उतारवय ही संकल्पना हळुहळू बाद होतेय

अजय भागवत's picture
अजय भागवत in जनातलं, मनातलं
11 Jun 2017 - 6:05 pm

हया शतक़ातील सर्वात मोठी क्रांति जर कोणती असेल तर ती, “वयोमानातील वाढ” ही मानावी लागेल. आपण आपल्या आजी-आजोबांच्या काळातील नागरिकांपेक्षा २५-३० वर्षे अधिक जगत आहोत. ही वाढीव वर्षे खूप मोठा कालावधी आहे - अगदी एक आख्खे दुसरे आयुष्य वाढल्यासारखेच आहे. परंतू, आपण अजुनही आयुष्याकडे पूर्वीच्याच नजरेने पाहतोय का? म्हणजे असं की, आयुष्य म्हणजे, जन्म, मग तारुण्यातील आपल्या जीवनाची चढती कमान आणि मग पन्नाशीनंतर शारीरिक-मानसिक उतार... ह्याच विचारसरणीत आपण अडकून तर पडलेलो नाही ना? 

पुढील वाचन कृपया येथे करा -https://drive.google.com/file/d/0B8a9AFSuwpEsdWpoaFBDbTlkWEU/view?usp=sh...

ppt डाउनलोड करून पाहावी.

मांडणीमत

प्रतिक्रिया

पुढील वाचन इकडेतिकडे करत बसण्याइतका रिकामा वेळ नाही. क्षमस्व.

- (चिरतरुण) एस. ;-)

एस, माझे ही 2-4 ब्लॉग इत्यादी आहेत.. काय म्हणता?

तुमचे वय झाले असेल, म्हणून लिंक्स!
;)

असो, भेटू अजून 100 एक वर्षाने.

जेम्स वांड's picture

11 Jun 2017 - 8:22 pm | जेम्स वांड

सध्या उठावदार वयात (उमेदीच्या वयात, कोण रे तो अश्लील अश्लील ओरडतोय) असल्यामुळे उतारवयाबद्दल वाचून अवलक्षण करून घ्यायचा मानस नाहीये, त्यामुळं आमचा पास.

माम्लेदारचा पन्खा's picture

11 Jun 2017 - 8:30 pm | माम्लेदारचा पन्खा

हा झैराती उतार भयावह आहे . . .

आम्ही मिपा सोडून कुठ्ठंकुठ्ठं जात नै . . . .

माम्लेदारचा पन्खा's picture

11 Jun 2017 - 8:31 pm | माम्लेदारचा पन्खा

हा झैराती उतार भयावह आहे . . . . आम्ही मिपा सोडून कुठ्ठंकुठ्ठं जात नै . . . .

अरूण गंगाधर कोर्डे's picture

11 Jun 2017 - 8:59 pm | अरूण गंगाधर कोर्डे

उतारवय ही संकल्पना बाद झाली असली तरी वृद्धांशी वागण्याची पद्धत मात्र पूर्वी पेक्षाही जास्त विचित्र असल्याचे अनुभवीत आहे. नाइलाजास्तव असे लिहावे लागत आहे. या गोष्टी लिहिणं चांगलं की वाईट कळत नाही. याबाबत भिन्नता असू शकेल.

अजय भागवत's picture

12 Jun 2017 - 5:31 pm | अजय भागवत

माझा अनुभव ह्याबाबतीत निरीक्षणावर आधारित आहे व वृत्तपत्रामध्ये अधूनमधून दिल्या जाणाऱ्या बातम्या ह्या नातेसंबंधाचा आरसा दाखवतात. माझयाकडे असा काहीही विदा -डाटा नाही जेणेकरून मी काहीही खात्रीपूर्वक सांगू शकेल.

डॉ सुहास म्हात्रे's picture

11 Jun 2017 - 9:22 pm | डॉ सुहास म्हात्रे

दुसर्‍या स्लाईडमधला भारताचा नकाशा चुकीचा आहे. निदान भारतिय नागरिकाने तरी संपूर्ण काश्मीरसह भारताचा नकाशा वापरणे योग्य व वैध असते.

अजय भागवत's picture

12 Jun 2017 - 5:28 pm | अजय भागवत

सर, तो नकाशा योग्यच आहे. कोणत्याही अधिकृत नकाशात पाकच्या अधिपत्याखालील भाग व चीनने गिळलेला भाग अशाच पद्धतीने दाखवतात. भारताची सीमारेषा त्या नकाशात स्पष्ट दिसत आहे, त्यामुळे मी तुमच्या मताशी सहमत नाही. असो.

डॉ सुहास म्हात्रे's picture

12 Jun 2017 - 6:32 pm | डॉ सुहास म्हात्रे

सर, तो नकाशा योग्यच आहे. कोणत्याही अधिकृत नकाशात पाकच्या अधिपत्याखालील भाग व चीनने गिळलेला भाग अशाच पद्धतीने दाखवतात.

