शामभट्टाची "युरोप" वारी .. इटली, स्वीस, फ्रान्स

Primary tabs

चौकटराजा's picture
चौकटराजा in भटकंती
14 May 2017 - 5:05 pm

दिवस पहिला

इतरांपेक्षा काहीतरी वेगळे शिकावे म्हणून १९७० च्या सुमारास वास्तुविद्येच्या अभ्यासक्रमास गेलो पण दोन वर्षे झाल्यावर तो अभ्यासक्रम सोडला. पण History of Architecture हा विषय शिकताना भारतातील मंदिरे व युरोपातील चर्चेस हा कुतुहलाचा विषय बनलेला होता. पैकी त्यात अभ्यासास असलेली भारत देशातील सर्व प्रमुख मोठी मंदिरे पाहून झाली. " आपल्याला देवात रस नाही पण देवळात जरूर आहे" अशी उदघोषणा करीतच भुवनेश्वर, रामेश्वर, मदुराई, हंपी, बदामी, पट्टडकल, सोमनाथपूर ,तंजाउर, श्रीनगर , ग्वालियर येथील मंदीराना भेटी दिल्या अगदी सहकुटुम्ब. आता साठी ओलांडून गेली. "आता नाही तर कधीच नाही " या निश्चयाने युरोपातील चर्चेस पाहावीत यासाठी संशोधन करण्यास सुरूवात केली. लंडन, रोम, वर्म, मिलान , फ्लोरेन्स कलोन व पॅरिस या शहरात मोठी व अप्रतिम बांधकाम असलेली चर्चेस आहेत. पैकी मिलान व वर्म ही शहरे टूर ऑपरेटर्स च्या कक्षेत येत नाहीत. टूर ऑपरेटर की आपण स्वतंत्रपणे जायचे याचा सम्यकपणे अभ्यास केला असता असे कळून आले की लगेज व जेवण हे दोन मुद्दे सोडले तर टूर बरोबर जाणे हा एक मूर्खपणा आहे. " दिल्ली का कुतुब मिनार देखो .." या स्टाईलने केवळ " ओरिएन्टेशन टूर " करवीत ते आपल्याला फक्त एका शहरातून दुसर्‍या शहरात " कॅरी" करतात असे आढळून आले. तसेच पान पान जाहिरातीचे पैसे शेवटी कोण देतो याचे उत्तर आपणच असे असते. त्याना एकगट्ठा मागणीचा लाभ निवास, भोजन याबाबतीत मिळतो हे खरेच पण युरोपात फिरण्याचा खरा " फील" आपण स्वतंत्रपणे जाण्यात आहे. हे मी आता ठामपणे म्हणू शकतो. मग एकदा " बस्स .. ठरले की आपण टूरवाल्याकडे जायचे नाही" मग करायचे काय ? यावेळी मिपावरचेच एक अभ्यासू प्रवासी डॉ, सुहास म्हात्रे व चित्रकार चित्रगुप्त हे दोन स्नेही मदतीला धावून आले. या दोघानी केलेला युरोप प्रवास व माझी शैली यात फार फरक असणार होता. मी गरीब ब्राह्मण स्टाईलने जाणार होतो. म्हणून या लेखमालेला हेतूपूर्वक "शामभट्टाची युरोपवारी " असा मथळा दिला आहे. आता डॉ नी तीन वर दिले.होतेच .. पहिला वर फॉरेक्स कार्ड , दुसरा वर.... स्वीस ट्रॅव्हल पास व तिसरा वर म्हण्जे एअर बी एन बी. युरेल पास हा युरोपातील सुमारे २२ देश पहाण्यासाठी मिळत असला तरी त्याचा फायदा इटली व फ्रान्स या देशात अजिबात नाही कारण तेथे याशिवाय आरक्षणाचे जास्तीचे पैसे खर्च करावे लागतात. युरोप वारी करायची तर आपल्याबरोबर एखादे तरी जोडपे हवे म्हणजे आपल्याला निवासात खर्चात सवलत मिळते तसेच एकमेकांवर लक्ष रहाते यास्तव नातेवाईक , मित्रमंडळी यात विचारणा केली पण कोणीच तयार होईनात. कारणे एक ना अनेक. पण मला मुळातच प्रवासाची आवड असल्याने मी याल तर सह न याल तर शिवाय " या न्यायाने जायचेच असे ठरवून टाकले.

