भारतात रेल्वेने प्रवास करताना काय काळजी घ्यावी?

अत्रे's picture
अत्रे in काथ्याकूट
24 May 2017 - 8:57 am
गाभा: 

आमचे एक नातेवाईक रेल्वे ने प्रवास करत होते. रात्री ३.३० वाजता कोणीतरी डब्याची चेन खेचली आणि रेल्वे थांबवली. आमच्या नातेवाईक खिडकीजवळ होत्या आणि जवळच त्यांची पर्स होती. एका चोराने बाहेरून पर्स ओढण्याचा प्रयत्न केला पण झटापटीत पर्स चा बंद तुटला आणि तो पळाला.

तुमच्या जवळ काही रेल्वेने प्रवास करताना उपयोगी येतील अशा सेफ्टी टिप्स आहेत का? अशा टिप्स ची एक लिस्ट बनवून वॉट्सअप वर फॉरवर्ड केली तर लोकांचा फायदा होईल.

धन्यवाद.

प्रतिक्रिया

स्पा's picture

24 May 2017 - 9:07 am | स्पा

लोल

सतिश गावडे's picture

24 May 2017 - 9:26 am | सतिश गावडे

लोक आता व्हाट्सपवर फॉरवर्ड करायला काहीतरी द्या म्हणू लागले आहेत ;)

अभ्या..'s picture

24 May 2017 - 9:44 am | अभ्या..

व्हाट्सप के नाम पर दे दो मालिक.
असे मागणारे भिकारी रेल्वेत दिसले की आपापल्या व्हाट्सप मध्ये डोके खुपसुन बसायचे. वर नाही बघायचे. ;)

हेमंत८२'s picture

24 May 2017 - 4:18 pm | हेमंत८२

मला तरी हे कुठे दिसले नाही इतक्या वर्षात ...नया है क्या यह?

अत्रे's picture

24 May 2017 - 9:58 am | अत्रे

लोल. विषयाला धरून प्रतिसादाच्या अपेक्षेत. वॉट्सअपचा जनप्रबोधनासाठी चांगला उपयोग होऊ शकतो असे मला वाटते. नेहमीच्या बिनडोक फॉरवर्ड पेक्षा काही उपयोगी/प्रॅक्टिकल फॉरवर्ड मेसेज बनवले तर बरे होईल. असो.

मग मलाही पुण्याच्या पिएमटी , मुंबयच्या टॅक्सी, तलावपाळी समोरचे टांगे, डोंबोलीच्या शेअर रिक्षा, मुरबाड नगर च्या खचाखच भरलेल्या वडाप, पनवेल रत्नाग्री च्या एसट्या यातुन प्रवास कसा करावा याच्या टिपा पायजेल
Watsapp app वर नया हे यह म्हणुन सेंडायला माल मिळल

पुण्याच्या पीयमटीतून प्रवास करायची इच्छा असेल तर देवच तुझे रक्षण करो. कुठल्याच यश्टीचा प्रवास नको या एकाच कारणासाठी मी कार पाळली आहे. टांगे, रिक्षा आणि वडाप तसेच गोंयच्या खाजगी बशी हे सगळे आपल्या आवाक्याबाहेरचे आहे. तिथे सुपरमॅनच पायजेल.

टवाळ कार्टा's picture

25 May 2017 - 2:53 pm | टवाळ कार्टा

कार पाळली आहे

=))

एस's picture

24 May 2017 - 12:14 pm | एस

रेल्वेत सहप्रवाशाने कितीही आग्रह केला तरी त्याच्याकडील काही खाऊ नये.
रेल्वे स्थानकावर मिळणारे बाटलीबंद पाणी हे हमखास नळाचे भरलेले असते, तेव्हा ते घेऊ नये.
आपल्या बॅगा ह्या आपल्या सीटाखाली न ठेवता समोरच्या सीटाखाली कुलूप-साखळीने बांधून ठेवाव्यात म्हणजे त्यांच्यावर आपली नजर राहते.
प्रवास करताना दागदागिन्यांचा मोह टाळावा. ते घालून प्रवास करू नये.
अजून बऱ्याच टिपा आहेत. देईन सवडीने सावकाश. प्रवासासाठी आगाऊ शुभेच्छा.

अत्रे's picture

25 May 2017 - 6:07 am | अत्रे

धन्यवाद.

आपल्या बॅगा ह्या आपल्या सीटाखाली न ठेवता समोरच्या सीटाखाली कुलूप-साखळीने बांधून ठेवाव्यात म्हणजे त्यांच्यावर आपली नजर राहते.

असे करणे अलाऊड असते का? समोरचा माणूस म्हटला आमच्या सीटखाली तुमच्या बॅगा ठेऊ नका, तर?

