाले प्रतिसाद आणि तो आय.डी हे दोन्ही मिपावर नाहीत. संपादकांनी ते प्रतिसाद उडवले आणि ज्यांच्या हातात आय.डी उडवायचे अधिकार असतात त्यांनी तो आय.डी पण उडवला. तोच मनुष्य आता दुसर्‍या नावाने मिपावर वावरत असला तर कल्पना नाही. मी त्या पक्षाचा कायमच विरोधक राहिलो आहे आणि त्याला अनुसरून मी त्या चर्चेत प्रतिसाद दिले होते. पण माझ्या मुद्द्यांचा प्रतिवाद न करता मी दोन-अडीच वर्षांपूर्वी दिलेले त्या राजकिय पक्षाशी दुरूनदुरून संबंध नसलेले प्रतिसाद घेऊन स्कोअर सेटलिंगसाठी वापरले. हा प्रकार नक्कीच खटकण्याजोगा होता. तेव्हापासून ठरविले की मिपावर माझ्या खाजगी आयुष्याविषयी फार गोष्टी लिहायच्या नाहीत. त्यानंतर 'मी एक बत्थड इंजिनिअर होतो' वगैरे नेहमीच्या गोष्टी सोडून मिपावर खाजगी आयुष्याविषयी फार लिहिलेले नाही.

मिपावर किंवा पब्लिक फोरमवर स्कोअर सेटलिंग कसेही होऊ शकते याची कल्पना आहे. पण आपण एखाद्या गोष्टीसाठी खूप संघर्ष केलेला असला तर ती गोष्ट आपल्या मनातील थोडासा हळवा कोपरा असते. त्या गोष्टीसाठी आपण नक्की कोणत्या दिव्यातून गेलेलो असतो ते केवळ आपल्याच कळू शकते इतरांना नाही . आणि नेमकी तीच गोष्ट दुसर्‍या कोणी आपल्या प्रतिसादाशी अजिबात संबंध नसलेल्या तिसर्‍याच विषयावरील स्कोअर सेटलिंगसाठी केली तर ते सगळ्यांनाच आवडेल असे नाही. अशा गोष्टी भविष्यात होणारच नाहीत याची काय खात्री आहे?

या लेखमालेचा विषय बघून हे विचार मनात आले होते. हे लिहावे की नाही हा प्रश्नही पडला होता. तसेच भरलेल्या दुधाच्या ग्लासमध्ये मीठाचा खडा मला टाकायचा नाही. पण या लेखमालेच्या विषयासंदर्भात या निसरड्या गोष्टी आहेत हे एक मिपाचा कायमचा हितचिंतक आणि मिपाला आंतरजालावरील आपले घर समजणारा या नात्याने लिहित आहे. ही गोष्ट विचार करण्यायोग्य वाटल्यास त्याचा विचार व्हावा ही विनंती.

असो. लेखमालेस शुभेच्छा.

अत्यंत माहितीपूर्ण प्रतिसाद. विशेषतः व्यक्तिगत माहीती न देण्याबाबतची भूमिका.
================
अनेक लोक लेखन वाचत नाहीत, वाचलं तर काय वाचलं काय कळलं याचा काही पत्ता नसतो, आणि खोटारडी आणि विपर्यास्त माहिती प्रसवत आणि प्रसारवत राहतात. बरीच मंडळी तरी प्रारंभी गोड बोलून माहीती काढून घेतात आणि नंतर ती दिल्याचा पश्चात्ताप करवतात. काही मंडळी तर चक्कच खासगीत दिलेली माहीती लोकांत आणतात ते ही विकृतिकरण करून!!!

सविता००१'s picture

13 Aug 2017 - 10:04 pm | सविता००१

गॅरी ट्रुमन आणि अरुण जोशी१२३ यांच्या पतिसादांशी.

अजिबात म्हणजे अजिबातच नाही पटला हा विषय.
असो.
लेखमालेला अनेकानेक शुभेच्छा!

यशवंत पाटील's picture

29 Jul 2017 - 5:49 pm | यशवंत पाटील

तशा चुका बर्याच आहेत म्हणा. परंतू लिहायसारख काही नाही.
बाकिच्यांचे लेख वाचायला तयार होऊन बसलो आहे.

