रावेरखेडी १

Primary tabs

अमरेंद्र बाहुबली's picture
अमरेंद्र बाहुबली in भटकंती
1 Jul 2017 - 9:50 pm

www.misalpav.com/node/30970
मिसळपाव ही काय भानगड आहे हे माहित नव्हतं त्यावेळी श्री मोदक ह्यांचा हा लेख वाचला. बाजीराव पेशव्यांची समाधी मध्य प्रदेशात कुठेतरी आहे हे कळाल. लेख खुप छान होता. वडीलही इतिहास प्रेमी असल्याने त्यांनी सुध्दा पुन्हा पुन्हा वाचला. काही दिवसांनी मध्य प्रदेशात इंदौर च्या शंभर की.मी. अंतरावर मुंबई आग्रा महामार्गावरील शाजापुर ह्या ठीकाणी पवनउर्जा कंपणीत नोकरी लागली. (आताही आहे.) कंपणीत सर्व भारतातील मुलं आहेत. पण जीतके मुलं आहेत त्यातल्या मराठी मुलांशी चांगली गट्टी जमली. श्री मोदक ह्यांचा लेख डोक्यात होताच एके दिवशी मी सर्वांना समाधी ला जाण्याचा बेत सांगीतला. पण म.प्र.शात अस काही असेल कोणाच्या गावीही नव्हते. तरी सर्व जण तयार झाले. रस्ता माहित नव्हता पण शोधून घेऊ ( ओवर काँन्फी. ) अशी तयारी करून आेमकारेश्वर व बाजीराव पेशवे समाधी अशी प्लानींग केली. कंपनीचे एक साहेब व्यक्ती मराठीच असल्याने त्यांना बेत सांगीतला.( गाडी चा जूगाड होईल म्हणून) त्यांनी देखील ऊत्साहात तयारी केली. (गाडी मिळाली.) आम्ही एकूण पाच लोक, चालक व बोलेरो सकाळी तयार झाली. सकाळी कुणालाही काही कळू न देता आपापल्या मार्गे रवाणा होऊन शहराबाहेर मिळावे असे ठरले.( पाच मध्ये सहावा वाढून बसायला अडचण होऊ नये म्हणून.).
सकाळी ठरल्याप्रमाणे सर्व जमलो. व गाडी इंदोरच्या दिशेने रवाणा झाली.( रस्ता खराब) मुंबई आग्रा हाईवे हा मुंबई दे देवास पर्यंत चौपदरी आहे. आणि पुढे देवास ते ग्वाल्हेर दूपदरी व पुन्हा ग्वाल्हेर ते आग्रा चौपदरी.( सध्या देवास _ ग्वाल्हेर चौपदरी करण युध्द पातळी वर सुरू आहे) शाजापुर हुन इंदौर 100 km असल तरी रस्ता दूपदरी असल्याने ट्राफीक मुळे 3 तास लागतात.(च)
सकाळी 8 ला आमजी गाडी निघाली. ड्रायवरची स्कील चांगली असल्याने त्याने अडीच तासात इंदौर टच केल.
रस्त्यात देवास लागले. तीथे बस स्ट्यांड समोर टेकडीवर देववासीनी आणी तुळजा भवानी देवीची प्रसिद्ध मंदिरे आहेत. मी गाडीतल्या सर्वांना मंदीरांचा व देवासचे राजे पवार घराण्याचा ईतिहास सांगीतला.(देवास व धार धाकटी पाती मोठी पाती) आम्ही चार मित्रात एक कोल्हापुरातला., एक कराड चा, एक अकोल्याचा व मी धुळ्याचा. असे आम्ही चार व साहेब (बडोद्याचे) आम्ही सर्व नाश्त्या साठी इंदौर बाय पास ला थांबलो......

टीप= कृपया संभाळून घ्यावे. पहिल्यांदा (परिक्षा सोडून) कुठेतरी काही लीहीत आहे.

क्रमश:

प्रतिक्रिया

गुड. अजून लिहा. फोटो टाकायची कृती इतरत्र दिलेली आहेच. पुढील भाग लिहिणार असाल तर धाग्याच्या शेवटी 'क्रमशः' असे लिहावे. काही मदत हवी असल्यास साहित्य-संपादक यांना कळवावे.

