अग्निशामक दल आणि आमचे "अग्निकारक प्रसंग"

Primary tabs

माम्लेदारचा पन्खा's picture
माम्लेदारचा पन्खा in जनातलं, मनातलं
14 May 2017 - 8:09 pm

प्रसंग पहिला-
स्थळ : आमचे घर
वेळ: मध्यरात्रीचे २.३०

स्वयंपाकघरात काहीतरी आवाज झाला म्हणून वडिलांना जाग आली म्हणून ते उठून बघायला गेले. तिथे मिट्ट अंधार होता . . . फक्त फ्रीजमागे एक दिव्य प्रकाश दिसत होता . काही कळायच्या आतच आमचा ६ फुटी डबल डोअर फ्रीज भसाभस पेटला . वडिलांच्या डोळ्यासमोर त्याही अवस्थेत अंधारी आली. तडक ते माझ्याकडे आले आणि मला व आईला उठवले . मी धावत स्वयंपाकघरात गेलो तर तिथे अग्नितांडव सुरू होते. माझ्या लक्षात आलं की गॅसचा सिलेंडर वाचवला पाहिजे पण तो काढणं अशक्य होतं. सिलेंडर पेटला असता तर अख्खी बिल्डींग उडाली असती . . . पण आता आयुष्य केवळ दैवाच्या हवाली होतं . . . मेनस्वीच मी बंद केला आणि फायर ब्रिगेडला फोन करण्यासाठी नंबर शोधू लागलो. आईने आजुबाजुला असलेल्या शेजारी लोकांना उठवलं आणि सावध केलं.

फायर ब्रिगेडचा नंबर काही मिळेना म्हणून मग आमच्या पोलीस स्टेशनला फोन केला आणि त्यांना निरोप देण्याची विनंती केली. आमचं घर चौथ्या मजल्यावर असल्याने मी खाली जाऊन उभा राहिलो तर पोलीस नुसते जीप घेऊन तिथे आले. मी त्यांना विचारले की तुम्ही फायरवाल्यांना निरोप दिला का तर नाही म्हणाले. मी मनात म्हटलं की इथे काय माझं तोंड पहायला आलाय का तुम्ही ? पण मी पुन्हा एकदा अजीजीने त्यांना सांगितलं की फायरवाल्यांना लवकर घेऊन या . . . .

फायर ब्रिगेडचा बंब तर आला . . . . जवान खाली उतरले पण कसचं काय . . . . सगळे एकजात "टाईट"! ते त्यांच्या पाईपाला सोडवायला लागले तसे मला आश्चर्य वाटले . . . . संपूर्ण पाईप आकाशाकडे धरून उभं राहिल्यावर मग त्यानं मला विचारलं . . आग कुठे लागली आहे ???? मला स्वतःच्या डोक्यावर हात मारून घ्यावासा वाटला . . . मी कंट्रोल केला आणि सांगितलं की तुम्हाला चौथ्या मजल्यावर जायचं आहे तसं तो माझ्यावरच भुंकला की आधी सांगायला काय झालं . . . मग तो पाईप पुन्हा गुंडाळून ठेवून ते बिल्डींगमधे घुसले . . . . पोलीस सुद्धा आपली जीप लावून मजल्यावर वर चढले (काहीच काम नसावं बहुतेक ) . . .

घरात गेल्यावर फक्त धूर आणि अंधार . . . . त्या वासानं बहुतेकांची नशा उतरली . . . . त्यांनी बादल्या भरभरून पाणी ओतायला सुरुवात केली . . . घरभर तो जळका वास आणि काळं काळं पाणी . . . अक्षरशः काळ्यापाण्याचीच शिक्षा झाली आम्हाला . . . . . सगळी आग विझल्यावर सगळे तराट जवान आमच्या पुढे येऊन उभे राहिले. तुमची एवढी आग विझवली . . आता खुशीने काय द्यायचं ते द्या असं म्हणायला लागले . . आमचं केवढं नुकसान झालं त्याचे तुम्हाला कसले पैसे द्यायचे असं म्हणून त्यांना वाटेला लावलं . . . .

त्यांचं आटपतंय तोच पोलीसांनी त्यांच्या पध्दतीने चौकशी सुरू केली . . . . तुमचा कोणावर संशय आहे का . . . घरात कोणाचं नवीन लग्न झालं आहे का . . आग लागल्यावर पहिल्यांदा कोणी पाहिलं वगैरे टिपिकल प्रश्न आले . . . . . काहीच सापडत नाही म्हटल्यावर त्यांनीही पैसे मागितले पण आम्ही कसले देतो . . . हात चोळत निघून गेले . . . .

