रालायन्स जिओ,जिओफोन ..इतर कंपण्यांची नफेखोरी,उपाय काय??

टर्बोचार्जड फिलॉसॉफर's picture
टर्बोचार्जड फिलॉसॉफर in जनातलं, मनातलं
21 Jul 2017 - 2:06 pm

रिलायन्सने काही महीन्यांपुर्वी जिओ सर्व्हीस सुरु केली.अत्यंत परवडणार्या किंमतीत त्यांनी ग्राहकांना इंटरनेट देऊ केले आहे.तीनशे रुपयात तीन महीने रोज १जीबी डेटा ते देत आहेत.आज मुकेश अंबाणी यांनी जिओफोनची घोषणा केली आहे.१५०० रुपये जे तीन वर्षात रिफंड होतील ,तेवढे भरायचे व ,४G स्मार्टफोन घ्यायचा.छान योजना आहे.मी वास्तविक कुणा कंपणीचा सपोर्टर नाही.पण रिलायन्सच्या योजनांमुळे Airtel,Vodaphone ,idea या कंपण्यांची नफेखोरी उघड झाली आहे.
जिओ येण्याच्या आधी एअरटेल,आयडीया वगैरे मंथली १जीबी २जी पॅक साठी १९८ रुपये ग्राहकाला मोजायला लावत होते.जिओ आल्या नंतर हेच प्रोव्हाईडर आज तीनशे रुपयात ३० जीबी डेटा सर्रास देत आहेत.म्हणजे याआधी चाललेली यांची नफेखोरी लक्षात येईल.दाबुन पैसा कमवून हे आज जिओशी स्पर्धा करत आहेत.
याधीही २००३ साली कॉल रेट चार रुपये outgoing व दोन रुपये incoming असताना रिलायन्सनेच ४० पैसे दर लावून इन्कमींग फ्री करुन प्राईसिंग सामन्यांना परवडेल इतपत खाली आणले होते.थँक्स टू रिलायन्स...
रिलायन्सचे जाऊदेत.प्रश्न असा पडतो की दूरसंचार सेवांवर नजर ठेवणारी TRAI संस्था या नफेखोरीवर काय करत होती इअतके दिवस.?
असो ,यामुळे इंटरनेट सर्वसामान्यांपर्यंत आले हेही नसे थोडके.

मांडणीप्रकटन

प्रतिक्रिया

मराठी_माणूस's picture

21 Jul 2017 - 2:34 pm | मराठी_माणूस

याधीही २००३ साली कॉल रेट चार रुपये outgoing व दोन रुपये incoming असताना रिलायन्सनेच ४० पैसे दर लावून इन्कमींग फ्री करुन प्राईसिंग सामन्यांना परवडेल इतपत खाली आणले होते.थँक्स टू रिलायन्स...

मग हे मार्केट लीडर आहेत का ? आणि त्यांच्या त्या जुन्या फोन चे काय झाले ?

मार्मिक गोडसे's picture

21 Jul 2017 - 2:45 pm | मार्मिक गोडसे

रिलायन्सला टक्कर देणे महाकठीण. 'करलो दुनिया मुठ्ठिमे' कडे वाटचाल चालू आहे. TRAI ऐवजी रिलायन्स बाकी टेलिकॉम कंपन्यांना वठणीवर आणेल.

श्रीगुरुजी's picture

21 Jul 2017 - 2:50 pm | श्रीगुरुजी

रिलायन्स संपूर्ण भारतीय बनावटीचा फोन आणत आहेत. चिनी कंपन्यांची मक्तेदारी मोडण्यासाठी ही चांगली सुरूवात आहे. २४ ऑगस्टला बुकिंग सुरू झाले की जिओ चा फोन घ्यायचा विचार आहे. परंतु त्या फोनमध्ये फक्त २ एमपी इतक्याच क्षमतेचा कॅमेरा आहे असं ऐकतोय. तसं असेल तर तो फोन खपणार नाही कारण आता बहुतेक सर्व फोन किमान १३ एमपी चा बॅक कॅमेरा व २ एमपीचा फ्रंट कॅमरा देतात.

