सध्या काय वाचत आहात?

मुक्त विहारि's picture
मुक्त विहारि in काथ्याकूट
10 Jun 2017 - 10:44 pm
गाभा: 

तसे आम्ही छंदी-फंदी पण दुर्दैवाने वाचनाचे व्यसन पण असेच.घरात तशी २०००च्या आसपास पुस्तके आहेत, पण आवडलेले पुस्तक दरवेळी विकत घेणे परवडत नाही.

म्हणून २ वाचनालये लावली आहेत.सगळीच पुस्तके विकत घेणे एकाच वाचनालयाला पण परवडत नसतील, असे मला वाटते.

तर महत्वाचा मुद्दा असा की. आज एक मस्त पुस्तक मिळाले.

पुस्तकाचे नांव : आलेख (विश्वसंस्कृतीचा)

लेखिका : आशा दामले

प्रकाशक : नवचैतन्य प्रकाशन , बोरीवली, फोन नंबर ०२२-२८६४५२१२, ०२२-२८६३५२२१२

ह्या प्रूथ्वीवर अगणित पुस्तके असतील, आणि मिपावर पण असंख्य वाचनव्यसनी मिपाकर असतीलच.

वाचनव्यसनी मिपाकरांमध्ये एकमेकांना आवडलेल्या पुस्त्कांच्या गाभ्या बद्दल आदान-प्रदान व्हावी ह्या हेतूने हा धागा काढला आहे.

प्रतिक्रिया

"नाईलकाठची मिठ्ठास कहाणी" हे एक भन्नाट पुस्तक आहे.

साखरेच्या टंचाईने त्रस्त असलेल्या सुदान देशात १९८५ साली पहिलाच असा "केनाना साखर कारखाना" कसा उभा राहिला याची कहाणी आहे. या साखर कारखान्यामध्ये अकाऊंट्सचे काम बघायला गेलेल्या आणि नंतर आफ्रिकेतच उरलेले आयुष्य व्यतीत करणार्‍या गोविंद देसाई या मराठी माणसाची कथाही सोबत येतेच. आफ्रिकन लोकांना बाहेरच्यांमुळे बसलेले सांस्कृतीक धक्के... अमेरिका, युरोप, भारत, पाकिस्तान, कोरीया, बांग्लादेश, फिलीपीन्स अशा वेगवेगळ्या देशातून आलेले आणि एकत्र राहिलेले लोक आणि त्याच्या संस्कृत्यांचे एकमेकांना बसलेले धक्के असे अनेक किस्से लहान लहान लेखांच्या स्वरूपात लिहिले आहे आणि त्यातूनच कारखान्याची कथा पुढे सरकते.

गोविंद देसाईंच्या पत्नीने एका मराठी गृहिणीच्या नजरेतून हा सगळा प्रवास टिपला आहे.

http://www.bookganga.com/Preview/BookPreview.aspx?BookId=271213120428&Pr...

हे विश्वाचे आंगण - सुधीर जांभेकर

हे ही ठीकठाक पुस्तक आहे.

मराठी माणूस अमेरिकेत जातो आणि जागतिक पातळीवरचा यशस्वी आर्किटेक्ट होतो ही गाथा त्रोटक स्वरूपात मांडली आहे

जानेवारीत बुक केलेले आणि खूप गाजावाजा करून आलेले पुस्तक "तुमचा आमचा नाना" हाती पडले, सपशेल निराशा झाली.

मोठमोठ्या व्यक्तींनी नाना पाटेकर वर अगदीच त्रोटक लिहिलेले लेख असे स्वरूप आहे. अक्षरशः पान दिड पानात लेख आवरते घेतले आहेत आणि सोबतीला भयाण शब्दांकन!

पुस्तकात चांगले फोटो आहेत हीच एक जमेची बाजू. पण पैसे वाया गेल्याचा फील आला

पुस्तकाची किंमत 800/-

आत्ता अनिल अवचटांचे कार्यमग्न हाती आहे. "कार्यरत" चे पुढचे व्हर्जन म्हणावयास हरकत नाही.

नक्की वाचावे असे पुस्तक आहे.

http://www.bookganga.com/Preview/BookPreview.aspx?BookId=090716010457&Pr...

आदूबाळ's picture

11 Jun 2017 - 10:24 am | आदूबाळ

यासाठी धन्यवाद.

हे 'कार्यरत'चं पुढचं व्हर्जन आहे की पुढचा भाग? (म्हणजे आगोदरच्या कार्यकर्त्यांवर अपडेटेड लेख + थोडे नवीन लेख असं आहे का?)

दुसरं असं की अनिल अवचट हल्ली लय पाट्या टाकतात असं मत झालं आहे. पूर्वी विडीकामगारांवर किंवा बुवाबाजीवर लेख लिहिताना जो rigour असे तो जाऊन गेली काही वर्षं ते कायच्याकाय बेंगरूळ लिहिताहेत.

तसेच लेख आहेत का? की मूळ 'कार्यरत'च्या वळणावर जाणारे आहेत?

सतिश गावडे's picture

11 Jun 2017 - 11:40 am | सतिश गावडे

दुसरं असं की अनिल अवचट हल्ली लय पाट्या टाकतात असं मत झालं आहे. पूर्वी विडीकामगारांवर किंवा बुवाबाजीवर लेख लिहिताना जो rigour असे तो जाऊन गेली काही वर्षं ते कायच्याकाय बेंगरूळ लिहिताहेत.

प्रचंड सहमत.

