II ना होतो नवा मी , ना होती ती जुनी II ( मिपा मित्रानो "जेनी" नाही बरं का ... जुनी )

सिद्धेश्वर विलास पाटणकर's picture
सिद्धेश्वर विला... in जे न देखे रवी...
30 Jun 2017 - 3:19 pm

ना होतो नवा मी

ना होती ती जुनी

गोष्ट चालूच होती

होती फक्त राजा न राणी II

सांगे आषाढ पाऊस

नको सोडून जाऊस

संगे थांब तू जरासा

वाटे हृदयास दिलासा II

किती दिल्या आणा भाका

चुके काळजाचा ठोका

वर्षे क्षणात लोटली

आता क्षण वाटे मोठा II

असा काय घात झाला

झाली दुसरीच राणी

राजा दूर दूर गेला

सोडून साऱ्या आठवणी

आता कुणासंगे बोलू

मन उदास उदास

आषाढ पावसाचा जोर

देई राजाचा रं भास

फुटकं नशिब त्ये माझं

संगे आठवणींचं ओझं

म्या चालली चालली

जिथं नेतील तिथं ढग II

सिद्धेश्वर विलास पाटणकर C

कविता