आदूबाळ's picture

21 Jul 2017 - 3:03 pm | आदूबाळ

पण नफे'खोरी' केली तर नेमका प्रॉब्लेम काय आहे? आयडिया, एअरटेल आणि मंडळी फिलॉसॉफरवाड्याव पत्रिका घेऊन आली होती का की आमचा फोन घ्या बुवा...

अनुप ढेरे's picture

21 Jul 2017 - 4:11 pm | अनुप ढेरे

अगदी अगदी!
नफेखोरी नको असेल तर नका वापरु त्यांची सर्विस.

विजुभाऊ's picture

21 Jul 2017 - 3:44 pm | विजुभाऊ

रिलायन्सच्या योजनांमुळे Airtel,Vodaphone ,idea या कंपण्यांची नफेखोरी उघड झाली आहे.

ही नफेखोरी नाही तर तोटेखोरीच म्हणायला हवी. रीलायन्सला हे असे फुकट / स्वस्तात देणे परवडणारे नाही. पण त्यांची तोटा सहन करण्याची क्षमता इतर कम्पन्याम्पेक्षा खूपच मोठी आहे.
रीलायन्स ने त्यांच्या भविष्यातील नफा लक्षात घेवून सध्या तोटा सहन करायचे धोरण ठेवलेले आहे. रीलायन्स ने आर कॉम च्या वेळेसच हे सुरु केले त्या नंतर बी एस एन एल ने इनकमिंग फ्री सुरू केले.
पण सध्याची परिस्थिती पाहिली तर आर कोम तोट्यातच आहे. रीलायन्स जीओ आणि आर कॉम या दोन वेगवेगळ्या कम्पन्या आहेत. दोन्ही आंबाणी वेगळे आहेत.
पन " हम तो डुबेंगे सनम मगर तुमको लेकर" अशी पॉलीसी आहे.
ग्राहकांचा फायदा होतोय हे महत्वाचे

समाधान राऊत's picture

21 Jul 2017 - 3:53 pm | समाधान राऊत

पण नफे'खोरी' केली तर नेमका प्रॉब्लेम काय आहे?
ती नफेखोरी नाही तर लूट होती. आणि हे सर्वसामान्य लोकांना समजत नसले तरी TRAI ला कळत होते, मग त्यांनी काहीच का केले नाही हे मात्र समजत नाही.
परंतु त्या फोनमध्ये फक्त २ एमपी इतक्याच क्षमतेचा कॅमेरा आहे असं ऐकतोय
तो नव्या युगाचा बेसिक फोन असेल. प्रत्येकाच्या खिशाला परवडणारा आणि इंटरनेटशी जोडून ठेवणारा..

असेल ना. पण ट्रायने का मनावर घ्यावं?

ट्रायची उद्दिष्टे (इथून):

TRAI's mission is to create and nurture conditions for growth of telecommunications in the country in a manner and at a pace which will enable India to play a leading role in emerging global information society.

One of the main objectives of TRAI is to provide a fair and transparent policy environment which promotes a level playing field and facilitates fair competition.

यात कुठे तरी "ग्राहकांची काळजी घेऊ" किंवा "नफेखोरी थांबवू" असं आहे का? किंबहुना ट्रायने रिलायन्सलाच "predatory pricing which is harmful to competition" म्हणून ब्यान केलं पाहिजे.

