सहकरी ग्रुहनिर्मान सम्स्था

चष्मेबद्दूर's picture
चष्मेबद्दूर in काथ्याकूट
6 Jul 2017 - 10:22 am
गाभा: 

नमसकार मित्रहो,
जर स.ग्रु.स. मध्ये कोनिच सदस्य का. मन्दलात सहभागी होन्यास तयार न झाल्यामुले सान्स्स्थेचा कार्भार शास्नाच्या हातात गेला तर काय वाइत / चान्ग्ले घदु शकते ?
नविन नियमानुसार ५ वर्शे साथि का. म. निवदून देने सक्तिचे आहे. खालि दितेल्स दिले आहेत.
१. सदस्य सन्ख्या २०
२. त्यातला एक अतिशय भान्द्खोर ...कोर्तापर्यन्त गेलेला , त्यामुले सगले घाब्रून..
३. म्हनुन कार्भार घ्यायला सगले नाखूश

जानकारान्नि प्रकाश तकावा ही विननति.

प्रतिक्रिया

मराठी_माणूस's picture

6 Jul 2017 - 10:37 am | मराठी_माणूस

"मोकलाया" ची खुप दिवसानी आठवण आली.

दीपक११७७'s picture

6 Jul 2017 - 12:28 pm | दीपक११७७

बलं बलं मद पुले तायं

चष्मेबद्दूर's picture

6 Jul 2017 - 12:55 pm | चष्मेबद्दूर

आणि शुद्धलेखना कडे जमल्यास दुर्लक्ष करावे , ही विनंती.
धन्यवाद.

चष्मेबद्दूर's picture

6 Jul 2017 - 12:55 pm | चष्मेबद्दूर

आणि शुद्धलेखना कडे जमल्यास दुर्लक्ष करावे , ही विनंती.
धन्यवाद.

कपिलमुनी's picture

6 Jul 2017 - 12:57 pm | कपिलमुनी

वकीलाचा सल्ला घ्या

" समिती गठन करू न शकल्यास सरकारी कार्यकारी अधिकारी( प्रशासक) नेमला जातो. त्याच्या सहीशिवाय कोणतेही चेक व्यवहार बँक व्यवहार होणार नाहीत."

कार्यालयातल्या कारकुनाने सांगितले कसंही करून पाच नावे टाका . भले ते काम करोत वा न करोत. हेच हिताचे आहे.

एकदाका समिती नाही म्हटले की बाहेरची खाबुगिरी ब्लॅक सुरू होईल. त्यापेक्षा रीतसर पदाधिकारी असले तर कामाचे आउटसोर्सिंग करता येते व हा खर्च अधिकृत बँक अकाउंटमधून होतो. तो खाबुगिरीपेक्षा स्वस्त पडतो.
जे काही समंजस सदस्य आहेत त्यांना कमिटित घ्या आणि कागदोपत्री अधिकार सोसायटीकडेच ठेवा.

चष्मेबद्दूर's picture

6 Jul 2017 - 10:51 pm | चष्मेबद्दूर

इतका मुद्दे सूद अभिप्राय दिल्या बद्दल धन्यवाद.

रुस्तम's picture

8 Jul 2017 - 2:31 am | रुस्तम

सोसायटी मध्ये काही भाडेकरू leave and license agreement शिवाय रहात असतील तर तक्रार कुठे करावी.

कंजूस's picture

8 Jul 2017 - 9:58 pm | कंजूस

रुस्तम,
जो मेंबर ब्लॅाक भाड्याने { आणि लि&ला अग्री न करता}देऊन गेला आहे असं कळलं आहे तो त्याच्याच ब्लॅाकमध्ये राहात आहे असे धरावे लागेल.
१) कमिटीमध्ये " जे मेंबर स्वत: इथे न राहता भाड्याने ब्लॅाक देऊन गेले आहेत परंतू सोसायटीला तसे लेखी कळवले नाही त्यांना सोसायटीतल्या पत्त्यावर लेखी सूचना देण्यात यावी" हा ठराव करावा.
कमिटि मिटिंगचा हा वृतान्त लिहिलेल्या पानाची फोटोकॅापी काढून त्यावर सेक्रट्रीने अटेस्टेशन करावे. एका लेटर हेडवर " मेंबर अमुक, आपण अग्रीमेंट न करता ब्लॅाक भाड्याने दिला आहे,लेखी कळवले नाही. पुढील कारवाई होऊ शकते." ठराव क्रमांक **, ही मिटिंग। सह ती फोकॅा जोडून त्याच्या ब्लॅाकवर राहाणाय्रा भाडेकरूस प्रत्यक्ष द्यावी. तो मालकास लगेच कळवतोच.

