पिढींमधला टेक्निकल गॅप - वाढत आहे/कमी होत आहे?

अत्रे's picture
अत्रे in काथ्याकूट
28 May 2017 - 7:54 am
गाभा: 

आजकाल आपण बघतो की बऱ्याच 50-60 च्या वरती वय असणाऱ्याना नवीन टेक्नॉलॉजी (स्मार्टफोन, इंटरनेट) शिकायला अवघड जाते / त्यात रस नसतो. या उलट शाळेतल्या मुलांना मात्र या गोष्टी लवकर समजतात/ हाताळता येतात.

मिपावरच्या वयस्कर लोकांकडून हे जाणून घ्यायला आवडेल कि ते स्वतः तरुण असताना त्यांच्या आणि त्यांचा वडीलधाऱ्या पिढीमधला "टेक्निकल गॅप" केवढा होता? आजच्या इतकाच का खूप छोटा? तेव्हा सुद्धा 50-60+ लोकांना तेव्हाची नवीन टेक्नॉलॉजी वापरायला अवघड जात असे का?

याच अनुषंगाने अजून एक प्रश्न - आजपासून पन्नास वर्षांनी अशी काय टेक्नॉलॉजी येईल असे तुम्हाला वाटते; जी आजच्या तरुण लोकांना "अवघड" जाईल?

प्रतिक्रिया

गामा पैलवान's picture

28 May 2017 - 11:39 am | गामा पैलवान

अत्रे,

इच्छाशक्ती मजबूत असेल तर उतारवयात प्रोग्रामिंग देखील शिकता येतं. पुरेसा वेळ दिल्यास कुठलंही कौशल्य कितीही कठीण वाटलं तरी कुठल्याही वयात आत्मसात होतं. शिकायची इच्छा हवी.

आ.न.,
-गा.पै.

दशानन's picture

28 May 2017 - 11:54 am | दशानन

सहमत.

उपयोजक's picture

30 May 2017 - 11:16 am | उपयोजक

म्हणजे IT सेक्टरमधले एवढे लोक कमी करताहेत updated नाहित म्हणून.या सगळ्यांना इच्छा नाही शिकण्याची?

कंजूस's picture

28 May 2017 - 9:16 pm | कंजूस

छापील माध्यमातून इलेक्ट्रॅानिक/डिजिटल माध्यमात जाणे ही मोठी उडी होती. आताची पिढी डिजिटलमधून डिजिटलमध्येच जात आहे अथवा जाणार आहे. फरक काही नाही.
पुढचे तंत्रज्ञान बोलणे ऐकणे यावर असेल. हातात धरायचे फोन जातील. पण एकवेळ अशी येईल लोक परत मातीच्या घरात जायला तयार होतील डिजिटलपासून दूर॥

गामा पैलवान's picture

28 May 2017 - 11:22 pm | गामा पैलवान

कंजूस,

पुढील तंत्रज्ञान बोलणे-ऐकणे यावर असेल या विधानाशी असहमत. माहितीचं ग्रहण व पृथक्करण करण्यासाठी ऐकणे ही फार सावकाश प्रक्रिया आहे. वाचणे त्यामानाने कमी वेळात होते. मात्र ऐकण्याचा वेग वाढवण्यात यश आलं किंवा आवाजाचं थेट विचारांत रुपांतर करणं शक्य झालं तर मात्र परिस्थिती वेगळी असेल. असा आपला माझा अंदाज.

आ.न.,
-गा.पै.

टचस्क्रिनपेक्षा बोलून फोन चालू बंद करणे,कॅाल लावणे, सर्च केलेला मजकूर ऐकणे,घरातल्या वस्तूंशी संपर्क बोलून, फिंगरप्रिंट स्कॅनरऐवजी आपल्या आवाजाचा आइडी ठेवणे वगैरे.

हे तंत्रज्ञान तर केव्हा पासून उपलब्ध आहे. माझ्या फोनमध्ये वरील सर्व सुविधा आहेत व माझा डिड वर्ष जुना फोन आहे.

*घरातल्या वस्तूंशी संपर्क बोलून
हे पण आता उपलब्ध झाले आहे, फक्त त्यासाठी थोडे पैसे जास्त खर्च करावे लागतील.