त्याला त्याच्या बॅगा आपल्या सीटखाली ठेवायला सांगायच्या. त्याचा फायदा सांगायचा. तरीही नाहीच ऐकलं तर मग ज्याचीत्याची बॅग ज्याच्यात्याच्या सीटखाली.

अद्द्या's picture

24 May 2017 - 12:33 pm | अद्द्या

रेल्वेने प्रवास करू नये

सिरुसेरि's picture

24 May 2017 - 12:55 pm | सिरुसेरि

रात्री झोपताना जवळ मफलर , कानटोपी / माकडटोपी बाळगावी . थंडी वाढली तर उपयोग होतो .

सिरुसेरि's picture

24 May 2017 - 12:57 pm | सिरुसेरि

रात्री झोपण्याआधी डब्यातल्या / कंपार्ट्मेंटमधल्या खिडक्या बंद ठेवाव्यात .

दीपक११७७'s picture

24 May 2017 - 1:24 pm | दीपक११७७

१. स्लिपर कोच चे टिकीट बुक करताना सधारण १०-४९ वयोगटातील व्यक्तींन साठी - उन्हाळ्यात साईड लोअर बर्थ, कारण खुप गरमतं, हिवाळ्यात आणि पावसाळ्यात हमखास अप्पर बर्थचं घ्यावे, करण खिडक्या सिल बंद नसतात त्यामुळे गारवार किंवा पाऊस आत येतो.

२. एसी कोच साठी हमखास लोअरच घ्यायचा. करण वर खुप गार लागतं. सर्व सिजन मध्ये.

टिपः- मिडल बर्थ मिळ्णे हे कुठल्याही कोच मध्ये, ती एक शिक्षाच असते.

सतिश पाटील's picture

24 May 2017 - 3:18 pm | सतिश पाटील

उत्तर भारत्तात अणि मुख्यतः दिल्ली वेगैरेला प्रवास करत असाल तर आपले सामान व्यस्थित संभाळण.
झोपताना स्लीपर किंवा पायताण लपवून ठेवावे, नाहीतर सकाळी आपण उठायच्या आधीच बरेच जण न विचारता हक्काने शौचालायासठी त्याचा वापर करतात
फक्त रेल्वेचे अधिकृत पाणीच प्यावे. इतर पाणी नकोच.
रेल्वेचे अथवा प्लेटफार्मवरचे कुठलेच उघडे अन्नपदार्थ खाऊ नयेत फले सुद्धा खाऊ नए.. घरून आणलेले किंवा बिस्किट यावरच दिवस ढकलावा
सिगरेट पित असाल तर फक्त शौचालायातच प्यावी.
चुकून सुद्धा प्यान्त्री कार मधे जाऊ नए.
खाद्यपदार्थ वाटत फिरनारे जी पोर असतात त्यांच्याशी मैत्री ठेवावी .खुप उपयोगी पडतात.

खाद्यपदार्थ वाटत फिरनारे जी पोर असतात त्यांच्याशी मैत्री ठेवावी .खुप उपयोगी पडतात.>>>>हे अगदी बरोबर आहे

नावातकायआहे's picture

25 May 2017 - 9:08 am | नावातकायआहे

भा पो.... :-)

रेल्वेने जाताना, कर्जत ला वडापाव, लोणावळ्याला चिक्की, पुण्यात सुकी भेळ ( शिवाजीनगरची सुकी भेळ मिळाली तर उत्तम), दौंड ला काहीही खायचे नाही, जेऊरला गाडी थांबत असेल तर गरमागरम वडे, कुर्डुवाडीला मस्त पैकी गरम इडली -वडा चटणी हे खायचेच.

फाऊल..! हा वेगळ्या धाग्याचा विषय आहे.

वेगळा धागा काढा तेथे बोलूया. :)

(घटप्रभा स्टेशनवर नेहमी चटणीवडा चापणारा) मोदक.

कपिलमुनी's picture

24 May 2017 - 9:48 pm | कपिलमुनी

toilet

चित्रात दाखवलेला तांब्या बरेचळा गायब असतो तेव्हा विधीसाठी स्वःतचा तांब्या किंवा बाटली घेउन जाणे

भिंगरी's picture

25 May 2017 - 11:29 am | भिंगरी

फारच स्वच्छ दिसतोय.

चित्रात दाखवलेला तांब्या जरी असला तरी त्याची कधी कधी साखळी पुरत नाही. तेव्हा विधीसाठी स्वःतचा तांब्या किंवा बाटली घेउन जाणे.

त्याच बरोबर पॅन्ट आणि सदऱ्याच्या खिशातील सर्व वस्तू अगोदरच बॅग मध्ये काढून ठेवाव्यात. चित्रात दाखवलेल्या भोकातून त्या अनावधानाने पडू शकतात.