धर्मराजमुटके's picture

21 Jul 2017 - 4:46 pm | धर्मराजमुटके

मी एक ग्राहक आहे आणि समोरचा मला लुटायलाच बसला आहे असे वाटणे ही खास मानवी प्रवृत्ती आहे. :)
मला वाटते की अगोदर या क्षेत्रात आलेल्या कंपन्यांनी अव्वाच्या सव्वा नफेखोरी केलेली नसावी. सुरुवातीला हे क्षेत्रातील तंत्रज्ञान महाग होते, शिवाय संपुर्ण नवे सेक्टर असल्याकारणाने मनुष्यबळ प्रशिक्षित करणे वगैरे वर कंपन्यांचा बराच पैसा खर्च झाला असणार. एवढ्या अवाढव्य प्रकल्पांवर केलेला खर्च वसूल होऊन प्रत्यक्ष नफा मिळायला सुरुवात होण्यास कित्येक वर्षांचा (या कंपन्यांच्या बाबतीत हा काळ ३ ते ५ वर्षांचा असावा.) काळ जातो. त्या दरम्यान तंत्रज्ञान सतत बदलत असल्यामुळे सतत गुंतवणूक अपरिहार्य होऊन बसते. रिलायन्सकडे फार्फार मोठी होल्डींग कॅपासिटि असल्यामुळे ते सुरुवातीला बरीच वर्षे तोटा सहन करुन उद्योग चालू ठेऊ शकतात. गेल्या ३-४ वर्षात एमटीएस, व्हिडीओकॉन, बीपीएल, एअरसेल, युनिनॉर ह्या कंपन्यांनी एकतर या क्षेत्रातून काढता पाय घेतला किंवा अतिशय मर्यादित (थोड्या राज्यांत) त्यांचे अस्तित्व उरले आहे. एमटीएनएल आणि बीएसएनएल ह्या सरकारी कंपन्या तर चक्क तोट्यात आहेत. (अर्थात त्यांची इतर अनेक कारणेदेखील आहेत).

त्यामुळे या कंपन्यांनी अगदीच आपल्याला लुटले असे नाहि म्हणता येत. मात्र त्या अगदी साळसुदपणे वागतात हे म्हणणे देखील चुकीचे ठरेल. मी अगदी सुरुवातीपासुन मोबाईल सेवा वापरल्या आहेत (पैसेवाला असल्यामुळे नाही तर किडा असल्यामुळे) मात्र गेली अनेक वर्षे व्होडाफोनच्या सेवेशी संलग्न आहे. काही काळ एअरटेल देखील वापरले मात्र त्यांचे बिल वेळेत न भरल्यास अगदी दुसर्‍याच दिवशी ऑऊटगोईंग कॉल्स बंद होऊन जायचे. व्होडाफोनवाले त्यामानाने सुरुवातीपासूनच जरा मवाळ होते. शिवाय मी दर ६-१२ महिन्यांने त्यांनी एमएनपी चे कारण सांगून जास्तीत जास्त लाभ पदरात पाडून घेतलेले आहेत. प्रत्येक कंपनीचे त्यांच्या वेबसाईटवर दाखविलेल्या प्लॅनव्यतिरिक्त इतर काही खास प्लॅन्स असतात. जास्त काळ संलग्न असलेल्या ग्राहकांना याचा लाभ नक्कीच दिला जातो.

अर्थात रिलायन्समुळे ग्राहकाचा फायदा होत असेल तर तो नक्कीच स्वागतार्ह आहे. मी देखील जिओचे एक कार्ड वापरत आहे. पण जोपर्यंत व्होडाफोन भारतात आहे आणि त्यांची सेवा मला भावतेय तोपर्यंत थोडासा जादा पैसा देऊन त्यांची सर्विस वापरावी लागली तरी ती मी नक्कीच वापरत राहणार आहे.

भारतात प्रीपेड कस्टमर बेस जास्त आहे. एअरटेलने सगळ्यात प्रथम मासिक पाळी प्लॅन (२८ दिवसांचा) आणला त्यावरुन मी त्यांच्यावर अतिशय नाराज आहे. कोणत्याही टेलिकॉम कंपनी ने हा प्लॅन बदलून ३० दिवसांचा प्लॅन आणला तर मी त्यांचा इतर ग्राहकांच्या वतीने ऋणी राहीन.

