डायरेक्ट सेलिंग चे लॉजिक काय?

अत्रे's picture
अत्रे in काथ्याकूट
22 Jun 2017 - 8:23 am
गाभा: 

काही कारणानिमित्त आज नेटवर "डायरेक्ट सेलिंग" या विषयावर वाचत होतो.

डायरेक्ट सेलिंग म्हणजे वस्तू एखाद्या दुकानात न विकता, आपल्या एजंट्स मार्फत विकणे. या क्षेत्रातील काही मोठ्या कंपन्या आहेत ऍम वे, एवोन, ओरिफ्लेम, टप्परवेअर वगैरे (source: http://economictimes.indiatimes.com/industry/services/retail/government-...)
दिल दोस्ती दोबारा मध्ये दाखवलेला मॅग्नेट वॉटर चा धंदा या टाईपचा/ बिझनेस मॉडेलचा आहे.

डायरेक्ट सेलिंग मुळे बऱ्याच लोकांचे नुकसान झाल्यामुळे चीन मध्ये १९९८ साली यावर बंदी घालण्यात आली होती, पण ही बंदी २००६ साली उठवण्यात आली. [In 2006, after heavy lobbying from American companies, China lifted its ban (http://www.nytimes.com/2009/12/26/business/global/26marykay.html) ]

या धंद्याबद्दल वाचल्यानंतर मला दोन प्रश्न पडले. जाणकार लोकांनी कृपया यावर प्रकाश टाकावा.

१. डायरेक्ट सेलिंग वाले लोक बहुतांशी हर्बल कॉस्मेटिक्स / मेकअप चे प्रॉडक्ट्सच का विकत असतात?

२. या कंपन्या आपल्या वस्तू दुकानात विकणे का नाही प्रेफर करत? खालच्या लेखात म्हटल्याप्रमाणे

So, will Amway allow the Amazons and Flipkarts of the world to sell their products online in the future? “Never,” says Budhraja categorically. He feels that if they start selling on Amazon and Flipkart, they would cease to be an MLM or direct selling company in the long run. But the company hasn’t been able to stop their distributors from selling their products on these sites. Amway and many other direct sellers like Tupperware and Oriflame have issued several warnings to distributors who list their products on third party e-commerce sites but has met with little success. “Every player in the industry has faced this issue. No company has been able to restrict the sale of its products on third party e-commerce platforms,” says Nangia. The newly announced guidelines, however, restrict e-commerce companies from selling products on other websites without the permission of direct-selling companies and Budhraja believes that once it becomes a law, they will be able to take action against distributors who sell on other platforms.

(https://www.outlookbusiness.com/strategy/feature/touch-and-feel-3537)

त्यांचा घरोघरी प्रॉडक्ट विकणे सोडून इतर मार्गातून विक्री करणे याला विरोध आहे असे दिसून येते. पण या बिझनेस मॉडेलचे लॉजिक काय आहे? त्यांना नॉर्मल दुकानात/ इ कॉमर्स सायटीवर वस्तू विकून कोणते नुकसान होते?

प्रतिक्रिया

अमर विश्वास's picture

22 Jun 2017 - 12:33 pm | अमर विश्वास

MLM आणि डायरेक्ट सेलिंग हे मुळात वेगवेगळे प्रकार आहेत.
युरेका फोर्ब्स चे व्हॅक्युम क्लिनर्स हे डायरेक्ट मार्केटिंगचे भारतातले सर्वात मोठे उदाहरण
बाकी डायरेक्ट मार्केटिंग का व कधी करायचे ही MBA ची ५० मार्कांची केस स्टडी होऊ शकेल :)
तरी डायरेक्ट मार्केटिंग ठरवणारे फॅक्टर्स
1. Type of product : innovation / new concept / me too
2. Type of product : Consumable / durable
3. Type of demand in market : existing demand / hidden aspiration
4. Possibility of winning Push or Pull strategy
5. Pricing strategy : Skimming / penetration
6. Alternative distribution strategy

बाकी डिटेल्स वेळ मिळाला कि टाकतो

अत्रे's picture

22 Jun 2017 - 12:59 pm | अत्रे

प्रतिसादासाठी धन्यवाद. सविस्तर वाचायला आवडेल. तुमचे बुलेट पॉईंट्स कळाले नाहीत.

