दुकानाचा गाळा विकत घेणे - कायदेशीर बाबी

Primary tabs

अप्पा जोगळेकर's picture
अप्पा जोगळेकर in काथ्याकूट
17 Jul 2017 - 10:41 am
गाभा: 

नमस्कार,

दुकानाचा गाळा विकत घ्यायचा असेल तर कोणकोणत्या कायदेशीर बाबी तपासून पाहाव्या लागतात याबद्दल माहिती हवी आहे.
सहसा घर खरेदी करताना टोकन अमाउंट देणे, अ‍ॅग्रीमेंट करणे, सोसायटीचे एनोसी घेणे, इंडेक्स टू आणि कंप्लीशन सर्टिफिकेट घेणे अशी प्रक्रिया असते.
दुकान खरेदी करतानादेखील हीच प्रक्रिया असते का. कोणकोणती कागदपत्रे तपासून पाहावीत.
रिसेलचे दुकान घेताना आणि बिल्डरकडून दुकान घेताना डॉक्युमेंटेशन मधे काय फरक असतो.
जमीन बळकावली जाते तसे भाड्याने दिलेले दुकान भाडेकरु कडून बळकावले जाऊ शकते का, दुकान भाड्याने देताना घर भाड्याने देण्यापेक्षा वेगळे काय करावे लागते इत्यादी माहिती मिळवायची आहे.
मध्यंतरी एकदा अभ्या यांनी दुकान भाडेपट्टा करार कायद्यात कसलासा बदल होणार असे काही लिहिले होते.
त्याबद्दल वाचायला आवडेल.
धन्यवाद.

प्रतिक्रिया

अनुप ढेरे's picture

17 Jul 2017 - 10:42 am | अनुप ढेरे

ते क्याब व्यवसायाचं क्यांसल केल काय?

अप्पा जोगळेकर's picture

17 Jul 2017 - 10:45 am | अप्पा जोगळेकर

जर काही ठरवले असेल तर कॅन्सल करणार साहेब. सध्या नुसतीच माहितीची जमवाजमव करतो आहे.

>>दुकान खरेदी करतानादेखील हीच प्रक्रिया असते का.>>

१)नवीन/अगोदर असलेले दुकान
२)एक ठराविक लायसन्स असतात त्यातूनच एक लायसन घ्यावा लागेल.
३)जुने दुकान घेताना नाव बदलणे अधिक लायसन बदलणे दोन्हींस ड्युटी बसते.
४) सोसायटीतील दुकान :- एक मोठा डोकेदुखी विषय आहे. कोणतेही काम निघाले तरी खर्च शेअर करावा लागतो जरी त्यातून एक पैसा फायदा नसतो.
५)ज्लालाग्राही पदार्थ रंग ठेवणे आणखी लायसन
६) पाणी आणि टॅाइलट कॅामन आहे का?
बरेच आहे
शुभेच्छा!

सुचिता१'s picture

18 Jul 2017 - 7:22 am | सुचिता१

अभ्या..'s picture

17 Jul 2017 - 11:24 am | अभ्या..

मला ह्या कायद्याची काही कागदोपत्री कल्पना नाहीय पण त्या जागेत शॉप ऍक्ट(व्यवसाय परवाना) काढायचा असेल तर भाडेकरार नोंदणीकृत असलेला पाहिजे असा जीआर मला एजंटने दाखवला आहे. आधी नुसत्या बॉण्डवर लेखी करार चालत असे.
शिवाय त्या जागेत भाडेकरूला स्वताचे वीज कनेक्शन, त्यातल्या त्यात इंडस्ट्रियल थ्रीफेज हवे असेल तरीही सेम हीच प्रोसिजर.
सरकारला भाडेकरार कळलाच पाहिजे.

मार्मिक गोडसे's picture

17 Jul 2017 - 11:45 am | मार्मिक गोडसे

भाडेकरार नोंदणीकृत केल्याशिवाय आता पोलिस स्टेशन मधून ना हरकत प्रमाणपत्र मिळत नाही. आबासाहेबांनी सूट दिली होती, ते गेले आणि पोलिस माजले.

सिद्धेश्वर विलास पाटणकर's picture

17 Jul 2017 - 2:00 pm | सिद्धेश्वर विला...

दुकान खरेदी करताय खालील बाबी तपासून पहा

१) मालकाबाबत माहिती गोळा करा .. शक्यतो त्याचे चरित्र .. त्याने कुठे फसवणूक केलेली आहे कि नाही .. तो स्वतः कसा आहे .. आजकाल हि फॅशन झाली आहे .. ब्लॅक पैसे घ्यायचे आणि समोरच्याला झुलवत ठेवायचे ...

२) कागदपत्रे ,वकिलामार्फत तपासून घ्या .. किती आणि कसा खर्च येणार आहे .. त्याची नोंद घ्या आणि ती जातं करून ठेवा .. त्याप्रमाणे जमवाजमव करताना अडचण येणार नाही ...

३) वकिलाचे नाव मालकाला सांगू नका ... तिथे काळेबेरे होऊ शकते .. तुमच्याकडे मुबलक वेळ असेल तर आणि तरच बिनधास्त राहा ...

४) जे पण धनादेश व्यवहारात ठरतील त्यांच्यावर तुमच्या सोयीनुसार तारखा टाका .. स्वतः टाका .. फसवणूक होऊ शकते ...

५ ) पूर्ण कागदपत्रे असतील .. ह्याची शाश्वती वकिलाकडून मिळाल्यानंतर .. दुसर्या ओळखीच्या वकिलाकडून सल्ला घ्या ..

६) शक्यतो दोन हात करावे लागतात .. मालक झोड असेल तर .. त्याची पण तयारी ठेवा ...

हे सर्व मी सांगतोय कारण मी यातून गेलेलो आहे .. विश्वास नसेल तर खुशाल दुसऱ्यावर विश्वास टाकून गाळ्यासाठी जाऊ शकता ...