पिणं.. लपविणं..

Primary tabs

गवि's picture
गवि in काथ्याकूट
11 May 2017 - 4:43 pm
गाभा: 

थेट विषयालाच हात घालणं उत्तम.

सभी पीनेवाले मित्रों.

दारु पिण्याच्या, सॉरी, आय मीन ड्रिंक्स घेण्याच्या फायद्यातोट्यांवर काथ्याकूट करणं अगदी जुनाट झालंय.

कोणता ब्रँड?, किती पितो किंवा प्यावी, कायकाय मिसळून प्यावी, कोणत्या वेळी प्यावी?.. सोबत कोंबडी असावी की काजू? आपण कसे टँकर आहोत आणि अख्खा खंबा बसल्या बैठकीला रिचवूनही कसे ओक्के असतो..यावर चर्चा बहुत रंगतात.

पण या ना त्या कारणाने पिणारच असं ठरवलेल्या लोकांपुरती व्याप्ती ठेवून एका महत्वाच्या विषयावर ब्रेनस्टॉर्मिंग व्हावं या इच्छेने हे लिहीतोय.

पिण्याचा एक मुख्य भाग , किंवा आव्हान म्हणा, हे असतं की ते लपवावं कसं?

लॉजवर खोली घेऊन राहणार्या बॅचलराला बिंधास उघडउघड कितीही रिचवता येते. त्यामुळे ते छाती काढून सांगतात की आम्ही उजळ माथ्याने पितो.. लपवत नाही.

पण अनेक बापड्या संसारी लोकांना आपण दारु पितो हेच मुळात लपवावं लागतं. ही एक पुरुषजन्माची कुचंबणा आहे (दुसरी कुचंबणा म्हणजे वरचेवर दाढी करावी लागणं.. तिसरी कुचंबणा म्हणजे ऑफिसातल्या "तिला" (करंट अकौंट) बायकोपासून (सेव्हिंग्ज अकौंटपासून) लपवणं, चौथी कुचंबणा म्हणजे... बरं असो...).

अनेकांच्या बाबतीत हा किमान पितो हे आईबापबायकोपोरं या सर्वांना माहीत आहे पण नेमका कितीदा आणि किती पितो हे माहीत नाही अशीही अवस्था असते. ही एक सेफ व्यवस्था असते..

त्याखेरीज कामाच्या जागी पिणं, आय मीन प्यायलेला सापडणं म्हणजे दारुला लागणार्या पैशाच्या उगमालाच बोळा बसणं. म्हणून जरा टीमच्या मेंबर्ससोबत जर्रा ऑफिसच्या दिनांतानंतर अंमळ बसणं हाही एक सेफ उपाय असतो.

पण घरी परतल्यावर काय ? बायकांची नाकं पुरुषांपेक्षा हजारपट पॉवरफुल असतात.

प्रसंगोपात्त मद्य पिऊनही त्याचा दरवळ आपल्या मुखातून अथवा अंगाला येऊ नये यासाठी हमखास उपाय कोणाला सापडला आहे का? किमान घरी पोहोचेपर्यंत तरी दारुचा मागमूस उरु नये यासाठी तुम्ही काय करता?

कम्मॉन.. तुम्ही करता..आडीबाजी नाय पायजे.. उगं बळंच निरागसपणा नको.. जरा समस्त पुरुषजमातीसोबत आपापले उपाय शेयर करा.

आणि हो... व्होडकाचा वास येत नाही ही अंधश्रद्धा आहे.

मोठ्या कॉन्फिडन्सने वोडका ढोसून वरुन पानबीन किंवा हॉल्सची गोळी चघळून घरी पोहोचावं आणि "आता सरळ झोपायला जावा, सासूबाईंसमोर जाऊ नका.. आणि एकूणच जरा कमी करा.." असा त्रासिक आणि त्रस्त उपदेश मिळतो असा अनेकांना अनुभव असेलच.

तर... आपला आवडता कार्यक्रम करुनही सुमडीत सावासारखं घरात घुसण्यासाठी तुम्ही काय करता?

यात बाटल्या / कॅन्स लपवण्याच्या जागा, लपविण्यास सोपे मद्यप्रकार, पिण्याच्या योग्य वेळा, योग्य जागा, इफेक्टिव (ट्राईड अँड टेस्टेड फॉर्म्युला) अशा अनेक अंगांनी विचार करता येईल.

तळटीप १. ओकण्याशी संबंध जोडू नये.

तळटीप २. फक्त पुरुषांना लागू.

प्रतिक्रिया

अभ्या..'s picture

11 May 2017 - 5:30 pm | अभ्या..

सॉरी गविराज,
आमचे फाटके बनेल असे इलेक्ट्रिकच्या वायरींवर टांगायला सांगायचा तुम्हाला अधिकारच नै.
आम्ही आत्ताच नै बोल्णार जा.
.
.
.
.
जर काही शाही बनेल टांगलेले दिसले तर बोलू म्हणा...;)

टवाळ कार्टा's picture

11 May 2017 - 5:39 pm | टवाळ कार्टा

बनेल का लपव्ता =))

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 May 2017 - 8:11 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गविसेठ पहिल्याछुट एक गोष्ट सांगावी लागते की बिनवासाची दारु अजुन यायची आहे (असं समस्त पिणारे मित्र म्हणतात)