टिप : स्त्रियांचा अवमान करण्याचा या प्रतिसादाचा उद्देश नाही. तसे वाटल्यास हा प्रतिसाद संपादक मंडळ उडवू शकते.

सुबोध खरे's picture

21 Jul 2017 - 6:16 pm | सुबोध खरे

Out of the 78 crore phones in India, Ambani said, 50 crore are feature phones that cannot be used for Internet or data usage. The new phone would give "affordable" device to these 50 crore users and "end the digital exclusion in India"
http://economictimes.indiatimes.com/articleshow/59695466.cms?utm_source=...
मुकेश अंबानींचा हा हिशेब आहे. आज आपल्याकडे येणारे सुतार प्लम्बर इ लोकांकडे साधे फिचर फोन आहेत कारण स्मार्ट फोन आणि त्यासाठी लागणाऱ्या डेटाचे बिल त्यांना परवडत नाही (किंवा ते आपल्याला परवडणार नाही अशी त्यांची अज्ञानातून आलेली समजूत आहे).
या मूळ समजुतीला धक्का लावून हा मानसिक अडसर दूर करणे हि रिलायन्सची खेळी आहे.
आपले फोन हे classes साठी नसून masses साठी उपब्ध केले तर ARPU AVERAGE REVENUE PER UNIT ( प्रत्येक ग्राहकाकडून मिळणारा नफा) हा कमी असेल पण संख्याबळाचा वापर करून त्याचा फायदा उठवणे हा हेतू आहे.
त्यातून हा फोन स्वस्त आहे (१५०० रुपये ठेव ठेवा आणि ३ वर्षांनी फोन परत करा आणि १५०० रुपये परत घ्या) आणि भारतात तयार करून त्यावर (मेक इन इंडिया) कराचा फायदा आणि चिनी बाजारपेठेला आव्हान हा दुहेरी हेतू साध्य केला जात आहे. रिलायन्स ने सर्वात प्रथम ३५० रुपये महिना तीन वर्षे भरून (धीरूभाई अंबानी पायोनियर स्कीम) कितीही कॉल फुकट करा म्हणून योजना आणली ज्यात या पैशात फोनसुद्धा मिळत असे. यामुळे कारण "टुच्चा आदमी के पास भी फोन" आल्याने मोबाईल फोनच्या युगात क्रांती झाली.श्रीमंत आणि उच्च मध्यमवर्गीय माणसाची मक्तेदारी असलेला भ्रमणध्वनी सर्व सामान्य माणसाला उपलब्ध झाला.
आज हीच परिस्थिती स्मार्ट फोन बाबत रिलायन्स करू पाहत आहे. रिलायन्स काही समाजसेवा म्हणून हे करीत नाहीत. आपल्या राखीव उत्पन्नातून हि खेळी खेळत आहेत त्यात ते किती यशस्वी होतील हे माहित नाही परंतु सर्व सामान्य माणसाला स्मार्ट फोनचे फायदे माहित झाले कि तो ते वापरू लागेल यात शंकाच नाही. डिजिटल इंडिया सफल करण्यात याचा एक मोठा वाटा असेल यात शंकाच नाही.

जेम्स वांड's picture

22 Jul 2017 - 11:48 am | जेम्स वांड

आमचे प्रल्हाद बाबा मेनेजमेंट वाले हेच म्हणत, बाबांनो १० रुपयांची एक शाम्पू बाटली विकण्यापेक्षा १-१ रुपयाच्या १० पुड्या करून विका.....

१) RIL मधली छत्तीस हजार कोटी अथवा इतर टेलिकॅाम कंपन्यांतील मोठी गुंतवणूक त्या कंपन्यांच्या प्रमोटरांची मोठ्या टक्केवारीने आहे का?
२) ती बँका/पब्लिकची असणार.
३)प्रमोटर आपले पैसे 'इतर' मार्गाने परत मिळाले की परदेशात जाऊन बसला तर?
४) डुबणार कोण? - जन्ता आणि कर्मचारी.

