" भूत " एक सत्य कि मिथ्य ?

Primary tabs

सिद्धेश्वर विलास पाटणकर's picture
सिद्धेश्वर विला... in काथ्याकूट
5 Jul 2017 - 4:02 pm
गाभा: 

भूत होते कि अजून कोण हे तुम्हीच ठरवावे ?

आम्ही पूर्वी वरळीला समुद्रकिनारी राहत असू . डेव्हलपमेंटच फॅड नुकताच सुरु झालेलं होत . जुन्या इमारती जमीनदोस्त करायच्या आणि नवीन बांधायच्या . घटना घडली ते साल साधारण १९९५ असेल . मी , माझा भाऊ सागर आणि अजून एक मित्र मंगेश संध्याकाळी क्रिकेट खेळात होतो . खेळाडू जास्त नसल्याकारणाने आम्ही घराशेजारी एक जाण्यायेण्यासाठी बऱ्यापैकी मोठी अशी जागा होती त्या जागेमध्ये खेळ चालू होता . मी बराच वेळ आउट होत नसल्याने , जीवावर आल्याप्रमाणे सागर बॉलिंग करत होता आणि मंगेश विकेटकीपर होता . आमच्या इमारतीसमोर एक चाळ होती ती पुर्णपणे खाली करण्यात आली होती . तिथे नवीन टॉवर जो बनणार होता .
बऱ्यापैकी अंधार झाला असल्याने , मी तडकावलेला बॉल त्या चाळीत गेला . बॉल आणण्यास कोणीच तयार नव्हते . नाईलाजाने मी चाळीत घुसलो. मी बघितलं होत बॉल कुठे गेला होता ते . बॉल एका शेवटच्या घरात , जिथे पहिले कुंभारकारकाका राहायचे तेथे गेला होता .चाळीतले शेवटचं घर असल्याने , त्या घराला समोर एक छोटी पडवी होती. मी तिथे गेलो आणि बॉल कुठे दिसतोय का ते पाहत होतो . तितक्यात पायाला काहीतरी लागलं . कुणाची तरी साडी , कोणतरी आडवं पडलं होत .
मी अचानक झालेल्या अनपेक्षित स्पर्शाने पुरता धास्तावून गेलो आणि लागलीच मंगेशला हाक मारली . सागरने त्याला रोखलं आणि म्हटलं अरे त्याला शोधून देत बॉल . तो उगीच काहीतरी कारण देतोय . मी तस्साच परत धावत गेलो आणि काकुळतीला येऊन त्यांना सांगितलं कि कोणीतरी तिथे बाई पडली आहे .
आम्ही सर्व परत त्या घरात शिरलो , अंधार असल्याने फार्स काही दिसत नव्हतं . आम्ही त्या बाईला उचलून शेजारी रस्त्यावरच्या दिव्याखाली आणलं . तिथे ती बाई थोडी शुद्धीवर आली आणि फक्त " माया " एवढंच म्हणाली .
माया नावाची माझ्या मित्राची बहीण होती . शेजारीच असल्याने मी धावत मायाच्या आईला तिचा ओळखनामा करण्यासाठी बोलावण्यास गेलो . मामी ( मायाची आई ) धावत आल्या . त्यांनी तिला तुरंत ओळखलं . ती त्यांच्या चुलत भावाची बायको होती . ते सर्व जण बी डी डी चाळीत राहत होते . तिथे लग्नानंतर त्या बाईला काहीतरी भुतबाधेचा त्रास होता आणि ती अशीच पौर्णिमेच्या रात्री जर मोकळी असेल तर धावत समुद्रावर जायची . ती घर सोडून जाऊ नये म्हणून तिचे हात आणि पाय बांधण्यात येत .
असो ... या सर्व गोष्टीवर माझा विश्वास नव्हता . मी त्या फक्त ऐकायच्या म्हणून ऐकल्या आणि आम्ही सारे त्या बाईला , मायाच्या घरी घेऊन आलो ..
