ताज्या अराजकीय घडामोडी भाग-१

Primary tabs

अमितदादा's picture
अमितदादा in काथ्याकूट
13 May 2017 - 2:40 pm
गाभा: 

ताज्या घडामोडी ची चर्चा करण्याकरता ताज्या घडामोडी हा धागा होता, परंतु सध्याची त्याची नवीन आवृत्ती फक्त राजकीय घडामोडी ची चर्चा करण्यासाठी असल्याने नवीन अराजकीय घडामोडी किंवा घटना तिथे टाकण्यास मर्यादा येत आहेत, त्यामुळे अराजकीय घडामोडी साठी हा नवीन धागा.

नुकतीच एक चिंताजनक बातमी वाचली, हीच बातमी मी तीन कि चार वर्षपूर्वी वाचलेली, परंतु यातून सरकार ने कोणताही धडा घेतला नाही हे पाहून आणखी चिंताजनक वाटतेय. हि बातमी आहे भारतातील औषधनिर्माण कंपन्यातील औषध कचऱ्यापासून तयार होणार्या सुपरबग ची. भारतातील हैदराबाद मध्ये औषद निर्माण कंपन्यांचा मोठा परिसर आहे तेथूनच भारतातून निर्यात होणार्या औषधापैकी ५०% औषधे तयार होतात. यातील बर्याच कंपन्या औषध निर्मिती साठी असणारे standards and regulations पाळतात, परंतु औषध कचरा/ drug residues बाहेर सोडताना मात्र कोणतीही काळजी घेत नाहीत, यातून ह्या गोष्टी जमीन आणि पाणी मोठ्या प्रमाणात प्रदूषित करतायत आणि यातूनच जन्म होतोय सुपरबग चा. खाली दिलेला रेपोर्ट काय म्हणतोय पहा (हा रेपोर्ट साधा सुधा नसून Infection ह्या अंतराष्ट्रीय नियतकालिकात पब्लिश झालेल्या पेपर वर आधारित आहे)

India’s pharma industry is creating superbugs with its dirty effluent discharges

The presence of drug residues in the natural environment allows the microbes living there to build up resistance to the ingredients in the medicines that are supposed to kill them, turning them into what we call superbugs.

ह्या सुपरबग मुळे साधे साधे आजार सुधा गंभीर रूप धारण करतायत कारण antibiotics हे कुचकामी ठरतायत. हा रेपोर्ट काय म्हणतोय बगा

India has become the epicentre of the global drug resistance crisis, with 56,000 newborn Indian babies estimated to die each year from drug-resistant blood infections, and 70% to 90% of people who travel to India returning home with multi-drug-resistant bacteria in their gut, according to the study.

भारतातील कुचकामी कायदे आणि त्याची अंमलबजावणी याला कारणीभूत आहे, तसेच प्रशासकीय पातळीवर नसणारे गांभीर्य सुधा याला कारणीभूत आहे.

आता थोडी चांगली आणि सुखद बातमी
भारतातील अत्यंत नामवंत अश्या संस्थांनी (IISc and IISER) E. coli ह्या drug resistant bacteria वरती प्रयोग करून यातील antibiotic न विरोध करणाऱ्या enzyme चा शोध घेतला, आणि antibiotic ला कश्या पद्धीने निष्प्रभ केले जाते हे शोधून काढल. खालील बातमी मध्ये या पूर्ण प्रोसेस मध्ये H2S वायू च कार्य अत्यंत सहजरीत्या समजावून सांगितलं आहे. या शास्त्रज्ञाना पुढच्या प्रयोगात यश येवो हि सदिच्छा.
Reversing drug resistance made possible

जाता जाता आपल्या देशाचा राजधानीचे नाव बदनाम करणाऱ्या NDM-१ ह्या bacteria resistant enzyme विषयी माहिती विकिपीडिया वरती वाचता येयील
NDM-1

टीप: मी ह्या क्षेत्रातील जाणकार नाही, एक सामान्य वाचक म्हणून पहिल्या बातमी विषयी भीती आणि दुसर्या बातमी विषयीची उत्सुकता व्यक्त केली आहे.

प्रतिक्रिया

हे चिंताजनक आहेच, पण अशा बातम्या येण्यामागे कधीकधी थोडाबहुत राजकारणाचा आणि व्यावसायिक स्पर्धेचाही भाग असतो. याबद्दल अजून माहिती खोलात जाऊन आणि निष्पक्षपणे काढली गेल्यास सत्य उमजू शकेल.