या खेरीज सिंगापूर , थायलंड मलेशिया अशा प्रवासापेक्षा व अमेरिकेपेक्षा वा दुबई पेक्षा " युरोप" वारीला प्राधान्य मिळण्याचे आणखी सबळ कारण माझ्याकडे होते. आज आपण जी जीवनशैली जगतो तिची मुळे युरोपातच सर्वार्थाने आहेत.आपण जो शर्ट, जी पॅन्ट घालतो त्यापासून ते आपल्या प्रिय लोकशाही राज्यपद्धती चा उगम युरोपातील आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुत्व ही मूल्ये आपण तिथूनच मिळविली व राजे महाराजे , संस्थानिक यांच्या कारकीर्दीला विराम देऊन लोकांचे राज्य स्वीकारले. आजच्या घडीघडीला जे काही आपण वापरतो त्याची बरीचशी पेटंट्स युरोपियन शास्त्रज्ञांकडे आहेत. औद्यिगिक क्रांती तिथेच घडली व प्रचंड जीवितहानी घडविणारी महायुद्धे तिथेच लढली गेली. त्यातूनच शांततेचे खरे मूल्य नागरिकाना कळून आज युरोपातील बहुतेक राष्ट्रे युद्धमान परिस्थिती टाळून ऐहिक प्रगतीचा मार्ग अवलंबित आहेत. धर्मिक भावनेपेक्षा इथे राष्ट्र या संकल्पनेला नागरिक अधिक महत्व देतात हे दिसून येत आहे.

मे महिन्याचा सुरवातीच्या आठवड्यात गेलो तर गर्दी कमी असेल व विविध जागी रांगेत उभे राहाण्याचा ताप वाचेल अशा हेतूने आखणी करावी असे मनाने घेतले.
त्यासाठी नोव्हेंबर महिन्यात २५ एप्रिल ते ९ मे या दरम्यानची विमानाची तिकिटे जायची व परतीची अशी दोन्ही " इकॉनॉमी" वर्गाची काढली. त्यासाठी प्रत्येकी मुंबई ते रोम व पॅरोस ते मुम्बई असे " ओपन जॉ" तिकिट फक्त ३४००० त मिळाले त्याखेरीज विसा मिळणार नव्हता. एअर बी एन बी च्या बेवसाईटवर होस्ट ची यादी धुंडाळू लागलो. मेट्रो , ट्राम, पासून जवळ असलेल्या घरांचा शोध सुरू झाला. एअर बी एन बी ही सामान्य लोकाना हॉटेलचे दर परवडत नाहीत व युरोपचे महागडे जेवण आवडत नाही व परवडत ही नाही अशांसाठी २००८ साली सान फ्रान्सिस्को येथे स्थापन झालेली एक एजंट कंपनी आहे. तिचा कारभार चोख आहे. या घरातून स्वैपाकघर , खोली व बाथरूम वापरण्यास देण्याची सोय असेल तर असे मालक त्याचे होस्ट म्हणून नाव नोंदवितात. आपण पैसे भरण्यापूर्वी आपल्याला फोटोवरून जागा कशी आहे ते कळते , साधारण कोणत्या विभागात आहे तेही कळते पण पैसे भरल्याखेरीज पत्ता देत नाहीत.अर्थात बुकिंग विना दंड रद्द करता येते. ( काही मुदतीतच). यात काही फायदे आहेत. रम्य ठिकाणी रहाता येते. त्या कुटुम्बात मिसळता येते. आपल्या गावाकडचा आहार घेता येतो. रेसेप्शनीस्ट ,लिफ्ट, अटेन्डन्ट यांचा अनावश्यक खर्च आपल्यावर पडत नाही. कुणालाही टीप द्यावी लागत नाही. आंतरजालावर व प्रत्यक्ष चर्चेत असे सांगितले जाते की पासपोर्ट मधे पोलीस पैसे खातात, विसा एक महाकठीण काम आहे. फार फेर्‍या माराव्या लागतात वगैरे. माझ्या बाबतीत असे काही घडले नाही. पोलिसानी सन्मानपूर्वक वागणूक देत मार्ग मोकळा केला तर विसा चार दिवसात घरपोच आला.विसासाठी प्रत्येकी ५५०० रूपये लागले. विसा देण्यासाठी मी प्रत्येकी ७० कागदपत्रे सोबत लावली होती जणू विसा ऑफिसरला ती पाहाण्याचा कंटाळा यावा. ( बहुदा तसेच झाले असावे काय ?)विसा मिळाल्यावर आनंद गगनात मावेना. दिसादिसानी जाण्याची तयारी सुरू झाली. शामभट्टाचे बजेट असल्याने खूप भारी प्रकारच्या बॅगा घेणे टाळले. चार पाच हजार रूपये जर्किन साठी काही घालायचे नाहीत असे ठरवून फक्त ६०० रूपयाचा जर्किन चक्क रस्त्यावर विकत घेतला. ( पाउस व धंडगार वारे यापासून त्याने मस्त रक्षण केले ).