तेजस आठवले's picture

29 Jul 2017 - 7:13 pm | तेजस आठवले

मी हा शब्द ज्याच्यात येतो असा कुठलाच विषय नको शक्यतो. अजून बदलता येत असेल तर पाहावे ही विनंती.
१. गाजलेल्या कवितांचे रसग्रहण. बघूया आपले सिद्धहस्त मिपाकर कविता कशी खुलवतात ते.
२. भयकथा/ थरारकथा / रहस्यकथा. (मोजी / अकु पद्धत चालणार नाही)
३. निसर्गाबद्दलची मुक्तके.
४.मन
५. आपल्या रोजच्या वापरातील एखादी वस्तू घेऊन त्याच्या शोध आणि निर्मितीमागची सर्व गोष्ट. ह्यासाठी बरीच शोधाशोध करावी लागू शकते.
६. माहित नाहीत आणि विचारही करू शकत नाही अशी करिअर्स आणि त्यातले लोक.असं काहीतरी भन्नाट.
७. एकल प्रवास आणि त्यातले अनुभव..(ह्यात अगदी अर्ध्यातासाचा ट्रेनचा प्रवास पण असू शकेल किंवा २५ तासाचा परदेश/देशांतर्गत प्रवास असू शकेल.) आपण सगळेच केव्हा ना केव्हा एकट्यानेच प्रवास केला असतोच.
८.भीती. ही प्रत्येकालाच वाटत असते.कसली तरी. ज्ञात/अज्ञात गोष्टींची, वास्तूंची, कसलीही. हा विषय कदाचित अगदी फालतू वाटेल पण जरा एकांतात विचार करायला बसलो तर बऱ्याच गोष्टी आठवतील.
मनात आले ते विषय सुचवलेत.

पिलीयन रायडर's picture

1 Aug 2017 - 6:15 pm | पिलीयन रायडर

कॅनडामधल्या नोकरीच्या संधी असा जो धागा होता, त्यात एकांनी (बहुदा अनिंद्य.. नक्की आठवत नाही.) त्यांनी अनेक वर्षांपुर्वी लंडनला जाण्याचा निर्णय कसा घेतला आणि काही माहिती नसताना केवळ दहावीच्या जोरावर कसे गेले ह्याचा उल्लेख केला होता. हा संघर्ष वाचनीय असेल.

मिपावर फार मोठा वर्ग हा भारताबाहेर / महाराष्ट्राबाहेर रहाणारा आहे ज्यांनी अशा काळात महाराष्ट्र सोडला जेव्हा आपल्यासाठी नक्की काय वाढुन ठेवले आहे ह्याची पुरेशी कल्पना त्यांना नव्हती. तरीही ते आले. परक्या भुमीत मराठी काय, भारतीय लोकही दिसायला दुरापास्त असतील. मराठी आंतरजाल तितके पुढे गेले नसेल की मिपा सारखे सपोर्ट ग्रुप हाताशी असावेत. ह्या लोकांनी केलेला संघर्ष नक्कीच वाचनीय असेल.

लोक नोकरीच्या निमित्ताने पुष्कळ फिरतात, लहान मुलांना सोबत घेऊन परक्या जागी जातात. त्यांना नानाविविध अनुभव येत असतील. भाषेपासुन किराणामाला पर्यंत सगळंच वेगळं. खास करुन ३०-४० वर्षांपुर्वीचा काळ जेव्हा संपर्काची साधनं तितकी प्रगत नव्हती. ह्या लोकांनी काही तरी चूक केली म्हणुन संघर्ष नव्हता केला.

गणेश लेखमालेच्या निमित्ताने जर अशा सकारात्मक गोष्टी वाचायला मिळाल्या तर जास्त आवडेल. आणि कदाचित लोकांना लिहीताना तितके अवघड वाटणार नाही.

राघवेंद्र's picture

1 Aug 2017 - 8:50 pm | राघवेंद्र

एक नंबर प्रतिसाद !!!

अनिंद्य's picture

5 Aug 2017 - 12:33 pm | अनिंद्य

@ पिलीयन रायडर, नाही हो - तो मी नाही. मी राणीच्या देशात कधीच गेलो नाहीये. :-)

तुमची बृहद-महाराष्ट्रीय साहित्याची कल्पना छान आहे.

त्यांनी अनेक वर्षांपुर्वी लंडनला जाण्याचा निर्णय कसा घेतला आणि काही माहिती नसताना केवळ दहावीच्या जोरावर कसे गेले ह्याचा उल्लेख केला होता. हा संघर्ष वाचनीय असेल.