अमरेंद्र बाहुबली's picture

1 Jul 2017 - 10:27 pm | अमरेंद्र बाहुबली

धन्यवाद. पुढे लीहीणार आहे. फोटोच तेवढ जमत नाहीये. पण प्रयत्न करतो.

अमरेंद्र बाहुबली's picture

1 Jul 2017 - 10:35 pm | अमरेंद्र बाहुबली

धन्यवाद. पुढे लीहीणार आहे. फोटोच तेवढ जमत नाहीये. पण प्रयत्न करतो.

मुक्त विहारि's picture

1 Jul 2017 - 10:39 pm | मुक्त विहारि

उत्तम लेखांचे इथे स्वागतच होते. (मला पण सुरुवातीला फार टपल्या पडल्या होत्या...पण इथले सदस्य फार उत्तम स्वभावाचे आहेत....)

लेख जमला आहे...

मिपाच्या परंपरेला धरून २ चूका... (आम्ही वैयक्तिक सगळ्या चूका पचवू शकतो.पण "मिपा" हे सामाजीक आंतरजालीय स्थळ आहे. )

१. लेख थोडा मोठा हवा

२. फोटो हवेत. (जमल्यास भटकंती ह्या विभागातील डॉ, सुहास म्हात्रे ह्यांचे धागे बघावेत,)

अमरेंद्र बाहुबली's picture

1 Jul 2017 - 10:54 pm | अमरेंद्र बाहुबली

धन्यवाद मुक्त विहाली सर लेख मोठा च लिहायचा होता. पण पहिल्यांदा लीहुत असल्यानं आत्मविश्वास नव्हता. (पुढल्या वेळी चुक सुधारीण) आणि ह्या टप्पयात फोटो टाकण्यासारख काही नव्हतच.... त्यामुळे....

मुक्त विहारि's picture

1 Jul 2017 - 11:11 pm | मुक्त विहारि

इथे मला "मुवि काका" ह्या नावानेच ओळखतात.

बस हमारे लिये इतना काफी़ है....

अमरेंद्र बाहुबली's picture

1 Jul 2017 - 11:33 pm | अमरेंद्र बाहुबली

हो मुवि काका. मार्गदर्शन करत रहावे.

मुक्त विहारि's picture

2 Jul 2017 - 12:17 am | मुक्त विहारि

घंट्याचे मार्गदर्शन....

नविन सभासदाला सांभाळून घ्यावे, असे आम्हाला "गणपाने" जाणवून दिले आहे. "गणपा"ने त्यावेळी सांभाळून घेतले नसते तर, शायद हम यहां नहीं होते. (आता "गणपा" कोण? म्हणून विचारु नये."मिपावर" पा.कृ.च्या अनभिषिक्त बल्लवांपैकी ते एक आहेत.)

इरसाल's picture

3 Jul 2017 - 3:43 pm | इरसाल

मिपाचा प्रघात पाळणे आवश्यक असल्याने...........

कोण हा गणपा ??????

मुक्त विहारि's picture

4 Jul 2017 - 10:40 pm | मुक्त विहारि

आजकाल ते इथे जास्त नसतात.

कपिलमुनी's picture

2 Jul 2017 - 12:00 am | कपिलमुनी

विहाली आवडला

मी पण मुवी काकाच म्हणते ... हो कि नै काका !

अमरेंद्र बाहुबली's picture

1 Jul 2017 - 10:55 pm | अमरेंद्र बाहुबली

धन्यवाद मुक्त विहारी सर लेख मोठा च लिहायचा होता. पण पहिल्यांदा लीहीत असल्यानं आत्मविश्वास नव्हता. (पुढल्या वेळी चुक सुधारीण) आणि ह्या टप्पयात फोटो टाकण्यासारख काही नव्हतच.... त्यामुळे....

अमरेंद्र बाहुबली's picture

1 Jul 2017 - 10:56 pm | अमरेंद्र बाहुबली

धन्यवाद मुक्त विहारी सर लेख मोठा च लिहायचा होता. पण पहिल्यांदा लीहीत असल्यानं आत्मविश्वास नव्हता. (पुढल्या वेळी चुक सुधारीण) आणि ह्या टप्पयात फोटो टाकण्यासारख काही नव्हतच.... त्यामुळे....

