मोदी सरकारची तीन वर्षे

आशु जोग's picture
आशु जोग in काथ्याकूट
26 May 2017 - 11:34 am
गाभा: 

मोदी सरकारची तीन वर्षे

नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या कारकीर्दीला आज ३ वर्षे झाली. त्यांच्या कारकीर्दीबाबत काय बरे वाईट मुद्दे सांगता येइल विशेषतः मागच्या मनमोहनसिंग सरकारच्या तुलनेत . . .

मला दिसतात ते मुद्दे असे

नोटाबंदी
जी एस टी सर्वसहमती
बांगलादेश जमीन वाटप सर्व सहमती

आणि मनमोहनसिंग यांच्याबाबतीत
२जी ३जी घोटाळा, मुंबई हल्ला २६/११, कसाबला यशस्वीरीत्या पकडणे आणि फाशी देणे, अफझल गुरुला फाशी देणे इ.

आपल्याला काय काय मुद्दे आठवतात !

प्रतिक्रिया

चिनार's picture

26 May 2017 - 11:41 am | चिनार

आता येणार मजा !!!

--आमच्या येथे पतंजलीचे पॉपकॉर्न मिळतील. (दु. १ ते ४ या वेळेत ज्यादा शुल्क आकारण्यात येईल.)

गामा पैलवान's picture

26 May 2017 - 12:47 pm | गामा पैलवान

हे झोपमोडशुल्क तर नव्हे? तसं असल्यास स्पष्टपणे लिहावं अशी विनंती. नव्या नियमानुसार सेवापुरवठ्याच्या व्यवसायात पारदर्शकत्व हवं.

-गा.पै.

आशु जोग's picture

26 May 2017 - 12:21 pm | आशु जोग

आता येणार मजा !!!

संपादक महोदय यापूर्वीही इतरांच्या धाग्यांवर अशा प्रकारे कमेंट टाकण्याचे प्रकार होत असत. त्यामुळे सिरीयस धाग्यांचा विचका होइ. काही जण कंपू करून ठरवून एखाद्या धाग्यावर एक सारख्या कमेंट टाकत.

यामुळे अनेक जण इथे यायचे आणि लेखन करायचे बंद झाले. प्रत्येक ठिकाणी अशा कमेंट टाकून इतरांना नामोहरम करण्याचे प्रकार हे लोक करत असतात.

कृपया आता येणार मजा आणि पॉपकॉर्न याचा अर्थ काय हे स्पष्ट करावे.

संपादक महोदय,

आपणही अशा टिप्पण्यांशी सहमत असाल तर तसे स्पष्ट सांगा. इथे लिहीणे बंद करू. कोणालाच त्रास नको. असे अपमान करण्यापेक्षा स्पष्टपणे तसे सांगितलेत तर फार बरे होइल.

स्पा's picture

26 May 2017 - 12:25 pm | स्पा

उगि उगि

चिनार's picture

26 May 2017 - 12:54 pm | चिनार

जोग साहेब,
ह्यातून आपल्या अपमानाचा उद्देश नाही. आणि ह्यामागे कोणताही कंपू नाही. वरील प्रतिसाद पूर्णतः माझा आहे.
आंतरजालावर लिहिताना गमंत,थट्टा,विषय भरकटणे ह्या गोष्टी होत असतात. त्याला इलाज नाही.
मोदी आणि त्यांचे सरकार हा विषय चावून चावून इतका चोथा झाला आहे की आता त्यावर नवीन धागा आल्यावर कोणीतरी गम्मत करणार, कोणीतरी विषय भरकटवणार, आणि कोणीतरी गांभीर्याने चर्चा करणार.
माझ्यापुरतं विचारलं..तर मी चर्चा वाचणार आणि पॉपकॉर्नही खाणार...

तरीही संपादकांना वरील कॉमेंट आक्षेपार्ह वाटत असल्यास त्यांनी डिलीट करावी.

आशु जोग's picture

26 May 2017 - 8:03 pm | आशु जोग

चिनार

आपल्या अपमानाचा उद्देश नाही.