दूसरी गोष्ट पीऊन आलात ही गोष्ट एकाच व्यक्तिपासून लपवून राहु शकत नाही ती म्हणजे तुमची बायको, अशा वेळेस एक तर तुम्हाला लैच प्रेमाचा उमाळा येतो नै तर तुम्ही तिच्याशी भांडता आणि हळूच तिच्याशी लगट करता, अग माझी इच्छा नव्हती आज एका मित्राच्या वाढदिवस होता, त्याचा खुप मोठा प्रॉब्लम होता मित्र म्हणून मी सोडवला बसलो थोडंसं' आणि पुढे जे घडून जो योग्य समारोप करतो तो यशस्वी पिणारा (असे समस्त पिणारे मित्र म्हणतात)

एक महत्वाचं...पिता ना मग मग ते लपून राहुच शकत नाही, एक तर तुम्ही पिता हे कबूल करा आणि तुम्हाला अनेक स्मस्याना सामोरं जावं लागत असेल तर तुम्ही ड्रिंक्स बन्द करा (असे समस्त पिणारे म्हणतात)

-दिलीप बिरुटे
(समस्त नसलेला)

गवि's picture

12 May 2017 - 8:34 pm | गवि

सर..

तुम्ही फक्त ताक पिता असं ऐकलं आहे. खरंय का ते?

-(निरागस) गवि.

प्रचेतस's picture

12 May 2017 - 9:38 pm | प्रचेतस

मी ही अगदी हेच्च ऐकलंय.

ज्ञानोबाचे पैजार's picture

11 May 2017 - 5:30 pm | ज्ञानोबाचे पैजार

व्होडका (किंवा कोणतीही मदिरा) घेतली आहे हे समजण्यासाठी वास घ्यायची गरज नाही तर ते वर्तनावरुनही समजते.
म्हणजे उदा. बायकोशी अतिशय नम्र पणे वागणे, तिच्या साठी गजरा किंवा पान घेउन जाणे, किंवा तिच्याशी इंग्रजी मधून संवाद साधणे वगेरे वगेरे लक्षणे पुरेशी आहेत.
(अनुभवी) पैजारबुवा,

म्हणजे उदा. बायकोशी अतिशय नम्र पणे वागणे, तिच्या साठी गजरा किंवा पान घेउन जाणे, किंवा तिच्याशी इंग्रजी मधून संवाद साधणे वगेरे वगेरे लक्षणे पुरेशी आहेत.

अत्यंत उपयुक्त निरीक्षण. धन्यवाद. उपयोग करण्यात येईल.

व्होडका (किंवा कोणतीही मदिरा) घेतली आहे हे समजण्यासाठी वास घ्यायची गरज नाही तर ते वर्तनावरुनही समजते. उदा. बायकोशी अतिशय नम्र पणे वागणे,

अरे देवा =))
यावरुन आठवले माझ्या मैत्रिणीचा नवरा एक रात्री पिऊन आला मग दारात वाट पाहत बसलेल्या आपल्या आई, वडील आणि बायकोला ओळीने वाकून नमस्कार करत सुटला =))

संजय क्षीरसागर's picture

11 May 2017 - 9:26 pm | संजय क्षीरसागर

मग दारात वाट पाहत बसलेल्या आपल्या आई, वडील आणि बायकोला ओळीने वाकून नमस्कार करत सुटला

तरी थोडी कमीच घेतली म्हणायची !

व्यवस्थित झोकली असती तर म्हणाला असता " आलो का नै बरोब्बर घरी ? चला आता सगळ्यांनी माझ्या पाया पडा" :)

??

असो महिला मंडळाने त्यांचे नवरे करत असलेले उपाय शेअर केले तरी चालतील की!!

अभ्या..'s picture

11 May 2017 - 5:43 pm | अभ्या..

अर्र
=))

टवाळ कार्टा's picture

11 May 2017 - 7:33 pm | टवाळ कार्टा

आरारारा

टवाळ कार्टा's picture

11 May 2017 - 5:38 pm | टवाळ कार्टा

खि खि खि...ख्या ख्या ख्या

सूड's picture

11 May 2017 - 5:45 pm | सूड

तळटीपा वाचून हसतोय. =))

माम्लेदारचा पन्खा's picture

11 May 2017 - 5:51 pm | माम्लेदारचा पन्खा

इथं पार्टी आहे आता . . . . .

पण मिपावरचे पेताड असे सहजासहजी तोंड उघडतील काय ?

उपाय नंबर मायनस एक. दारू पिऊच नये.
उपाय नंबर दोन. दारू ढोसल्यावर घरी जाऊ नये, दुसऱ्या दिवशी दुपारी जावे.
उपाय नंबर एक. वरचे दोन उपाय कोणी करणार नाहीतच. तेव्हा अशांनी घरी गेल्यावर सगळ्यात आधी स्वतःचे तोंड बंद ठेवावे.
.
.
.
.
उरलेले उपाय 'बसल्यावर' सांगण्यात येतील. बायको मिपा वाचते. कदाचित गुपचूप डुआयडीदेखील काढला असेल, काय सांगावे!

'पुरुष कोनाडा झालाच्च पाहिजे...'