आतापावेतो निवासाप्रित्यर्थ काही पैसे भरून विविध शहरी आरक्षण केले होते. रोम ( ३ रात्र , ६६००), तिरानो( १ रात्र ३५००), लूसर्न ( १ रात्र ४५००) , इसेल्टवाल्ड ( २ रात्री ९५००) जिनेव्हा ( २ रात्री १०००० ) तर पॅरिस( २ रात्री ५६००) . हे सारे खर्च रूपयामधे दोघांसाठीचे असून या खर्चात आपल्याला माथेरानला तरी रहाता आले असते का अशी शंका येते.

१५ दिवसांच्या प्रवासात आपण एक मिक्स बॅग हासील करावी या हेतूने एक दोन पर्व शिखरे, एक दोन संग्रहालये , दोन तीने चर्चेस, एक दोन वाडे, दोन तीन बोट प्रवास एक दोन मार्केट्स, युरोपातील हाय स्पीड ट्रेनचा अनुभव व एक दोन सीनीक ट्रेन रूट्स असा प्लान केला होता.
रोम-फ्लॉरेन्स- व्हेनिस- मिलान- तिरानो-लूसर्न-इसेल्टवाल्ड-जिनेव्हा- शामोनी-पॅरिस-मुम्बई. असा मार्ग आखला होता. यात फ्लोरेन्स ते व्हेनिस व व्हेनिस ते मिलान व्हाया बोल्गोना हा प्रवास रात्रीचा म्हणजे आय सी एन ( इंटर सिटी नोट्टे ) या रेल्वेचा होता.

प्रस्थानाचा दिवस २५ अप्रिल २०१७ रात्री २१३५ ची फ्लाईट. हा फ्लाईट हा मोठा रूबाबदार शब्द आपण आपल्या संदर्भात कधी उच्चारू असे मला स्वप्नातही वातले नव्हते. पण ते घडत होते. विमानाच पहिलाच प्रवास . अनेक अनुभवीनी चेक इन सिकुरिटी स्कॅन, प्रोहिबिटेड आयटेम्स, स्मगलिंग स्कॅम्स, इंजिनाचा आवाज, इअरप्लग , जेटलॅग ते इमिग्रेशन चे ठसे व प्रश्न असे अनेक बागुलबुवा उभे केले होते. तसे काहीच घडले नाही.

आम्ही युरोपला जाणार तेंव्हा आम्ही व्होल्वो, ओला असे काहीतरी साधन वापरून एअरपोर्टला जाउ असे सांगत होतो. पण अनावश्यक खर्च " लाईफ स्टाईल" बडेजाव या साठी करायचा नाही असे माझे धोरण असते. सबब चिन्चवड ते पनवेल भुसावळ एक्सप्रेस , पनवेल ते कुर्ला लोकल हा प्रवास करून आरामात कुर्ला रेस्वे स्थानाच्या बाहेर हजर झालो. भयंकर उकाडा असल्याने जूस वगरेचे दोन दोन ग्लास मारून झाल्यावर टॅक्सी वाल्याकडे " टर्मिनल टू " साठी चौकशी केली तर त्याने ३५० रूपये सांगितले. ओलावाल्याकडे चौकशी करता १८० रूपयात काम होईल असे त्याने सांगितल्यावर अर्थ्या तासात अगदी योग्य वेळ राखून आन्तरराष्ट्रीय विमानतळ मुंबई येथे उतरलो. विमानतळावर थंड पाण्याची ही सोय नाही. जरा खंत वाटली. चेक ईन नेटवर केले असल्याने "एतिहाद" या विमान कम्पनीच्या कर्मचार्‍यानी अगदी नम्र वर्तणुकीचा नमूना समोर ठेवत बोर्डिंग पास हातात ठेवले. आता पुढची पायरी सिक्युरिटी चेकिंग . तिथे घोळच होता.केबिन बॅगा पुढे जात होत्या व माणसे दुसर्‍याच रांगेत उभी. सुदैवाने कोणी दुसर्‍याची बॅग उचलून नेत नव्हते . एरवी कारभार बरोबर नव्हता हेच खरे.