अत्रे's picture

25 May 2017 - 12:51 pm | अत्रे

त्याच बरोबर पॅन्ट आणि सदऱ्याच्या खिशातील सर्व वस्तू अगोदरच बॅग मध्ये काढून ठेवाव्यात.

सहमत. एका मित्राचा मोबाइल असाच रेलवेच्या संडासातून खाली पडला. परत नाही मिळाला.

माझ्या बरोबर प्रवास करणाऱ्या एका आर्मी वाल्याचे आय कार्ड त्या भोकातून पडले होते. त्याने लगेच बाहेर येऊन चैन ओढली. गाडी थांबल्यावर उडी मारून तो बिचारा असला पळत होता. सुदैवाने त्याचे आयकार्ड त्याला सापडले होते.

मराठी_माणूस's picture

25 May 2017 - 2:01 pm | मराठी_माणूस

स्वतःच्या चुकीने एखादी वस्तु खाली पडली तरी साखळी ओढुन सगळ्यांचा खोळंबा केला जाउ शकतो ?

विशुमित's picture

25 May 2017 - 2:40 pm | विशुमित

या बद्दल काही माहिती नाही आपल्याला ?

धर्मराजमुटके's picture

25 May 2017 - 5:43 pm | धर्मराजमुटके

मांजा तं एचेशीचा वरीजनल रिजल्ट पडला पाकीटासहीत इथून. तां एक बरा जाला. दोन चार इषय उडाले होते आणि कागद कुठे लपवायचा ता एक प्रश्नच होता. आपसूक उत्तर गावलां ! :)

तांब्या आणि इतर साधनं पाहताना आधी नळाला पाणी आहे ते पाहुन घ्यावे ! :D
दरवाजी कडी लागते आहे का ? तसेच लागल्यावर ती उघडते आहे का ? हे पाहुन घ्यावे. बोगीत सामान टाकुन झाल्यावर हा सर्व्हे करावा, नाहीतर आयत्या वेळी वांदे व्ह्यायचे ! :D

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मिले हो तुम हमको बड़े नसीबों से चुराया है मैंने किस्मत की लकीरों से... :- Fever [ Reprise Version | Neha Kakkar | Tony Kakkar ]

योगी९००'s picture

25 May 2017 - 9:25 am | योगी९००

काळजी कुणाची? आपली की रेल्वेची?

नव्या कोर्‍या तेजस एक्स्प्रेसची लोकांनी वाट लावली असे छापून आले आहे. सो काल्ड हाय फाय लोकांनी हेडफोनपण चोरलेत. आता काळजी आपली घेण्यापेक्षा रेल्वेची घेणे जास्त जरूरी आहे असे वाटून गेले.

प्रसाद_१९८२'s picture

25 May 2017 - 10:32 am | प्रसाद_१९८२

मागे महामना व गतिमान एक्सप्रेस मध्ये देखिल अशा घटना घडल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या, आता तेजस बाबत देखिल हेच झालेय. एकुणच रेल्वे व इतर सार्वजनिक वाहनातून प्रवास करणार्‍या भारतीयांची मानसिकता एक नंबरची भिकार** झालेय.

दशानन's picture

25 May 2017 - 12:00 pm | दशानन

952 लोकांपैकी 12-14 लोकांनी हेडफोन सोबत नेली आहेत, त्यात ही रेल्वे हेडफोन परत करा हे गाडी थांबाच्या आधी सांगायला विसरली!
एवढी पण लोक वाईट नाहीत म्हणायचे या आकडेवारीनुसार

*संदर्भ नवभारत टाइम्स

भारतीयांची मानसिकता एक नंबरची भिकार** झालेय.
"झालीये" कि मुळातच "आहे"

चौकटराजा's picture

26 May 2017 - 7:24 am | चौकटराजा

मी युरोपला जाउन आल्यानंतर युरोपियन मानसिकता व भारतीय मानसिकता यांची तुलना झालीच. माझ्या मते भारत का कधीही एकसंध असे राष्ट्र नव्हते. ते अस्तित्वात आल्यानंतर मला मानसिकरित्या देखील राष्ट्र घडवायचे आहे अशी जाणीव असलेला पहिला नेता म्हण्जे नरेंद्र मोदी. तरीही ही मानसिकता बदलण्यात व सुप्रशासन आणण्यात ते कमीच पडत आहेत. कारण ती आणण्याची मानसिकता इतर केंद्रीय मंत्र्यांमधे नाही. जेंव्हा असे अनेक मोदी आय ए एस किंवा आय पी एस मधून निर्माण होतील त्यावेळी लोकाना स्वतः ला बदलावेच लागेल. अशांचे या दोन गटातील प्रमाण वाढते आहे. पण आणखी किती वर्षे "चांगल्यांची दहशत" निर्माण व्हायला लागेल हे सांगणे कठीण !