हा गैरसमज आहे.

भारताचा अधिकृत नकाशा कोणता आहे हे ठरविण्यासाठी व प्रसिद्ध करण्यासाठी सरकारने अधिकृत केलेली संस्था "सर्व्हे ऑफ इंडिया" हीच एक आहे. इतर कोणा भारतिय वा अभारतिय संस्थेला किंवा परदेशी सरकारला तो अधिकार नाही.

भारताचा चुकीचा नकाशा प्रसिद्ध करणे हा भारतिय कायद्याप्रमाणे दंडनिय गुन्हा आहे. अधिक माहितीसाठी "सर्व्हे ऑफ इंडिया"चे संस्थळ आणि विशेषत: त्यातील खालील पान पाहिल्यास बरेच प्रबोधन होईल...
http://www.surveyofindia.gov.in/pages/display/190-public-awareness


(वरील चित्र सर्व्हे ऑफ इंडियाच्या संस्थळावरून साभार)

डॉ सुहास म्हात्रे's picture

12 Jun 2017 - 6:48 pm | डॉ सुहास म्हात्रे

भारताचा राज्यांच्या सीमांसहीत अधिकृत नकाशा...

(mapsofindia.com च्या सौजन्याने)

अत्रे's picture

13 Jun 2017 - 7:13 am | अत्रे

माहितीसाठी धन्यवाद.

एक शंका - कोणी अखंड भारत म्हणून - भारत पाकिस्तानचा एकत्र नकाशा दाखवत असेल तर तिला/त्याला शिक्षा होऊ शकते का?

अजय भागवत's picture

13 Jun 2017 - 7:23 am | अजय भागवत

मी ह्यावर फार वेळ वाया घालवणार नाही. तुम्ही मी दिलेला नकाशा नीट पाहावा. त्यात भारताचा नकाशा आपल्या आंतरराष्ट्रीय सीमारेषांचा स्पष्ट चित्रण करून दाखवल्या आहेत. ज्या भागातील डेटा त्यांच्याकडे आहे, तेथील भाग त्यांनी रंगवले आहेत. इतकेच.

डॉ सुहास म्हात्रे's picture

13 Jun 2017 - 2:17 pm | डॉ सुहास म्हात्रे

वा वा ! तुमच्या व्यस्ततेचे कौतुक आहे ! :)

(स्वतःच्या ब्लॉगची झैरात करण्यासाठी) मिपावर धागा टाकण्याइतका वेळ तुमच्याकडे होता, तेव्हा, केवळ 'एका मिपाकराने दुसर्‍या मिपाकराला उपयोगी माहिती द्यावी' याच उद्देशाने नकाशाच्या वैधतेबद्दल माहिती दिली होती. असो.

त्या संस्थळावर दिलेल्या इमेल अ‍ॅड्रेसवर जर कोणी तक्रार केली तर मात्र ती निस्तरायला व्यस्ततेतून नक्की वेळ काढावा लागेल, हे तुम्हाला माहीत आहेच, त्यामुळे ते सांगण्याची तसदी घेण्याची गरज नाही म्हणा ! ;) शुभेच्छा !

दशानन's picture

13 Jun 2017 - 2:58 pm | दशानन

का वेळ वाया घालवत आहात?

अत्रुप्त आत्मा's picture

12 Jun 2017 - 7:17 am | अत्रुप्त आत्मा

काय जाहीर केलय आत?
वरती वरण खालती भात! :p

गुगल डॅाक्स अँड्राइड फोनवरच चालते. इकडेच लिहा काय ते लवकर ,वेळ थोडा आहे. :)

तुमची पीपीटी पण मराठीतच आहे. मग सरळ तिकडून इकडे कॉपी पेस्ट का नाही करत?

रातराणी's picture

12 Jun 2017 - 12:25 pm | रातराणी

ही कल्पना बलराज साहनी यांनी कधीच बाद करून ठेवली आहे.
आठवा बरं जरा, ए मेरी जोहरजबी ;)

अजय भागवत's picture

12 Jun 2017 - 5:24 pm | अजय भागवत

सहमत ! :-)

माझ्या प्रतिसादाचं वाचन कृपया इथे करा.

अत्रुप्त आत्मा's picture

13 Jun 2017 - 6:46 am | अत्रुप्त आत्मा

दू दू बाळ! =))

धर्मराजमुटके's picture

12 Jun 2017 - 5:39 pm | धर्मराजमुटके

अवांतर विनोद : उतारवय ही संकल्पना दारुचे व्यसन असणार्‍यांनी फार अगोदरपासूनच बाद केलेली आहे. दारुचे व्यसन असणारा कधीही म्हातारा होत नाही. तो तरुणपणातच स्वर्गवासी होतो. असे कोणातरी लेखकाचे प्रसिद्ध वचन आहे.