तिथे चटईवर तिला आडवे ठेवण्यात आले . मामींचं पुराण चालूच होत . मी त्यांना सांगूनही पाहिलं कि भूत बीत काही नसत .
मी, सागर आणि मंगेश त्या बाईच्या अवतीभवती उभे होतो . मी पाहिलं कि त्या बाईचे डोळे अर्धे उघडेच आहेत
आणि मला वाटलं कि ती फक्त पडून राहायचे नाटक करत आहे .. मी मामींना सांगितलं कि काही लोक उगाच बाधा झालीय असं सांगून छळत असतात .. तसे काही नसेल हे मी आता सिद्ध करू शकतो .
मी अचानक त्या बाईचे नाक दाबून धरले . काही वेळातच ती बाई , विचित्र पुरुषी आवाज काढू लागली आणि प्रचंड ताकद काढून तिने मला अक्षरशः उचलून आपटले . आणि माझ्यावर चालून आली .
काही क्षणात हे सारे चित्र पालटल्यावर , इतर साऱ्यांची पाळता भुई थोडी झाली . सागर क्षणात शोकेसवर चढून बसला . मंगेश गॅलरीत लपला .. मामी त्यांनी बाथरूम गाठला आणि आटऊन काडी लावून घेतली . आता फक्त मी आणि ती चवताळलेली बाई एवढेच उरलो . मी लगेच हातात झाडू घेतल्या आणि त्या बाईला प्रतिकार केला . थोडीफार नखे लागली पण थोड्याच वेळात ती पुन्हा जमिनीवर आडवी पडली ..
मग मात्र मी तिथून पाल काढला आणि इमारतीमधील बाकी सार्यांना बोलावून आणले .
हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर आली .आणि मामींच्या घरात तोबा गर्दी उसळली . सर्व महिलामंडळ काय झालं ते विचारात होते . मामींनी माझ्याकडे बोट दाखवून म्हंटल , आम्ही सारे जागा मिळेल तिथे लपलो आघाडीवर हेच लढत होते . झालं माझा इंटरव्यू सुरु झाला .
पवार मामींनी परत प्रात्यक्षिक दाखविण्यास सांगितले . मी आधी समजावून सांगितले . कि प्रचंड ताकदीने ती उचलून फेकते , एवढ्या साऱ्या बायका , त्याही जाडजूड .. दरवाजातून बाहेर पाळताना , कुणाला काही लागलं तर ? तरीही बहुतेक जणीं आर्जवू लागल्या , तेव्हा कुठे मी परत तयार झालो . मला पुढे काय होणार याची पूर्वकल्पना होतीच , म्हणून खारबारदारीचा उपाय म्हणून , मी गॅलरीचा दरवाजा उघड ठेवला होता . जेणेकरून मला बाहेर लपता येईल .
मी सावधपणेच नाक दाबलं , जेव्हा भूत परत वैतागलं, मी आधीच गॅलरीत लपलो . पुढे काय झालं ते बघता आलं नाही पण , शिंदे मामींच्या पायाला तर मोहिते मामींच्या ढोपराला बाहेर पाळताना खरचटलं होत .
ती बाई दंगा करून परत आडवी पडली . नंतर तिच्या यजमानांनी तिला टॅक्सित घालून नेलं . पुढे काय झालं ते माहीत नाही तिचं पण तिथपासून आजपर्यंत एक प्रश्न मला पडलेला आहे . भूत सत्य आहे कि मिथ्या?
अजून दोन माझ्यासोबत घडलेलं प्रसंग आहेत ते मी नंतर सांगेन , पण मला मिपावासियांना हे विचारायचं आहे कि आपण या साऱ्या गोष्टीवर विश्वास ठेवता का ?

