समाजातील लब्ध प्रतिष्ठित आणि त्यांची काल्पनिक दुःखे

Primary tabs

अभिजित - १'s picture
अभिजित - १ in काथ्याकूट
16 Jul 2017 - 12:22 pm
गाभा: 

आज १६ जुलै चा लोकसत्ता. लोकरंग पुरवणी. सचिन कुंडलकर चा लेख. - जसे जगायला हवे तसे.
http://www.loksatta.com/karant-news/sachin-kundalkar-article-on-chef-sid...
पैसे कमावणे म्हणजे काहीतरी एकदम सोप्पी आणि फालतू गोष्ट असून ती कोणीही करू शकतो. पण आपल्या मनाप्रमाणे बेफाट बेधुंद इ इ जगणे हे खरे मर्दा चे काम असते असे एकंदरीत या कुंडलकराचे म्हणणे आहे !!
आधी सिद्धार्थ महाडिक ची स्टोरी. पुण्यातील एका "साध्या" मध्यमवर्गीय घरातील मुलगा. मरिन इंजिनिअर झाला. मग ते क्षेत्र त्याला आवडले नाही. त्याला स्वयंपाका ची आवड होती. मग काय त्याने ते शिकायचे ठरवले. तो ऑस्ट्रेलिया ला गेला. अडीच वर्ष तिथे राहून तिथल्या अतिशय प्रसिद्ध अशा Cordon Bleu cookery school Sydney मध्ये शिकला. रेफ - http://timesofindia.indiatimes.com/life-style/food/food-reviews/Restaura...
तिथून परत आल्यावर नोकरी करायचे नाही असे त्याने ठरवले आणि सरळ स्वतःचे हॉटेल टाकले.
याच्या या सगळ्या हौशींना याचे "साधे" मध्यम वर्गीय पालक सपोर्ट करत होते !!
मान्य आहे कि हा सिद्धार्थ महाडिक मेहनती आहे. पण हा "साधा" मध्यमवर्गीय कसा काय बुवा ? कुंडलकरची मध्यम वर्गाची व्याख्या काय ?

ते जाऊ दे. पुढे या कुंडलकराला म्हणे बरच लोक भेटलेत कि जे IT मध्ये काम करतात. चिक्कार पैसे कमावतात पण खुश नाहीत. वेगळे काही करू इच्छितात. अरे अति हुशार माणसा . ते खुश नाहीत याचे कारण काय असेल याच्यावर विचार केलास का तू ?
हि घे कारणे. डोईजड काम, डेड लाईन , वर्क प्रेशर आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे नोकरीची नसलेली शाश्वती .
समजा एखादया माणसाला देवाने सरळ वरदहस्त दिला कि - तू आजपासून चिंता करू नको. जमेल तसे काम कर. अगदी ७ तासात पण कामावरून पळ काढ . तुला नोकरी मधून कोणीही काढू शकणार नाही. कंपनी बंद पडणार नाही. बंद पडणार असेल तर आधीच मी तुला दुसऱ्या कंपनीत लावेन . तुला भरपूर पगार देतो. सगळ्या सुट्टया देतो. आणि चिक्कार increment पण मिळेल. आता सांगा कोण म्हणेल कि मी नाखूष आहे. मला नको ते पैसे ?
आत्ता काल परवा एका तेलगू मुलाने नोकरी वर रुजू झाल्यावर २/४ दिवसातच आत्महत्या केली पुण्यात. माहित आहे ? पेपर वाचतात का हे कुंडलकर ?
मला तरी आज पर्यन्त कोण्ही माणूस असा भेटला नाही कि जो म्हणतोय मला चिक्कार पैसे मिळतो. नको तो पैसा .
तरीही कुंडलकर साहेब तुम्हाला खरोखर असे मजबूत पैसे वाले लोक नेहमी भेटत असतील तर एक काम करा. त्यांच्या कडून समाजा करता काही देणगी जमा करा. पैसे बाबा आमटे , स्नेहालय यांच्या नावाने जमा करून घ्या . बघू किती जमतात पैसे .. घेणार का हे challenge ?
जाता जाता - चित्रा पालेकर पण लिहितात . रविवार लोकसत्ता मध्ये. गेल्या महिन्यात लेख वाचले. एकदा आपला मुलगा कसा गे आहे याचे कौतुक वाचले. नंतर एकदा आपली मुलगी पण कशी लेस्बियन आहे हे पण वाचले. पण हे सगळे प्रकार म्हणजे एक प्रकारचं मानसिक आजार आहे. वाचा - एल जी बी टी समूहाचा मानवाधिकार आणि गौरवीकरण - http://maharashtratimes.indiatimes.com/editorial/samwad/lgbt/articleshow...

