काय हवंय?

अमलताश_'s picture
अमलताश_ in जनातलं, मनातलं
18 Jul 2017 - 6:03 pm

एका मैत्रिणीची २५ अपेक्षांची चेकलिस्ट होती. लग्न झाल्यावर म्हणाली कि " हि इज एन आन्सर टू माय प्रेयर्स" . मजाच वाटली मला. म्हणजे यार माझी काही चेकलिस्ट च नाहीये ना !

आयुष्यात चांगला घडावं एवढी अपेक्षा आहे. नेहमी चांगलंच घडणार नाही हेही माहित आहे. पण त्या भविष्याच्या "सरप्राईज एलिमेंट" मध्ये एक थ्रिल वाटतं. म्हणूनच ज्योतिष वगैरे मध्ये कधी रस वाटला नाही.

माणसाचं असणं हे भावनेशी जुळलेलं आहे. म्हणून दुःख सुद्धा आपण माणूस असण्याचा भाग आहे. खरं तर प्रेमात पुन्हा पुन्हा पडून दुःख करायची नशा अनुभवलेल्या माणसाला दुःख म्हणजे पुन्हा प्रेमात पडायचं निमित्त वाटतं असतं.

मग नेमकं काय हवं असतं?

एक च वाक्य. "सगळेच आपापल्या आयुष्यात वेगवेगळ्या लढाया लढत असतात. पण तू तुझी लढाई खूप 'ग्रेसफुली' लढत आहेस "

रेखाटन

प्रतिक्रिया

तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय ते मला कळलं नाही. खूप त्रोटक वाटतंय. विस्तार करून लिहिणार का ?