जरावेळ आतील दुकाने , लाउन्जेस यांचे निरिक्षण करीत एकदाचे विहित गेटवर पोहोचलो. काचेच्या भव्य खिडकीतून बाहेर पाहिले . आमचे विमान जशी येष्टी गाडी फलाटाला लागते तसे लागले होते. विमान मोठे होते. यथावकाश आमच्या " झोन" च्या बोर्डिगची घोषणा झाली. व विमानाच्या गुहेत शिरलो. आमच्या बरोबर वीणा वर्ल्ड चा एक ग्रूप होताच. बहुतेक अशाना सवलतीचे तिकीट म्हणून न खपणार्‍या सेंटर सीटस देतात असे माझे निरिक्षण झाले आहे.
बरोबर २१३५ विमानने पुश बॅक केला तरी टॅक्सी व रनवे मोड पार करीत विमानाने २१५५ चे सुमारास हवेत झेप घेतली. पाच मिनिटे खालच्या वेस्टर्न एक्प्रेस हायवे चे जुहू बीचचे दर्शन घडवीत विमानाचे अबुधावी साठी अरबी समुद्रावरून वेगाने उडण्यास सुरूवात केली.

प्रतिक्रिया

वा! मजेदार आणि खुसखुशीत. पुभाप्र.

निशाचर's picture

14 May 2017 - 5:49 pm | निशाचर

व्यवस्थित अभ्यास करून वेळ देऊन प्रवासाची आखणी केली तर पश्चिम युरोपात टूर ऑपरेटर्सची गरज पडणार नाही. तुम्ही ते धाडस केल्याबद्दल अभिनंदन! स्वतंत्र फिरताना जे अनुभव येतात (खरंतर जे अनुभव घेणं भाग पडतं) ते टूरबरोबर येणं कठिण.

मिलान व वर्म

यातील `वर्म` म्हणजे कोणतं ठिकाण हे कळलं नाही. एक छोटी दुरूस्ती: Bologna चा उच्चार बोलोSन्या च्या जवळ जाणारा आहे.

तुम्ही प्रवासाची पार्श्वभूमी सांगितल्याने तुम्हाला दिसलेल्या युरोपबद्दल वाचायची उत्सुकता आहे. पुभाप्र.

चौकटराजा's picture

14 May 2017 - 6:30 pm | चौकटराजा

(खरंतर जे अनुभव घेणं भाग पडतं) होय असे अनुभव मलाही आले त्याबद्द्ल लिहिनच. कारण सर्व भले बुरे प्रामाणिकपणे लिहिणार आहे.

चौकटराजा's picture

14 May 2017 - 6:39 pm | चौकटराजा

https://en.wikipedia.org/wiki/Wormser_Dom इथे माहिती मिळेल.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

14 May 2017 - 5:55 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

वा वा वा. पुढील भागाच्या प्रतिक्षेत. तेवढे फोटु चिकटवा की काकाश्री.