हे अनिवासि. त्यांना या धाग्याच्या माध्यमातून पुन्हा एकदा लिहिण्याचे आवाहन करीत आहे.. खरोखर अत्यंत प्रेरणादायी अनुभव असतील त्यांचे..

भाते's picture

8 Aug 2017 - 9:03 am | भाते

यावर इतरत्र स्थायिक झालेल्या मिपाकरांकडुन सविस्तर लेखमाला वाचायला नक्कीच आवडेल.
परक्या ठिकाणी गेल्यावर सुरुवातीच्या काळात त्यांना आलेले बरेवाईट अनुभव ते आत्ताचे आयुष्य हा प्रवास आमच्यासाठी नक्कीच प्रेरणादायक असेल.

संमं, पुढेमागे या विषयाचा जरूर विचार व्हावा.

साहित्य संपादक's picture

3 Aug 2017 - 8:14 pm | साहित्य संपादक

श्रीगणेश लेखमालेसाठी हा विषय निवडण्यापाठीमागची भूमिका

साहित्य संपादक मंडळ निर्माण झाल्यापासून (म्हणजे गेल्या दोन वर्षांपासून) श्रीगणेश लेखमालेचं स्वरूप हे 'मिपाकरांनी मिपाकरांसाठी' असं ठेवायचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला आहे. मिपाकरांकडे असलेल्या वैविध्यपूर्ण अनुभवांचा फायदा अन्य मिपाकरांना मिळावा, कोणाला त्यातून प्रेरणा मिळावी, असा हेतू आहे. त्यालाच धरून गेल्या दोन श्रीगणेश लेखमालांचे विषय होते.

या वेळचा विषय आहे "माझा मी जन्मलो फिरुनी (आयुष्यात घडलेली चूक अन काढलेला मार्ग)". आपण सगळेच चुका करतो, त्यातून धडपडत मार्ग काढतो, कधी कोणी दुसरीच व्यक्ती मार्ग दाखवते. अनुभवांचं एकमेकांशी आदानप्रदान (शेअरिंग) असावं, मित्रांशी संवाद साधताना असणारा खुलेपणा असावा आणि सदस्यांतली 'एक मिपाकर आपणही' अशी वीण पक्की व्हावी असा प्रामाणिक प्रयत्न म्हणून हा विषय निवडला आहे. कित्येकदा 'या परिस्थितीत मी काय करू?' अशी हतबल अवस्था येते, आणि अशाच वेळी अशा प्रकारचं लेखन आठवतं. परिस्थिती अगदी तशीच्या तशी नसली तरी बोगद्याच्या टोकाशी थोडासा प्रकाश दिसू शकतो. अगदी काही नाही तर मनोबल टिकायला/वाढायला याचा उपयोग होऊ शकतो.

आता ही घडलेली चूक आणि काढलेले मार्ग काही मोठे, आयुष्य बदलायला लावणारेच असायला पाहिजेत असं नाही. उदा० "दार्जिलिंगला फिरायला गेलो होतो, पण चुकून सगळ्या हाफपँट्स नेल्या" असं अगदी रोजच्या जीवनातलं, सर्वसामान्यही काही असू शकतं. वैयक्तिक, सामाजिक किंवा व्यावसायिक जीवनात तुम्हांला आलेल्या अडचणी आणि तुम्ही त्यातून काढलेला मार्ग. थोडक्यात काय तर "परिस्थितीपुढे, प्रसंगापुढे हतबल न होता दिलेली लढत" हा एक समान धागा असला म्हणजे झालं. मग ती कहाणी तुमची असो किंवा तुम्हाला माहीत असलेल्या एखाद्या व्यक्तीची असो, आम्हांला वाचायला आवडेल.

विविध प्रतिसादांत विचारलेल्या प्रश्नांबद्दल / मतांबद्दलः

'मी'पणा

हा एक स्वतःवर (पक्षी: मिपावर) विनोद करायचा (self-deprecating humour) क्षीण प्रयत्न होता. तो फार गांभीर्याने घेण्याची आवश्यकता नाही. सदस्यांनी स्वतःविषयी लिहिणे हा समान धागा
पूर्णपणे मान्य आहे. वर 'भूमिके'त लिहिल्याप्रमाणे 'मिपाकरांनी मिपाकरांसाठी' हा श्रीगणेश लेखमालेच्या 'ब्रँडिंग'चा भाग आहे. अर्थात, श्रीगणेश लेखमाला आज अशी आहे म्हणून कायम / जगाच्या अंतापर्यंत तशीच असावी असा हट्ट नाही. नव्या कल्पनांचं / इनोव्हेशनचं स्वागतच आहे.

