मदत हवी आहे

Primary tabs

भावना कल्लोळ's picture
भावना कल्लोळ in काथ्याकूट
16 May 2017 - 6:30 pm
गाभा: 

आज मिपावर परत एकदा मदतीची याचना घेऊन आले आहे. मी ज्या फेब्रिकेशन फर्म मध्ये काम करते तिथे नोकरीची संधी उपलब्ध आहे. आमच्याकडे शीट कटिंग, बेंडिंग या सगळ्या सुविधा देतो. तर आमच्या सरांच्या मुलाने एक वर्षांपूर्वी वॉटरजेट कटिंग मशीन घेतली होती आणि तोच ती चालवत सुद्धा होता. पण आता त्याच्या अकस्मात निधनामुळे आम्हाला ती मशीन ऑपरेट करू शकेल असा मुलगा/ मुलगी हवी आहे. ज्यांना कमीत कमी या क्षेत्रातला किमान १ वर्षांचा अनुभव असेल. तसेच फेब्रिकेशन लाईन मधला अनुभव असणारा कुशल कारागीर हि हवा आहे. वॉटरजेट साठी पनवेल येथील तळोजा एमआयडीसी मध्ये भरती आहे. गरज निकडीची असल्याने तसेच पनवेल जवळपास कोण होतकरू, हुशार मुलगा राहणारा असेल तर उत्तम. तर विचार केला कि मिपामित्रांना थोडा त्रास देऊया या बाबतीत. असा कोणी मुलगा तुमच्या नजरेत असल्यास कळवणे.

प्रतिक्रिया

इरसाल कार्टं's picture

16 May 2017 - 7:44 pm | इरसाल कार्टं

संपर्क तपशील द्या