चौकटराजा's picture

14 May 2017 - 6:32 pm | चौकटराजा

हा भाग काय सांगतो ? कप्पाळ .?. विमानात पेट्रोल भरत आहेत असा फोटो टाकू काय ,,,,,? ऑं ..... ? :)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

14 May 2017 - 10:45 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

असचं काही नाही ओ. हवाईसुंदरीचा टाकलात तरी चालेल. =))

चौथा कोनाडा's picture

14 May 2017 - 11:00 pm | चौथा कोनाडा

हवाई सुंदरी नाही तरी गेलाबाजार तुमचे मदतस्नेही डॉसुम्हा अन चिगुसाहेबांचे फोटो टाका :-)

चौरा साहेब, भन्नाट सुरुवात ! उत्सुकता ताणली गेलीय !
हा भटकंती वृतांत वाचत आमचा सिज़न चांगला जाइल.
पुभाप्र !

प्रचेतस's picture

14 May 2017 - 5:58 pm | प्रचेतस

उत्तम सुरुवात काका,
सहलीची आखणी खूपच उत्तम केली आहे, जिनिव्हा वगैरे ठिकाणचे मुक्काम इतक्या स्वस्तात करणे कौतुकास्पद आहे.

अभ्या..'s picture

14 May 2017 - 6:01 pm | अभ्या..

आह्ह्ह्ह,
चौराकाका, तुमच्या नजरेतून युरप पाहण्याची मज्जा काही और असणारे बरंका.
एक अस्सल कलाकार नजरेचा, टिप्पीकल पुणेरी अन चाबरा मराठी नमुना युरपला पाहायला मिळाला हेही नसे थोडके. ;)
.
येऊंद्या जोर्रात.

चौकटराजा's picture

14 May 2017 - 6:35 pm | चौकटराजा

तू पाठवलेली चटणी ,, बुवाने परोपकारी गोपाळा प्रमाणे आणून दिली. मी ती युरोपला नेली. सोलापूरच्या लिओनार्दो ने पाठविली असे वरीजिनल व्हिन्सी ला सांगणार होतो पण थडग्यात शिरू दी नात साले !

व्व्वा, चटणी तर युरप फिरली म्हणा की. भारीच. वेळेवर पोहोचली हे बुवांचे उपकार. ________/\_______

लैच भारी. तुमची प्रवास आखणी कॉपी मारावी काय?
पुढचे भाग पटपट येऊ द्या प्लीज.

सतिश गावडे's picture

14 May 2017 - 7:15 pm | सतिश गावडे

काका, फोटोही टाका की.

स्पा's picture

14 May 2017 - 7:26 pm | स्पा

ले चाैरा आँण फायर

दशानन's picture

14 May 2017 - 8:56 pm | दशानन

वाह, देखणी सुरवात झाली, पुलेंशु!

चित्रगुप्त's picture

14 May 2017 - 9:03 pm | चित्रगुप्त

बह्तुम गेक्या दिनेचीमचमचुमुमतु्त...
अर्र्र्र्र्र्र्र्र... हे काय झाले कळफळकास ??
चौरापंत, तुमचा गेल्या तीन-चार वर्षांचा अभ्यास - बेत शेवटी फळास येतात्सा होऊन तुम्ही उभयता अगदी स्वतंत्रपणे युरोप प्रवास करून आलात हे फार कौतुकास्पद असे कृत्य आहे. याबद्दल शतशः अभिनंदन. आता आम्हा मिपाकरांना बहुप्रतिक्षित असलेले खमंग प्रवासवर्णन वाचायची पर्वणी लाभणार, आणखी काय हवे ?
पुण्याला आपली भेट झाली असता चर्चिलेली घडीची काठी आणि फिरत्या खुर्चीच्या आयडियाची कल्पना कितपत उपयोगी पडली हे जाणण्यास उत्सुक आहे. मोनालिसा खापर-खापर-खापर पणजींची भेट घडलीच असेल आणि मिशेलँजेलोचा दाऊद याची देही याची डोळा बघण्याचे भाग्यही लाभले असेल. व्हेनिस आणि फ्लॉरेंसच्या गल्ल्यांतून फिरताना काय काय मौज अनुभवली, कोणकोणते संगीत कुठकुठे ऐकायला मिळाले वगैरे अगदी सविस्तर लिहा.
पुभालौयेयाअ.

डॉ सुहास म्हात्रे's picture

14 May 2017 - 9:29 pm | डॉ सुहास म्हात्रे

चौरासाहेब,

एका भन्नाट प्रवासतयारीचा साक्षिदार असल्याने या प्रवासवर्णनाची जोरदार उत्सुकता होतीच ! खणखणीत पुणेरी बाण्याने मसालेदार सुरुवात करून तुम्ही ती अधिकच वाढवली आहात !