MLM आणि डायरेक्ट सेलिंग हे मुळात वेगवेगळे प्रकार आहेत.

MLM ला डायरेक्ट सेलिंग चा उपप्रकार असे म्हणता येईल का?

माहितगार's picture

22 Jun 2017 - 7:45 pm | माहितगार

कदाचित MLM प्रकारास पब्लिक वैतागल्यामुळे स्वतःला MLM म्हणून घेण्या पेक्षा डायरेक्ट मार्केटींग म्हणून ओळख देण्याचा प्रय्तन MLM वाले करत असावेत. वस्तुतः MLM हि स्वतंत्र कॅटेगरी ठरते - नेटवर्क मार्केटींगचा प्रकार आहे , ते लोक दुकानात बसून देल करत नाहीत हे खरे अपवादात्मक प्रमाणात पुर्व ओळख न काढता कस्टमर्सना डायरेक्ट भेटण्याचे प्रकार होतात पण खरी भिस्त ओळखींचा (नेटवर्क)चा उपयोग करुन होते. MLM मध्ये एका विक्री नंतर पैसे घेऊन चक्र थांबत नाही ते चालू राहते साखळी तुटे पर्यंत प्रत्येक खरेदीदारच विक्रेता एजंट बनतो. डायरेक्ट मार्केटींगच्या क्लासिकल मॉडेल मध्ये वस्तु विकत घेतली आणि पैशाचा व्यवहार संपला की ट्रँझॅक्शन तेथेच संपते. MLM आणि डायरेक्ट सेलिंग एकाच मापात मोजणे म्हणजे गोंधळ वाढवणे आहे, ते टाळलेले नक्कीच बरे. दोन्ही विषयांच्या चर्चा वेगव्गेअळ्या केल्यास जाणकारांना प्रतिसाद देणे अधिक सुकर असेल असे वाटते.

नै हो, मलम वेगळं. मलमचा मुख्य मुद्दा असा असतो, की तुम्हाला तुम्ही कराल त्या कामाचे पैसे तर मिळतीलच, पण तुम्ही न केलेल्या कामाचे पैसेही मिळतील. डायरेक्ट सेलिंगमध्ये न केलेल्या कामाचे पैसे मिळत नाहीत.

वरचे प्रतिसाद वाचून थोडा गोंधळ झाला आहे.

मी नेटवर खालील माहिती वाचली. ती खरी नसल्यास कृपया नेमके सांगावे.

१.

Direct selling consists of two main business models: single-level marketing, in which a direct seller makes money by buying products from a parent organization and selling them directly to customers, and multi-level marketing (also known as network marketing or person-to-person marketing), in which the direct seller may earn money from both direct sales to customers and by sponsoring new direct sellers and potentially earning a commission from their efforts

संदर्भ: [Direct selling. (2017, June 13). In Wikipedia, The Free Encyclopedia. Retrieved
01:42, June 23, 2017, from https://en.wikipedia.org/w/index.php?title=Direct_selling&oldid=785517237]

२.

Direct selling is a method of marketing and retailing goods and services directly to the consumers, in their homes or in any other location away from permanent retail premises . ... Many direct selling companies, both person-to-person and party plan, are now organised on multilevel principles. This is where direct sellers are given the opportunity, in addition to the rewards from making personal sales, to build their own sales teams. In doing so, they are able to receive additional rewards that come from the sales achieved by those they have recruited trained, helped and motivated.

संदर्भ: http://www.dsa.org.uk/about-the-dsa/what-is-direct-selling/

असे असताना mlm हे डायरेक्ट सेलिंग चा सबसेट आहे असे का म्हणू नये?