अमर विश्वास's picture

11 Jun 2017 - 11:50 am | अमर विश्वास

दुसरं असं की अनिल अवचट हल्ली लय पाट्या टाकतात <<<

पूर्वी ते "मुशाफिरी" करत होते .. त्यामुळे त्याचे लेखन प्रत्य्क्ष अनुभवांवर आधारित होते, त्याची डॉ आनंद नाडकर्णींबरोबरची गर्द वरची लेखमाला "माईलस्टोन" होती

पण आता ते जुन्या आठवणींवर लहितात .. फरक पडणारच

मुक्त विहारि's picture

11 Jun 2017 - 11:57 am | मुक्त विहारि

श्री तुषार नातू ह्यांचे नशायात्र पुस्तक कुणी वाचले आहे का?

गर्दच्या भयानक व्यसनातून श्री. तुषार नातू, फार परीश्रमाने बाहेर पडले आहेत. त्यांच्या स्वानुभवावर आधारीत पुस्तक असल्याने, "सीधी बात नो बकवास." ह्या उक्ती वर आहे.

अमर विश्वास's picture

11 Jun 2017 - 4:53 pm | अमर विश्वास

नशायात्र वाचाल आहे ..
तुषार नातू हे थोपु वर सुद्धा ऍक्टिव्ह आहेत. नुकतीच त्याच्याशी थोपु मैत्री झाली आहे.
तेथे ते अनेक अनुभव शेअर करतात

अनिल अवचटांचे सध्याचे लिखाण हा एक वादाचा मुद्दा आहे. सप्तरंग / सकाळ मध्ये लिहिलेली बालीश लेखमाला असो की वेगवेगळ्या छंदांची वेगवेगळी पुस्तके असोत.. हाती फारसे कांही लागत नाही किंवा पुस्तकांची किंमत पटत नाही.

मी वर उल्लेखलेले कार्यमग्न, संभ्रम, शिकवले ज्यांनी, कोंडमारा वगैरे पुस्तके नवीन असली तरी यातील लेख पूर्वी दिवाळी अंकात लिहिलेले आहेत.. त्यामुळे जुना टच अनुभवता येतो.

अप्पा जोगळेकर's picture

12 Jun 2017 - 5:23 pm | अप्पा जोगळेकर

अनिल अवचट भारी माणूस आहे. पण त्यांची पुस्तके कंटाळवाणी असतात.
त्यांचे 'अमेरिका' हे एक पुस्तक मात्र खूप आवडले.

एकदा जरुर वाचावा
ब्लॅाग मधील ग्रॅंड ब्युटी वरील लेखही ब्युटीफुलच
हा एक तुकडा

गुडी टु शूज’ माणसांना घासाघासानं संवेदनशीलता भरवणारे अवचट स्वत:च कसे कंटाळत नाहीत या प्रकाराला? असाही प्रश्न मला पडतो. पण मध्यमवर्गीय लोकेषणा भल्या भल्यांना सुटत नाही. त्यातल्या त्यात नीतिमान जगू इच्छिणारा हा वर्ग आहेच अ‍ॅडिक्टिव्ह. ‘अनिल अवचट लिहितात मध्यमवर्गासाठीच. त्यातही पुण्यातल्याच', या सुनील तांब्यांच्या मताशी मी सहमत आहे. पण तो लेखक माणूस संपूर्ण न मांडताच मध्यमवर्गीय जगणं रोम्यॅंटिक करून मांडायला जातो हाच तर माझा प्रॉब्लेम आहे. ‘अरे माझ्या मध्यमवर्गीय भांडवलशाहीत राहून मिडिऑकर झालेल्या प्रॉडक्टांनो, हे घ्या माझं सामाजिक जाणिवेचं इंजेक्शन’ अशा आविर्भावात उपदेशामृताचे घुटके पाजणारे अवचट मला जाम वात आणतात.

हा लेख खूपच एकांगी वाटला.

पूर्वी वाचकांचं जग दोन भागांत विभागलं गेलं होतं. पुलं आवडणारे आणि पुलं नावडणारे; आता, नवीन जगात एकतर तुम्हाला अनिल अवचट आवडतात किंवा त्यांचा कंटाळा येतो. हे वाक्य म्हणजे अगदीच अतिशयोक्ती आहे.

ही ब्लॉग पोस्ट आधी वाचली होती.

पण माझा आक्षेप थोडा वेगळा आहे. प्रेडिक्टेबल होण्याला किंवा त्याच त्या जिलब्या परत पाडण्याला नाही. मर्जी है आप की, क्यूं की कीबोर्ड है आपका.

आक्षेप आहे अनभ्यस्त लिहिण्याला. "मला एवढंच दिसलं म्हणून मी एवढंच लिहिलं" ही सोयीस्कर पळवाट काढण्याला.

मोदक's picture

19 Jun 2017 - 2:28 am | मोदक

अनभ्यस्त = अन+अभ्यस्त

असे आहे का..? पहिल्यांदा हा शब्द सामोरा आला आहे.

("संमींक्षंक म्हंणूंनं नांव कांढांऽऽल" असा मधल्या आळीतून एक सल्ला..!) ;)

आदूबाळ's picture

19 Jun 2017 - 2:28 pm | आदूबाळ

लोल.

असाच अर्थ आहे 'अनभ्यस्त'चा. आल्सो नोन अ‍ॅज 'घोका आणि ओका' किंवा 'सीपीए' (कॉपी पेस्ट अ‍ॅप्रोच).

प्रदीप's picture

19 Jun 2017 - 7:57 pm | प्रदीप

अवचटांचे लिखाण अनभ्यस्त आहे, हा तुमचा आरोप त्यांच्या कुठल्या लिखाणावर आहे? सर्वच? काही ठराविक? ठराविक लिखाणाविषयी असेल, तर नेमके कुठले?