किती लेखक खऱ्या आयडीने लिहितील याची शंका आहे,
ही भीती आहे खरी! यावर उपाय म्हणजे ज्या लेखकांना खऱ्या आयडीने लिहायचं नाहीये त्यांनी आपले लेख साहित्य संपादक आयडीला व्यनिने पाठवताना तसा स्पष्ट उल्लेख करावा. म्हणजे ते लेख साहित्य संपादक या आयडीने प्रसिद्ध करता येतील. प्रत्येक लेख साहित्य संपादक मंडळाकडून डोळ्यांत तेल घालून वाचला जातो. जर काही खाजगी माहिती उघड होते आहे याची शंका जरी आली, तर आम्ही संपर्क साधूच.
आणखी काही शंका, मतं असल्यास जरूर कळवावीत.

प्रतिसाद आवडला. आवर्जुन काही गोष्टी क्लीअर केल्याबद्दल धन्यवाद. स्वतःच्या नावाने लेख पाठवणे अवघड वाटल्यास सासं नावाने लेख करणे हे पण पटले. फक्त त्या केस मध्ये सासं सोडून त्या खर्‍या आयडीचा सोर्स इतरांकडे नसावा - हस्ते परहस्ते नाव उघड होण्याची शक्यता असते.

लेखमालेला शुभेच्छा, वाचण्यास उत्सुक आहे.

लेखमालेला शुभेच्छा, वाचण्यास उत्सुक आहे.

हेच बोल्तो.

कारणमीमांसा पटली आहे पण, हे उत्तर देण्यात खूप वेळ गेला असे नाही का वाटत?

असो, उत्तम लेख-भोग देवाला व भक्तना देखील मिळावी हीच अपेक्षा.

एकदा सगळ्यांचे वाहत्या गंगेत हात धुवून झाले की मग एकदाच उत्तर दिलेले बरे, असा विचार केला असेल ;)

दशानन's picture

3 Aug 2017 - 9:39 pm | दशानन

हा हा हा, सहमत!
पण माझा उद्देश तो नव्हता ना नाही आहे. लेखकाला / लेखिकेला थोडा जास्तवेळ मिळाला असता एवढीच अपेक्षा.

यशोधरा's picture

3 Aug 2017 - 9:31 pm | यशोधरा

सुरेख, संतुलित प्रतिसाद. आवडला. मालिकेतील लेख वाचण्यासाठी उत्सुक आहे.

पिलीयन रायडर's picture

3 Aug 2017 - 10:56 pm | पिलीयन रायडर

विनोदाचा प्रयत्न खरंच क्षीण होता हे मान्य केल्या बद्दल धन्यवाद!
विषय समजण्यात चुक झालेली नव्हती, विषय इतका खास नाही असं अजुनही मत आहे. कदाचित लेख वाचुन बदलेलही!
सासं आयडीने लेख प्रकाशित करण्याची कल्पना उत्तमच पण स्रुजा म्हणते ते ही महत्वाचे.

विषयाबद्दल मतभिन्नता असू शकते. पण ह्यावेळी श्रीगणेश लेखमालेमध्ये एक महत्त्वाचा बदल घडून येत आहे. तो म्हणजे, आतापर्यंत केवळ निमंत्रितांसाठीच असलेली लेख लिहिण्याची संधी आता ह्या वर्षी निमंत्रितांबरोबरच सगळ्या वाचकांना मिळणार आहे. हे माझ्या मते एक मोठं पाऊल आहे. त्यामुळे कधीकधी निघणारा काहीश्या नाराजीचा सूर बदलू शकेल आणि श्रीगणेश लेखमाला अधिकाधिक मिपाकराभिमुख होऊ शकेल अशी मला आशा आहे.

आयडीच्या व्यक्तिगततेसंबंधी सहमत आहे. यावर काही पर्याय शोधून लवकरच आपल्यापुढे घेऊन येतो.