पुढच्या आठवडाभर आम्ही आगीच्या धक्क्यातून बाहेर आलो नव्हतो . . . .

प्रसंग दुसरा - (ह्याचा वरील घटनेशी काही संबंध नाही )
स्थळ - आमच्या घराशेजारचा चौक
वेळ - संध्याकाळी ५.३०

अग्निशामक दलाकडून आग विझवण्याची प्रात्यक्षिकं

आमच्या घराजवळचा चौक म्हणजे सतत कुठलेतरी कार्यक्रम . . . . माझी परीक्षा होती म्हणून अभ्यास करत बसलो होतो . . . तेवढ्यात माईकवर बेसूर आवाजात एस्टीच्या स्टँडवर उद्घोषणा होतात तसा आवाज सुरू झाला . . . . अग्निशामक दल विभागीय नागरिकांसाठी आग विझवण्याची प्रात्यक्षिकं दाखवणार होतं . . . .ठणाठणा वाजवत बंबही आला . . . आता अभ्यास बोंबलणार म्हणून डोकं उठलं होतं . . . कोणीतरी जगदाळे सगळे प्रयोग दाखवत होता . . . . .

माईकवर सांगितलं की आता जगदाळे लाकडी वस्तुंना लागलेली आग विझवतील . . . . हुकुमाप्रमाणे जगदाळे पाणी )जोरदार पाण्याचे फवारे मारू लागले . . माईकवर सगळ्या विभागाला एेकायला जाईल एवढ्या आवाजात पुन्हा सांगितलं गेलं . . . . जगदाळे आधी आग तर लावा मग विझवा !

मनोरंजन होतं आहे हे पाहून अचानक तिथे गर्दी जमली . . . जगदाळेने मन लावून प्रयोग दाखवले आणि अर्ध्या तासाने आपला पसारा आवरून बंब निघून गेला . .

अनुभवनाट्यमुक्तकराहती जागा

प्रतिक्रिया

एस's picture

14 May 2017 - 8:40 pm | एस

:-)

खटपट्या's picture

14 May 2017 - 8:55 pm | खटपट्या

अतिशय सन्ताप्रक प्रकार. तुम्ही आयुक्तांकडे तक्रार करायला हवी होती.

पिलीयन रायडर's picture

15 May 2017 - 5:13 am | पिलीयन रायडर

बापरे... असा फ्रिज पेटु शकतो? मागे एका मित्राची टाटा नॅनो आपोआप पेटली होती. हे भयंकर आहे...

बापरे! फ्रिज कसा पेटला काही काही कळाले का? किती जुना होता? वॉरंटी होती का?

माम्लेदारचा पन्खा's picture

15 May 2017 - 9:49 am | माम्लेदारचा पन्खा

वॉरंटी कामाला येत नाही अशा घटनेत . . . .

अद्द्या's picture

15 May 2017 - 10:17 am | अद्द्या

स्टॅबिलायझर नव्हता का ??

mcb ट्रिप नाही झाला वोल्टेज जास्त झाल्यावर ?

माम्लेदारचा पन्खा's picture

15 May 2017 - 10:23 am | माम्लेदारचा पन्खा

पण उपयोग नाही झाला . . .

पद्मावति's picture

15 May 2017 - 10:57 am | पद्मावति

बापरे, भयंकर अनुभव :(

कपिलमुनी's picture

15 May 2017 - 10:59 am | कपिलमुनी

फुंकर घाला

माम्लेदारचा पन्खा's picture

15 May 2017 - 11:36 am | माम्लेदारचा पन्खा

मिपाकरांना आग लावायला उद्युक्त करावं लागत नाही असं एेकून आहे . . . .

अभ्या..'s picture

15 May 2017 - 11:48 am | अभ्या..

लाकडं कमी पडली रं पंख्या. दुसरं कै नै.
.
शनवार पेठेच्या आतील बोळात आगीचा बंब आणताना नदीमार्गे का आणावा लागला, अग्नीशामकदलातील कुणा गोगट्यांनी आग लागूच नये म्हनून दिलेले टिपीकल सल्ले, आगीत जळालेल्या पॉलीस्या आणि इस्टेटीचे कागद, भयाण आगीतही शिल्लक राहिलेले मोदीकाकांचे कॅलेंडर, ह्या आगीवरुन दुसरीच जुनी आग आठवलेला गुज्जू शेजारी, अपार्ट्मेंटवाल्यानी जिना काळा केल्याबद्दल केलेला दंड, तीन दिवस आगीची सुट्टी घेतली म्हनून आयटीमधली नोकरी गमावली असे काहीतरी पैजे होते. ;)

माझ्या डोळ्यासमोर आता घरातला फ्रीज उभा राहीलाय शप्पथ सांगतो.