आदूबाळ's picture

19 Jun 2017 - 8:14 pm | आदूबाळ

सगळ्या नाही. वर लिहिल्याप्रमाणे विडीकामगारांवरचा लेख (आणि "माणसं" हे एकंदर पुस्तकच), पूर्णिया, संभ्रम, कार्यरत हे आवडतात. त्यातल्या लेखनात (वर लिहिल्याप्रमाणे) रिगर जाणवतो. पण तसं हल्लीच्या लेखनात जाणवत नाही. चट्कन आठवलेली उदाहरणं म्हणजे जिऑलॉजीवरचा लेख, आणि मला वाटतं मायक्रोब्जवरचा लेख.

ललित लेखनातही "स्वतःविषयी"सारख्या पुस्तकांत जाणवणारा नितळपणा जाऊन बनचुकेपणा आला आहे. अर्थात ललित लेखन अमुकच प्रकारचं असलं पाहिजे असा आग्रह धरायचा नसतो, त्यामुळे ते सोडून सोडा.

हे बघा: http://www.bookganga.com/Preview/BookPreview.aspx?BookId=070113065558&Pr...

जी काही चारपाच पानं वाचली ती पुरेशी आहेत.

प्रदीप's picture

19 Jun 2017 - 8:27 pm | प्रदीप

चट्कन आठवलेली उदाहरणं म्हणजे जिऑलॉजीवरचा लेख, आणि मला वाटतं मायक्रोब्जवरचा लेख.

अलिकडच्या त्यांच्या लिखाणांत तो पूर्वीचा कस राहिला नाही, ह्याच्याशी मी सहमत आहे. आणि ही जी दोन उदाहरणे दिली आहेत, त्यांजविषयीही. त्यांचे शास्त्रज्ञांच्या कार्यावरील लेख मला बरेच भाबडे वाटत आले आहेत. तसे ते 'कार्यरत' मधेही होते असे वाटले, व अलिकडील 'कार्य..(नक्की नाव विसरलो)' मधीलही तसेच आहेत असे वाटत राहीले. तुम्ही उल्लेखिलेले दोन्ही लेख ह्या नव्या संग्रहात समाविष्ट आहेत.

मोदक's picture

19 Jun 2017 - 9:03 pm | मोदक

कार्यमग्न.

कुठे थांबावं हे खूप लोकांना कळत नाही. अवचट त्यात आलेले पाहून दु:ख झालं खूप. कालांतराने ढासळत गेलेलं दीर्घ लेखनकरियर असण्यापेक्षा वन-बुक-वंडर परवडले.

मला वाटले होते की हे पुस्तक लहान मुलांसाठीचे आहे, म्हणून चाळून ठेऊन दिले.

गामा पैलवान's picture

19 Jun 2017 - 11:28 pm | गामा पैलवान

मोदक, वार्धक्य हे दुसरं बालपणच आहे. फक्त ते निभावून न्यायचं असतं इतरांना.
आ.न.,
-गा.पै.

प्रदीप's picture

18 Jun 2017 - 1:41 pm | प्रदीप

माणसं, गर्द, संभ्रम, हमीद, प्रश्न आणि प्रश्न, कार्यरत ह्यांपैकी नक्की कुठले ‘अरे माझ्या मध्यमवर्गीय भांडवलशाहीत राहून मिडिऑकर झालेल्या प्रॉडक्टांनो, हे घ्या माझं सामाजिक जाणिवेचं इंजेक्शन’ ह्या सदरातले आहे?

अशा तर्‍हेने जगातील कसल्याही लिखाणाची, कलाकृतीची संभावना करता येतेच, हे मान्य आहे. सतीश तांबेंचे सनसनाटी लिखाणही अशाच तर्‍हेने टिचकीनिशी उडवून लावता येईल.

सौन्दर्य's picture

11 Jun 2017 - 9:07 am | सौन्दर्य

सध्या श्री अशोक समेळ लिखित 'मी अश्वत्थामा चिरंजीव' ही कादंबरी वाचत आहे. पुस्तकाच्या शीर्षकावरूनच कळते की ही अश्वत्थाम्याच्या जीवनावर लिहिलेली कादंबरी आहे. पण खरं सांगू ६८७ पानांपैकी १३८ पाने वाचली पण ग्रीप आली नाही. अश्वत्थामा चिरंजीव आहे हे एकवेळ जरी मान्य केले तरी अश्वत्थामा इंग्रजी बोलतो, मराठी, गुजराथी बोलतो हे काही पटत नाही. बघू पुढे वाचताना काय वाटतं ते.

मंदार कात्रे's picture

11 Jun 2017 - 9:23 am | मंदार कात्रे

श्रीमान योगी ची नरहर कुरुन्दकर लिखित प्रस्तावना परखड आणि सडेतोड वाटली

अमर विश्वास's picture

11 Jun 2017 - 9:57 am | अमर विश्वास

सचिनचे अत्मचरित्र
.

काही दिवसांपूर्वी साक्षात सचिन तेंडुलकरचे आत्मचरित्र "Playing it my way" वाचायला घेतले

जवळ जवळ ३०-३५ वर्षांचा कालखंड (लहानपण धरून) अनेक नव्या गोष्टी काळतील, अनेक अनुत्तरित प्रश्नांची उकल होईल ... पुस्तक वाचून संपले .. पण हाती नवीन काहीच लागले नाही ...