अजून एक प्रश्न -
http://web.archive.org/web/20010205060500/dsa.org/pyramid.stm हा दुवा मला एका ऍकेडेमिक पेपर वर मिळाला. त्यात असे म्हटले आहे कि सगळे मलम हे फसवणारे असतात असे नाही. त्यांनी म्हटले आहे की पिरॅमिड स्कीम वाले लोक आपण मलम चे प्रिन्सिपल्स वापरतात पण त्यांचा उद्देश लोकांना फसवणे हा असतो.

Some pyramid promoters try to make their schemes look like multilevel marketing methods. Multilevel marketing is a lawful and legitimate business method which uses a network of independent distributors to sell consumer products.

To look like a multilevel marketing company, a pyramid scheme takes on a line of products and claims to be in the business of selling them to consumers. However, little or no effort is made to actually market the products. Instead, money is made in typical pyramid fashion, from recruiting. New distributors are pushed to purchase large and costly amounts of inventory when they sign up.

माहितगार's picture

23 Jun 2017 - 2:17 pm | माहितगार

कायदा, सेल्स आणि मार्केटींग हि त्या क्षेत्रातील जाणकारांचा विकिपीडियावर कमीत कमी लेखन सहभाग असलेली क्षेत्रे आहेत त्यामुळे त्या संंबधाने इंग्रजी विकिपीडियावरील डायरेक्ट सेलींग लेखातील माहिती परिपूर्ण आहे असे वाटत नाही. दिलेला संदर्भ समिक्षण पोकळी असलेला आहे म्हणजे त्या क्षेत्रातील जाणकारांकडून संबंधीत ग्रंथाचे समिक्षण झालेले नसताना वापरला गेला आहे. आपण उधृत केलेल्या परिच्छेदापुढे unreliable source असा टेग सुद्धा कुणीतरी वापरलेला दिसतो आहे.

आमेरीकन लेखक मंडळीही संत्री मोसंबी म्हणून आणि मोसंबी संत्री म्हणून खपवण्याचा / भासवण्याचा प्रयत्न बर्‍याचदा करताना दिसतात त्यामुळे गोंधळात भर पडते. आपल्याला गोंधळात किती रहावयाचे आहे हे ज्याचे त्याने निवडलेले बरे.

तुमचे म्हणणे खरे असू शकते. पण हा विकी दुवा देखील बघा
https://en.wikipedia.org/wiki/Multi-level_marketing#Direct_selling_versu...

यातही मलम हे डायरेक्ट सेलिंग चा एक टाईप आहे असे म्हटले आहे.

मलम आणि डायरेक्ट सेलिंग हे एकदम वेगवेगळ्या गोष्टी आहेत, असे सांगणारा दुवा/संदर्भ मिळाल्यास कृपया द्यावा.

पण एकंदरीत मला या व्याख्येपेक्षा दुसऱ्या प्रश्नात जास्त रस आहे (जो खालच्या एका प्रतिसादात रिपीट केला आहे).

माहितगार's picture

23 Jun 2017 - 5:11 pm | माहितगार

आपल्यासाठी खास, खालील छायाचित्र बनवले आहे.
.
.
MLM format

वस्तुतः जेव्हा वस्तुचा उत्पादक किंवा सेवादाता (कंपनी) त्याच्या स्वतःच्या सेल्स स्टाफ मार्फत ग्राहकाला सरळ विक्रीकरतात तेव्हा व्यवस्थापन शास्त्रात त्यास डायरेक्ट सेलींग म्हटले जाते. आता वरच्या चित्रात पहा बर्‍याच मलम कंपन्या स्वतः उत्पादनही करत नाहीत फार फारतर पहिला ग्राहक डायरेक्ट सेलिंगने विकला म्हणता येईल पण पुढचा प्रत्येक ग्राहक साखळीतील पुढच्या ग्राहकाला विकतो आहे ('अ' → 'ब'ला विकतो → 'ब' → 'क' ला विकतो) म्हणजे मूळ उत्पादकाच्या अथवा सेवा दात्याच्या भूमिकेतून हे इनडायरेक्ट सेलिंग/मार्केटींगच ठरते.