प्रतिक्रिया

जेम्स वांड's picture

16 Jul 2017 - 5:24 pm | जेम्स वांड

नेमका काय काथ्या कुटणे अपेक्षित आहे ?

वाल्मिकी's picture

16 Jul 2017 - 8:35 pm | वाल्मिकी

मुद्दा काय आहे ?

कुंडलकरांचा असा राग राग करू नका. ठरवून केलेला विनोद आणि अभावितपणे झालेला विनोद याची भन्नाट सरमिसळ त्यांच्या लेखांत असते**. मी तर बुवा चातकासारखी वाट बघतो त्यांच्या लेखांची.

कुंडलकरांना नावं ठेवणार्‍याला मिसळीत बेदाणे लागतील, आणि पावभाजीत सांबार मसाला घातला जाईल - असा शाप देऊन हे चार शब्द संपवतो.

**अधिक माहिती आणि मनोरंजनासाठी याच सदरातले जुने लेख वाचून बघा.

जेम्स वांड's picture

17 Jul 2017 - 8:14 am | जेम्स वांड

ठो

अभिजित - १'s picture

17 Jul 2017 - 9:46 pm | अभिजित - १

तुम्ही एकदम जबरा फॅन दिसताय . ठीक आहे. पण तुम्ही लक्षात घ्या कि मी काही त्यांच्यावर वैयक्तिक टीका करत नाहीए. त्यांनी जे लेखन केले आहे ते कसे चुकीचे आहे इतकेच फक्त बोललो आहे. त्याच्या करता मला शाप ?? माझी टीका चुकीची आहे का ?
IT मध्ये लोक खुश नाहीत तर त्यांच्या नाखुशीचं खरे कारण मी टाकले आहे तसेच आहे. बहुसंख्य केस मध्ये. कि हे हि तुम्हाला पटत नाहीए ? माझी चूक काय ? कि कुंडलकर वर टीका करणे म्हणजे महत्पाप ??

अभ्या..'s picture

17 Jul 2017 - 9:56 pm | अभ्या..

अवघडे,
कुंडलकरांसोबत थोडा उपरोधाचाही अभ्यास करायला हवा होता.

जेम्स वांड's picture

17 Jul 2017 - 10:02 pm | जेम्स वांड

डब्बल ठो :D

उपरोध समजून घेत चला हो साहेब.

जेम्स वांड's picture

17 Jul 2017 - 10:05 pm | जेम्स वांड

ऑ, मी केले तरी काय हो सायकल वाले दादा?

तुमी नाय वो.. तुमाला उद्देशून नाये माझा प्रतिसाद.

बाकी तुमचे आणि मिपाचे जुने ऋणानुबंध दिसतात तरीही तुम्ही असा प्रश्न विचारलात म्हणजे तुमच्याकडे भरपूर वेळ आहे असे दिसते. :D

विशुमित's picture

18 Jul 2017 - 11:08 am | विशुमित

ट्रिपल ठो ..!!

जेम्स वांड's picture

18 Jul 2017 - 11:26 am | जेम्स वांड

बाकी तुमचे आणि मिपाचे जुने ऋणानुबंध दिसतात तरीही तुम्ही असा प्रश्न विचारलात म्हणजे तुमच्याकडे भरपूर वेळ आहे असे दिसते. :द


-----------------------

आराराच, सायकलवालं टॉप गियर हो. :D

पावभाजीत सांबार मसाला घातला जाईल

हाहाहा!

दशानन's picture

16 Jul 2017 - 9:41 pm | दशानन

मनोरंजक !!!!

मराठी_माणूस's picture

17 Jul 2017 - 2:19 pm | मराठी_माणूस

http://www.loksatta.com/karant-news/author-shares-experience-of-making-c...

ह्या लेखात , वृध्द माणसांचा अणि पर्यटकांचा केलेला हेटाळणी करणारा उल्लेख वाचुन पुढचे लेख वाचणे सोडुन दीले.

तुम्ही उल्लेखलेल्या बातम्या किंवा कुंडलकरांचा हा लेख वाचला नाही. मी आतापरेंत त्यांचे २ लेख वाचलेत. दुसरा वाचला कारण पहिला बराचसा पटला होता. दुसरा वाचता वाचता हा मनुष्य कन्फ्यूज करतो असे वाटायला लागले व त्यानंतर त्यांचे काही वाचले नाही. त्यांचा एक शिनेमाही अर्ध्यात बंद केला. त्यांची प्रसंगांची सांधेजोड कधी पटत नाही तर कधी साफ चुकीची वाटते. एखाद्या मनुष्याचे लेखन, सादरीकरण न आवडणे, न पटणे यापेक्षा वाचकांना (म्हणजे मला) इरिटेट होते. प्रतिसाद लिहिणे थांबवते कारण त्याचे नातेवाईक इथेच चार घरे ओलांडून राहतात.