सचिनच्या इनिंग्स, मॅचचे वर्णन, इतकेच काय सचिन कशा पद्धतीने बाद झाला हे सारे आमच्या डोळ्यासमोर आहे .. तेच परत वाचण्यात काय मजा? तेही अत्यंत पुळकावण्या भाषेत :(
ग्रेग चॅपल एपिसोड, मॅच फ़िक्सिन्ग या बद्दल सोईस्कर मौन बाळगले आहे. २००७ वर्ल्ड कप मधील घसरण अगदीच वरवरची व्यक्त झालीय ...

डेझर्ट स्टॉर्म किंवा २०११ वर्ल्ड कप चे वर्णन एखाद्या समांतर सिनेमा सारखेच आहे .. रटाळ ....

विनोद कांबळीचा माफक उल्लेख समजू शकतो .. पण फॅब फोर किंवा वीरू सारखे खंदे सहकारी ,, यांच्या बद्दल सचिनच्या नजरेतुन बघायला नक्की आवडले असते .. पण ....

सचिन ला वेळोवेळी सतावणाऱ्या दुखापती व त्यावर केलेली मात याबद्दल वाचताना सचिनची थोरवी व त्याची खेळाप्रतीची निष्ठा परत एकदा अधोरेखित होते व त्याचे निवृत्तीचे वानखेडे वरून केलेले भाषण परत वाचायला मिळते या जमेच्या बाजू ...

हे म्हणजे मिसळ खायला जावे .. छान चांदीच्या थाळीतून मिसळ समोर यावी ... पण
- अरे तर्री कुठाय?
- तर्री कशाला ? चांदीची थाळी दिली आहे कि
- बर थोडा कांदा तरी ...
- कांदा??? चांदीची थाळी आहे कि
-बर फरसाण .... चांदीची थाळी ....
अहो मिसळ खाणाऱ्याला चांदीच्या थाळीचे कौतुक नसते हो .. हे त्या बोरिया मुजुमदारला कोणीतरी समजावुन सांगा ..

ता.क. : हे पुस्तक वाचल्यावर मूळ मसुदा लिहून झाल्यानंतर तो वकील PR आणि इमेज कन्सल्टंट यांच्या टीम ने "सेन्सॉर" केला असावा असे वाटते ..
आपण हे पुस्तक वाचले असेल तर आपले मत जरूर सांगा .. वाचले नसेल तर ... फार काही गमावलेले नाही ...

पुन्हा ता.क. : हे पुस्तक वाचल्यावर सचिन चा चित्रपट बघावा का (किंवा का बघावा) असा प्रश्न पडला आहे

धर्मराजमुटके's picture

11 Jun 2017 - 10:20 am | धर्मराजमुटके

विथ ड्यु रिस्पेक्ट फॉर यु (सचिनवरचे पुस्तक विकत घेऊन वाचल्याबद्दल), सचिन आणी अमिताभ ! पण सचिन आणि अमिताभ यांच्या बायकापोरांना कदाचित माहित नसतील एवढया सगळ्या गोष्टी माध्यमे कित्येक वर्षे आपल्यासमोर भसाभसा ओतीत आहेत. सचिन आणि अमिताभ मला पण आवडतात. पण जाहिरातीत, बातमीत यत्र तत्र सर्वत्र त्यांना झेलणे आता अवघड झाले आहे. आपली ब्रँड व्हॅल्यू आहे ती अगदी उसाचा रस काढतात त्याप्रमाणे पिळून पिळून त्यातून कमाई करायची असा त्यांचा समज झालेला दिसतोय असे मलातरी वाटते. कायेकी दोघांनीही आपली प्रतिमा अगदी घाऊक प्रमाणात विक्रीला काढल्यामुळे त्यांची प्रतिमा माझ्यासारख्या अनेकांसमोर अगदीच किरकोळ झालेली आहे असा माझातरी (गैर !) समज झालेला आहे.

सचिन चं आत्मचरित्र भन्नाट बोर आहे... कुणीतरी अगदी चपखल म्हटलेलं: It is a mile long and an inch deep!

अमर विश्वास's picture

11 Jun 2017 - 10:58 am | अमर विश्वास

धर्मराजजी
मी सचिनचा फॅन नाही .. पण हा ३० वर्षांचा क्रिकेटचा इतिहास या दृष्टीकोनातून वाचले .. अर्थात भ्रमनिरस झाला .. तो माझ्या प्रतिक्रियेतही दिसतोच .. विशेषतः माझा ता.क. जर वाचलात तर मी वकील PR आणि इमेज कन्सल्टंट इत्यादी वर (थोडक्यात व्यापारीकरणावर) टीकाच केली आहे :)

बाकी विकत घेऊन वाचण्याबद्दल ... मला हिटलर पण आवडत नाही. तरी मी नाझी भस्मासुराचा उदयास्त विकत घेऊनच वाचले ... (ह.घ्या :) :) )

मुक्त विहारि's picture

11 Jun 2017 - 12:16 pm | मुक्त विहारि

हे बहुतांशी एकाच भुमिकेतून लिहितात, अपवाद श्री. वसंत शिंदे ह्यांनी लिहिलेले आर्मचरित्र. (पुस्तकाचे नांव विसरलो.)

बाकी मग ते शांतारामा असो , हसरे दू:ख असो, शहेनशा असो किंवा सनी डेज असो. सगळे मी-मी वर आधारीत.

खूल्लम खूल्ला लिहिणारे जवळपास नाहीतच, असे मला वाटते.