सिद्धेश्वर विलास पाटणकर

प्रतिक्रिया

दीपक११७७'s picture

5 Jul 2017 - 5:01 pm | दीपक११७७

आटऊन काडी लावून घेतली

कदाचीत भुत असतं- नसतं.

सिद्धेश्वर विलास पाटणकर's picture

5 Jul 2017 - 6:46 pm | सिद्धेश्वर विला...

आतून काडी लावून घेतली असं लिहायचं होत ....

आतून काडी लावून घेतली असं लिहायचं होत ....

आतून कडी लावून घेतली असं म्हणायचे असेल तुम्हाला.

:-D :-D :-D :-D :-D :-D

दादा तुझ्या नावातला तो C कुठे गेलारे ??

भुताने खाउन टाकला कि काय ?? :D

प्रसाद_१९८२'s picture

5 Jul 2017 - 5:20 pm | प्रसाद_१९८२

इतकी विनोदी घटना मी आजवर वाचली नव्हती.:))
मस्त, मजा आली वाचायला. अजून येऊद्या.:)

अमरेंद्र बाहुबली's picture

5 Jul 2017 - 5:40 pm | अमरेंद्र बाहुबली

आम्ही नविन घरात रहायला गेल्यावर "शेजारच्या बाईच्या अंगात भुत येते!" सांभाळून रहा. असं लोक सांगायचे. त्यामुळे आमची फॅमिली धास्तीत होती. पण माझ्या वडिलांनी सर्व काँलनी गोळा करून भूत पळवण्याचा उपाय सांगितला. "ज्या स्त्री च्या अंगात भूत येते. तीचे केस एका पायाखाली धरून दुसर्या पायाने तोंडावर लाथा घालायच्या." आम्ही १० वर्ष त्या घरात राहीलो पण ह्या १० वर्षांत त्या स्त्री च्या अंगात कधीच भूत आले नाही.

जेनी...'s picture

5 Jul 2017 - 5:55 pm | जेनी...

=))

अभिजीत अवलिया's picture

5 Jul 2017 - 6:45 pm | अभिजीत अवलिया

मग मात्र मी तिथून पाल काढला

पाल का काढली तुम्ही :)

सिद्धेश्वर विलास पाटणकर's picture

5 Jul 2017 - 6:47 pm | सिद्धेश्वर विला...

पळ काढला ....

सुबोध खरे's picture

5 Jul 2017 - 6:55 pm | सुबोध खरे

सिद्धेश्वर साहेब
तुम्ही जे वर्णन करत आहेत त्यावरून ती स्त्री मनोरुग्ण असावी असे वाटते. मनोरुग्ण अशा अवस्थेत आपली सर्व शक्ती पणास लावली तर किती अनावर होतात ते अनुभव घेतलेल्याना( आणि डॉक्टर आणि त्यांच्या इतर कर्मचारी वर्गास) माहित असते.
आपल्या माहिती साठी माझ्या स्वतःच्या अनुभवाचा दुवा मी खाली देत आहे.
मनः सामर्थ्य

सिद्धेश्वर विलास पाटणकर's picture

5 Jul 2017 - 7:18 pm | सिद्धेश्वर विला...

साहेब मी आपण दिलेली लिंक वाचली . अतिशय आवडलीसुद्धा . इथे जे माझ्याबरोबर घडलं , त्याचा मी माझ्या परीने प्रतिकार पण केला . पण तिचा तो पुरुषी आवाज आणि ती घरी जाताना बोलली तो आवाज ह्यामध्ये जमीन अस्मानाचा फरक होता . ते काय घडलं होत , ते आकलनशक्तीच्या बाहेरच होत .. पण घडलं एवढं खरं