बोलरोचा टाकला असता तरी आवडला असता.
मस्त गाडी एकदम

अरे व्वा.. रावेरखेडी..!!!!!

तुम्ही वर उल्लेख केला आहे त्या ट्रिप नंतर मी आणखी एकदा रावेरखेडीला जाऊन आलो. ते संपूर्ण गांव फिरून बघितले आणि तेथे एक "पँवार" नामक कुटुंबाच्या लग्नाची तयारी सुरू आहे असेही कळाले.
आपल्याकडचे पवार आणि ते पँवार असाही काहीतरी संबंध असावा.. त्या विषयात फारसे गम्य नसल्याने नंतर पाठपुरावा केला नाही.

लेख थोडा मोठा लिहा, कंस कमी करा आणि फोटो टाकाच. पुढील लेखाच्या प्रतिक्षेत आहे.

(रावेरखेडीला भेट देऊ इच्छिणार्‍यांनी रस्ता / आणखी माहिती हवी असल्यास मला बिन्धास्त व्यनी करावा.)

सुबोध खरे's picture

2 Jul 2017 - 2:07 pm | सुबोध खरे

हे पवार नसून पंवार म्हणजे पहाडी लोक असतात. काही लोक स्वतः ला पन्वर असेही हिंदीत लिहितात.

अमरेंद्र बाहुबली's picture

2 Jul 2017 - 3:16 am | अमरेंद्र बाहुबली

.

अमरेंद्र बाहुबली's picture

2 Jul 2017 - 3:16 am | अमरेंद्र बाहुबली

.

अमरेंद्र बाहुबली's picture

2 Jul 2017 - 3:16 am | अमरेंद्र बाहुबली

.

अमरेंद्र बाहुबली's picture

2 Jul 2017 - 3:29 am | अमरेंद्र बाहुबली

फोटो काही अपलोड होईना.
URL टाकला.
Width height कीती ठेवायचीते सांगा. व
alternative word काय घ्यावा?
टीप = सदर खटाटोप मोबाईल वरन चाललाय

विड्थ 680 ठेवा, हाईट रिकामे सोडा आणि alternative text मध्ये एक डॉट टाका

उभ्या फोटोना विड्थ 450 वगैरे ठेवा

फोटो पब्लीक शेअर असुद्यात

विड्थ 680 ठेवा, हाईट रिकामे सोडा आणि alternative text मध्ये एक डॉट टाका

उभ्या फोटोना विड्थ 450 वगैरे ठेवा

फोटो पब्लीक शेअर असुद्यात

अमरेंद्र बाहुबली's picture

2 Jul 2017 - 4:58 pm | अमरेंद्र बाहुबली

प्रतिक, लेख चांगला होतोय.
१) फोटो १
फ्लिकरवरच्या फोटोंच्या तीनचार लिंक्स असतात. दिलेली
Link:https://www.flickr.com/photos/152194951@N02/35526459781/in/dateposted-public
इथे चालणार नाही. फोटोवर क्लिक करून दुसरी बाणाखालची शेअरिंग लिंक वापरावी लागते.

कंजूस's picture

2 Jul 2017 - 8:42 pm | कंजूस

फोटो १ मधून embed कोड कॅापी करून त्यामधला हा भाग
<img src="https://farm5.staticflickr.com/4210/34847616863_7224e681fb_z.jpg" width="480" height="640" alt="IMG_20170106_172041">
वापरल्यावर आलेला फोटो-
IMG_20170106_172041

पैसा's picture

3 Jul 2017 - 5:00 pm | पैसा

मिपावर स्वागत. लिहा अजून. मलाही रावेरखेडीला कधीतरी जायचे आहे.

प्रीत-मोहर's picture

4 Jul 2017 - 6:44 pm | प्रीत-मोहर

पुभाप्र!!

इरसाल कार्टं's picture

5 Jul 2017 - 10:16 am | इरसाल कार्टं

आणि हो, जमतंय तुम्हाला. लिहा बिनधास्त.