बायका पीत नाहीत असं का समजून चाललात गवि?
माझा त्रोटक अनुभव सांगते.
माझा नवरा व मी अज्याबात एक घोटही कोणत्याही प्रकारची दारू पीत नाही, अगदी बीयरही नाही पण गेले वर्षभर किंवा जास्तच माझ्या फ्रिजमध्ये चार बाटल्या हाय्नीकिन की कायश्या नावाची बियर पडून होती. किडनीस्टोनचा त्रास सुरु झाल्यावर अनेक उपायांपैकी एक म्हणजे बियर पिणे हाही एक उपाय आहे असे म्हणतात. नको नको म्हणत असताना नवर्‍याने सहा बाटल्या आणल्याच! दोन कश्याबश्या प्यायले. आधीच दारूकामात रस नसताना या असल्या चवीचं काहीतरी प्यायल्यावर "लोक का पितात?" हा प्रश्न पडलाय. लिंबाचं सरबत यापेक्षा कितीतरी पटीनं बरं. दोन बाटल्यांनंतर अर्धा तास वाट पाहिल्यानंतर जराही फरक जाणव्ला नाही. तो किडनीस्टोन आणि मी तसेच विव्हळत पडून होतो. मुलगा येऊन आपली आई झिंगालाला नाहीये ना, हे पाहून जात होता. काही फरक न पडल्याने ती बियर दीड वर्षांनंतर टाकून द्यायला बाहेर काढली. बियरपासून काही पाकृ होतात का हा शोध घेतला पण काही नाही. फारतर शांपूसारखी वापरता येते म्हणून केस धुवून टाकावेत असा विचार केला. नंतर क्यान्सल केला. शेवटी नवर्याला एका शनिवारी सोफ्यात बसवून "या चार बाटल्या संपवल्याशिवाय उठायचं नाही" अशी ताकीद दिली व फ्रिजमधील रिकाम्या जागेत भेळेसाठी केलेल्या चिंचेच्या चटणीच्या दोन बरण्या ठेवल्या.
एकदा जालावरील पाकृ पाहून पास्ता सॉस घरी केला व त्यात घालायला वाईन आणण्यास नवर्‍याला सांगितले. दोन चमचे वाईन घातलेला पास्ता खाऊन आम्ही जे गाढ झोपलो ते एकदम फ्रेश अवस्थेत सकाळी उठलो. नंतर ती वाईनची बाटली किचनसिंकमध्ये ओतून दिली.

खरच त्रोटक अनुभव ग रेवाक्का.
नुसता त्रो म्हणले तरी चालेल.

रेवती's picture

11 May 2017 - 7:30 pm | रेवती

हीहीही........
होय रे बाळा, माझ्या पेयपानाला काही मोठा इतिहास वगैरे नाही. फक्त त्रो म्हणून शकतोस.

यशोधरा's picture

12 May 2017 - 8:45 am | यशोधरा

त्रो अ मजेशीर आहेत!
वाईन ओतून दिलीस? अरेरे! स्वयंपाकात वापरली असतीस की!

आदूबाळ's picture

11 May 2017 - 7:25 pm | आदूबाळ

त्रो अ १: ह्या. हायनिकेन ही काय बियर आहे का?
त्रो अ २: वाईन आयुर्वेदिक असते हो. ठेवायची कधी लागली तर. नाहीतर पंचवीसेक वर्षांनी भरपूर किमतीला विकून टाकायची.

आता हायनिकेन जर बियर नसली तर खरी बियर किती वाईट चवीची असेल असा अंदाज करतिये.
वाईन आयुर्वेदिक काय, हम्म............पैसे मिळवण्याचे आधुनिक उपाय या पुस्तकात लिहायला पाहिजे हा उपाय.

सूड's picture

11 May 2017 - 7:37 pm | सूड

=))

काय ही बियरची विटंबना.....

कपिलमुनी's picture

11 May 2017 - 7:17 pm | कपिलमुनी

कच्चा कांदा भरपूर खाणे,
बायकांना कच्च्या कांद्याचा वास आवडत नाही त्यामुळे 'जवळ' येत नाहीत .

टीप :
१.बायकांना हा अनेकवचनी शब्द स्वानुभवातून आलेला नाही , समस्त पुरुषजातीच्या मंथनातून आलेला आहे.
२. ओल्डमंक पिल्यास काय पण करा वास जात नाही.

टवाळ कार्टा's picture

11 May 2017 - 7:37 pm | टवाळ कार्टा

२. ओल्डमंक पिल्यास काय पण करा वास जात नाही.

बसायच्या आधीच गजरा, साडी, दागीना, फिरायला जायचे बुकिंग.....यातले जे जे झेपेल त्याची व्यवस्था करावी =))

ओल्ड मंक पिणारे असलं काही करत असतील असे वाटत नाही.
आणी जरी असल्या डिमांड ओल्डमंकवाल्यांना केल्या तरी दोनच पर्याय संभवतात.
१) ए शटाप..............
२) उद्या हं जानू..............
.

=))

अभ्या महाचावट आहे असं एक निरीक्षण नोंदवीत आहे.

अभ्या..'s picture

11 May 2017 - 9:42 pm | अभ्या..

महाचावट ना , असु दे . ओके
बंदूक की औलाद वगैरे नाही ना?
=))

अप्पा जोगळेकर's picture

12 May 2017 - 11:09 am | अप्पा जोगळेकर

असेच म्हणतो.

रश्मिन's picture

12 May 2017 - 10:51 am | रश्मिन

शिट्ट्या टाळ्या !!
(ओल्ड मंक अनुग्रहीत )
बिअर प्रेमींनी एकवार अल्ट्रा घेऊन पहावी .. (वासाची कमी , अल्ट्रा ची हमी )

अद्द्या's picture

12 May 2017 - 1:19 pm | अद्द्या

ओल्डमंक पिल्यास काय पण करा वास जात नाही.

अगदीच सहमत ..