रघुनाथ.केरकर's picture

25 May 2017 - 2:30 pm | रघुनाथ.केरकर

चार वर्षापुर्वीची गोष्ट आहे, मँगलोर एक्स्प्रेस ने मी ठाण्याहुन कणकवली ला निघालो होतो. गाडी १०.३० च्या सुमारास ठाण्याहुन सुटली, पवसाचे दिवस असल्या मुळे
ग़ाडीतशी रिकामी होती, माझं वेटींग असल्याने दरवाज्या कडे पेपर टाकुन बसलो होतो. पनवेल गेल्यावर मी स्वता माझ्या डब्याची दारे आतुन लॉक केली. सुमारे २ च्या आसपास गाडी वीर स्थानकाजवळ क्रॉसींग साठी थांबली. डब्ब्याच्या मार्गीकेमधले लाइट्स सोडले तर बाकी सगळा अन्धार होता. दरवाजच्या बाजुच्या सींगल सीटवर एक५०शी मधली माउली पाय सोडुन बसली होती. तिचा नवरा अपर साईड्बर्थ वर झोपला होता. डब्ब्यात तशी थोडी जाग होती. काही लोक जागे होते. काही झोपले होते.

गाडीने १० मिनिटानी हॉर्न दीला आणी किन्चीतशी हलली. तेवढयात पाय सोडुन बसलेली माउली जोरात किन्चाळली. मी पुढे होउन विचारलं की काय झालं?, तीच्या मंगळ्सुत्राचे थोडे मणी तीच्या ओन्जळीत सांडले होते. थोडे सीटवर आणी थोडे उरलेल्या मंगळ्सुत्राला लटकले होते. पुढे झालेले सगळे समजुन गेले कि काय झालं ते. बाई एकदम घाबरली होती, इतक्यात अर्धा डबा गोळा झाला होत. सगळ्यांनी चौकश्या सुरु केल्या होत्या. ह्या सगळयात माझ्या बसायच्या पेपर चा बाजार उठला होता. मी पण मग उभ्या उभ्या चर्चेत सहभागी झालो. लोकांनी रेल्वे पोलीसांना शिव्या द्यायला सुरुवात केली होती. विक्टीम माउली पण त्यात सहभागी झाली. दोन चार शीव्यांनंतर तीला देखील थोडं मोकळं वाटलं असेल.
गाडी अजुन थांबुनच होती. चर्चा पण हळुहळु तुटक होत गेली. काही लोक मणी शोधायला गुंग होते. एवढ्यात त्या मण्यांचा असली दावेदार तीचा नवरा साईड बर्थ वरुन तिच्यावर डाफ़रला " तुका घराकडेच सांगललय, ही असली सोन्गा घालुन भायर पडा नको, सांगलाला आयकाक नको मगे बस रड्त"
एवढयात शेजारच्या मीडल्बर्थ ला बसलेली एक विसेक वर्षाची मुलगी मध्येच बोलली " बाबानु तुमी वगीच आरडा नकात, लोका न्हीजली ह्त घार काय ता? तसा पन ता ब्यांटेक्स चाच होता"

ब्यांटेक्स शब्द कानावर पडल्यावर मणी उचलणार्‍यांचा उत्साह मण्यांसारखा गळुन पडला. एक जण जमा केलेले मणी विक्टीम माउलीच्या हातात ठेवत म्हणाला की " काकी इतकेच सापडले" बाकीचे मणीरत्नम पण अलगद उठ्ले आणी आपापल्या जागेवर जाउन बसले. सगळे रेल्याक्स...