अनुप ढेरे's picture

18 Jul 2017 - 10:47 am | अनुप ढेरे

मला तरी आज पर्यन्त कोण्ही माणूस असा भेटला नाही कि जो म्हणतोय मला चिक्कार पैसे मिळतो. नको तो पैसा .

पैसा व्यवस्थीत आहे म्हणणारे तुम्हाला भेटले नसतील तर संगत बदला. असे लोक असतात. जेवढे आहे ते पुरतय आणि अजुन पैशासाठी शांती न बिघडवु देणारे असतात. आणि ते अंबानी-बिर्ला नसतात. मध्यमवर्गीयच असतात. तरी गरजेपुरता पैसा आहे असं म्हणतात.

पुंबा's picture

18 Jul 2017 - 12:24 pm | पुंबा

हो अशी लोकं भेटतात अनेक.. माझ्या मते अश्या लोकांच्या संख्येत वाढच झालीये गेल्या दशकात..

सुबोध खरे's picture

18 Jul 2017 - 11:49 am | सुबोध खरे

लब्ध प्रतिष्ठित चा अर्थ ज्यांना प्रतिष्ठा लाभली आहे असे. ज्यांना प्रतिष्ठा लाभली आहे अशा लोकांना दुःख नाहीच असे म्हणणे हे अतिशयोक्ती आहे. आणि त्यांची दुःखे काल्पनिकच असतील हे आपण कसे ठरवले.
सध्या घरातील मुलगा मरीन इंजिनियर झाला. ते क्षेत्र त्याला आवडले नाही याचा अर्थच त्याने तेथे काही काळ तरी काम केले असेल ना? काही काळ काम केले म्हणजे काही तरी पैसे मिळवला असेलच ना? मरिन इंजिनियरना भरपूर पगार मिळतो कारण तो परकीय चलनात असतो म्हणूनच बरेच लोक अतिशय कंटाळवाणे आणि एकसुरी काम असले तरी या क्षेत्रात जातात.
मग अशा मुलाने जर आपल्याला न आवडणारे क्षेत्र सोडून आवडीच्या क्षेत्रात जाण्याचे ठरवले तर त्याच्या मध्यमवर्गीय पालकांनी सपोर्ट केला तर काय चूक आहे? कारण समजा हे क्षेत्र जमले नसते तर परत मरीन इंजिनियरिंग मध्ये जाण्याचा पर्याय त्याला खुला होताच कि. वर्ष दोन वर्ष प्रयत्न करून तो जमला नसता तरी आयुष्यात काही तरी करण्याचा प्रयत्न आपण केला याचे समाधान असतेच कि मग ते पूर्ण जमले नाही तरी.
डॉ गिरीश ओक यांचे उदाहरण घ्या. डॉक्टरकी सोडून केवळ अभिनयाची आवड म्हणून सर्व सोडून ते मुंबईला आलेच कि.
माझ्या माहितीतील एक अत्यंत हुशार मुलगा मुंबईतील आय सी टी (पूर्वीची यु डी सी टी) मधून केमिकल इंजिनियर झाला. आठ दहा वर्षे त्याने भरपूर पगाराची नोकरी केली पण तेथे त्याचे मन रमेना. म्हणून त्याने ते सर्व सोडून सी ए केले आणि तो एक प्रथितयश सी ए म्हणून व्यवसाय करतो.
पैशाचे पाठबळ असेल तर तरुणपणातच काय मध्यवयातहि लोक असा वेगळा मार्ग निवडतात.
श्री आनंद भाटे (आनंद गंधर्व) हे १० आणि १२ ला बोर्डातआलेले अत्यंत हुशार विद्यार्थी होते पुणे अभियांत्रिकीतून(COEP) मधून संगणक तंत्रज्ञान यात अभियांत्रिकी करून वर चढत चढत झेन्सार सारख्या कंपनीचे प्रमुख कार्यकारी अधिकारी (CEO)असताना त्यांनी नोकरी सोडून पूर्ण वेळ आपल्या गायकीसाठी वाहून घेतले आहे. ज्यांना गायकीत काहीही कळत नाही आणि आवडहि नाही अशाना हा निर्णय मूर्खपणाचा वाटणे साहजिक आहे.
पण आपल्याला गायकीला वेळ देता येत नाही हे त्यांचे दुःख आपण काल्पनिक म्हणणार का?
समजा एखादया माणसाला देवाने सरळ वरदहस्त दिला कि - तू आजपासून चिंता करू नको. अगदी ७ तासात पण कामावरून पळ काढ . तुला नोकरी मधून कोणीही काढू शकणार नाही. कंपनी बंद पडणार नाही. बंद पडणार असेल तर आधीच मी तुला दुसऱ्या कंपनीत लावेन . तुला भरपूर पगार देतो. सगळ्या सुट्टया देतो. आणि चिक्कार increment पण मिळेल. आता सांगा कोण म्हणेल कि मी नाखूष आहे.
असा माणूस मी स्वतः आहे. मी सात तासांच्या वर काम करीत नाही. दुपारी झोपतो.( आणि पन्नाशी झाली तरी मला दुपारी आणि रात्रीही व्यवस्थित झोप येते) रविवारी पूर्ण सुटी घेतो. रात्री बेरात्री काम करीत नाही.
मी जास्त काम केले तर मला यापेक्षा दुप्पट पैसे मिळतील आणि तशा संधीही सहज उपलब्ध आहेत.
माझ्या गरजांपेक्षा मला नक्कीच पैसे जास्त मिळतात आणि त्यावर जेवढा येतो तेवढा आयकर भरून मी सुखाने झोपतो. म्हणून मी समाधानी आहे.
असे असणे वाईट आहे का?