अभ्या..'s picture

12 May 2017 - 1:50 pm | अभ्या..

शी बाबा, त्यात काय एवढं?
उद्या डीओ अन सेंटचा पण वास येतोय म्हणाल. ;)

अद्द्या's picture

12 May 2017 - 2:48 pm | अद्द्या

दाद्या .. वास येतो म्हणालो .. त्याचा त्रास होतो असं नाही

दादा कोंडके's picture

11 May 2017 - 8:07 pm | दादा कोंडके

'बसून' घरी आल्यानंतर एक चोरासारखं वागलं किंवा 'हाँ, मैने पी है, चोरी तो नही की है' वाला अ‍ॅटीड्युड दाखवला तरीही मंडळी टोमणे मारतेच. त्यामुळे तीसरा वागायचा प्रकार असेल तर अनुभवींनी शेअर करावा.

गवी, 'न पिण्याची झायरात कराणार्‍या मंडळींनी या धाग्यावर ई ओकार्‍या काढू नयेत' असा ढुस्क्लेमर टाकायचा की.

पिलीयन रायडर's picture

11 May 2017 - 8:11 pm | पिलीयन रायडर

काय वाट्टेल ते करा.. आम्हाला कळतंच. वास लपवाल हो, पण चेहर्‍यावरचा आनंद कुठे लपवाल?! टेल टेल!

अयायायाया.... असंय होय? खिक्क...

अभिदेश's picture

11 May 2017 - 8:36 pm | अभिदेश

घरी / बायकोला सरळ कल्पना द्यावी , मी सोशल ड्रिंकर आहे , दारुडा नाही. कोणताही वेगळा उपाय करायची गरज नाही. वाटल्यास कधीतरी एकदा विस्की / स्कॉचची ऑन द रॉक चव द्यावी , ९९% आवडणार नाहीच , मग वर म्हणावे "बघ मी कसा पितो ते माझं मलाच माहिती , तुला वाटतं मी मजा करतोय " ... :-)

सौरा's picture

12 May 2017 - 10:40 am | सौरा

हाहाहा..

जगभरातील सर्व उपाय करुन झाले, अगदी पांन, फुले, गवत खाऊन झाले काही उपयोग नाही झाला!
शेवटी बैठक घेतली, शांत सांगितले... (घेऊन च होतो ;) )
मर काय करायचे ते कर - आई - बायको व विषय संपला!

महिन्यातील 10 दिवस माझे 20 त्यांचे!

संजय क्षीरसागर's picture

11 May 2017 - 9:36 pm | संजय क्षीरसागर

तर... आपला आवडता कार्यक्रम करुनही सुमडीत सावासारखं घरात घुसण्यासाठी तुम्ही काय करता?

घरात घुसल्यावर बाकीचे आनंदाचे कार्यक्रम कसे निर्विघ्न पार पाडता ? हा खरा प्रश्न आहे. नाही तर नुसती पीऊन काय उपयोग ?

टवाळ कार्टा's picture

12 May 2017 - 3:28 pm | टवाळ कार्टा

आग्गाग्गा....

अफगाण जलेबी's picture

11 May 2017 - 9:48 pm | अफगाण जलेबी

पण कुठल्याही 'ओल्या ' पार्टीत दुष्काळातून आल्याप्रमाणे चरतो. विशेषतः ज्याला snacks किंवा शुद्ध मराठीत चखणा म्हणतात ते. त्यावर काही उपाय आहे का?

- (चखणाहाॅलिक नव-याची बायको) अफगाण जलेबी.

कपिलमुनी's picture

11 May 2017 - 10:32 pm | कपिलमुनी

एकच उपाय प्यायला शिकवा

डॉ सुहास म्हात्रे's picture

11 May 2017 - 11:21 pm | डॉ सुहास म्हात्रे

एकच उपाय. पिऊन घरी जाणं इतकं सिरियसली घेऊ नका. तुम्ही सिरियस होता, मग घरच्यांना वाटतं की पिण्यात काहीतरी खोट असली पाहिजे... आणि मग सगळं पुढचं रामायण घडतं. :)

स्रुजा's picture

11 May 2017 - 11:29 pm | स्रुजा

पण मी काय म्हणते, नवरा बायको एकत्र बसुन सिनेमा बघत एखादा पेग घेतायेत ही कल्पना नाहीच करवत का? कशाला बायकांना बदनाम करायचं म्हणते मी? ;)

आणि उगा आपलं बायकोच्या धाकात आहोत असा आव आणतो प्रत्येक नवरा .. काही नसतं असं !

नवरा बायको एकत्र बसुन सिनेमा बघत एखादा पेग घेतायेत ही कल्पना नाहीच करवत का?

मी अॅडिशनल पेयपानाबद्दल बोलतोय. व्हॅलिड / अप्रूव्हड कोट्याबद्दल नव्हे.

स्रुजा's picture

11 May 2017 - 11:39 pm | स्रुजा

लोल, हाच तो आव ! अप्रूव्ह्ड कोटा म्हणे. कितीही खोटं असलं तरी बायकांना वाटतं किती गं बाई नवरा माझ्या धाकात ...

अप्पा जोगळेकर's picture

12 May 2017 - 10:21 am | अप्पा जोगळेकर

नवरा बायको एकत्र बसुन सिनेमा बघत एखादा पेग घेतायेत ही कल्पना नाहीच करवत का?
नाही करवत. बायकोने स्वतंत्रपणे बसावे असे मत आहे. मी तर बायकोला तुला ज्या शनिवारी बसायचे असेल तेंव्हा सांगून ठेव मी तेंव्हा मुलीशी खेळत बसेन आणि माझा कार्यक्रम रविवारी करेन अशी ओपन ऑफर अनेकदा दिली आहे.
उगाच 'बसल्यानंतर' तुझी आई मला अमुक ढमुक बोलली, माझ्या आईच्या पोळ्या तुझ्या आईपेक्षा किती मऊसूत असतात हे कोण ऐकणार.