पिलीयन रायडर's picture

4 Aug 2017 - 12:47 am | पिलीयन रायडर

अरे हो! हा मुद्दा लक्षात आला नव्हता की गणेशलेखमालेचे आवाहन होत नव्हते. डायरेक्ट लेख यायचे!

खरंच चांगला बदल आहे हा.

मलाही हे लक्ष्यात आले नव्हते.
फक्त श्रीगणेश लेखमालेत एक लेख टाकून नंतर क्वचितच दिसणार्‍यांपेक्षा आधी एक मिपाकर म्हणून ओळख झालेल्यांचे लेख वाचायला मला तरी व्यक्तिशः जास्त आवडेल.

आनंदयात्री's picture

4 Aug 2017 - 1:48 am | आनंदयात्री

>>पण ह्यावेळी श्रीगणेश लेखमालेमध्ये एक महत्त्वाचा बदल घडून येत आहे. तो म्हणजे, आतापर्यंत केवळ निमंत्रितांसाठीच असलेली लेख लिहिण्याची संधी आता ह्या वर्षी निमंत्रितांबरोबरच सगळ्या वाचकांना मिळणार आहे.

हे अतिशय आवडले. स्तुत्य निर्णय. साहित्य संपादक मंडळाला शुभेच्छा.

चला, आता लिहा सगळ्यांनी पटापटा.

साहित्य संपादक's picture

3 Aug 2017 - 11:25 pm | साहित्य संपादक

लेख देण्याची मुदत वाढवत आहोत. आता आपले लेख १८ ऑगस्ट पर्यंत येऊ द्यात.

स्नेहांकिता's picture

4 Aug 2017 - 11:43 am | स्नेहांकिता

विषयाचे विस्तृत प्रकटीकरण आणि शंकांचे निराकरण केल्याबद्दल सासं यांचे आभार.

पण ह्यावेळी श्रीगणेश लेखमालेमध्ये एक महत्त्वाचा बदल घडून येत आहे. तो म्हणजे, आतापर्यंत केवळ निमंत्रितांसाठीच असलेली लेख लिहिण्याची संधी आता ह्या वर्षी निमंत्रितांबरोबरच सगळ्या वाचकांना मिळणार आहे.

याबद्दल मात्र असहमत. गेल्या वर्षीही श्रीगणेश लेखमाला सर्व मिपाकरांना लेखनासाठी खुली होती आणि
या धाग्यामध्ये तसे जाहीर आवाहनही करण्यात आले होते.
श्रीगणेश लेखमाला २०१६ -आवाहन

सूड's picture

4 Aug 2017 - 12:09 pm | सूड

लेख लिहिण्याची संधी आता ह्या वर्षी निमंत्रितांबरोबरच सगळ्या वाचकांना मिळणार आहे.

आवाहन प्रत्येक वेळी यायचं की!! निमंत्रित वैगरे प्रकर्ण नव्हतं.

अच्छा. ग्रेट. मला वाटलं या वर्षीच खुली झाली की काय.

मिपा १० वर्षांचे होईल ना? त्यानिमित्ताने काही खास उपक्रम करणार आहत का?

चौकटराजा's picture

7 Aug 2017 - 9:25 pm | चौकटराजा

माझ्या निरिक्षणानुसार व्यक्तिगत अनुभवातून आलेले लिखाण ही मिपाची संस्कृति च नाही. याचे कारण मला मानवी स्वभावात आहे असे वाटते. ते असे की जो माझ्या बरोबरीचा आहे त्याची मला फारशी किंमत नसते. जो माझ्या पेक्षा यशस्वी झाला आहे त्याच्या अनुभवांची मला ओढ असते. मिपाकरांमधे तसे सेलेब्रेटी लेखक कोणी नाहीत. समजा इथे लताबाई व विठ्ठल कामत वा असे कोणी सदस्य असते तर त्यांच्या लेखांवर उड्या पडल्या असत्या. कारण मानवी स्वभाव अनुभवाला महत्व देत नाही ते कोणाचे अनुभव आहेत याला महत्व देतो. " आराम हराम आहे" हे पं नेहरूनी म्हणणे व तेच चौकट राजा यानी म्हणणे यात जमीन अस्मानाचा फरक असतोच.

मोदक's picture

20 Aug 2017 - 8:33 am | मोदक

असहमत.