नीट पहा 'अ' → 'ब' ला डायरेक्ट विकतोय असा गैरसमज निर्माण केला जातोय वस्तुतः 'अ' एम एल एम कंपनीचे उत्पादन घेतो आहे आणि मग 'ब' ला विकतोय उत्पादक कंपनीच्या दृष्टीने हे इनडायरेक्ट मार्केटींगचे उदाहरण आहे. पण 'अ' हा 'ब'च्या सरळ संपर्कात असल्यामुळे डायरेक्ट सेलिंगचे चित्र रंगवण्याचा फसवा प्रयत्न चालू आहे. इन डायरेक्ट सेल्स चॅनल मध्येही डिस्ट्रीब्यूट्र सब डिस्स्ट्रीब्यूटरच्या डायरेक्ट संपर्कातच असतात पण त्यास व्यवस्थापनशास्त्रात डायरेक्ट सेलींग म्हणत नाहीत इंडायरेक्ट मार्केटींग मध्येच मोडतात.

मलमची गणना डायरेक्ट सेलिंग मध्ये करणे ही एकप्रकारे धूळफेक आहे

एवढे प्रयत्न घेऊन समजावून सांगितल्याबद्दल धन्यवाद.

जेव्हा वस्तुचा उत्पादक किंवा सेवादाता (कंपनी) त्याच्या स्वतःच्या सेल्स स्टाफ मार्फत ग्राहकाला सरळ विक्रीकरतात तेव्हा व्यवस्थापन शास्त्रात त्यास डायरेक्ट सेलींग म्हटले जाते.

ही व्याख्या ठरवल्यास प्रश्न मिटतो.

या व्याख्येनुसार Amway ही डायरेक्ट सेलिंग करणारी कंपनी आहे का मलम?

डायरेक्ट सेलिंग, मलम, पिरॅमिड स्कीम या सगळ्यांच्या व्याख्या काही का असेना - मला Amway कंपनीच्या लोकांच्या विधानामागचे लॉजिक समजून घ्यायचे आहे (जे विधान मी मूळ पोस्ट मध्ये दिलेले आहे)

थोडक्यात

The newly announced guidelines, however, restrict e-commerce companies from selling products on other websites without the permission of direct-selling companies and Budhraja believes that once it becomes a law, they will be able to take action against distributors who sell on other platforms

(https://www.outlookbusiness.com/strategy/feature/touch-and-feel-3537 )


त्यांचा त्यांचे प्रॉडक्ट घरोघरी विकणे सोडून इतर मार्गातून विक्री करणे याला विरोध आहे असे दिसून येते. असे का? त्यांना नॉर्मल दुकानात/ इ कॉमर्स सायटीवर वस्तू विकून कोणते नुकसान होते?

माहितगार's picture

23 Jun 2017 - 3:00 pm | माहितगार

मलम बद्दल मिपावर यापुर्वी बर्‍यापैकी धागे होऊन गेले असावेत. ज्यांना माहित आहेत त्यांनी इथे त्याचे दुवे दिल्यास अत्रे साहेब आणि उशिराने आलेल्या इतरांना तेच ते दळण दळायचे टाळून माहितीचा लाभ घेता येईल.

मलम प्रकारात मला व्यक्तिशः रुची नसल्यामुळे सविस्तर लिहिणे शक्य असणार नाही. तरी मला असलेली किमान माहिती देतो पण मलम समर्थकांनी मला उपप्रतिसाद देण्याचे टाळल्यास आभारी असेन कारण अधिक चर्चेत मला रस असणार नाही.

