११ जुलै..जागतिक लोकस॑ख्या दिवस.

Primary tabs

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in काथ्याकूट
10 Jul 2017 - 3:37 pm
गाभा: 

उद्या ११ जुलै..जागतिक लोकस॑ख्या दिवस.

नुकतीच साडेसात अब्जापार गेलेली जागतिक लोकस॑ख्या अनेक कठिण प्रश्न व्यक्तिगत व सामाजिक जीवनात निर्माण करतेय अन त्याचवेळी शास्त्रज्ञ व विचारव॑ता॑ना नवनवी आव्हान॑ देऊन उत्तर॑ शोधायला भाग पाडतेय. या परस्पर विरोधी अटळ रेट्याचे आपण सर्व साक्षीदार आहोत. माझ्या याबद्दलच्या भावना, ज्या मी मि.पा. वर व इतरत्र पूर्वी लिहिलेल्या एका मुक्तकात मा॑डल्या होत्या, त्या पुन्हा देतोय.

मि.पा. च्या सभासदा॑ना या सर्वस्पर्शी विषयाबद्दल काय वाटत॑य ?

मी ....अब्जशीर्ष
================
मी ....अब्जशीर्ष मानवता
मीच फुलविते विझू पाहणारी पहिली ठिणगी
जिला क्रान्तीच्या सहस्र धगधगत्या जिभा फुटतात
मीच गुणगुणते आमूलाग्र बदलांची बीजाक्षरे
जी दुमदुमतात प्र‌ग‌तीचा मंत्र होऊन आसमंतात
ती मीच, जिच्या पायाशी चिरेबंद चिलखते
भुगा होण्याआधी लोळण घेतात
मीच मळते विश्व वेढून दशांगुळे उरणाऱ्या
अदम्य ज्ञानलालसेच्या पायवाटा
कैकदा मरून
प्रतिकूलांना पुरून
मीच उरते पुनःपुन्हा
अब्जशीर्ष.
अजिंक्य.
रंग,वंश,लिंग,ध‌र्म‌ या चौक‌टीत‌ मला चिणू नकोस
दिव्यत्वाच्या शोधात व्य‌र्थ शिणू नकोस.

प्रतिक्रिया

दीपक११७७'s picture

10 Jul 2017 - 4:12 pm | दीपक११७७

माझ्या याबद्दलच्या भावना, ज्या मी मि.पा. वर व इतरत्र पूर्वी लिहिलेल्या एका मुक्तकात मा॑डल्या होत्या, त्या पुन्हा देतोय

मी ....अब्जशीर्ष हे कवन म्हणजेच तुमच्या पुर्वी मांडलेल्या भावना आहेत का?