गटारी स्पेश्यल : अ‍ॅबसिन्थ - एक हरिताप्सरा

Primary tabs

सुनील's picture
सुनील in जनातलं, मनातलं
24 Jul 2017 - 8:46 am

एक श्वान आणि एक कच्छप वगळता सांप्रत काहीही पाळत नाही, श्रावण तर दूरची गोष्ट. सबब, "गटारी" साजरी करण्याचे काहीही कारण असण्याची आवश्यकता नाही, नसावी.

तरीही "गटारी" साजरी होतेच!

म्हणजे कसं आहे की, आपण चवथीला मोदक किंवा होळीला पुरणपोळी खातो ती काय त्या दिवसांनतंर बराच काळ मोदक वा पुरणपोळी खायला मिळणार नाही म्हणून नव्हे, तर एक रिवाज म्हणून. तसेच माझ्या "गटारी"चेही!

एक रिवाज म्हणून साजरी करायची.

खेरीज, यंदा खास आकर्षण होते ते म्हणजे - अ‍ॅबसिन्थ.

चेक रिपब्लिकमध्ये बनलेले हॅप्सबर्ग अ‍ॅबसिन्थ. तब्बल ७२.५% ABV असलेले हे हिरवट द्रव्य भलतेच जहाल आणि मादक! किंचित साखर आणि थंड पाणी मिसळून घेतलेत की सातवा स्वर्ग काही दूर नाही!

HA

अवांतर - एखादी गोष्ट आरोग्यास हितकारक किंवा अहितकारक आहे, हे सिद्ध करणारी वैद्यकीय संशोधने ही काही नवलाईची गोष्ट नव्हे! किंबहुना, एक गोष्ट एकाच वेळेस योग्य आणि अयोग्य आहे असे सिद्ध करणारी परस्परविरोधी संशोधनेदेखिल पहायला मिळतात. अ‍ॅबसिन्थही त्यास अपवाद नाही.

असे सांगतात की फ्रान्समध्ये अ‍ॅबसिन्थ सेवनाचे फॅड इतके वाढले होते की वाईन उत्पादकांच्या पोटात गोळा आला. अखेरीस त्यांनी काही "संशोधकांना" हाताशी धरून अ‍ॅबसिन्थची यथेस्त नालस्ती आरंभली. परिणाम त्यांना हवा तोच झाला. फ्रान्ससहीत अनेक देशांनी यावर बंदी घातली. फ्रान्सचा वाईन उद्योग पुन्हा बहरला. २१ व्या शतकात पुन्हा एकवार "संशोधन" होऊन अ‍ॅबसिन्थ तितकीशी घातक नाही असे सिद्ध झाले!

थंड पेयविरंगुळा

प्रतिक्रिया

टवाळ कार्टा's picture

24 Jul 2017 - 12:15 pm | टवाळ कार्टा

खत्रा

पुंबा's picture

24 Jul 2017 - 12:38 pm | पुंबा

काय सुंदर बाटली आहे.. रंग, लोगो सुरेख..
एन्व्ही यू..

वा! हे संशोधन भलतेच आवडले आहे. :-D

वा! हे संशोधन भलतेच आवडले आहे. :-D

अभ्या..'s picture

24 Jul 2017 - 12:41 pm | अभ्या..

अति कौतुक झालेय. इतकी काय भारी वाटली नाही.