मलमच्या मूळ तत्वज्ञानात व्यावसायिक वितरणाची साखळी टाळून सरळ कंझ्यूमरलाच मार्केटींग/सेल्सची साखळी म्हणून वापरुन घेणे आहे. मी एक टूथपेस्ट १० रुपये उत्पादन खर्चाचा टूथपेस्ट बनवला २ रुपये माझा प्रॉफीट लावला तर उत्पादकापाशी उत्पादनाची विक्री किमंत १२ रुपये होते. सर्वसाधारण विक्रीत समजा डिस्ट्रीब्यूटर १ रुपाया नफा घेईल रिटेलर समजा २ रुपये नफा घेईल एम आर. पी. १५ रुपये होईल. हा ३ रुपयांचा फायदा मी डिस्ट्रीब्यूटर आणि रिटेलरला देण्या एवजी ग्राहकालाच १५ रुपयांना सरळ विकतो पण ते या बोलीवर की त्याने माझ्या अजून टूथपेस्ट इतर मित्रांना/इतरांना विकून द्याव्या. तो माझ्या टूथपेस्ट जेवढ्या विकुन देईल तसा तसा मी पहिल्या टूथपेस्ट मधला ३ रुपयाचा शेअर त्याला वाटून देईन म्हणजे त्याला -ग्राहकाला- पुरेशा टूथपेस्ट विकून दिल्यानंतर ती टूथपेस्ट १२ रुपयांनाच पडेल.

फंडा मूळात चुकीचा नाही पण बिझनेस मॉडेल राबवणारी मंडळी बर्‍याच आपापल्या सोईच्या गफलती करत असतात. वर दिलेल्या टूठपेस्ट उदाहरणात माझ्या व्यक्तिगत व्यवसाय वेगळा असतो माझ्या एकुण उत्पनातून जो खर्च होतो त्यात तत्वज्ञान दृष्ट्या मलमातून विक्रीकरुन देऊन माझ्या अल्पबचतीत अल्प भर पडावयास हवी. मलमांचे बिझनेस मॉडेल राबवणारी मंडळी हा फंडा पूर्ण उफराटा करुन कसा राबवता येईल हे पाहतात. प्रॉडक्टची विक्रि हे प्राधान्य न ठेवता नफ्याच्या विक्रीचे स्वप्न विकणे ह्याला प्राधान्य बनवले जाते. यासाठी टूथपेस्टची किंमत अव्वाच्या सव्वा वाढवली जाते. मार्केट प्राईस पेक्षा अव्वाच्या सव्वा किमंतीला विकणारी साखळी कुठेतरी तुटणार असते वाळूचा खोपा (पिरॅमीड) पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे केव्हातरी कोसळणार हे नक्की असते. बहुतांश मदार ओळखीच्या आणि ओळखीच्यांच्या ओळखीच्या लोकांना गटवण्यावर असते. कोणत्याही व्यक्तिच्या ओळखीच्या नेटवर्कला शेवटी मर्यादा असते अशी मर्यादा संपली कि नेटवर्क मार्केटींग कोसळत असते. व्हेन डायग्राम काढलीतर ओळखीच्या लोकांची सर्कल्स एकमेकांना छेदत असतात आणि भासवल्यापेक्षा नेटवर्कथ्रू मार्केट फारफार मायक्रो स्वरुपाचे असते. कन्सेप्ट सेलींगचे ग्रेट ट्रेनिंग हे लोक एकमेकांना देत असतात. पण अनोळखी ठिकाणी जाऊन प्रॉडक्ट सेलिंग च्या ट्रेनिंग मध्ये मलम आणि नेटवर्क वाली मंडळी कच्ची असतात जिथे उर्वरीत डायरेक्ट सेलिंगची मंडळी तरबेज असण्याची शक्यता अधिक असते. बेसिक टेक्निक आणि मार्केटींग फंड्यात फरक खूप मोठा आहे त्यामुळे मलम कंझ्यूमरपाशी डायरेक्ट पोहोचतो म्हणजे क्लासिकल डायरेक्ट सेलिंग होते असे नव्हे. अजूनही फरक सांगता येतील पण या धाग्यासाठी तुर्तास एवढे पुरेसे असावे.

सविस्तर प्रतिसादासाठी धन्यवाद.