चिगो's picture

12 May 2017 - 4:25 pm | चिगो

उगाच 'बसल्यानंतर' तुझी आई मला अमुक ढमुक बोलली, माझ्या आईच्या पोळ्या तुझ्या आईपेक्षा किती मऊसूत असतात हे कोण ऐकणार.

कहरच..
('अप्रुव्ह्ड कोट्यातून' पिणारा) चिगो

स्रुजा's picture

12 May 2017 - 12:03 am | स्रुजा

यावरुन एक किस्सा आठवला. एक मैत्रिण इथली नवीन नोकरीला लागली. त्यांचं ऑफिस शुक्रवारी बीअर पार्टी करायला जायचं, ही पण गेली. मस्त टीम बरोबर २ बीअर प्यायली आणि बस मध्ये बसली. त्यांनी नुकतंच घर बदललं होतं , स्टॉप वरुन बर्‍यापैकी चालत जावं लागाय्चं. म्हणुन तिने नवर्‍याला फोन केला की घ्यायला ये बस स्टॉप वर. आवाज ऐकुनच नवरा काय समजायचं ते समजला. जाऊन उभा राहिला गुपचुप. बसची वेळ उलटुन अर्धा तास झाला हिचा पत्ता नाही. तेवड्।यात हिचा फोन, तुल सांगितलं तरी येत नाहीस वेळेवर म्हणुन चिडली होती. हा म्हणे अगं मी केंव्हाचा स्टॉप वर उभा आहे, ही पण म्हणे मी पण केंव्हाची उभी आहे. शेवटी याने विचारलं कोणत्या स्टॉप वर आहेस बाई? तर तेंव्हा समजलं की तिने जुन्या घराची बस घेतली होती आणि जुन्या घरासमोर उभी होती !! मग बिचारा तिकडे जाऊन हिला घेऊन आला आणि तुला ऑफिसमधुन लिफ्ट मिळणार नसेल तर नो दारु असा बिचारीला धाक पण लावला :D

राघवेंद्र's picture

12 May 2017 - 1:24 am | राघवेंद्र

=D

यशोधरा's picture

12 May 2017 - 8:46 am | यशोधरा

=))

अभ्या..'s picture

12 May 2017 - 9:30 am | अभ्या..

बरोबर आहे नवर्याचे,
दारू पिउन असे जुने पत्ते आठवायले तर अवघडे ;)

सतिश गावडे's picture

12 May 2017 - 9:34 am | सतिश गावडे

=))

समाधान राऊत's picture

12 May 2017 - 10:01 am | समाधान राऊत

*LOL*

सौरा's picture

12 May 2017 - 10:42 am | सौरा

लोल्झ.. :प

टवाळ कार्टा's picture

12 May 2017 - 3:29 pm | टवाळ कार्टा

ठ्ठो =))

आषाढ_दर्द_गाणे's picture

12 May 2017 - 10:47 pm | आषाढ_दर्द_गाणे

:)

आषाढ_दर्द_गाणे's picture

12 May 2017 - 1:26 am | आषाढ_दर्द_गाणे

तसं 'प्यायल्यानंतर लपवावे का लागते?' हा इतरांना पडलाय तसा मलाही पडलेला प्रश्न आहे.
मग पिणे सोशल असो वा अँटीसोशल (असतात प्रसंग काही)
असो.
स्वतःच्या पायाने चालत घरी जाण्याइतकी शुद्ध असताना, वेगळं काही करायची गरजच काय?
नाही तर सरळ इतके उशिरा उगवायचे की घरातली आम जनता तोवर गाढ झोपेत असेल.
मग तुम्ही, तुमची चावी आणि घराचे कुलूप, ह्यांनी एकत्र येऊन काय तो एकदा तिढा सोडवलात की सरळ निद्रादेवीच्या स्वाधीन व्हावे!
आणि शेवटचा उपाय म्हणजे सरळ-सरळ नकार देणे.*

बाकी तुम्ही विचारात घेतलेल्या अनेक उपायांमध्ये 'दारूसोबत बक्कळ पाणी पिणे' हे कुठे दिसत नाहीये.
बहुदा ह्याने 'अंगाला वास येणे' प्रकारही निकालात निघावा

* ह्याकरिता पणशीकरांचे 'तो मी नव्हेच' आहे तूनळीवर, त्याची उजळणी करायला हरकत नाही!

रामपुरी's picture

12 May 2017 - 1:50 am | रामपुरी

दूरदेशी रहात असाल तर बायकोला पण सामील करून घ्या. आई वडील सोबत रहात असतील तर शिव्या खा (नीट लावलेली असेल तर शिव्या काही समजत नाहीत) आणि झोपून जा. हा का ना का

प्रकाश घाटपांडे's picture

12 May 2017 - 9:12 am | प्रकाश घाटपांडे

काही लोक विंग्लिश मारत्यात आन वास यौ ने म्हनून मंग किमाम खात्यात, पन नेमका घरी आल्यावर कंट्रिचा वास मारतोय