गामा पैलवान's picture

11 Jun 2017 - 2:27 pm | गामा पैलवान

मुक्तविहारी,

मला वाटतं की आत्मचरित्र वाचनीय होण्यासाठी जीवनप्रवास तितकाच रोचक असावा लागतो. सचिन वा अमिताभ यांना त्यांच्या क्षेत्रांत संघर्ष खूप करावा लागला. मात्र तो वगळता बाकीचं आयुष्य लोकांना एकसुरी वा कंटाळवाणंही वाटू शकतं. आत्मचरित्रात केवळ एका क्षेत्राचा विचार न करता समग्र आयुष्याचं प्रतिबिंब पडायला हवं. त्यामुळे सचिन/अमिताभ यांची आत्मचरित्रे रोचक बनवणे ही एक व्यावसायिक कला या अर्थी बघायला पाहिजे.

एखाद्या थरारक चित्रपटात मूळ कथाबीज एक असतं आणि इतर घटना पूरक म्हणून दाखवल्या जातात. तशी सोय आत्मचरित्रात उत्पन्न करणं हे त्या व्यावसायिक लेखकाचं कौशल्य आहे.

आ.न.,
-गा.पै.

+ १

किंबहूना ह्यामुळे मला, मेळघाटातील मोहोर, ही तर श्रीची इच्छा, आणि दोन हात, बॅरिस्टराचे कार्ट इत्यादी आत्मचरित्रे आवडली असावीत.

अत्रारचा फास - नारायण धारप :)

शिवाजी कोण होता? - गजानन भास्कर मेहेंदळे
त्या काळचे उत्तम ऐतिहासिक विवेचन. 15% पर्यंत वाचून झालंय. निजामशाही संपली तिथपर्यंत.

Six Easy Pieces - Essentials of Physics - रिचर्ड फाईनमन
सुप्रसिद्ध फाईनमन लेक्चर्स चा भाग. भौतिक शास्त्राचा विचार कसा करावा यासाठी जरूर वाचावे. अर्धेअधिक वाचून झालेय

कपिलमुनी's picture

12 Jun 2017 - 10:30 am | कपिलमुनी

'शिवाजी कोण होता' याच नावाचे एक पुस्तक गोविंद पानसरे यांनी लिहिला आहे :)

यायला, गल्तीसे मिष्टेक हो गया.
श्री राजा शिवछत्रपती (चा अनुवाद-टाईप) : Shivaji : his life and times

वरुण मोहिते's picture

12 Jun 2017 - 11:07 am | वरुण मोहिते

पंकज कालुवाला ह्याच एक चांगलं पुस्तक आहे . ते वाचतोय सध्या ४-५ दिवसांपासून . त्यात इंदिरा गांधी ह्यांची हत्या त्याचे परिणाम . राजीव गांधी ह्यांची हत्या त्याचे परिणाम ,जनरल झिया उल हक,बेनझीर भुट्टो ,सद्दाम हुसेन ,श्रीलंकेचे भंडारनायके ,इस्राईल चे यित्झाक राबिन ,अफगाणिस्तानचे हाफिझउल्लाह अमीन अश्या अनेकांच्या हत्येची माहिती आहे . पुस्तक मोठं आहे पण चांगलं आहे .

माझ्याकडे "रा का बर्वे" या लेखकाने लिहिलेले याच नावाचे पुस्तक आहे.

तुम्ही म्हणताय त्या पुस्तकाची अनुक्रमणिका देऊ शकाल का..? किंवा ISBN नंबर..?

वरुण मोहिते's picture

13 Jun 2017 - 9:00 am | वरुण मोहिते

९७८-९३-८६०५९-००-० .

मोदक's picture

13 Jun 2017 - 9:42 am | मोदक
अद्द्या's picture

12 Jun 2017 - 1:31 pm | अद्द्या

The discovery of India.
नेहरूंचे हे पुस्तक भेट म्हणून मिळालंय.. तेच सुरुवात करतोय आता.

चिगो's picture

12 Jun 2017 - 4:46 pm | चिगो

Game of Thrones वाचतोय.. ५व्या सिझन पर्यंत मालिका पाहिलीपण होती.. आज दुपारीच 'किंग जॉफरी' गचकला..

अद्द्या's picture

12 Jun 2017 - 4:50 pm | अद्द्या

देव तुम्हाला spoilers पासून वाचवो

मस्त. लय भारी. सगळी बुकं वाचून नंतरच पुढचे सिजन पहा.

सागर's picture

12 Jun 2017 - 8:36 pm | सागर

सध्या भा.रांनी लिहिलेली शेरलॉक होम्स ही ५ छोट्याशा पुस्तकांची सिरिज डोके हलके व्हावे म्हणून वाचतोय. पुढच्या आठवड्यात एक मोठे पुस्तक घेईन.
बहुतेक कुरुंदकर अथवा शेषराव मोरे अथवा दुर्गा भागवत यांपैकी एक.

रातराणी's picture

13 Jun 2017 - 10:13 am | रातराणी

मिरासदारी
=))
व्यंकुची शिकवणी आणि शिवाजीचे हस्ताक्षर अगणित वेळा वाचूनही प्रत्येकवेळी तेवढंच हसू येतं.

प्रेटी गर्ल्स - करीन स्लाउटर

आजकालच्या कल्पित गुन्हे/थरार लेखिका फारच grotesque लिहितात :(

अ‍ॅमी - तुझ्या लाडक्या पॉला हॉकिन्सचं (गर्ल इन अ ट्रेन वाल्या बै) नवं पुस्तक आलंय म्हणे.

awww अर्धे पुस्तक वाचेपर्यंतच त्या बाई माझ्या लाडक्या होत्या. पूर्ण पुस्तक वाचून भ्रमनिरास झालेला :D

हो नवीन पुस्तक आलय तिचं माहित होतं.

