RAAM - रेस अॅक्रॉस अमेरिका सायकल शर्यत विजेत्यांचा सत्कार समारंभ

Primary tabs

अजित पाटील's picture
अजित पाटील in जनातलं, मनातलं
11 Jul 2017 - 2:22 pm

नमस्कार

Indo Cyclist Club

 

 

जगातील सर्वात कठीण मानली जाणारी रेस अॅक्रॉस अमेरिका (RAAM -Race Across America) सायकल स्पर्धा नुकतीच संपन्न झाली.
या वर्षीच्या शर्यतीचे वैशिष्ट्य आणि अभिमानाची बाब म्हणजे महाराष्ट्रातील डॉक्टर श्रीनिवास आणि डॉक्टर अमित समर्थ या दोघांनी ही स्पर्धा सोलो प्रकारात पूर्ण करून इतिहास घडवला.

RAAM पूर्ण करण्यासाठी अमेरिकाच्या १२ राज्यांमध्ये ५००० किमी आणि एकूण १,७५,००० फूट उंचीचे चढ पार करावे लागतात. ही स्पर्धा अमेरिकेच्या पश्चिमेकडील ओशनसाइड, कॅलिफोर्निया राज्यातून सुरू होते व पूर्वेकडील अॅनॅपोलिस मधील सिटी डॉक या शहरामध्ये पूर्ण होते. अमेरिकेच्या पश्चिमेकडून पूर्वेकडे प्रवास करताना तीन प्रमुख पर्वतश्रेणी (सिएरा, रॉकी आणि अॅपलाचियान) ओलांडून, अमेरिकाच्या चार प्रवाहातील नद्या (कोलोराडो, मिसिसिपी, मिसूरी आणि ओहियो) आणि ग्रेट प्लेन्स मोजे आणि सोनोरन वाळवंट, स्मारक व्हॅली, ग्रेट प्लेन्स आणि गेटिसबर्ग अशा अमेरिकन सीमारेषांमधून प्रवास होतो. यामध्ये स्पर्धकाला वेगवेगळ्या हवामानामध्ये; कडाक्याच्या थंडीपासून ते अत्यंत उष्ण अशा वाळवंटातून फारशी विश्रांती न घेता सलग सायकलिंग करावे लागते.

डॉ श्रीनिवास यांनी ५,००० किमीची ही स्पर्धा ११ दिवस १२ तास आणि ४५ मिनीटे तर डॉ अमित यांनी ११ दिवस २१ तास आणि ११ मिनिटांमध्ये पूर्ण केली.

या दोन विजेत्यांच्या कामगिरीचे कौतुक म्हणून "इंडो सायकलिस्ट क्लब" ने त्यांचा सत्कार समारंभ आयोजित केला आहे. या कार्यक्रमामध्ये स्पर्धेसाठी त्यांनी केलेली तयारी आणि तेथे आलेले अनुभव याचीही माहिती मिळेल.

हा कार्यक्रम विनामूल्य आहे परंतु नोंदणी करणे आवश्यक आहे.

Registration Link (नोंदणी लिंक) "http://www.meraevents.com/event/meet-raam-race-across-america-finishers-..."

दिनांक : १६ जुलै २०१७
ठिकाण : काळेवाडी, ज्ञानेश्वर मंगल कार्यालय, जवळ पेट्रोल पंप काळेवाडी, पिंपरी चिंचवड, पुणे,
वेळ : सायंकाळी ४:१५ वा तो ७:०० वा.
Google Map Location "https://goo.gl/maps/HX1wpAQ8wWs"

 

 

 

 

http://www.meraevents.com/event/meet-raam-race-across-america-finishers-with-icc-pune?ucode=organizer

 

 

----------------------------------------------------------------------------------------------------------------------