इतकी बारकाईने तयारी करण्याइतकी चिकाटी माझ्यात नाही. मी मुख्य आकर्षणे निगुतीने बघता येतील इकडे लक्ष देऊन इतर वेळ येईल तेव्हा पाहून घेऊ असे सोडून देतो. तुम्ही तयारी करताना दर गोष्टीबद्दल दाखवलेली बारकाई आश्चर्यकारक होती हे मुद्दाम नमूद करत आहे.

टाका लवकर लवकर पुढचे भाग, तुमच्या खास शैलीत ! आणि हो फोटोही टाका भरपूर.

पिलीयन रायडर's picture

14 May 2017 - 10:12 pm | पिलीयन रायडर

काका, आपले प्रवासाबाबत अगदी १०००% मत जुळते. आपलाही कारभार असाच. स्वतंत्र फिरुन अत्यंत बजेट ट्रिप करण्याकडे कल. वाचलेल्या पैशातुन २ गावं अजुन पाहुन घेऊ. पबिक ट्रानस्पोर्ट असताना तर कुठेच अडत नाही. फक्त अजुन एअर बी एन बी सोबत नाते जुळायचे आहे. त्यापेक्षाही स्वस्तात हॉटेल्स मिळाल्याने आजवर कधी योग आलेला नाही. पण तुम्ही दिलेले दर पहाता लवकरच ते ही करुन बघेन.

अत्यंत उत्तम सुरुवात! पुभाप्र!

दुर्गविहारी's picture

14 May 2017 - 10:41 pm | दुर्गविहारी

मस्त. पुढील भागाची उत्सुकता वाढली आहे. लवकर टाका.

संजय क्षीरसागर's picture

14 May 2017 - 11:09 pm | संजय क्षीरसागर

जेवढा पैसा कमी तेवढी माणूस बुद्धी जास्त कल्पकतेनं वापरतो असा रुल आहे. तुमची सहल भारी झालेली दिसतेयं. पुलेशु !

अत्रुप्त आत्मा's picture

15 May 2017 - 12:14 am | अत्रुप्त आत्मा

अ्आह्हा! वाचने मे बहुतंही मज्जा आ रैला है! लाश्ट की विमान टेक अॉफ की लैनों ने मण पर इतना असर डाल्या , की ऐसे लगा , हम ही जा रैले है!
अब लवकर लवकर अगला भाग डालो. पढने कू जी चाता है! :)

व्हिसासाठी सत्तर कागदपत्रं?? आणखी एकदोन गरिबांचे व्हिसे झाले असते त्यात!

शैली मस्त आहे,काका. पुभाप्र!

नंदन's picture

15 May 2017 - 4:26 am | नंदन

मस्त जमलाय पहिला भाग. और भी आन्दो!

वावावा! तुमची बघण्याची शैली लिहिण्यातही उतरते. सतत कानाला हेडफोन्स लावून गाणी ऐकणारा माणूस हे चित्र डोळ्यासमोर दिसते. सहलीच्या आयोजनात मिपाकर मोठ्या प्रमाणात दिसताहेत हे एक विशेष. शेंगाचटणी झणझणीत!
एटिहाथ विमानापुढे नारळ फोडल्याचा फोटो टाका.

लॉरी टांगटूंगकर's picture

15 May 2017 - 10:27 am | लॉरी टांगटूंगकर

मजा येते आहे. फोटोंची प्रतीक्षा राहील.

माम्लेदारचा पन्खा's picture

15 May 2017 - 11:59 am | माम्लेदारचा पन्खा

पुढील भाग लवकरच येऊ द्या . . . . . .

पाटीलभाऊ's picture

16 May 2017 - 12:21 pm | पाटीलभाऊ

खुसखुशीत लेख...और आने दो

निरंजन._.'s picture

16 May 2017 - 3:23 pm | निरंजन._.
निरंजन._.'s picture

16 May 2017 - 3:24 pm | निरंजन._.
पैसा's picture

16 May 2017 - 6:26 pm | पैसा

मस्त सफर वृत्तांत!