सध्या मी फारच क्रीपी पुस्तक वाचतेय you, the breakdown, the couple next door, end of watch, woman in cabin-10... जरा ब्रेक घेऊन वुडहाउस वगैरे वाचायला पाहिजे आता ^_^

माझंही असंच मत झालं. किंबहुना ती नायिका सारखी टल्ली होऊन आगगाडीतून चकरा मारायला लागल्यावरच वैताग यायला लागला होता. हॉकिन्स असूनही डाळ शिजली नाही.

हॉकिन्स असूनही डाळ शिजली नाही. >> =))

अभ्या..'s picture

19 Jun 2017 - 9:29 am | अभ्या..

हाहाहा
तिच्या प्रेस्टीजचीच शिट्टी वाजवली.
=))

वरुण मोहिते's picture

15 Jun 2017 - 6:17 pm | वरुण मोहिते

बोलणार्यांबद्दल असं बोलू नका हो :))
असो वुडहाऊस आवर्जून वाचाच सगळ्यांनी .
फिरत फिरत चर्चगेट ला मागे मिळालेलं पुस्तक आता परत वाचायला घेईन .
नाव सिलेक्टड शॉर्ट स्टोरीज .
आय एस बी एन नंबर -८१-९०३२६८ -३ -एक्स
वाचून पहा छान आहे . ओ हेन्री पासून चेकॉव्ह ह्या सगळ्यांच्या कथा आहेत . माझा एक भाग वाचायचा राहिलेला म्हणून वाचतोय परत . ७०० -८०० पानाचं आहे पुस्तक .

वुडहाऊस आवर्जून वाचाच सगळ्यांनी >> येस. वाचावाच लागणार आहे आता. नाहीतर मलाच टल्ली व्हावे लागेल क्रिपी गोष्टी वाचून झोप येणे बंद झाले म्हणून :-P

===
कोणाकडे jeeves चे epub कलेक्शन आहे का? किंवा कुठून डाउनलोड करता येईल?

आदूबाळ's picture

16 Jun 2017 - 2:50 pm | आदूबाळ

इथे बरीच आहेत. एकदोन जीव्जचीही आहेत. पण क्लासिक जीव्ज (आन्ट्स आरन्ट जेन्टलमन वगैरे) नाही दिसली.

http://www.gutenberg.org/ebooks/author/783

हो ती सगळी झालीयत वाचून कधीच :)

प्रभू-प्रसाद's picture

17 Jun 2017 - 11:30 pm | प्रभू-प्रसाद

सध्या फक्त मिपा..
बाकी वपु, सुशि ची पारायणे झाली आहेत.

अमर विश्वास's picture

19 Jun 2017 - 10:54 am | अमर विश्वास

वीकएंड ला आवराआवरी करताना MBA च्या काळात वाचलेली दोन पुस्तके हाती लागली ..
Third Wave आणि future shocks .. दोन्ही Alvin Toffler ची ..
त्याने १९८० साली लिहिलेले आजही अनुभवास येते ...

(अधाशी ) मुवि

एस's picture

20 Jun 2017 - 11:54 am | एस

'जैतापूरचे अणुमंथन'
लेखक: राजा पटवर्धन
ग्रंथाली प्रकाशन.

वरुण मोहिते's picture

30 Jun 2017 - 11:50 am | वरुण मोहिते

४ वर्षांपूर्वी आलंय. वीजनिर्मिती उद्योगातील अपघात ,अणुवीज प्रकल्प जागतिक पसारा ,जैतापूर चे राजकारण असे काही भाग वाचनीय आहेत .
आय एस बी एन नंबर -९७८-९३-८००९२ -७३-७

अमरेंद्र बाहुबली's picture

30 Jun 2017 - 11:29 am | अमरेंद्र बाहुबली

मला राऊ ही ना.स ईनामदारांची कादंबरी pdf मध्ये मिळेल का? कृपया सांगावे.

विचित्रा's picture

30 Jun 2017 - 12:26 pm | विचित्रा

गणेश मतकरींचं इन्स्टॉलमेंट
शिवाय त्यांनीच संपादित केलेल्या रत्नाकर मतकरींच्या श्रेष्ठ कथा.

टेड बंडीबद्दल अधिक जाणून घ्यायची इच्छा होती म्हणून the stranger beside me वाचायला चालू केलं होतं. पण लेखनशैली फारशी पकड घेणारी वाटली नाही. सुरुवातीची 2 3 पानच वाचली आहेत. कोणी वाचलंय का हे पुस्तक? पुढे पुढे पकड घेतं का??

सध्या हॅरी पॉटर अँड करस्ड चाईल्ड वाचतेय.

कुठे थांबावं हे खूप लोकांना कळत नाही. अवचट त्यात आलेले पाहून दु:ख झालं खूप. कालांतराने ढासळत गेलेलं दीर्घ लेखनकरियर असण्यापेक्षा वन-बुक-वंडर परवडले. >>>> +१००००. बहुप्रसव होणे म्हणजे दर्जा घसरणे.

मुक्त विहारि's picture

1 Jul 2017 - 4:11 pm | मुक्त विहारि

ह्याला काही अपवाद....

१. बाबूराव अर्नाळकर (ह्यांनी १४००च्या वर लेख आणि कादंबर्‍या लिहिल्या आहेत.सध्या "निवडक बाबूराव" वाचत आहे. ह्या व्यक्ती विषयी परत कधी तरी.)

२. प्र.के.अत्रे

३. ग.दि.माडगूळकर

आणि

४. पु.ल.देशपांडे

जाताजाता वाचक नसतील तर लेखक होत नाहीत, ही पण एक वस्तूस्थिती.कारण वरील ४ही उदाहरणे एका ठरावीक कालावधीतच होती.सध्या मात्र बहू आयामी व्यक्तीमत्वे फारच कमी किंबहूना नाहीतच.असे मला वाटते. कुणी माझे हे अज्ञान दूर केल्यास आनंदच होइल.