अमरेंद्र बाहुबली's picture

5 Jul 2017 - 7:25 pm | अमरेंद्र बाहुबली

पुर्वी समाज अशिक्षीत असल्याने प्रत्येक घरात स्त्री ला छळले जायचे. ह्या छळापासून सुटकेसाठी स्त्रीया एकतर राँकेल टाकून स्वतः ला जाळत नाहीतर विहीरीत जीव देत. पण सर्व स्त्रियांतजीव देण्याइतकी हिम्मत नसल्याने त्या अशा अंगात भूत असल्याच्या गोष्टीने दहशत पसरवत. ( देवी येणे हे पण यातलेच) त्यामुळे घरातले लोक( निदान त्या भूताला ) घाबरून त्या स्त्री ला छळणे टाळत. आजच्या जमान्यात स्त्री वादी कायदे असल्याने भूतांना कोणी वाली राहीला नाही. हे माझे वयक्तीक मत.

सिद्धेश्वर विलास पाटणकर's picture

5 Jul 2017 - 7:35 pm | सिद्धेश्वर विला...

होय तुम्ही म्हणता ते खरं आहे .. किंबहुना सुबोध खरे साहेबांचे म्हणणे देखील पटले .. पण हि बाई जरी मनोरुग्ण असली तरी तिचा तो पुरुषी आवाज लक्षात राहण्यासारखा होता. इथे मिपा वर आत्ताच कुठे आगमन झाले आहे . चर्चा हे दालन आवडले .. म्हणून हे भूत सत्र चालू करावे असे वाटले ...

योगी९००'s picture

6 Jul 2017 - 8:44 pm | योगी९००

भूतांचा मला अनुभव नाही (आणि नकोही) पण तुमचा अनुभव आवडला.

http://www.maayboli.com/node/49229 ह्या आणि http://www.maayboli.com/node/12295 ह्या धाग्यांवर काही लोकांचे अनुभव आहेत. वाचून खरंच वाटते की भुते असावीत.

ज्योति अलवनि's picture

5 Jul 2017 - 8:52 pm | ज्योति अलवनि

भूत असतं की नसतं ते वैयक्तिक ठरवावं. कारण विश्वास ठेवा अस सांगून कोणी ठेवणार नाही आणि भूत नाही म्हंटल तरी ते मान्य होईलच अस नाही. पण भूत म्हंटल की लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांना चर्चा करायला आवडते. आणि सर्वसाधारणपणे मनातून भिती देखील असते.

मात्र तुमचं लेखन आवडलं

श्रीगुरुजी's picture

5 Jul 2017 - 9:00 pm | श्रीगुरुजी

मिपाला एका भुताने झपाटलय. ते भूत रोज फालतू कवितांचा रतीब टाकतं.

प्रमोद देर्देकर's picture

6 Jul 2017 - 6:07 am | प्रमोद देर्देकर

मिपाला एका भुताने झपाटलय>>>>
चूक एका नाही अनेक भुतांनी झपाटले आहे.
काही भूतं आता अल्प विश्रांती घेत आहेत भूक लागली (कशाची ते विचारू नका) की येतील परत. तर काहींचा कायमचा उतरा केलेला आहे (पाचार मारली ) आहे.

आणि सगळ्या भुतांपेक्शा एक शॉलीड अत्रुप्त आत्मा सतत इथं मिपावर वावरत असतो. तेव्हा सावधान.

सगळ्या भुतांपेक्शा एक शॉलीड अत्रुप्त आत्मा

तुम्हाला पण गप्पकन धरलं होतं का?

मला सकाळी भूत मित्थ्या वाटतं आणि संध्याकाळ व्हायला लागली कि हळू हळू खरं असेल कदाचित असं वाटतं. रात्री खात्री असते कि कोणीतरी भसकन येणार, त्या रात मूवी मधल्या रेवती सारखं. खास करून घरात संध्याकाळी एकटी असले कि सगळे चुकून माकून बघितलेले भुताचे चित्रपट आठवतात :D .

कधी कधी वाटतं कि ते संध्याकाळी देवासमोर निरांजन / देवाची स्तोत्र वगैरे प्रकार माझ्यासारख्या घबराट लोकांनी शोधून काढला असावा :P