मार्गदर्शन /नवी सुरवात

Primary tabs

सन्घमित्रा's picture
सन्घमित्रा in काथ्याकूट
16 Jul 2017 - 8:36 pm
गाभा: 

सातत्याने येत असलेल्या व्यावसायिक अपयशातून बाहेर कसे पडावे ? दैवी मार्गदर्शन असे काही असते का ? नवी सुरवात कशी करावी ?

प्रतिक्रिया

मिपावर धागा काढावा.

कंजूस's picture

17 Jul 2017 - 7:38 am | कंजूस

ज्योतिषाचा सल्ला घ्या. व्यवसाय मार्गदर्शनात नक्कीच उपयोगी पडते.

सुज्ञ's picture

17 Jul 2017 - 11:57 am | सुज्ञ

काय व्यवसाय करता आपण .कुठल्या क्षेत्रात

अपयश / अडचणीची करणे बघुन त्या विषयातील तज्ज्ञांचा सल्ला नेहमीच उपयुक्त ठरतो ...
ज्योतिषांच्या सल्ल्याने फक्त मानसिक आधार मिळू शकेल ... ज्योतिषांच्या सल्ल्याने बिझनेस चालणे शक्य नाही...

तज्ज्ञांचा सल्ला नेहमीच उपयोगाचा ठरत नाही हे जेव्हा कळेल तेव्हा उशीर झालेला असतो.

अर्थार्जन फक्त व्यवसायानेच होते असे नाही. पुन्हा व्यवसायांतही खूप प्रकार असतात. त्यातला कोणता जमेल हे ग्रह नक्की सांगतात. स्वतंत्र/भागिदारीत, कारखाना/डिस्ट्रिब्युटर, फुटकळ/ठोक, बँकिंग/सर्विसिंग/विमा/कमिशन एजंट, किराणा/मेटल/भाजीपाला/इलेक्ट्रोनिक्स वगैरे यासाठी फक्त.

अमर विश्वास's picture

17 Jul 2017 - 4:15 pm | अमर विश्वास

कंजूसजी
आपल्या मताचा पूर्ण आदर ठेऊन कुठलाही प्रतिसाद देत नाही ..
फक्त माझा वैयक्तिक अनुभव : आज पर्यंत वेळोवेळी विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचे सल्ले घेतले (व काही क्षेत्रात सल्ले दिले (कन्सल्टन्सी)
पण ज्योतिषाकडे एकदाही गेलेलो नाही .. आणि हो आमचे उत्तम चाललेले आहे .. अर्थात हा वैयक्तिक निवडीचा प्रश्न आहे ,,,

कुठल्याही वैध मार्गाने सर्वांना यश मिळो हीच सदिच्छा

अमुक प्रकारचे काम /व्यवसाय तुम्हाला चांगला जमेल हेच तो ज्योतिषी मत देईल॥ यात अवैध काहीच नाही. आपल्या जवळचे लोकही कधी सुचवतातच.
भरभराट झाल्याशी कारण. करणारा माणूस काम करणारच आहे,तो काही दैवावर विसंबून राहात नाही.
व्यवसाय निवडल्यावर तज्ञांची मदत घेईलच परंतू रूळ बदलायचा का हेएक मत.

व्यावसायिक अपयशाचे स्वरूप समजावून घ्यायचा प्रयत्न करा. बाळबोध वाटेल पण नक्की काय चुकले/चुकते आहे हे कागदावर लिहून पहा. त्याने बराच अंदाज येतो.
नक्की बिझिनेस स्ट्रॅटेजी चुकतेय की अर्थव्यवस्थापनात कमी पडत आहात हे तपासून पहा.
शक्यतो आर्थिक गुंतागुंतीचा सर्वात आधी विचार करा, धंद्यात अपयश आले तर पुर्णतः नविन वाट चोखाळावी लागू शकते, तरी त्याची तयारी ठेवा मात्र आर्थिक समस्यांचा निपटारा आधी करा.
अमर वर म्हणाले तसे तुमच्या व्यवसायाशी संबंधीत लोकांचा सल्ला अवश्य घ्या.
फ्रस्ट्रेशनपासुन दूर रहा आणि कुटुंब तसेच मित्रमंडळींना मदतीला घेऊन प्रश्नांची थंड डोक्याने सोडवणूक करा.
शुभेच्छा!

धर्मराजमुटके's picture

17 Jul 2017 - 5:51 pm | धर्मराजमुटके

नक्की काय प्रॉब्लेम आहे ते कळल्याशिवाय सल्ला कसा देणार ?
इथे एक सदस्य होते. त्यांनी तुमच्या प्रश्नावर अगदी जालीम उपाय सुचवला असता. पण असो. !
समस्येचे स्वरुप माहित नसल्यामुळे केवळ शुभेच्छा देऊन थांबतो.

फुत्कार's picture

17 Jul 2017 - 7:24 pm | फुत्कार

choose yourself - guide to wealth by James Altucher हे पुस्तक जरूर वाचा. kindle वर ते केवळ रु. ६३ /- ला उपलब्ध आहे.
त्यातले सर्वच मुद्दे मला पटले नसले तरी काही कल्पना फारच छान आहेत आणि नेहमीपेक्षा वेगळ्या देखील आहेत.

खरंतर हे पुस्तक सर्वांनीच वाचायला हवे. त्यातील वेगळ्या कल्पनांसाठी.

सूचना - ही एक series आहे पुस्तकांची. त्यातले choose yourself या पहिल्या भागापेक्षा मला वर उल्लेख केले आहे ते पुस्तक / भाग आवडले. आणि तुम्ही मांडलेल्या प्रश्नासंदर्भात ही ते जास्त योग्य आहे.