बाबा घरी आले कि इंग्लिश न्युझ लावून बसतात ........ मग समजायचं कि आज औषध घेतलाय

अप्पा जोगळेकर's picture

12 May 2017 - 10:41 am | अप्पा जोगळेकर

तशी लपविण्याची वेळ येत नाही सहसा पण शुक्रवारी 'बसणे' झालेले असते. आई-वडील-बायकोयांना ते माहीत असते आणि तरीही रविवारी दुपारी जेवणाआधी बिअर पिण्याची तीव्र इच्छा होते तेंव्हा लपवावे लागते.
१) सकाळी बाजारहाट करायला जावे आणि २-३ टिन भाजीत लपवून कापडी पिशवीतून घेऊन यावेत.
२) भाजी फ्रीज मधे ठेवता ठेवता हळून फ्रीजर मधे ढकलून द्यावेत. मग निवांत मुलाबाळांशी खेळत बसावे. आई-वडील-बायको-मुले वगैरे लोकांची आंघोळ होऊ द्यावी. शहाण्या बाळासारखी ताटे, वाट्या वगैरे घेऊन तयारी करुन ठेवावी.
जेवायला कधी बसायच असा प्रश्न आला की आलोच आंघोळ करुन असे म्हणून आंघोळीच्या टॉवेल मधे टिन लपवून आंघोळीला जावे.
३) थंड पाण्याने आंघोळ करता करता थंड बिअर ढकलावी. (चकणा पाहिजेच वाल्यांनी शेंगदाणे खिशात घ्यावेत).
४) आंघोळ झाली की थेट जेवणाच्या ताटावर बसावे. भरपेट जेवावे. आणि भांडी वगैरे आवरुन निवांत लोळावे. रविवार असल्याने आणि चम्चमीत जेवण झाल्याने सगळे झोपतात. ५ पर्यंत वास जातो..

अनुप ढेरे's picture

12 May 2017 - 10:45 am | अनुप ढेरे

आवरा! काय धाडस!

अभ्या..'s picture

12 May 2017 - 10:49 am | अभ्या..

अधुन मधून बियर केसाना कशी चांगली याचे डेमो दर आठवद्याला देत राहायचे.
वासाचा प्रश्न मिटतो.

अप्पा जोगळेकर's picture

12 May 2017 - 10:50 am | अप्पा जोगळेकर

काही तरी काम काढून ११-साडेअकराला बाहेर जावे. परतायला उशिर करावा आणि बाहेरुन मारुनच यावे. उगाच फोन करुन ताट वाढलेले आहे याची खात्री करावी आणि घरी येऊन सरळ ताटावर बसावे.

अप्पा जोगळेकर's picture

12 May 2017 - 10:55 am | अप्पा जोगळेकर

यासाठी आईवडील घरी नसणे आवश्यक आहे. सकाळी हपिसला जाण्याआधी मुद्दाम फालतू कारणावरुन एखादे भांडण काढावे. आणि मग संध्याकाळी फोन करुन जेवायला घरी येणार नाही सांगावे. निवांत झोकून आणि जेवून घरी यावे. आणि सरळ झोपावे.
दुसर्या दिवशी सकाळी सरळ चूक झाली असे सांगून बिनशर्त माफी मागावी

अप्पा जोगळेकर's picture

12 May 2017 - 11:02 am | अप्पा जोगळेकर

हे फक्त कॉलेज युवकांसाठी आहे.
एखाद्या रात्री सबमिशन चे कागद खरडण्यासाठी जागत बसावे किंवा जर्नल लिहिण्यासाठी जागत बसावे. एका तांब्यात जिन किंवा व्होडका ओतून झेपेल तितके पाणी मिसळून ठेवावे. खरडता खरडता तांब्या भाड्यातून घोट घोट पित राहावे. मधून मधून लाडू-चिवड्याचे डबे फस्त करत राहावे. नंतर तांब्या स्वच्छ घासून ठेवायला विसरु नये. सकाळी पाणी समजून कोणी प्यायले तर पंचाईत होते.

बाब्बौ.. आप्पासाहेब लै पोचलेले अणभाविक आहेत्सं दिसतं..

वरुण मोहिते's picture

12 May 2017 - 11:30 am | वरुण मोहिते

कशी असते चव तिची ??

समाधान राऊत's picture

12 May 2017 - 12:06 pm | समाधान राऊत

खुदा से तो डर !!!

भटकंती अनलिमिटेड's picture

12 May 2017 - 11:31 am | भटकंती अनलिमिटेड

ही कुणाच्या तरी सहचारिणीने अकाऊंट हॅक करुन केलेली पोस्ट समजावी का? सगळ्या ट्रिक्स उपाय जाणून घेऊन हाणून पाडण्याचा डाव करण्यासाठी?

अप्पा जोगळेकर's picture

12 May 2017 - 11:54 am | अप्पा जोगळेकर

जादूगाराची पोतडी रिती होत नाही कधी.

तनमयी's picture

12 May 2017 - 11:34 am | तनमयी

ब्रिझर काय अस्ते

संजय पाटिल's picture

12 May 2017 - 11:52 am | संजय पाटिल

तर... आपला आवडता कार्यक्रम करुनही सुमडीत सावासारखं घरात घुसण्यासाठी तुम्ही काय करता?

आपून कुच नय करता.... जो करना होता हय वई करते, मतलब जहा भी गिरा दिखेगा, उठाके लाके एक कोने मे डाल देते....
;)

वर मुनीवर म्हणाले आहेतच .. कि मॉंक चा सुवास ( फक्त वास म्हणून अपमान नाही करायचा ) काही केला जात नाही .

काही गोष्टी करतो त्या या .
एक तर नंतर भरपेट जेवावे.. ज्यात कांदा लसूण असेल. .नॉर्मली चिकन / मासे असतातच नंतर च्या जेवणात.. त्यामुळे तो वास थोडा मिसळतो .

