ठिपक्यांची मनोली (मुनिया) आणि माळमुनिया

सानझरी's picture
सानझरी in जनातलं, मनातलं
22 Jul 2017 - 12:11 pm

नमस्कार मिपाकरहो!

मागच्या वर्षी मी मुनिया वर एक लेख टाकला होता.

या वर्षी ठिपक्यांच्या मनोली सोबत माळमुनियाही येत आहेत. माळमुनिया (Silverbill) पक्षी मुनियाच्याच जातीचा पण रंगाने वेगळा. याच्या पोटावर मुनियासरखे ठिपके नसतात, तर याच्या शेपटीवर एक मोठा पांढरा ठिपका आसतो. ज्यामुळे व्हिडीओत याला पटकन ओळखायला सोप्पं जाईल. याचे २ फोटोही खाली देत अहे.
मुनियांना त्यांच्या आवाजासाठी पाळल्या जायचे. मुनियांचा नाजूक घुंगरां सारखा मंजुळ आवाज बर्‍याच लोकांना ऐकायचा होता म्हणून यावर्षी (महत्प्रयासाने) मुनियाचा व्हिडीओ काढला. तो व्हिडीओ इथे देत आहे. माळमुनियाचा आवाज मुनिया पेक्षा थोडा मोठा असतो. त्यामुळे आमच्याकडचा चिवचिवाटही वाढलाय.

A light broke in upon my soul --
It was the carol of a bird,
It ceased -- and then it came again,
The sweetest song ear ever heard.
-Lord Byron

माळमुनिया

.

छायाचित्रणअनुभव

प्रतिक्रिया

अनिंद्य's picture

22 Jul 2017 - 1:25 pm | अनिंद्य

@ सानझरी

तुम्ही खऱ्या भाग्यवान !

सानझरी's picture

22 Jul 2017 - 3:55 pm | सानझरी

धन्यवाद अनिंद्य!!

अनिंद्य's picture

22 Jul 2017 - 1:26 pm | अनिंद्य

व्हिडीओ दिसला पण फोटो दिसत नाहीत.

श्रीगुरुजी's picture

22 Jul 2017 - 3:40 pm | श्रीगुरुजी

मस्त! पक्षी बघायला खूप आवडतात. माझ्या घराच्या अवतीभवती २०-२५ प्रकारचे पक्षी येतात. बरेचसे पक्षी आता ओळखायला शिकलो आहे. ठिपकेवाल्या मुनियांची जोडी एकदा खिडकीत येऊन बसली होती. फोटो काढायच्या आतच उडून गेली. माळमुनिया हा पक्षी अजून पाहण्यात नाही. कदाचित पाहिला असेल पण ओळखलेला नाही.

फोटो काढायच्या आतच उडून गेली.

पक्षी दिसले कि मनभरून बघून घ्या, फोटोच्या मागे नका लागू. कॅमे-याच्या नादात तो क्षण निसटून जातो असा बरेचदा अनुभव आलाय..
माळमुनियाचे फोटोही टाकलेत पण ते दिसत नाहीयेत. सासंला व्यनि केलाय. ते देतील टाकून तेव्हा नक्की बघा..

श्रीगुरुजी's picture

22 Jul 2017 - 4:21 pm | श्रीगुरुजी

+ १

इडली डोसा's picture

22 Jul 2017 - 6:22 pm | इडली डोसा

त्या पक्षांसाठी तुम्ही घरी अशी छान सोय केली आहे त्याबद्दल तुझं आणि तुझ्या परिवाराचं कौतुक.

पद्मावति's picture

22 Jul 2017 - 6:31 pm | पद्मावति

खुप सुरेख.
त्या पक्षांसाठी तुम्ही घरी अशी छान सोय केली आहे त्याबद्दल तुझं आणि तुझ्या परिवाराचं कौतुक. +१

धन्यवाद इडो आणि पद्मावति..

यशोधरा's picture

24 Jul 2017 - 1:15 pm | यशोधरा

किती गोड आहे हे! :)

सानझरी's picture

24 Jul 2017 - 5:24 pm | सानझरी

धन्यवाद यशोधरा!! :)

खरच खूप छान आलेत फोटोस आणि मनाला भावली हि इवलीशी मुनिया फॅमिली ..

Swapnaa's picture

26 Jul 2017 - 6:22 pm | Swapnaa

खरच खूप छान आलेत फोटोस आणि मनाला भावली हि इवलीशी मुनिया फॅमिली ..

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 Jul 2017 - 9:15 pm | डॉ सुहास म्हात्रे

आख्खा मुनिया परिवार पाहूणा आला आहे की तुमच्या घरी ! लै भारी !!

पाहूणे नै, घरचेच आहेत ते आता. त्यांच्या अनेक पिढ्या बर्‍याच वर्षांपासून येत आहेत आमच्याकडे.. :)

रुपी's picture

27 Jul 2017 - 4:43 am | रुपी

वा. खासच!

धन्यवाद स्वप्ना आणि रूपी..

सपे-पुणे-३०'s picture

28 Jul 2017 - 9:02 am | सपे-पुणे-३०

लेख, व्हिडीओ आणि फोटो अतिशय सुंदर!! अजून एक आवर्जून उल्लेखनीय आहे ते म्हणजे नीटनेटकी बाल्कनी आणि पक्षांसाठी केलेली सोय. खूप आवडलं.

सानझरी's picture

31 Jul 2017 - 5:18 pm | सानझरी

धन्यवाद सपे!!

प्रीत-मोहर's picture

1 Aug 2017 - 8:03 pm | प्रीत-मोहर

सान!! आज पाहतेय हे. किती मस्त खाऊ पिऊ ची सोय केलीत ग.
आजच आमच्याकडे एका चिमणा चिमणीने घर बांधायला सुरवात केलीय. मी सुद्धा enjoy करेन आता चिवचिवाट!"

प्रीत-मोहर's picture

2 Aug 2017 - 8:42 am | प्रीत-मोहर

अरे आमच्यापण मुनियाच आहेत!!

धन्यवाद प्रिमो.. तुम्हीसुद्धा आता खाऊपिऊची छान सोय करा..