श्री आनंद भाटे (आनंद गंधर्व) हे १० आणि १२ ला बोर्डातआलेले अत्यंत हुशार विद्यार्थी होते पुणे अभियांत्रिकीतून(COEP) मधून संगणक तंत्रज्ञान यात अभियांत्रिकी करून वर चढत चढत झेन्सार सारख्या कंपनीचे प्रमुख कार्यकारी अधिकारी (CEO)असताना त्यांनी नोकरी सोडून पूर्ण वेळ आपल्या गायकीसाठी वाहून घेतले आहे.

आनंद भाटे झेन्सारचे सीईओ नसावेत. बर्‍यापैकी सीनियर होते, पण सीईओ नव्हते.

प्रकल्प व्यवसथापकाच्या समकक्ष पदावर "आहेत" .

सुबोध खरे's picture

18 Jul 2017 - 7:31 pm | सुबोध खरे

त्यांच्या गायनाच्या अगोदर झालेल्या मुलाखतीत मुलाखतकाराने दिलेली हि माहिती होती. अर्थातच ऐकीव आहे. ceo नसतीलही पण बऱ्याच मोठ्या पदावर असणार जेंव्हा त्यांनी ते सोडले तेंव्हा. विशेष गुणवत्तेने M. Tech केले असेहि सांगितले.

मित्रहो's picture

18 Jul 2017 - 3:14 pm | मित्रहो

माझी ही आवड आहे यात मी करीअर करावे असे कित्येकांना समजत नाही. बहुतेक सारे प्रवाहासोबत वाहत जानारेच असतात . असे असले तरी ते त्यांच्या आयुष्यात चांगले करतात.
दहा पंधरा टक्के लोकांना मनोमन वाटत असते की मी हे करायला हवे होते. त्यातले फार कमी सार काही सोडून तसे काही करण्याची हिम्मत दाखवतात. काही यशस्वी होतात काही नाही परत जुना मार्ग चालू लागतात. भयंकर त्रास असतो आणि वाटत तितक सोप नसत. आम्ही ज्या दुकानातून सायकली घेतो ते दुकान चालवनारे दोघेही आयटीत होते. आयटी सोडून सायकलचे दुकान चालवणे सहा वर्षपूर्वी असे काही समजावून सांगने कठीणच गेले असनार. अमेरीकेत जाउन पिएचडी करीत असताना ते सारे सोडून भारतात येउन अॅनिमेशन मधे काही करने म्हणजे मध्यमवर्गीय पालकांना कसे समजावून सांगनार. छोटा भीम यायला मधे बराच काळ गेला. सांगायचा मुद्दा असा की पिचडी करे पर्यंत किंवा आयटीत नोकरी सोडेपर्यंत वरील उदाहरणातले लोक बऱ्यापैकी मध्यमवर्गीय आयुष्य जगत होते आणि काहीतरी करुन रिटायर्ड झाले असते पण हे सार सोडून मधेच भलतेच काही करायचा निर्णय घेणे मात्र नक्कीच वेगळे होते तितकेच त्रासाचे सुद्धा. मनाला हवे तसे म्हणजे नऊ ते सात आयुष्य असे होते नाही. बऱ्याचदा साधारण नोकरीच्या जास्त मेहनत घ्यावी लागते.
हल्ली काही लोक आर्थिक स्थिरता आल्यानंतर करीअर बदलतात. विशेषतः दोघेही नोकरीचे असेल तर एकाला काहीतरी वेगळे करता येते. आयुष्याच्या एका विशिष्ट टप्प्यानंतर आर्थिक स्थिरता लागते. स्वतःचे आयुष्य कसे जगायचे हा निर्णय ज्याचा त्याचा आहे.

सचिन कुंडलकर यांचा गंध हा सिनेमा आवडला होता . बाकी या रविवारच्या लोकसत्ताच्या लोकरंग पुरवणीमधे चिन्मय मांडलेकर यांचा लेख सापडला नाही .