अरुण मनोहर's picture

29 May 2017 - 5:51 am | अरुण मनोहर

मी जेव्हा २२ वर्षांचा होतो तेव्हा माझे वडील ५3 वर्षांचे होते. आमच्याकडे त्यावेळी स्वयंपाक करायला स्टोव्ह वापरात. मी इंजिनियरिंगच्या स्कॉलरशीपचे पैसे वापरून आईला गॅस आणून दिला. तेव्हाची आठवण- वडील "नवीन चोचल्यांसाठी पैशाचा अपव्यय" म्हणून खूप सांतापले. त्यांनी तीन चार महिने गॅसवर शिजविलेले खाल्ले नव्हते. आईलाच त्यांच्यासाठी स्टोव्हवर वेगळा स्वयंपाक करावा लागायचा. मात्र लवकरच त्यांना गॅसचे महत्व कळले आणि ते स्वतःच सगळ्यांकडे गॅसची तरफदारी करू लागले.

याउलट अनुभव म्हणजे माझे आजोबा (वडिलांचे वडील) त्यांच्याकडे तबकडीवाला ग्रामोफोन ते तरुण असतानापासून होता. तसेच माझ्या वडिलांनी रेडिओ अगदी तरुणपणी विकत घेतला होता. फिलिप्सचा लाकडी खोकेवला व्हॉल्व्ह रेडिओ दुरुस्त करायला देखील ते स्वतःच प्रयोग करून शिकले. त्याची काटा फिरविणारी तुटलेली दोरी, किंवा खराब झालेला व्हॉल्व्ह बदलत ते तास न तास त्याच्याशी खेळात बसत. मला टेकनॉलॉजिची आवड वडीलांमुळेच लागली असे म्हणायला हरकत नाही.

गॅसचे उदाहरण हा त्यांच्या टेकनॉलॉजि द्वेषाचा नव्हे, तर काटकसरी वृतीचा नमुना होता.

पुंबा's picture

29 May 2017 - 10:27 am | पुंबा

वडील "नवीन चोचल्यांसाठी पैशाचा अपव्यय" म्हणून खूप सांतापले. त्यांनी तीन चार महिने गॅसवर शिजविलेले खाल्ले नव्हते.

अवांतर होईल खरे, पण हे सगळ्याच घरी होत असते की काय माहित. मुलाने नविन गोष्टी घरात विकत घेणे वडिलांना रुचत नाही असे निरिक्षण आहे.

दशानन's picture

29 May 2017 - 11:01 am | दशानन

+1

असाच काहीसा अनुभव माझा देखील आहेत, फक्त फरक एवढाच की बाबा स्वतःचे जेवण सोडत नसतं फक्त माझी बकोटी धरून बाहेर फेकत :D

सुबोध खरे's picture

30 May 2017 - 12:27 pm | सुबोध खरे

आमचे वडील आज स्मार्ट फोन वापरत आहेत आणि त्यांचा व्हॉट्स ऍप्प अकाउंट सुद्धा आहे. फोन वर ते आपल्या वरिष्ठ नागरिकांच्या सहलीचे किंवा कार्यक्रमांचे फोटो व्यवस्थित काढतात. त्यामुळे मोठ्या हौसेने दिलेला पॉईंट अँड शूट कॅमेरा धूळ खात पडला आहे. पे टी एम चा वापर करून विजेचे वय वर्षे ८१ पूर्ण. शिक्षण बी ए एल एल बी डी बी एम. आमची आई सुद्धा स्मार्ट फोन व्हॉट्स ऍप्प वापरते. वय वर्षे ७७. शिक्षण एम ए बी एड त्यांच्या बायकांचा ग्रुप आहे वय वर्षे ६५ + ग्रुपचे नाव गॅंग ऑफ गर्ल्स ( होय वस्तुस्थिती आहे). व्हॉट्स ऍप वर फोटो काढते. शिकायला थोडा वेळ लागतो पण प्रयत्न सतत चालू असतात. जे जमत नाही ते नातवंडांकडून जाणून घेतात.
आई आणि वडील हे शास्त्र शाखेचे विद्यार्थी नाहीत परंतु नवीन तंत्रज्ञान शिकण्याची जिद्द असली कि काहीही साध्य होऊ शकते

एकदा स्कील सेट अवगत झाला की अपडेट होत राहाणं मात्र आवश्यक आहे. तो काही विषेश प्रश्न नाही.