सुबोध खरे's picture

21 Jul 2017 - 7:25 pm | सुबोध खरे

In its latest stock exchange filing dated 31 March 2017, Reliance Industries reported a promoter holding of 46.32 %. (Large promoter holding indicates conviction and sincerity of the promoters. We believe that a greater than 35 % promoter holding offers safety to the retail investors.)

At the same time, institutional holding in the Company stood at 31.38 % (FII+DII). (Large institutional holding indicates the confidence of seasoned investors. At the same time, it can also lead to high volatility in the stock price as institutions buy and sell larger stakes than retail participants.)
https://www.sanasecurities.com/reliance-industries-equity-research/

सुबोध खरे's picture

21 Jul 2017 - 7:26 pm | सुबोध खरे

डिस्क्लेमर --माझ्याकडे रिलायन्स इंडस्ट्रीजचे कोणतेही समभाग( दुर्दैवाने) नाहीत.

अनुप ढेरे's picture

21 Jul 2017 - 10:06 pm | अनुप ढेरे

दुर्दैवाने

'सु' ऐवजी चुकुन 'दु' पडलाय काय?

कंजूस's picture

22 Jul 2017 - 7:31 am | कंजूस

ok
इतर अगोदरच्या कंपन्यांत गुंतवणूक केलेल्या बँका गॅसवरच.

अमरेंद्र बाहुबली's picture

21 Jul 2017 - 9:57 pm | अमरेंद्र बाहुबली

मला खुप त्रास झाला. वोडाफोन चा. 1 जी.बी. काटकसरीने वापरावे लागायचे. 50.₹ त 40₹ बँलन्स यायचा. आता कसं मनसोक्त नेटची नी काँलची उधळपट्टी.
जुग जुग "जियो" अंबानी. :-)

एकुलता एक डॉन's picture

22 Jul 2017 - 1:01 am | एकुलता एक डॉन

कंपन्या तोट्यात होत्या तर टेलिकॉम घोटाळ्यात एवढा पैसे कसा ओतला ?

सुबोध खरे's picture

22 Jul 2017 - 10:58 am | सुबोध खरे

http://www.livemint.com/Industry/7wpNdoJ0z0lsoHbhBEPIuM/6-telcos-includi...
धुतल्या तांदुळा सारखे कोण आहे हो?

रिलायन्सने क्युम्युलेटिव्ह नफ्याचा विचार करुनच हा प्रकार केला आहे.

हा क्युम्युलेटिव्ह नफा थोडा विस्कटून सांगता का ?

म्हणजे एका ग्राहका मागे कमीत कमी कमी नफा ठेवून जास्तीत जास्त नफा मिळवण्यासाठी मोठ्ठा ग्राहकवर्ग आकर्षित करुन घेणे.

अमोल काम्बले's picture

26 Jul 2017 - 1:35 pm | अमोल काम्बले

Master stroke by Reliance Jio, 1500 as security, for estimated 125 million smart phones and no payment to Government as it’s not a sale but security, clear cut loss of 28% GST of 1500 x 125 million to the Govt. exchequer, its almost ten times the 2G national loss. Learn how to make money.

काय्याप्पा वर हि पोस्ट फीरत आहे. ख खो दे जा.....

श्रीगुरुजी's picture

26 Jul 2017 - 3:23 pm | श्रीगुरुजी

जिओच्या चतुर भ्रमणध्वनी संचात 'कायाप्पा' नाही असे वाचले. तसे असेल तर हा संच फार कोणी विकत घेईल असे वाटत नाही.

एकुलता एक डॉन's picture

24 Aug 2017 - 6:12 pm | एकुलता एक डॉन

आणताय ते कायप्पा