कमिटी ते मेंबर संपर्क /पत्रव्यवहार /corresopendence ही पहिली पायरी आहे. ती करावीच लागते. हा पत्रव्यवहार एका फाइलमध्ये ठेवला जातो.
बहुतेक या सूचनेनंतर चक्रे जोरात फिरतात आणि। काम होते.
नाहीच झाले तर याचीच कॅापी लावून रेजिस्ट्रारकडे जाता येते. थेट तिकडे जाता येत नाही.
( अगोदरच वकीलाची नोटिस पाठवली ,कोर्टात गेलात तर मात्र कठीण आहे कारण कोर्टाचा निर्णय येईपर्यंत काहीच करता येणार नाही. )

( नियमाप्रमाणे अधिकृत non occupancy charges फारच कमी आहेत हे लक्षात ठेवावे. मेंटेंनन्स रु एक हजार असेल तर भाड्याने ब्लॅाक दिला म्हणून घे दीड हजार असे करता येत नाही. )

रुस्तम's picture

9 Jul 2017 - 11:50 am | रुस्तम

धन्यवाद कंजूस काका....

चौकटराजा's picture

7 Jul 2017 - 5:42 am | चौकटराजा

ज्या अर्थी एक माणूस कोर्टात गेला आहे त्या अर्थी सोसायटीत ऑलरेडी गैरकारभार चालू आहे. कारण चांगले घ॑डवून आणण्याची इच्छा असणारा माणूसच कोर्टापर्यंत जात असतो. वाईटाची इच्छा असणारेच प्रशासकाची वाट पहात असतात. आपल्या कोणाच्याही सोसायटीत २५ टक्के माणसे मूलतः वाईटच असतात एखादाच चांगला असतो व बाकी सारे बघे म्हणजेच वाईट असतात असा ३० वर्षाचा अनुभव आहे. चांगल्या प्रवृतीच्या माणसाना सवते सुभे निर्माण करण्याचा शाप आहे. सबब ते बघ्याची भूमिका घेऊन खरोखरी तळमळ असलेल्याना एकटे पाडतात. आपण १९ जणानी आपली नालायकी सिद्ध केली आहे. सबब सावरा स्वत:ला. जागे व्हा. प्रशासकाच्या ताब्यात सोसायटी द्याल तर जन्माची अद्द्ल घडू शकते. सोसायटी चालविणे अवघड नाही. वाईटाना एकटे पाडा चांगल्याना नव्हे.

"कामे काढा कामे काढा { आणि ती मलाच द्या}" या टाइपच्या मेंबरास काम मिळेनासे झाले की त्रास देऊ लागतो.

नितिन थत्ते's picture

9 Jul 2017 - 9:37 pm | नितिन थत्ते

अजून एक करता येईल.पोलीसांकडे सदर फ्लॅटमध्ये कोणी ट्रेसपासर रहात आहे अशी तक्रार करावी व त्या भाडेकरूला पोलीसांकरवी घालवावे.

कंजूस's picture

10 Jul 2017 - 5:57 am | कंजूस

तो हक्क ब्लॅाक मालकाचा!

नितिन थत्ते's picture

11 Jul 2017 - 7:20 am | नितिन थत्ते

सोसायटी "ब्लॉक मालकाची मालमत्ता सुरक्षित रहावी" म्हणून पोलीसात तक्रार करू शकते. उदा. ब्लॉकमालक सोसायटीत रहात नाही. आणि एकेदिवशी ब्लॉकमालकाखेरीज कुणीतरी इसम ब्लॉकमधील सामान बाहेर काढू लागला तर सोसायटी पोलीसांना बोलावू शकते. किंबहुना सोसायटीचे ते कर्तव्य आहे असे म्हणू शकतो.

कंजूस's picture

11 Jul 2017 - 10:10 am | कंजूस

??
!!!

महाराष्टातल्या सहकारी सोसायटी सन्द्र्भातली उपयुक्त साईट

https://mahasahakar.maharashtra.gov.in/1035/%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%96%...