मी पण खाली बसण्यासाठी वाकलो तर पेपर गलीतगात्र अवस्थेत होते. सगळे तुकडे जमा करुन बसुया म्हटल तर काही तुकडे दरवाज्याच्या फ़टीत अडकले होते. ओढुन काढले अस्ते तर अजुन तुकडे झाले अस्ते. म्हणुन म्हटलं की दरवाजा उघडुन पेपर काढावा. म्हणुन दरवाज्याच्या जवळ गेलो. इतक्या दरवाज्याच्या खीडकीतुन बाहेर एक आक्रुती हलताना दीसली. मी सावध झालो. खीडकीची काच धाडकन खाली केली. मागे वळलो आणी दुसर्‍या दरवाज्याची काच पण खाली केली. इतक्यात माझ्यासरखा एक पेपर वेटींग वाला एक जण होता, त्याने मला इशार्‍यानेच विचारलं की काय झालं. त्याला सांगीतला की दरवाज्याच्या बाहेर हँडल ला कुणीतरी लटकलयं. तो पण टेन्शन मध्ये आला. त्याने आणी मी डब्ब्यातल्या अजुन दोघातीघाना सावध केलं. त्या दोघानी अजुन दोघाना. ५ मीनीटाच्या आत सगळ्या काचा धडाधड लावुन घेतल्या. लोवर बर्थ वर चढुन मार्गीतल्या ट्युबलाईट्स बोटाने फ़िरवुन बंद केल्या. आश्चर्य म्हणजे कुणीही गोन्धळ घालत नवता. अन्धार झाल्यावर डब्याच्या दोन्ही साइडला खीडकीतुन पाहीलं. गोव्या कडच्या डाव्या बाजुला कुणीही नव्हतं पण उजव्या साइडला मात्र १५ ते २० लोक होते. डब्यातल्या लायटी बन्द केल्यावर ट्र्याक वर ट्रेन च्या बाजुने चीटकुन असलेली १५ २० डोकी स्पष्ट दिसत होती. आमच्या पैकी ५ ७ जणांनी आकडा नक्की केला. एक जण बोलला की पोलिसांना कळवुया. दुसरा बोलला की गार्ड ला कळवु. सगळे काही न काही सागंत होते, सुचवत होते. पण करत काहीच नव्हते. मी म्हणालो की पोलिसाना डायल करा. तितक्यात विक्टीम माउली बोलल्या " साकळी वडा"
मी म्हटलो" माजे आवशी गाडी हुभीच आसा, साकळी कित्याक वडतय" ती पण शांत झाली. इतक्यात एमर्जंसी विंडो कडे बसलेली एक आजी जोरात कीन्चाळली. असली भारी किन्चाळली ना , एकदम जोरदार. कोकणात ह्या असल्या कीन्चाळण्याला "आरड पाडली " असं पण म्हणतात. थोडक्यात त्या एमर्जंसी वींडो वाल्या काकी ने बाहेरची हालचाल बघितली असणार. बाहेरच्या १५ २० डोक्याना कळालं की आपल्याला पाहीलं दोघे तीघे काळोखातुन ट्र्याक शेजारच्या गवतात घुसले. ते बघुन डब्ब्यतल्या २ ३ काचा वर झाल्या. चोर चोर म्हणुन अजुन दोघे ओरड्ले. त्यांचा आवज ऐकुन ज्या झोप्लेल्या स्त्रीव्रुंदाला ह्याची काहीच कल्पना नव्हती त्या सुधा ओरडायला लागल्या. इतक्यात गाडी चालु झाली.
चिपळुन ला क्रॉसींगला थांबेस्तोवर सगळे धास्तावलेले होतो. बरेच लोक प्लाट्फ़ॉर्म वर उतरुन रेल्वे पोलिसाना शोधत होते.
ह्या दरम्यान मी एक पुठ्ठा मिळवला बसायला कम झोपायला. आणी गाडी चालु झाल्यावर झोपी गेलो.

जबरदस्त :) :) हा एक सेपरेट लेख करून टाकू शकता.

अत्रुप्त आत्मा's picture

25 May 2017 - 3:52 pm | अत्रुप्त आत्मा

प्लस वण!

@मणीरत्नम - :D

एस's picture

25 May 2017 - 7:53 pm | एस

प्लस टू!

बाकीचे मणीरत्नम पण अलगद उठ्ले आणी आपापल्या जागेवर जाउन बसले. सगळे रेल्याक्स...

== जबरा..

पुंबा's picture

25 May 2017 - 3:23 pm | पुंबा

खतरनाक..
जबरा शैली आहे तुमची भाऊ..

पैसा's picture

25 May 2017 - 5:07 pm | पैसा

असल्या चोर्‍या कोंकण रेल्वेत पण व्हायला लागल्या?

रघुनाथ.केरकर's picture

25 May 2017 - 5:26 pm | रघुनाथ.केरकर

ताईनु आता तरी कमी झाल्येत ..... आधी खुप होते.... लोक सांगत की कोकण रेल्वेचे कॉन्ट्रयाक्ट लेबर मजुरी गावाक न्हाय म्हणान ट्रेन लुटतत.

पण आधी पेक्षा आता प्रमाण कमी आहे....

दीपक११७७'s picture

25 May 2017 - 6:39 pm | दीपक११७७


ब्यांटेक्स शब्द कानावर पडल्यावर मणी उचलणार्‍यांचा उत्साह मण्यांसारखा गळुन पडला

लई भारी लिहीलं आहे.

मोदक's picture

25 May 2017 - 8:09 pm | मोदक

:))

जबरदस्त लिहिलंय! कमाल शैली आहे. "मणिरत्नम" वाचून फुटलो. खरंच वेगळा धागा म्हणून टाका.