हे सांगण्याची गरज का पडावी

ह्यामागे कोणताही कंपू नाही

(संपादित)

आनन्दा's picture

26 May 2017 - 3:37 pm | आनन्दा

विषय आलाय म्हणून सांगतो. संपादकांचे माहीत नाही, पण मला व्यक्तिशः असे त्रोटक धागे अजिबात आवडत नाही. त्या धाग्यांवर चर्चा करण्यासारखे असे काहीच नाही. तुमची नुसती मते मांडलीत, त्याचे स्पष्टीकरण दिले नाहीत. त्यामुळे अश्या धाग्यांवर दर्जेदार प्रतिसाद येतील असे मला तरी वाटत नाही.
ह्म्म.. आता क्लिंटनसारख्या आयडीने जर हा धागा हायजॅक केला तर मात्र चर्चा सुरू होऊ शकते.

जरा जास्तच स्पष्ट लिहिल्याबद्दल क्षमस्व.

उपेक्षित's picture

26 May 2017 - 12:53 pm | उपेक्षित

पॉपकॉर्न ऐवजी वडा-पाव अथवा सामोसा चालल का ?
लिहिता लिहिता साला गरवारेच्या (विमलाबाई) अण्णाच्या चटणी-पाव आन सांबार-पाव ची आठवण आली :(

विशुमित's picture

26 May 2017 - 1:03 pm | विशुमित

मिसळ खातोय.... या मिसळ खायला..!!

उपेक्षित's picture

26 May 2017 - 1:17 pm | उपेक्षित

जल्ला मेला ज्यावाय्च्या टेमाला मिसाळ चे नाव काढलात? कुठ फेडसाल हे पाप

लावा लावा आमच्या धंद्याची वाट !!
अरे कुठे फेडाल ही पापं ??
दोघान्चाही निशेध !!

अमर विश्वास's picture

26 May 2017 - 1:37 pm | अमर विश्वास

गरवारेच्या (विमलाबाई) अण्णाच्या चटणी-पाव आन सांबार-पाव
काय आठवण काढलीत उपेक्षितजी ... पाणी सुटले तोंडाला ... आता नुसते पोकॉर्न काही ग्वाड (तिखट?) लागणार नाहीत

उपेक्षित's picture

26 May 2017 - 2:12 pm | उपेक्षित

तुमी बी इम्लाबीचे का मालक ? कोणत्या ब्याच चे म्हणे ?

llपुण्याचे पेशवेll's picture

26 May 2017 - 8:04 pm | llपुण्याचे पेशवेll

वाह वाह चटणी पाव, साम्बार पाव, सामोसा पाव. काय दिवस होते ते. ढोल पथकात मिरव्णूक वाजवून झाल्यावर खायच्या मन्या गोखलेच्या पाणिदार रस्सा आणि ब्रेडची चव एक्दम तरळून गेली.

उपेक्षित's picture

26 May 2017 - 8:39 pm | उपेक्षित

येस सामोसा पाव काय लाजवाब टेस्ट असायची साला १/२ रुपयात पेट और मन दोनो भर जाता था

विखि's picture

26 May 2017 - 9:22 pm | विखि

आधी ५० पैश्याला मिळायचा चटणी-पाव आन सांबार-पाव मग १ रुपया झाला. सामोसा पाव तर इचारुच नका, पण सामोसा पाव च्या पैश्यात २/२ सांबार-पाव, चटनी पाव यायचे त्यामुळ त्याकड ओढा असायचा. अण्णाच्या त्या प्लास्टिक च्या घमील्यात चटणी असायची. १० वेळा सांबार/ चटनी घेतल तरी बी अण्णानी कधी काव काव नाय केल.
कळस म्हण्जे चटणी-पाव ची चटणी संपली की पाव त्या प्लास्टिक च्या घमील्यात पार खाल पर्यन्त बुडवायचा, पार हाताच्या कोपर्‍या पर्यन्त चटनी लागयची, तशीच ति पण वरपायची :) मग मात्र अण्णा उचकाययचा पण आमचा हावरेपणा कौतुकाने बघत असायचा.
नतंर अण्णा कर्नाटक हायस्कुल ला गेला, १/२ वेळा भेटला होता. कडकी च्या टायमात अण्णा नी लै साथ दिली राव.
त्याच्या डोळ्यातली ती माया आज बी आठवती :(

अगदी अगदी इक्या मनातले बोललास भाई ...

अमर विश्वास's picture

26 May 2017 - 2:18 pm | अमर विश्वास

नाय नाय ,, मी समोरच्या गरवारेला होतो ....
ढोल वाजवायला यायचो ... आमच्या भाषेत सेंट विमलीज ला :)