एक प्रश्न राहिला - एमवे चे प्रॉडक्ट्स त्यांच्या साखळीतल्या लोकांनी फ्लिपकार्ट/अमेझॉन वर विकण्यास एमवे चा विरोध का असतो, याबद्दल जाणून घ्यायला आवडेल. म्हणजे नेटवर्क मार्केटिंग करा किंवा इ कॉमर्स सायटीवर विका! पिरॅमिड च्या टॉप वर असलेल्याना काय फरक पडावा?

एमवे चे प्रॉडक्ट्स त्यांच्या साखळीतल्या लोकांनी फ्लिपकार्ट/अमेझॉन वर विकण्यास एमवे चा विरोध का असतो,

कुठलेही प्रॉडक्ट विकताना अथवा विकत घेताना महत्त्वाचा विषय असतो युएसपी. युनिक सेलिंग पॉइंट्स. कुठल्या गोष्टीसाठी तुम्ही ते उत्पादन घेताय अथवा विकताय ते फार महत्वाचे. साधे अ‍ॅमवेचे अन टूथपेस्टचे एक्झाम्पल घेऊ. त्यांची ग्लिस्टर पेस्ट बाजारात प्रचलित असलेल्या सर्वात महाग पेस्टपेक्षा महाग आहे. त्याचे कारण अ‍ॅमवे वाले देतात की थोडीशीच घ्यायची. खरेतर कुठलीही पेस्ट थोडीच घ्यायची असते असे डेंटिस्ट पण सांगतात. शेंगदाण्याएवढी सुध्दा खूप झाली. मग ही महागाची पेस्ट का घ्यावी लोकांनी? सिबाका, अँकर ह्या स्वस्त पेस्ट अशा युएसपीने विकतात. म्हणजे ते पेस्टचे कौतुक करणार पण लोक ती पेस्ट स्वस्त आहे म्हनून घेणार. मेस्वाक, डाबर, विकोवाले आयुर्वैदिक नावाखाली विकणार, कोलगेट, पेप्सोडेंट हे वर्षानुवर्षाचा ब्रॅन्ड म्हणून विकणार, मोठा ग्राहकवर्ग हा ब्रॅन्ड घेणार. त्यात परत सेन्सिटिव्ह, शायनीटीथ, ऑलडेप्रोटेक्शन असे उपप्रकार असतातच. क्लोजप वगैरे आधी जेल हा युएसपी वापरत आता ते रेग्युलर झाल्यावर यंग पिढी पकडून त्शा जाहीरातीचे बंबार्डींग करते. म्हणजे पेस्ट विकण्याआधी त्यानी युएसपी ठरवलेला असतो. तो त्या ब्रँडसोबत विकसित होतो, कस्टमर रिस्पोन्ससोबत बदलत राहतो. अ‍ॅम्वेचे ग्लिस्टर ह्यातले काय करते? जाहीरात हा खूप लोकांना अनावश्यक प्रकार वाटतो, त्यावर केलेला खर्च हा आम्ही ग्राहकांपर्यंत वेगळ्या मार्गाने पोहोचवतो असे प्रलोभन दाखवले जाते पण तसा फायदा करुन देण्याचा एकमेव मार्ग असतो तेवढ्या स्वस्तात विकणे. ते तर अ‍ॅम्वेवाले करत नाहीत. बर ते जाहीरात सामान्य ग्राहकाला अन वापरकर्त्याला करायला लावतात. त्यात एकसूत्रीकरण असूच शकणार नाही. एखादी एजन्सी ज्यापधतीने जाहीरात करते ती सर्वत्र एकाच पध्दतीने पोहिचलेली असते. एजन्स्या ह्या प्रॉपरली ट्रेन्ड असतात. त्यांनी उत्पादन, त्याचा युएसपी, टार्गेट, मिडीया, कॅम्पेनिंग ह्याचा व्यवस्थित अभ्यास केलेला असतो. तसे लोक्स असतात त्यांच्याकडे. अ‍ॅमवेचे ग्राहक/किंवा कुणीही सामान्य ग्राहक ह्या पध्दतीला जन्मात पर्याय तयार करु शकणार नाहीत. जाहीरात हे शास्त्र आणि कला दोन्हीही आहे. विपणन हे योग्य जाहीरातीसोबत भरपूर मोठ्या नेटवर्कवर काम करत असते. वर्षानुवर्षाचा सेटप बसलेला असतो तो अनुभवातून, सुलभीकरणाच्या अन सुविधाजनक परिस्थिती निर्माण करण्याच्या हेतूनेच तयार झालेला असतो. जाहीराती ह्या लोकशिक्षणाचे पण माध्यम समजले जातात. एखादे उत्पादन लोकांना आवडून ते घेण्यासाठी त्यांना प्रवृत्त करणे, त्याचा पुरवठा योग्य रीतीने ग्राहकापर्यंत करत राहणे, फीडबॅक घेऊन त्यानुसार उत्पादनात सुधारणा करुन ब्रॅन्ड जनमानसात मेंटेन करणे, अशा गोष्टी संशोधन, उत्पादन, अ‍ॅडव्हर्टायझिंग, मार्केटिंग, सेल्स, सर्व्हिस, लॉजिस्टिक्स चा वापर करुन वर्षानुवर्षे होत आल्या आहेत. त्या सगळ्यानाच फाटा देऊन नवीन काहीतरी करतोय असा आव आणणे हे ह्या साखळीतला एक अ‍ॅक्टिव्ह सदस्य असल्याने डोक्यात जाते.
सो.....