वेगळा धागा काढा, किस्सा वाचण्यासारखा आहे.

रात्रीच्या वेळी प्रवास करताना सावध राहायला हवं.

तितक्यात विक्टीम माउली बोलल्या " साकळी वडा"
मी म्हटलो" माजे आवशी गाडी हुभीच आसा, साकळी कित्याक वडतय"

:))

सरल मान's picture

25 May 2017 - 4:45 pm | सरल मान

इशय येगळा हाय पण रघुनाथ केरकरान्चा प्रतिसाद मझी जोरदार फलन्दाजी झालीय....लोल

विशुमित's picture

25 May 2017 - 5:45 pm | विशुमित

रात्री यदाकदाचित लघुशंकेसाठी उठला तर माघारी येऊन स्वतःच्याच सीटवर येऊन झोपा.

१२ वी मध्ये असताना माझा एकदा खतरनाक शॉट झाला होता. मी आणि माझा मित्र कोकण रेल्वे ने गोव्यावरून मुंबईला येत होतो. तिकीट वेटिंग होते. तरी आम्ही बर्थ मध्ये शिरलो. एक प्रवासी काही कारणास्तव मध्ये उतरला. मग आम्ही दोघे त्या सीट वर झोपलो. रात्री २ च्या सुमारास मी डोळे चोळत लघुशंकेसाठी उठून गेलो. माघारी येऊन पुन्हा झोपलो. आणि मित्राच्या अंगावर हात टाकला तसा एकदम माझा हात झिडकारला गेला. बघतोय तर मित्रा ऐवजी ती एक नवविवाहित स्त्री होती. मी खडखडीत जागा झालो आणि समजलं की मी विरुद्ध दिशेच्या डब्या मध्ये होतो.
लय मार खाल्ला असता. पण डायरेक्ट पाय पकडले आणि मित्राने मध्यस्ती केली म्हणून वाचलो.

धर्मराजमुटके's picture

25 May 2017 - 5:50 pm | धर्मराजमुटके

अगागा ! बरं झालं बाजार उठविला नस्ता तर मुडदाच बशिवला असता !

सचिन काळे's picture

25 May 2017 - 6:19 pm | सचिन काळे

*lol*

टवाळ कार्टा's picture

25 May 2017 - 11:13 pm | टवाळ कार्टा

हात टाकेपर्यंत प्रॉब्लेम नव्हता?

तुषार काळभोर's picture

26 May 2017 - 8:01 am | तुषार काळभोर

ते प्लेटोनिक का काय म्हणतात ना...

आदूबाळ's picture

26 May 2017 - 6:46 pm | आदूबाळ

A play for him and a tonic for her...

पुंबा's picture

29 May 2017 - 11:12 am | पुंबा

गोव्यावरून...?
हम्म्म्म..
(ह. घ्या. हो..)

चौकटराजा's picture

25 May 2017 - 6:40 pm | चौकटराजा

भारतीय रेल ही जगातील सर्वात स्वस्त प्रवास व्यवस्था आहे याचा अभिमान बाळगणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. पण ती निर्णय घेण्यात फार मागे आहे त्यामुळे
अपघात झाला तर पटापट निर्णय व्यवस्था रेल्वेकडे आजतरी नसावी असे वाटण्यास॑ वाव आहे. आपली गाडी इतका वेळ का एकाच जागी उभी आहे यासंबंधी निवेदन
ड्रायव्हर व गार्डने स्पीकर द्वारे करण्याची सोय असलीच पाहिजे. या बद्द्ल आग्रह सर्वानीच धरावा. आपली प्रचंड व अनावश्यक लोकसंख्या म्हण्जे आपले भांडवल ही कल्पना खुळचट आहे तर ती एक मोठी समस्या आहे हे ज्यावेळी आपल्याला सगळ्याना उमगेल तेंव्हा " जितक्या सीटस तितकेच प्रवासी " हे आपले स्वप्न पूर्ण होईल.

टवाळ कार्टा's picture

25 May 2017 - 11:15 pm | टवाळ कार्टा

आपली प्रचंड व अनावश्यक लोकसंख्या म्हण्जे आपले भांडवल ही कल्पना खुळचट आहे

हे आपले नाही...इथे व्यापार करायला येणार्या कंपन्यांसाठी ग्राहक नावाचे भांडवल आहे

सतिश गावडे's picture

25 May 2017 - 11:29 pm | सतिश गावडे

ड्रायव्हर व गार्डने स्पीकर द्वारे करण्याची सोय असलीच पाहिजे.

ही एव्हढी सोय झाली तर "दादर रत्नागिरी" आणि "दिवा सावंतवाडी" या दोन गाड्यांचे प्रवाशी दुवा देतील.