इंडो सायकलिस्ट क्लब बद्दल थोडक्यात माहिती

इंडो सायकलिस्ट क्लब हि एक सामाजिक बांधिलकीने तयार झालेली संस्था आहे. समाजामध्ये सायकलिंग आणि स्वतःचा फिटनेस बद्दल लोकांच्यामध्ये जागरूकता निर्माण करणे आणि सर्वांनी नियमित काहीतरी व्यायाम करावा हा उद्देश आहे. ७ लोकांनी तयार केलेल्या ह्या संस्थेचे आता संपूर्ण भारतभर १२०० च्या वर सदस्य आहेत. या संस्थेमध्ये कोणीही सामील होऊ शकते. आपल्या बरोबर आपले मित्र आणि घराच्या सदस्यांना पण सामील करून घ्यावे. त्यांना फिटनेस बदल प्रवृत्त करावे जेणे करून आपला समाज निरोगी आणि आणि सदृढ होईल.
तसाच आमच्या एक उपक्रम आहे कि लोकांनी आठवड्यातून एकदा तरी ऑफिस ला सायकलिंग ने जाण्यास सुरुवात करावी जेणे करून आपण सर्व मिळून ह्या रहदारीचा जटिल प्रश्न सोडवण्यास मदत करू. संस्थेचे बरेचशे सदस्य दररोज ऑफिस ला सायकलने जातात.
या संस्थेबद्दल अधिक माहितीसाठी http://iccgogreen.org/ ला जरूर भेट द्या.

- इंडो सायकलिस्ट क्लब

बातमीक्रीडा

प्रतिक्रिया

मोदक's picture

11 Jul 2017 - 2:26 pm | मोदक

येणार येणार....

रजिस्ट्रेशन केले आहे..!!!

प्रशांत's picture

11 Jul 2017 - 4:55 pm | प्रशांत

रजिस्ट्रेशन केले.

डॉ सुहास म्हात्रे's picture

11 Jul 2017 - 11:03 pm | डॉ सुहास म्हात्रे

डॉ श्रीनिवास आणि डॉ अमित या दोन्ही विजेत्यांचे, त्यांच्या सहकार्‍यांचे, त्यांच्या कुटुंबियांचे आणि त्यांना हा विजय मिळविण्यासाठी प्रोत्साहित करणार्‍यांचे मनापासून अभिनंदन !

अभ्या..'s picture

11 Jul 2017 - 11:10 pm | अभ्या..

जिगरबाज हैत सगळे.
रामवीरांचे अभिनंदन आणि आयसीसीला खूप शुभेच्छा.

दशानन's picture

11 Jul 2017 - 11:11 pm | दशानन

सर्वांचेच अभिनंदन!

विजेत्यांचे अभिनंदन आणि मान्यवरांचे आभार.

अरे वा! या दोघांचे अभिनंदन.

सौन्दर्य's picture

12 Jul 2017 - 9:57 am | सौन्दर्य

दोन्ही विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन आणि ह्या कामगिरीबद्दल अभिवादन.

सुज्ञ's picture

12 Jul 2017 - 1:16 pm | सुज्ञ

की जुलै?

मोदक's picture

12 Jul 2017 - 1:21 pm | मोदक

जुलै आहे.

सासं - प्लीज बदल करा.

सुमीत भातखंडे's picture

12 Jul 2017 - 1:56 pm | सुमीत भातखंडे

दोघांचे अभिनंदन.

उपाशी बोका's picture

13 Jul 2017 - 12:14 am | उपाशी बोका

अशी खडतर शर्यत पूर्ण केल्याबद्दल दोघांचे अभिनंदन.

शीर्षक थोडे चुकले आहे, हे विजेते नाहीत, त्यांनी केवळ शर्यत पूर्ण केली आहे. (११ दिवस १८ तास ४५ मिनिटे आणि ११ दिवस २१ तास ११ मिनिटे वेळात)
खरा विजेता आहे क्रिस्टॉफ स्तासर ज्याने ही शर्यत ८ दिवस ९ तास ३४ मिनिटात पूर्ण केली.
http://raceacrossamerica.org/raamx/rcracer.php?s_N_Year_ID=41&s_N_Entry_...

अर्थात शर्यत पूर्ण करणे हे सुद्धा कौतुकास्पद आहे.

जुइ's picture

13 Jul 2017 - 2:36 am | जुइ

या दोन्ही स्पर्धकांचे हार्दिक अभिनंदन!! या स्पर्धेविषयी माहिती दिल्या बद्द्ल आभारी आहे.