श्रीगुरुजी's picture

21 Jul 2017 - 3:15 pm | श्रीगुरुजी

पु. लं. बद्दल संपूर्ण सहमत!

माझ्याकडे पु. लं. ची अनेक पुस्तके आहेत. अनेकदा सर्व पुस्तकांची पारायणे केली आहेत. कोणत्याही कारणाने कंटाळा आला की पु. लं. चे कोणतेही पुस्तक उघडून वाचायला लागतो आणि कंटाळा घालवितो. माझ्या दृष्टीने पु. ल. अजरामर आहेत. पूर्वी परदेशी जाताना विमानतळावर, विमानात व परदेशात हॉटेलमध्ये रिकाम्या वेळी वाचायला पु. लं. ची पुस्तके नेत होतो.

मुक्त विहारी, काही अंशी सहमत. ४ उदा. पैकी 'गदिमा' फक्त मान्य. बाकी तिघांबद्दल वाद-प्रवाद आहेत. त्यांच्याबद्दल आदर व्यक्त करुन काही म्हणतो :

१. अर्नाळकर : कादंबर्‍या संख्येने हजारात असल्या तरी त्या सर्वच दर्जेदार म्हणायच्या ?

२. अत्रे : कमरेखालचे विनोद, घणाघाती भाषा इ. चा अतिरेक नको वाटतो.

३. पु. ल. : 'कोट्यां'चा अतिरेक शेवटी नकोसा झाला होता.
तरुणपणी वरील तिघेही माझे आवडते होते. पण आज त्यांची काही पुस्तके वाचवणार नाहीत. हेच वपुंबाबातही खरे.
तेव्हा 'संख्या' आणि 'दर्जा' यांचे नाते मला तरी व्यस्त च वाटते.

कुमार१'s picture

2 Jul 2017 - 11:00 am | कुमार१

मराठीतील एक ख्यातनाम लेखक लक्ष्मण लोंढे यांचे २०१५ मध्ये झाले. गेल्या वर्षी त्यांचा प्रथम स्मृतीदिन साजरा झाला व त्यानिमित्ताने ‘ओंजळभर’ हा स्मृतीग्रंथ प्रसिद्ध झाला. त्या ग्रंथाशी माझा काही कारणाने संबंध आल्याने माझ्या या आवडत्या लेखकाच्या काही पुस्तकांची आठवण चाळवली गेली. त्यापैकी ‘लक्ष्मणझुला’ या पुस्तकाबद्दल काही लिहावेसे वाटते.

हे पुस्तक हा ३० लेखांचा संग्रह आहे. मूळ लेख पूर्वी ‘अंतर्नाद’ मासिकात सदर रूपाने प्रसिद्ध झाले होते. हे पुस्तक म्हणजे ललितगद्याचा एक उत्कृष्ट आविष्कार आहे. त्यातील लेख हे निसर्ग, विज्ञान आणि सौंदर्य या त्रिमूर्ती भोवती गुंफलेले आहेत. ‘प्रकृती कडून संस्कृतीकडे’ या लेखात हे स्पष्ट केले आहे की उपाशी पोटाने संस्कृतीच्या गप्पा मारता येत नाहीत पण, निदान पोट भरल्यावर तरी माणसाने संस्कृतीकडे वळले पाहिजे आणि तिचा मूलाधार आहे ती प्रेमभावना.

माणसाने पर्यावरणाची जी नासधूस चालवली आहे त्यावरील मार्मिक टिपणी एका लेखात केली आहे. निसर्गाने माणसाला हवा, सूर्यप्रकाश, पाणी, जमीन यासारख्या गोष्टी अगदी फुकट दिल्या आहेत पण आपण त्यांची हवी तेवढी कदर केलेली नाही याची जाणीव त्यातून होते.
स्थापत्यशास्त्रातल्या प्रगतीचा माणसाला केवढा गर्व असतो. पण जेव्हा आपण सफेद मुंग्यांनी तयार केलेल्या ५-६ मीटर्सच्या उंचीची वारूळे बघतो तेव्हा या नैसर्गिक चमत्कारापुढे आपल्याला नतमस्तक व्हावे वाटते याचे भान आपल्याला एका लेखातून येते.

‘कांचनमृगाच्या शोधात’ हा आपल्याला आत्मपरिक्षण करायला लावणारा लेख. ‘प्रगती’ कशाला म्हणायचे या मुद्द्याभोवती गुंफलेला हा लेख. प्रगतीचा आपण लावलेला ‘सतत वाढ’ हा निकष लेखकाच्या मते चुकीचा आहे. वाढ आणि विकास यातील फरक अगदी चांगल्या प्रकारे समजावून लेखक सुचवतो की प्रगतीची एकमेव फूटपट्टी पैसा हीच नसली पाहिजे.

पुस्तकाच्या मध्यात असलेला ‘हृदया हृद्य येक जाले’ हा लेख तर खरोखरच कळसाध्याय म्हणावा लागेल. आता अतिप्रगत संगणक युगात माणूस माणसाशी ‘जोडला’ गेलेला आहे खरे पण तो केवळ मेंदूने. त्याबरोबर माणसे एकमेकांशी हृदयाने जोडली गेली आहेत का हा लेखकाने उपस्थित केलेला प्रश्न आपल्याला अंतर्मुख करून जातो, नव्हे, सतावतो.