संपुर्ण भारतीय रेल्वे मार्गांवर धावणाऱ्या गाड्यांपैकी या दोन गाड्यांइतकी दुसरी कोणती गाडी सायडींगला ताटकळत नसेल.

रघुनाथ.केरकर's picture

26 May 2017 - 12:52 pm | रघुनाथ.केरकर

राज्यराणीक कसे इसरलात.... दिवा आनी रत्नागीरीच्या पाठोपाठ लूप लायनीर उभ्या रवाचो मान राज्यराणीचो सुधा आसा, पन रात्रीच्या काळोखात इतक्या कळान येना नाय, न्हीजेचो टायम असता ना...

बाकी २३ तारखेच्या तेजस एक्सप्रेस ने कुडाळ ते ठाणे प्रवास केला. ह्यापुर्वी कधी विमानाने प्रवास केला नसल्याने तेजस चा अनुभव खुपच छान होता. असं वाटलं की कोकण रेल्वे कात टाकतेय.... नम्र पेंट्री स्टाफ़, तत्पर हाउसकीपींग, सगळ कस्स छान होतं. एसी ची कुलींग देखील मस्त होती. काही लोक तर शॉल गुंडाळुन बसले होते. माझ्या मते रेल्वे ने आपला रोल बरोबर प्ले केला.
प्रवशानी मात्र जरा सुमार प्रतीसाद दीला. हेडफ़ोन घेउन जाणे, स्क्रीन काढायचा प्रयत्न करणे. वैगरे ...
माझ्या मागच्या सीट वर बसलेल्या प्रवाशाने तर जेवणाच्या प्लेट मध्ये हात धुतले. . त्याचे ओघळ माझ्या सीट खाली आले. त्याला हटकल्यावर म्हणतो कसा "गलास ता .... लवांडला"
ते बघुन माझे डोळे पाणावले.

माझ्या डब्ब्यात अट्टेंडंट ने स्वता हेड्फ़ोन गोळा केले. मला वाटतं की प्रवाशानी थोडे सहकार्य केले पाहीजे.

सिरुसेरि's picture

26 May 2017 - 6:00 pm | सिरुसेरि

छान लिहिलय . "नाहितर हिर नाय मोडत ? " ची आठवण झाली .

राघवेंद्र's picture

26 May 2017 - 8:15 pm | राघवेंद्र

मस्त किस्सा !!!

"गलास ता .... लवांडला

LOL

सतिश गावडे's picture

26 May 2017 - 9:14 pm | सतिश गावडे

राज्यराणी एक्स्प्रेस आहे तर "दादर रत्नागिरी" आणि "दिवा सावंतवाडी" प्यासेंजर. ;)

तसं रखडने नशिबात असेल तर मांडवी सुद्धा रखडते. :)

पैसा's picture

26 May 2017 - 9:34 pm | पैसा

शिरां पडो, थोड्या अती शहाण्यांनी एलईडी उचकाटून काढून बॅगांत भरल्यांनी होते खंय. रेल्वे ऑफिसर वेळेवर तिथे पोचले म्हणान ते गावले.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

25 May 2017 - 10:53 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

झुक झुक झुक झुक अगिन गाडी हे गाणं गाउ नये.

सतिश गावडे's picture

25 May 2017 - 11:32 pm | सतिश गावडे

गाडीमधले हेडफोन (असल्यास) चोरू नयेत. एलसीडीची (असल्यास) तोडफोड करु नये.

अजित खोडके's picture

28 May 2017 - 12:30 am | अजित खोडके

लोहपथयान विरामावस्थेत असताना वातायन बंद करावेत..

किस्सा एकदम छान सांगितलात!
पु. ल. चा `नाहीतर हीर नाही मोडणार`ची आठवण झाली!

चिकित्सक's picture

21 Jun 2017 - 9:22 pm | चिकित्सक

chinmay.deshpande@db.com

१. गाडीत चढण्या च्या अगोदर किमान २-३ तास आधी पासून तिचा आणि त्या रूट च्या अन्य काही गाड्यांचा स्टेट्स ट्रेक करावा , आजकाल मोबाइल एप मुळे हे सहज शक्य आहे , तुमचा वेळ वाचेल त्याच्या उपयोग तुम्ही अन्य काही कामात करू शकता |

२. लांबचा प्रवास असेल तर सोबत २०००० एमएच चे शक्ति संच (power bank) ठेवा तुमच्या बर्थ च्या ठिकाणी सॉकेट असेलच अस नाही , सोबत थ्रीपीन चे अडॅप्टर आणि किमान ३ यूएसबी स्लॉट असलेल क्वालकॉम मोबाइल चारजर ठेवा, प्रवासात मोबाइल ची बॅटरी लवकर संपते वर चारजर लावण्या वरुन सहप्रवासी भांडण करतात |