धन्यवाद. समजले असे वाटत आहे.

माहितगार's picture

23 Jun 2017 - 3:15 pm | माहितगार

त्यांचा त्यांचे प्रॉडक्ट घरोघरी विकणे सोडून इतर मार्गातून विक्री करणे याला विरोध आहे असे दिसून येते. असे का? त्यांना नॉर्मल दुकानात/ इ कॉमर्स सायटीवर वस्तू विकून कोणते नुकसान होते?

इ कॉमर्स सायटीवरुन विकल्यानंतर मार्केटींग आणि सेल्स कॉस्ट तशीही फार कमी झालेली असते. इ-कॉमर्स उपलब्ध असल्यानंतर उत्पादक ते ग्राहक साखळीतशीही संपुष्टात येऊन मलम किंवा नेटवर्क मार्केटींगची गरजच उरावयास नको. (जाहीरातीवर थोडा फार खर्च होत असेल)

पण मलम वरच्या प्रतिसादात म्हटल्या प्रमाणे प्रत्यक्षात वस्तूंची विक्री करण्या पेक्षा नफ्याच्या स्वप्नाचे मार्केटींग करण्यावर भर देतात, वस्तुतः संपलेले बिझनेस मॉडेल इकॉमर्सवरुन कसे विकण्यात पॉईंट काय ? पण नफ्याच्या स्वप्नाचे मार्केटींग करुन जेवढे पदरातपडतील तेवढे चांगले. एक मुर्तीकार एका मुर्तीच्या बेंबीत बोट घालण्यासाठी अव्वाच्या सव्वा पैसे घेत असतो. मुर्तीच्या बेंबीत विंचू असतो. अव्वाच्या सव्वा पैसे देऊन बोट घालून विंचूच चावल्याचे स्विकारणे अत्यतं अपमानास्पद असल्यामुळे विंचू चावलेला प्रत्येकजण बोटाला खूप गार वाटले असे उलटे सांगतो आणि त्यानंतर प्रत्येकजण बोट घालत रहातो. बोटाला थंड वाटले असे प्रत्यक्ष ओळखीच्या माणसाने खोट सांगितले तरी खरे वाटते ते इंटरनेट किंवा दुकानात वस्तू ठेऊन खरे वाटण्याचा संभव क्मी असावा. मलम वाली मंडळी दुखावली गेल्यास क्षमस्व. चुभूदेघेणे. वादविवादाच्या दृष्टीने उपप्रतिसाद देण्याचे टाळल्यास मलमकारांचे आभार