अमितदादा's picture

13 May 2017 - 3:52 pm | अमितदादा

माझ थोडस वेगळ मत आहे, मला नाही वाटत कि यात व्यावसायिक स्पर्धेचा मोठा भाग असाव, मुळात त्या लेखात हैदराबाद मधले sample घेवून प्रयोग केलेला आहे. त्यानंतर त्याचे findings एका आंतरराष्ट्रीय नियतकालिकात प्रसिद्ध केले आहेत. भारता बरोबर चीन चा उल्लेख आहे. हा जगभर कोठेही होणारी घटना आहे.
पण सुपरबग तयार होण्याचे ते एकमेव कारण नाही हे हि खरे, सध्या रोगावर antibiotic चा होणारा अनियंत्रित मारा त्या जंतू मध्ये antibiotic विरोधी शक्ती वाढवतो हे काही संशोधनातून सिद्ध झालेलं आहे असे वाचले आहे. याबाबत आणखी खोलात जावून चौकशी करावी याशी सहमत.
* मूळ किंवा उपप्रतिसादात काही चुकल्यास नवीन माहिती जाणून घेण्यास उस्तुक..

पैसा's picture

13 May 2017 - 3:58 pm | पैसा

अनेकजण अँटिबायोटिक्सचा आवश्यक डोस पुरा करत नाहीत त्यामुळेही जंतूंची त्या औषधाला प्रतिकार करायची शक्ती वाढते असं वाचलंय.

अत्रे's picture

13 May 2017 - 5:39 pm | अत्रे

सध्या रोगावर antibiotic चा होणारा अनियंत्रित मारा त्या जंतू मध्ये antibiotic विरोधी शक्ती वाढवतो हे काही संशोधनातून सिद्ध झालेलं आहे असे वाचले आहे.

अमेरिकेत अँटीबॅक्टेरिअल साबणावर बंदी घातली आहे म्हणे (http://sitn.hms.harvard.edu/flash/2017/say-goodbye-antibacterial-soaps-f...) त्याचा काही संबध असेल का सुपरबगशी ?

पैसा's picture

13 May 2017 - 3:54 pm | पैसा

पहिली बातमी वाचून धसका बसला तर दुसऱ्या बातमीमुळे अजून काही चांगल्या उपचारांच्या शक्यता दिसत आहेत

वरुण मोहिते's picture

13 May 2017 - 4:11 pm | वरुण मोहिते

मल्टिपल ड्रग रेसिस्टन्ट टीबी ह्या मुळे पुढे आलंय. बाकी डॉक्टर किंवा जाणकार लोक सांगतीलच .

Nitin Palkar's picture

14 May 2017 - 9:38 pm | Nitin Palkar

भारतातील कुचकामी कायदे आणि त्याची अंमलबजावणी याला कारणीभूत आहे, तसेच प्रशासकीय पातळीवर नसणारे गांभीर्य सुधा याला कारणीभूत आहे. पर्यावरण प्रदूषणाबाबत कार्य करणाऱ्या हिरेमठ नावाच्या एका डॉक्टरचे व्यक्तिचित्र अनिल अवचटांच्या 'कार्यरत' मध्ये दहा एक वर्षांपूर्वी वाचल्याचे आठवते.

अमितदादा's picture

20 May 2017 - 12:01 am | अमितदादा

@पैसा ताई आणि @नितीन पालकर
तुमच्या मताशी सहमत आहे
@आनंदयात्री
तुम्ही दिलेला दुवा माहितीपूर्ण आहे. खालील माहिती सुधा रोचक आहे.
WannaCry ransomware: Meet the expert who stopped the global cyberattack

आता एक जुनी परंतु रोचक बातमी
UPS ह्या कुरियर/कार्गो कंपनीने आपल्या मालवाहतूक करताना डावीकडे (उजवीकडून वाहने चालतात) न वळण्याचा निर्णय घेवून चांगलाच फायदा कमावला आहे. किती तरी लिटर इंधन बचत केली आहे, तसेच प्रदूषण कमी करण्यास हि मदत केलीय. गणिती दृष्ट्या विचार केला तर हा optimization प्रोब्लेम आहे. अधिक माहिती खालील दुव्यात...

Why UPS trucks (almost) never turn left