असो. आता ऑन सिरियस नोट :

तुमचा पुर्ण लेख इथे दिला असता तर अजुन जास्त चांगले झाले असते. पुर्ण लेख लिहून खाली हा लेख अमुक अमुक ब्लॉगवरदेखील प्रकाशित केलेला आहे असे लिहिले असते तर जास्त योग्य दिसले असते. तुमच्या लेखाचा कंटेंट पाहून ज्यांना आवडला असता त्यांनी आवर्जुन तुमच्या ब्लॉगला देखील भेट दिली असती. असो. पुढील वेळी असे करता आले तर पहा.

अजय भागवत's picture

13 Jun 2017 - 7:21 am | अजय भागवत

प्रतिसादाबद्दल आभारी आहे. गुगल डॉक हे ब्लॉग नाही. माझी ppt मी तेथुन शेयरली आहे. येथील "लेख" प्रकारात गुगल डॉक इन्सर्ट करता आले असते तर मी केले असते. ppt ची एक मजा अशी आहे की, त्यातील ऍनिमेशन तुम्हाला ppt तच व्यवस्थित पहाता येईल व ते अधिक परिणामकारक असेल. तसेच एखाद्याला ह्याच ppt चा वापर करायचा असेल तर ते विनासायास करू शकतात.

सतिश गावडे's picture

13 Jun 2017 - 11:56 am | सतिश गावडे

पहिल्या स्लाईडवरील तुमचे नाव आणि ईमेल आयडी डिलीट केले तर चालेल का?

अजय भागवत's picture

15 Jun 2017 - 10:05 am | अजय भागवत

तसे का करायचे आहे तुम्हाला ?

सतिश गावडे's picture

15 Jun 2017 - 10:18 am | सतिश गावडे

मी तिथे माझे नाव आणि ईमेल आयडी टाकून ते गुगल डॉकवर टाकेन आनि इथे त्याच्याबद्दल चार ओळी खरडेन.

अजय भागवत's picture

15 Jun 2017 - 7:09 pm | अजय भागवत

:-)

कपिलमुनी's picture

13 Jun 2017 - 5:18 pm | कपिलमुनी

ppt चा प्रेझेन्टशेन काही खास वाटला नाही. चित्रासहीत लेख दिला असता तरी चालले असते .
असो !

अजय भागवत's picture

15 Jun 2017 - 10:06 am | अजय भागवत

नेमके सांगितले तर पुढील वेळी सुधारणा करता येतील

कपिलमुनी's picture

13 Jun 2017 - 5:21 pm | कपिलमुनी

भारताचा चुकीचा नकाशा टाकल्याबद्दल निषेध

निषेध

प्रचेतस's picture

13 Jun 2017 - 5:49 pm | प्रचेतस

सहमत

प्रसाद_१९८२'s picture

13 Jun 2017 - 7:12 pm | प्रसाद_१९८२

कि तो नकाशा चुकीचा आहे म्हणून. भारताची आंतरराष्ट्रीय सीमा त्या पीपीटी मधील नकाशात व्यवस्थित दाखविली आहे. पाकव्याप्त व चिनव्याप्त काश्मिरमधून lifespan चा जो डेटा त्यांना हवा आहे, तो आता घेता येत नसल्याने तेवढा वादग्रस्त भाग सोडून, भारतात येणार्‍या काश्मिरच्या भागाला एका विशिष्ठ रंगामध्ये दाखविले आहे, असे मला तरी वाटते.

कपिलमुनी's picture

13 Jun 2017 - 9:26 pm | कपिलमुनी

कोणत्याही अधिकृत नकाशात पाकच्या अधिपत्याखालील भाग व चीनने गिळलेला भाग अशाच पद्धतीने दाखवतात

इथे त्यांनी जे लिहिला आहे त्यावरून lifespan चा जो डेटा त्यांना हवा आहे, तो आता घेता येत नसल्याने नकाशा चुकीचा दाखवला आहे असे म्हणता येत नाही। तो नकाशा चुकीचा आहे

अजय भागवत's picture

15 Jun 2017 - 10:04 am | अजय भागवत

तुम्ही म्हणालात तेच माझेही मत आहे.

काश्मीर साठी वेगळा रंग टाकून ''डेटा उपलब्ध नाही'' असे सांगायला हवे होते, ते योग्य ठरले असते
काही (६एक ) ठिकाणी फोटो आणि लिखाण overlap होते आहे. त्यामुळे काही slides वाचता आल्या नाहीत - उदा. पेशी पुनर्जन्म घेतात वाली slide
power of ९ things- यात धर्माचे पालन केल्याने आयुष्यमान कसे वाढेल ते नाही कळले
चाचणी प्रश्न गंमतशीर आहेत

मराठी_माणूस's picture

16 Jun 2017 - 2:37 pm | मराठी_माणूस

वयोमान वाढुन काय उपयोग
http://timesofindia.indiatimes.com/city/delhi/44-of-indias-aged-treated-...