हॉल्स / क्लोरमिंट नि वास जातो या सगळ्या अफवा आहेत . जेवणा नंतर वाटल्यास पान खावा ..

सर्वात बेस्ट उपाय .. आपल्या बापूसास एक मेसेज टाकून ठेवणे. . ते मग तुमची माउली झोपली कि मिस कॉल देतात .. त्यानंतर घरी जाणे.. आणि गुमान आपल्या खोलीत जाऊन झोपणे

नंदन's picture

12 May 2017 - 1:58 pm | नंदन

धागा आणि प्रतिसाद खतरनाक!

शाळाकालेजातल्या मित्रांबरोबर 'बसू आणि बोलू'च्या चिंतनबैठका पार पडल्यावर अंमळशाने पांगापांग होताना, याच एक्झिस्टेन्शियल समस्येने ग्रासलेले चेहरे आठवले. कारुण्यातून का कायसासा निर्माण होणारा विनोद सर्वश्रेष्ठ असतो म्हणतात, ते याचसाठी बहुधा ;)

मार्कस ऑरेलियस's picture

12 May 2017 - 2:07 pm | मार्कस ऑरेलियस

संसारा उध्वस्त करी दारु , म्हणुन संसार नका करु !

बेकार हाणला.......लोल

टवाळ कार्टा's picture

12 May 2017 - 3:29 pm | टवाळ कार्टा

ठ्ठोSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSS

अरेरे काय ही यांची अवस्था! निधड्या छातीने दोन बुचं घरीच पिऊ शकत नाहीत.
एका मल्लुने सांगितले की घरी रोज रात्री बायकोच फ्रिजमधली हवी ती बाटली काढून पेल्यात देते. संपलेली आहे आहे आणा हेही सांगते. " फक्त एवढ्याशा दारुसाठी बाहेर सेटिंग नको." यानंतर बय्राच पेताडांचे आ वासलेलेच आदराने.

विश्वजीत कदम's picture

12 May 2017 - 3:39 pm | विश्वजीत कदम
ससू's picture

12 May 2017 - 4:00 pm | ससू

मागच्या १० वर्षापासून आजमावलेला उपाय अगदी ओल्ड मॉंक ला सुद्धा लागू.
१. पार्टीला जाण्याआधी किंवा वाईन शॉप गाठन्याआधीच मेडिकल गाठा
२. पुदिना हरा टॅबलेट २ घ्या
३. आता पुढील कार्यक्रम दिल्लीहून थेट प्रक्षेपण चालूय द्या निर्धास्त विना वत्यय.
४. घराची अजिबात काळजी करू नका. कारण पिताना कसलीही काळजी नको नाहीतर पिण्याची मजा जाते. एन्जॉय करता येत नाही.
(म्हणून पुदिन हरा आधीच बाळगा. उगीच पिताना टेन्शन असते मेडिकल उघडे सापडेल का? जरी उघडे सापडले तरी पुदिन हरा असेलच का नसले तर दुसरे मेडिकल शोधावे लागेल. यात पिण्याची मजा जाते आणि नंतर पण वेळ जातो ; शिवाय एक अनाहूत धोका असतो कारण झालेला कार्यक्रम आपला
नको असलेला आत्मविश्वास अचानक पने वाढवतो कि आपल्या तोंडाचा वास काही येत नाही यात आपले मित्र/सहकारी उगीचच आपल्या फाजील आत्मविश्वासाला बळकटी देतात आणि आता स्वतः भाऊ डायरेक्ट घरी जातील असे होण्याचीच शक्यता जास्त असते.)
५. कार्यक्रम झाल्यावर घरी निघण्याच्या अगोदर एक पुदिना गोळी तोंडात टाका आणि गिळू नका. १-२ मिनीटानंतर गोळी आपोआप तोंडात फुटते. आणि आपल्याला सेंटर शॉक गोळी खाल्ल्याचं फीलिंग येत. पण एकदा का तुम्हाला हि गोळी तोंडात फुटण्याची सवय लागली कि नंतर काही वाटत नाही.
६ आता घरी पोहोचण्याच्या ५ मिनिट आधी किंवा गाडी पार्क झालयावर किंवा सोसायटी मध्ये एन्ट्री करताना दुसरी गोळी तोंडात टाकून करकचून चावून फोडा. आता तुमचा आत्मविशास चांगलाच वाढलेला असेल आणि पहिल्या गोळी इतकी २री गोळी शॉक देणार नाही.
७. हा उपाय ऐकल्यानंतर "मी उगीच काही शंका उपस्थित केल्यावर" हा उपाय सांगणाऱ्याने इतक्या (न पिताना असलेल्या) आत्मविश्वासाने सांगितले होते कि "अरे अगदी देशीचा पण वास जातो व्हिस्की,रम तर किस झाड कि पत्ती"
८. अगदी पहिल्या वेळेपासून आजपर्यंत तेवढ्याच विश्वासाने आजपर्यंत हा उपाय आजमावतो आहे.