खरा प्रश्न वैचारिक गॅपचा आहे. उदा. नव्या पिढीला लिव-इनमधे रस आहे आणि वैवाहिक कमीटमेंट नको वाटते आहे. युवक-युवतींचे संबंध मुक्त झाल्यामुळे सेक्स ही व्यक्तिगत बाब न राहाता, एक अनुभव म्हणून पाहायची फॅशन आली आहे. मनोरंजन आणि व्यसनं याकडे पाहायचा दृष्टीकोन संपूर्ण बदलला आहे. पैसा मुबलक उपलब्ध झाल्यामुळे राहाणीमानात उधळेपणा आला आहे. लहान वयात कार किंवा बाईक्स उपलब्ध झाल्यानं शारीरिक कष्ट आणि व्यायाम याकडे पाहाण्याचा दोन पिढ्यातला दृष्टीकोन कमालीचा बदलला आहे. बहुतेक तरुणाई दीड-दोन किलोमीटर चालायला राजी नसते.

माझ्या मते टेक्निकल गॅपपेक्षा ही वैचारिक गॅप फार मोठी आणि सांधता न येणारी बाब आहे.

उपेक्षित's picture

30 May 2017 - 4:48 pm | उपेक्षित

काही सदस्यांना सेक्स या गोष्टीचे इतके आकर्षण आहे कि जिथे जाईल तिथे तीच गोष्ट दिसत आहे.
धाग्याचा इशय काय आपण बोलतोय काय कूच टोटलीच नय लग्रेला हय ...

साला काही दिवसांनी पाककृती धाग्यावर पण हे लोक सेक्स बद्दल ज्ञान पाजळू लागतील काय सांगता येत नाय.

संजय क्षीरसागर's picture

30 May 2017 - 5:05 pm | संजय क्षीरसागर

काही लोकांना विषयाची व्यापकताच कळत नाही. त्यांना वैचारिक गॅपविषयी लिहीलंय की सेक्श्युअल ज्ञानाविषयी हेच कळत नाही .

धर्मराजमुटके's picture

30 May 2017 - 9:02 pm | धर्मराजमुटके

पिढींमधला टेक्निकल गॅप - वाढत आहे काय ?
होय नक्कीच. विशेषकरुन पुण्यात ! बर्‍याच माणसांना अजुनही हेल्मेट घालायला शिकायला जमत नाहिये ! :)

सर्व प्रतिसादाबद्दल आभार. कंजूस म्हणतात तसे टेक्निकल गॅप खूप वाढणार नाही असेच वाटते, बघूया काय होते..

काही जणांचे म्हणजे आहे कि शिकण्याची इच्छा असेल तर सध्याच्या वयस्कर लोकांना अवघड जात नाही - पण ही शिकण्याची इच्छा कशी निर्माण करावी हा पण एक प्रश्न आहे :) माझ्यामते तरुण लोकांनी घरात थोडा पेशन्स घेऊन नव्या टेक्नॉलॉजिचा वापर कसा करावा हे वयस्कर लोकांना शिकवले तर कदाचित फरक पडेल. माझ्या अनुभवावरून वयस्कर लोकांना एखादे ऍप/उपकरण जसे आहे तसे वापरायला रीलेटिव्हली सोपे जाते पण वेगवेगळ्या सेटिंग्स चेंज करताना त्रास होतो असे दिसते.

टीप: यासंबंधी ऑनलाइन शोध घेतला असता काही डॉक्युमेंट्स मिळाली.

http://cyber-seniors.ca/wp-content/uploads/2014/04/CyberSeniors_Mentor_Handbook.pdf

http://cyber-seniors.ca/wp-content/uploads/2015/02/CyberSeniors_Participants_Handbook_Tablet_Edition.pdf

यात सिनिअर सिटिझन्सना नवीन टेकनॉलॉजि कसे शिकवावी याबद्दल टिप्स दिलया आहेत.