३. ट्रेन च्या सॉकेट वर लॅपटॉप चालवू नये |

४. सामान आणि लगेज बांधण्या करिता चेन व लॉक घेऊन चला , झाशी, भुसावळ ,कटनी, मनमाड, बैतूल, ईटारसी , कानपुर दिल्ली आणि वाराणसी सारखे स्थानक चोरी चकारि साठी कुप्रसिद्ध आहेत | सोबत खाण्या- पिण्या च्या सामानाचा स्टॉक पुरेसा ठेवा, रेल्वी स्टेशन वरच्या वस्तूंचा क्वालिटी चा नेम नसतो |

५. सोबत चिल्लर ठेवावी , पाणी किंवा खाद्य पडार्थ विकत घेताना समस्या जाणवात नाहीत |

६. स्पेशल ट्रेन्स् मध्ये प्रवास संपल्या वर कोच अठटेन्डेण्ट ची टिप अपेक्षा असते , २-५ रुपये फार झालेत | साधारण गाड्या आणि स्लिपर कोच मध्ये हिजड्या पासून पिच्छा सोडवण्या करिता चिल्लर उपयोगी पडतात |

७. पेपर मॅगज़ीन स्टेशन वरुनच घ्यावा , गाडीत येणार्‍या विकरेत्या कडून पेपर - पुस्तके घेऊ नयेत , छापिल किंमत हून अधिक किमतीत ही लोक पेपर विकतात , पुस्तके सुद्धा पाइरेटेड आणि खराब प्रिंटिंग चे असतात|

८. कुणी बर्थ बदलण्यास विचारले तर आधी खात्री करून घ्यावी की त्यांचा बर्थ संडासा जवळ चा , मिडील किंवा साइड वाला नसावा | बर्थ बदलण्याची इच्छा नसेल तर अजिबात त्यांच्या विनवण्याचे दडपण घ्यायचे नाही |

९. जवळ इयरफोन्स हमखास बळगा , तुमच्या फोन वर बोलण्या मुळे किंवा फोनवर गाणी एकल्या आणि वीडियो बघितल्या मुळे अन्य प्रवाशांना असुविधा होऊ शकते |

१०. लहान मुल असल्यास त्यांच्या करिता डाइपर इत्यादी वस्तू आणि त्यांना एन्गेज ठेवण्या साठी खेळणी , पुस्तके जवळ ठेवावित , कंटाळलेली मुले बाळे हैराण करून सोडतात , कित्येक आई- बाप मुलांच्या तब्येती कडे लक्ष देत नाहीत आणि ते कॉरिडर व कामन स्पेस मध्ये ओकतात

११. कॉलेज च्या पोरं बरोबर तसेच अप डाउनर्स बरोबर पन्गे घेऊ नका |

१२. शयनयानातील ब्लॅंकेट अंगावर घेऊ नका , ती क्वचितच धुतल्या जातात व त्यामुळे ते धूलि नि भरलेले असतात , ते बर्थ वर पसरवून त्या वर चादर टाकून मगच वापरावे |

८. कुणी बर्थ बदलण्यास विचारले तर आधी खात्री करून घ्यावी की त्यांचा बर्थ संडासा जवळ चा , मिडील किंवा साइड वाला नसावा | बर्थ बदलण्याची इच्छा नसेल तर अजिबात त्यांच्या विनवण्याचे दडपण घ्यायचे नाही |
>>>
जर का सीट बदलायचीच असेल, त्या प्रवाशांचे तिकीट कुठपर्यंत आहे ते तपासा.
एकदा हैद्राबाद ते मुंबई प्रवास करताना एका कुटुंबाने मला जागा बदलून देण्यासाठी विनवले, त्यांनी सांगितले की त्यांचे तिकीट मुंबईपर्यंत आहे. मी पण त्यांच्या बोलण्यावर भरवसा ठेऊन सीट बदलून दिली. मध्यरात्री गाढ झोपेत असताना, पुण्याला त्या सीटचा खरा मालक चढला आणि मला अर्ध्या झोपेतून उठून सामान घेऊन पुन्हा माझ्या मुळच्या सीट्वर यावे लागले. ज्यांना मी सीट बदलून दिली, त्यांचे आरक्षण फक्त पुण्यापर्यंतच होते, त्यामुळे पुण्याला ती सीट दुसर्‍या प्रवाशाला दिली गेली.

१) जर घरून जेवण, नाश्त्याचे पदार्थ नेत असाल तर डिस्पोसेबल डिशेस, टिश्यू पेपर सोबत न्या.
२) अनोळखी प्रवाशांकडून कोणताही पदार्थ खायला घेऊ नका.