खानदेश...!

हर्षु's picture
हर्षु in जनातलं, मनातलं
11 May 2017 - 9:44 pm

काहि दिवसांपुर्वी एका लग्नाच्या निमीत्ताने जळगाव ला जाण्याचा योग आला. मराठवाड्याबाहेर जाण्याची तशी हि तिसरी - चौथी वेळ, पण आधी बघीतलं ते पुणंच. तिथले ते प्रवेश करताच दिसनारे माॅल्स, अजस्ञ रस्ते माझ्या शहरी मनाला खुप भावायचे. पण माझ्या ह्या खानदेश वारीनं माझ्या डोळ्यवरली ती माॅल ची झापडं पार उतरवली. तसं फार काहि नाहि पाहिलं मी तिथं, पण जे दिसलं ते नक्कीच मनाला सुखावनारं होत. सिल्लोड सोडुन जळगावात प्रेश करताच दोन्हि बाजुंना दिसलेली ती विस्तीर्ण पण उजाड माळराणं, पिकाची काढणी होवुन परत नवीन पीकासाठी पाण्याच्या प्रतीक्षेत असणारी ती मोठ्ठाली शेतं, मध्येच बसच्या खिडकीतुन दिसलेला तो आठवडी बाजार, आदल्या दिवशीच कुणीतरी गवत पेटवल्यमुळे लांबवरुन त्या टेकड्यांवर दिसनारी काळपट - तपकीरी रंगाची छटा हे सर्वच माझ्या शहरी मनाला सुखावणारे होते. बसमधुन उतरल्यावर सुद्धा पत्ता सांगण्यासाठी बिलकुल आढेवेढे न घेता आवर्जुन मदत करणारी हि मंडळी माझ्यासाठी तर कुतूहलाचाच विषय होती. बहिणाबाईंच्या कवितेत असणारा गोडवा इथल्या माणसांच्या स्वभावातुनच आलेला आहे हे माञ नक्की. माझा हा प्रवास माझ्या मनात अगदी कायमचा कोरलेला राहिल हे माञ नक्की.......!

हे ठिकाणअनुभव

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

11 May 2017 - 10:12 pm | प्रचेतस

खूप छान प्रवास झाला तुमचा.

अत्रुप्त आत्मा's picture

12 May 2017 - 6:59 am | अत्रुप्त आत्मा

+ १ अगदी अगदी!
प्रतिक्रियाही
खूप छान झाली आहे, प्रचेतस यांची. :)

कंजूस's picture

12 May 2017 - 2:46 pm | कंजूस

प्रवास :) :) :) :)

कंजूस's picture

12 May 2017 - 2:47 pm | कंजूस

प्रवास :) :) :) :)

इरसाल's picture

12 May 2017 - 2:47 pm | इरसाल

तुमच्यासारखी जुनी खोडंच जर नव्या सभासदाला अस करायला लागले तर काय म्हणावं.
उद्यापरवा ह्यांनी आपला आयडी बदलुन दुर्खु घेतला तर त्यात नवल वाटणार नाही.

जयन्त बा शिम्पि's picture

12 May 2017 - 9:55 pm | जयन्त बा शिम्पि

फारच त्रोटक प्रवास वर्णन लिहिले आहे.असं वाटतं की फक्त बसमधुन जेव्हढे पहाता आले त्यावरच लिखाण आहे. खरं म्हणजे दोन चार दिवस तेथे राहिला असता तर अधिक वर्णन करता आले असते.
जळगाव वा धुळे ही दोन्ही जिल्ह्याची ठिकाणे आहेत. त्यामुळे तेथे नक्कीच खुप काही पहाण्यासारखे आहे.
आमच्या धुळे येथे सरळसोट अश्या गल्ल्यांच्या रांगा, राजवाडे संशोधन मन्दिर, समर्थ वाग्देवता मन्दिर , नकाणे तलाव, लळिंगचा किल्ला,डेडरगाव तलाव व त्याच्या बाजुला असलेले धम्मसरोवर ( विपश्यना केन्द्र ), एकविरा देवीचे भव्य मन्दिर इ.इ. बरेच काही पहाण्यासारखे आहे.
धुळ्याची रंगपंचमी तर महाराष्ट्रात एकेकाळी गाजलेली आहे.या एकदा धुळ्याला ! !

एस's picture

12 May 2017 - 11:10 pm | एस

गुड. फोटो टाका.

खान्देशात तोरणमाळ अभयारण्यात वनपिंगळा हा दुर्मिळ पक्षी पहायला यायचे आहे. पाहूया कधी योग येतो ते.