भूत भाग २

Primary tabs

सिद्धेश्वर विलास पाटणकर's picture
सिद्धेश्वर विला... in काथ्याकूट
7 Jul 2017 - 4:19 pm
गाभा: 

माझ्या पहिल्या भागात घडलेल्या घटनेप्रमाणे हीदेखील वारालीलाच घडलेली घटना आहे .. दुसरी घटना .. मागच्या भागात मी नमूद केलं होत कि अजून दोन घटना घडून गेल्या आहेत त्यापैकीच एक ... पण महत्वाची ... महत्वाची यासाठी कि हि घटना माझ्याप्रमाणेच अजून एका व्यक्तीबरोबर सलग दुसर्या दिवशी घडली ...

आम्ही वरळीला राहत होतो .. वरळीला आमच्या घरी , कुठल्याही एका श्रावणी सोमवारी सत्यनारायणाची पूजा दरवर्षी असायची .. राहत घर छोटे असल्याने आम्ही घरातलं मोठं लाकडी सामान पूजेला येणाऱ्या लोकांना जागा व्हावी म्हणून घराबाहेर ठेवायचो ... त्यामध्ये मोठा लाकडी सोफा , स्टडी टेबल आणि एक लाकडी स्टूल असायचा ... श्रावण असल्याने पावसाची शक्यता फार .. पूजा आटोपल्यावर आई आणि बाबा सर्व सामान घरात कसे लवकर येईल ते बघायचे .... सोफा सागवानी आणि बराच जुना असल्याने त्याला प्राधान्य कमी असायचे पण बाकी सर्व वस्तू मध्यरात्रीपर्यंत जगाच्या जागी जायच्या ....
आमच्या इमारतीत पहिल्या मजल्यावर एक न्यूली मॅरीड जोडपं राहायचं .. छोटेखानी कुटुंब होत .. मी त्याला सतीश मामा म्हणायचो ... दुर्दैवाने तो पूजेच्या दोन तीन महिने अगोदर एडसने वारला होता .. त्याच्या बायकोनेही मग पूजेच्या महिनाभर आधी आत्महत्या केली .. जीवाला कंटाळून ... ते दोघेही जिवंत असताना आमच्या घराशेजारील जागेवर (कट्ट्यावर ) नेहेमी जेवण झाले कि निवांत गप्पा मारत बसायचे ... अगदी तास दोन तास ते बसून असायचे .. काय बोलायचे देव जाणे .. पण गप्पा मारणे हा त्यांचा नेहेमीचा शिरस्ता .. अगदी ना चुकता ...
पूजेच्या आधीच नुकतीच त्याची बायकोपण गेलेली त्यामुळे थोडे वाईट वाटत होते सर्वाना ... नेहेमी प्रमाणे पूजा झाली ... त्या श्रावणात पावसाचा थोडा खेळखंडोबाच होता म्हणून मी बाहेर सोफ्यावरच झोपण्याचा हट्ट धरला. नाईलाजाने आईबाबा तयार झाले ...
मी रात्री पहिल्यांदाच असा मोकळ्या आकाशात तारे बघत झोपणार होतो म्हणून खुश होतो ... हळूहळू जिकडे तिकडे सामसूम झाली ... आणि माझा पण डोळा लागला .. किती वाजले असतील ते माहीत नाही ... पण मध्येच कुणीतरी बोलण्याचा आवाज येऊ लागला ... कुणीतरी दोघे आपापसात अक्षरशः माझ्या बाजूच्या कट्ट्यावर बोलत बसले आहेत आणि तेही निवांत ... मी उपडी झोपलो असल्या कारणाने .. हळूच डोळा किलकिला करून बघितले ... बघतो तर काय .. तीच ती हिरवी चौकट वाली लुंगी घालून बसलाय ... शंभरटक्के खात्री झाली .. सतीश मामा आणि त्याची बायको .. त्यांच्या नेहेमीच्या जागेवर निवांत गप्पाटप्पा ... मला मात्र बाप्पा आठवू लागले ... स्तोत्र पण म्हणता येईना आणि झोप पण .... मी एकदम घामाने डबडबून ओला चिंब फक्त थेम्ब टाकायचा बाकी होतो ... मी बराच वेळ असाच पडून होतो .. शेवटी भल्या पहाटे आमच्या इथे एक पाव आणि खारी विकणारा माणूस यायचा , त्याचा आवाज ओळखीचा होता .. तो विचित्र आवाजात ''' लेले पाव्ह ल्ले''' करून ओरडायचा ... तो ओरडला तेव्हा सणकून मुडद्यासारखा उठून उभा राहिलो .. तो पण घाबरला .. हातून सायकल पडायची बाकी होती ... त्याला बोललो थांब जरा .... मी जोरात दरवाजा वाजवला ....आईने दरवाजा उघडला ... सकाळी आईला मी घडलं ते सांगितलं .. तिचा विश्वास बसला नाही .. त्याच रात्री सागरने झोपायचा हट्ट धरला .. मी आईला आधीच सांगितलेले होते .. सोफा घरात घ्यायला ... झालं सागर बाहेर झोपायला गेला ...माझी झोप आधीच्या रात्री पूर्ण न झाल्याने मी लवकरच झोपलो होतो .. त्यामुळे मला सागरच बाहेर झोपणं मला माहित नव्हतं ..
सागर झोपला आणि तीन साडे तीनच्या सुमारास किंचाळत उठून दरवाज्यावर लाथा मारू लागला .. दरवाजा उघडा म्हणून जोरजोरात ओरडत होता .. बाबानी दरवाजा उघडला आणि सागरला घरात घेऊन विचारलं .... त्याने तेच सतीश आणि त्याच्या बायकोबद्दल सांगितलं ... सकाळी मी जेव्हा उठलो तेव्हा सगळं प्रकार ध्यानात आला ... आईला पण आता पुरतं कळून चुकलं होत, कि मी जे सांगत होतो त्यात तथ्य होत ...

आता भूत सत्य कि मिथ्या हे तुम्हीच ठरावा .... भूत भाग समाप्त .. तिसरा आहे पण तो रिलीज होणार नाही .....

प्रतिक्रिया

चांदन्यान चांदनं पिठूरं चांदनं
चांदुन्या घातिल्या बाजा गो बाय चांदुन्या घातिल्या बाजा
या बाजेवं कोन देव निजे गो किस्नदेव निजे गो
राधाबाय घालिते वारा गो बाय राधाबाय घालिते वारा...

र आला, सुरु करा..

मुक्त विहारि's picture

7 Jul 2017 - 4:34 pm | मुक्त विहारि

यमुनेलाही पूर चढे

पाणीच पाणी चहू कडे

गं बाई गेला मोहन कुणीकडे

सिद्धेश्वर विलास पाटणकर's picture

7 Jul 2017 - 4:33 pm | सिद्धेश्वर विला...

आला आला वारा

चला भिर भिर फिरा

सूडासंगे येतील सारे

अजून बारा तेरा

गड्या, अजून बारा तेरा

सिद्धेश्वर विलास पाटणकर's picture

7 Jul 2017 - 4:36 pm | सिद्धेश्वर विला...

सूड ........मूड में आया कन्हैय्या

बँड बजानको,,

सिद्धेश्वर विलास पाटणकर's picture

7 Jul 2017 - 4:39 pm | सिद्धेश्वर विला...

मला लागली मिपाची ओ उचकी

कुणाची कुणाची ओ, याची का सुडाची

लाजू नको लाजू नाको .........

बबन ताम्बे's picture

7 Jul 2017 - 4:44 pm | बबन ताम्बे