‘एक टक्क्याचा खेळ’ हाही एक विचारप्रवर्तक लेख. आपला समाज हा असंख्य गटातटात विभागला गेला आहे. अशा विविध गटांची टक्केवारी काढून मग अल्पसंख्य गटांना कमी लेखण्याचे वा हिणवण्याचे प्रकार सतत चालू असतात. या संदर्भात एका मूलभूत शास्त्रीय सत्याकडे लेखक आपले लक्ष वेधतो. ते म्हणजे मानव आणि चिपांझी माकड या दोघांच्या ‘डीएनए’ मध्ये फक्त १ टक्क्याचा फरक आहे. म्हणजे, अखिल मानवी संस्कृतीच फक्त १ टक्क्याची संस्कृती आहे. तेव्हा अजून माणसामाणसांत भेद वाढवणारी टक्केवारी आपण गाडून टाकायला हवी आहे की नाही?

.. तर असे एकाहून एक सरस लेख असणारे हे पुस्तक. प्रत्येक लेख सरासरी ४ पानांचा. हेही एक आकर्षण. निसर्ग –विज्ञान- तत्त्वज्ञान यावरचे सोप्या भाषेतील सुरेख चिंतन. हे पुस्तक माझ्या संग्रही गेली १५ वर्षे आहे. साधारणपणे १०-१२ वर्षांनंतर आपल्या संग्रहातली काही पुस्तके ‘शिळी’ वाटू लागतात. पण हे पुस्तक त्याला नक्कीच अपवाद आहे. दर ३ महिन्यातून मी ते एकदा बाहेर काढतो, त्यातील एखाद्या लेखाचा मनापासून आस्वाद घेतो. आयुष्यभर जवळ बाळगावे असे हे पुस्तक आहे.

एमी's picture

21 Jul 2017 - 2:40 pm | एमी

Double indemnity झक्कास आहे!!

James M. Cain ने लिहिलेले Mildred Pierce पण आवडले होते!

ओम शांती ओम चित्रपटात राम कपूर ला तीन तीन फिल्मफेअर नामांकन मिळालेली असतात. तिन्हीत तेचते बाहें फैलाने असतं, तीचती शिफॉन साडीतली हिरवीण केस उडवत पळत येते, तेचते आ आ आ आ आ संगीत....

मराठी आंजादेखील तसंच आहे. तीचती पापड लोणची करणारी, भाकर्या बडवणारी आई आजी पणजी चुलतसासु मावशी... किंवा तेचते रम्य बालपण...

जर कोणाला यातली दुसरी गोष्ट ऐकूनऐकून बोर झालं असेल तर Let's pretend this never happened वाचा. टोटल लोटपोट आहे.

गामा पैलवान's picture

25 Jul 2017 - 12:44 pm | गामा पैलवान

अॅमी,

मराठी आंजादेखील तसंच आहे. तीचती पापड लोणची करणारी, भाकर्या बडवणारी आई आजी पणजी चुलतसासु मावशी... किंवा तेचते रम्य बालपण...

या विधानाशी सहमत आहे. मराठी आंजा महिला क्रिकेटप्रमाणे आहे. एकतर खेळ पुरुषी क्रिकेटच्या मानाने मंद असल्याने कमी प्रेक्षणीय, शिवाय खेळाडूही विशेष प्रेक्षणीय नाहीत. महिला क्रिकेटचं काही खरं नाही बुवा!

आ.न.,
-गा.पै.

वि.सू. : स्त्री ही अनंतकाळाची माता आहे हे पटवण्यासाठी महिला क्रिकेटाचं उदाहरण दिलं आहे.

.

हे वाचले.. २००४ ते २००८ इतका काळ संजय बारू यांनी मनमोहन सिंग यांचे मिडीया अ‍ॅडव्हायजर म्हणून काम पाहिले.

एकंदर मनमोहन सरकारची कामगिरी आणि दोन दोन सत्ताकेंद्रे बिचारे मनमोहन कसे सांभाळत होते याचे यथार्थ वर्णन आहे.

अपेक्षित असले तरी पुस्तक वाचताना धक्क्यावर धक्के बसत होते.

एमी's picture

4 Aug 2017 - 11:03 am | एमी

James Hadley Chase ची सगळी 90 पुस्तकं मिळाली.आता एकेक करून वाचणार !

सध्या A wrinkle in time वाचतेय.

===
साहित्य/संपादक हे पुस्तकां विषयीचे सगळे धागे नीट लावून 'वाचू आनंदे' सारखा वेगळा विभाग करता येईल का? त्यात साध्या काय वाचताय, कोणती पुस्तक खरेदी केली, कुठे प्रदर्शन चालुय, कुठे काही स्कीम चालुय, पुस्तकंच्या समीक्षा सगळे धागे टाकता येतील.

जेडी's picture

4 Aug 2017 - 2:58 pm | जेडी

विरंगी मी विमुक्त मी
लेखिका: अंजली जोशी
प्रकाशनः शब्द पब्लिकेशन

अंजली जोशी यांची ही कादंबरी, मुख्यतः स्त्रियांच्या कामेच्छा आणि त्या पुर्ण करण्यासाठी काय करावे ह्यावर बेटी डॉडसन केलेल्या प्रयत्नांचा मागोवा आहे. स्त्रियांनी तर ही कादंबरी नक्किच वाचायला हवी...सविस्तर लेख पुन्हा केव्हातरी..

जग बदल घालूनी घाव - एकनाथ आवाड

.
.
.

एमी's picture

22 Oct 2017 - 11:13 am | एमी

Tana French चं In the Woods वाचायला चालू केलं आहे नुकतंच. रोचक वाटतय सध्यातरी.