माझीही शॅम्पेन's picture

15 May 2017 - 1:49 pm | माझीही शॅम्पेन

अतिशय संतापजनक प्रकार आहे हा , वीडियो शूटिंग करून ठेवल पाहिजे होत ,

रचाकने काही सूचना देतो

1) प्रत्येक घरात एक माल्टि-पर्पज फायर एक्स्टिंग्विशरठेवला पाहिजे 1000 रु. पासून पुढे असा मिळतो

2) मागे एक मित्रा कडे त्यांचा मिक्सर पेटून पूर्ण किचन पेटल होत , ते बाहेर होते आणि कोणाकाडेही (शेजरयांकडे) घरची चावी नव्हती , दीड लाख + नुकसान झाल होत , विश्वासू शेजारी असेल तर नक्की चावी ठेवा

3) घरचा विमा काढून घ्या (आणि सोसायटी झाली असेल तर) बिल्डींगचा ही विमा काढून घ्या , अनेक कटू प्रसंगणनंतर शहाणपण येत ते कामाच नाही

प्रत्येक घरात एक माल्टि-पर्पज फायर एक्स्टिंग्विशरठेवला पाहिजे 1000 रु. पासून पुढे असा मिळतो

फ्लिपकार्ट / अमेझॉन वरचा एखादा सुचवता का?

माझीही शॅम्पेन's picture

15 May 2017 - 2:45 pm | माझीही शॅम्पेन

ABC पावडर फायर एक्स्टिंग्विशर म्हणून सर्च करा भरपूर मिळतील , कमीत कमी 2 KG (माझ्या मते 4KG) घेऊन टाका

अजुन एक फायर एक्स्टिंग्विशर शक्यतो किचनच्या बाहेर ठेवावा (सह्ज हाती लागेल असा)

गाडीत सुध्दा एखादा पोर्टेबल ठेवावा (हे मी अजुन केलेल नाहीय :( )

डिसक्लेमर :- मी ह्या विषायतील एक्षपर्ट नाही पण फक्त कॉमन सेन्स ने विचार करतो

प्रत्येक घरात एक माल्टि-पर्पज फायर एक्स्टिंग्विशरठेवला पाहिजे 1000 रु. पासून पुढे असा मिळतो

+१००

पैसा's picture

15 May 2017 - 3:00 pm | पैसा

भयानक प्रकार! पण विजेमुळे लागलेली आग पाणी मारून विझवतात? वेगवेगळ्या कारणानी लागलेल्या आगीप्रमाणे वेगवेगळे उपाय जसे की वाळू टाकणे, पाणी, फायर एक्स्टिंग्विशर इत्यादी असतात असे वाचलेले आठवत आहे. कारण शॉर्ट सर्किटच्या आगीत विजेच्या जिवंत तारा कुठे लोंबकळत असतील तर पाण्यामुळे अनावस्था प्रसंग उभा राहू शकतो.

रामपुरी's picture

15 May 2017 - 10:32 pm | रामपुरी

"विजेमुळे लागलेली आग पाणी मारून विझवतात?" अगदी हेच मनातआलं
पण सगळे जवान टाईट असल्याने काहीही अशक्य नसावं :)

रातराणी's picture

15 May 2017 - 11:18 pm | रातराणी

:(

मार्मिक गोडसे's picture

16 May 2017 - 10:22 am | मार्मिक गोडसे

"विजेमुळे लागलेली आग पाणी मारून विझवतात?" अगदी हेच मनातआलं
पण सगळे जवान टाईट असल्याने काहीही अशक्य नसावं

विजेमुळे लागलेली आग विजपुरवठा बंद करुन पाणी मारूनच विझवतात.

सगळे जवान टाईट होते पण लेखक टाईट नव्हते ,त्यांनी प्रसंगावधान राखून मेनस्वीच बंद केले होते.

मी-सौरभ's picture

16 May 2017 - 4:29 pm | मी-सौरभ

तो फ्रिज का पेटला ते कळलं का?
कुणी काळी जादू वगैरे केलेली का आणी त्या सिलिंडरचे काय झाले?