आता काही प्रतिबंधक उपाय
-- गोळ्या २ असलेल्याच बऱ्या १ गोळी ने थोडावेळ वास जातो पण २०-३० मिनटात आपली मदिरा आपला सुवास परत मिसळायला लागते पुदिना बरोबर.
-- पुदिना हरा रिजर्व्ह म्हणून खूप आधीच पाकिटात घेऊन ठेऊ नका. यात गोळ्या पाकिटातच फुटतात आणि काही उपयोग होत नाही. परत मेडिकल गाठावे लागते. (स्व अनुभव)
-- माझ्या एका मित्राने हा उपाय केल्यानंतर घरच्यांनी त्याला विचारले होते इतका पुदिनाचा का वास येतो आहे अचानक. त्याने त्या तंद्रितही घरच्यांना पटवून दिले कि तंदूरी बरोबर दिलेली पुदिना चटणी इतकी छान होती कि खूप चटणी खाल्ली हॉटेल मध्ये म्हणून वास येत असेल.)
-- वासाची ग्यारंटी पुदिना हरा घेते पण घरी गेल्यावर अति बोलणे, उगीच अपराध्या सारखे वागणे आपले बिंग फोडू शकते. यावर अंमल हा अनुभवानेच मिळवावा लागतो.

ओल्ड मॉंक प्रेमी,
ससू

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 May 2017 - 9:42 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

=)) जबरा.

-दिलीप बिरुटे

=)) =))

हे पण करून झालय .. प्रॉब्लेम हा येतो . . " रिश्ते मे हम तुम्हारे बाप लागते है " असं म्हणत सगळे प्रकार करून कोळून प्यायलेला माणूस हसायला लागतो मला बघून . आणि ते हसणं ऐकून बाकी कोणी उठले कि मग ओरडायला हि लागतात
. मग बस बोंबलत

टवाळ कार्टा's picture

12 May 2017 - 5:49 pm | टवाळ कार्टा

चायला तू कुठल्यातरी भुयारी मार्गातूनसुद्धा जाउ शकतोस तुझ्या खोलीत =))

अद्द्या's picture

15 May 2017 - 10:12 am | अद्द्या

तू बघितलंय ना घर .. एकाच दरवाजा आहे :-/

टवाळ कार्टा's picture

15 May 2017 - 6:43 pm | टवाळ कार्टा

तेच म्हणतोय की...दरवाजा एकच आहे....भुयारे किती असतील ते कोणी बघितलेय =]]

उपेक्षित's picture

12 May 2017 - 4:54 pm | उपेक्षित

खतरनाक धागा आणि एक सो एक प्रतिसाद :) ;)

मार्कस ऑरेलियस's picture

12 May 2017 - 5:49 pm | मार्कस ऑरेलियस

ह्या वरुन एक नुकताच आलेला व्हॉट्सॅपीय फॉरवर्ड आठवला :

एकदा नवरा असाच लोडखोड होईपर्यंत दारु पितो. पण नंतर घरी जायचे असते म्हणुन माऊथ फ्रेशनर डिओ वगैरे ही मारतो , आवर्जुन बायकोला द्यायला एक गजराही घेतो.

घरी गेल्यावर बायकोने दार उघडले की लगेच तिला घट्ट मिठी मारतो , नंतर तिच्या केसात गजरा माळतो आणि एकदम हातात उचलुन बेडरुम मध्ये घेवुन जातो ... फुल्ल रोमॅन्टीक ! नेक्स्ट स्टेप्स करायला घेणार तेवढ्यात बायको एकदम लाडीक स्वरात म्हणते : " आजपण पिऊन आलात ना ? "
नवरा आश्चर्य चकित होवुन म्हणतो " सॉरी सॉरी पण तुला कसं कळालं ? मी तर माऊथ फ्रेशनर , डिओ वगैरे मारुन आलेलो ..."

बायको लाजुन म्हणते " इश्श ...... तुमचा फ्लॅट आमच्या फ्लॅटच्या वरचा आहे ".

किल्लेदार's picture

12 May 2017 - 6:52 pm | किल्लेदार

वास लपवू पाहणाऱ्यांसाठी ......
वास - बडीशेपेसारखा
चव - बडीशेपेसारखी
अल्कोहोल - ४०-४५ ABV (म्हणजे विस्कीइतकेच)
किंमत - साधारणतः २५ डॉलर्स

प्यावी कशी - १ भाग पास्तीस, ४ भाग पाणी आणि भरपूर क्रश्ड आईस.

Pastis

be6d09df20c9d9468f01756a93fe16e0

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 May 2017 - 9:36 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रतिसाद माहितीपूर्ण आहे. आभार.

-दिलीप बिरुटे

डॉ सुहास म्हात्रे's picture

12 May 2017 - 10:01 pm | डॉ सुहास म्हात्रे

हा उपाय आपापल्या जबाबदारीवर करून पहा, "खुशाल रोज कितीपण पिऊन या पण असली नाटके परत करू नका", असे बायको म्हणेल...

मन्याटण्या's picture

13 May 2017 - 9:11 am | मन्याटण्या

"जेवढी प्यायची ती माझ्या समोर बसुन प्या आणी जेवण करून झोपून जा. मला बाहेरून पिऊन आलेल आवडत नाही"

मध्यंतरी दारूसंबंधी एक लेख 'कायअप्पा'वर वाचनात आला होता. त्यातील एक उतारा मी खाली देत आहे. वाचल्यावर आपणांस कळते, की काहीही आणि कोणताही उपाय करा, दारू प्यालेलाचा वास लपून राहू शकत नाही. कारण उच्छ्वासावर आपले नियंत्रण नसते.
-------------
दारू पचविण्याची शक्ती
माणसामाणसावर
अवलंबून असते.

३० मिली दारू
शरीरात शोषली जाण्यास
साधारणपणे
एक तास लागतो.

शरीरात पसरत जाणारे
हे अल्कोहोल
शरीरासाठी एक
अ‍‍ॅन्टीबॉडीच असते.

त्यामुळे...
यकृत,
मूत्रपिंड
आणि
फुप्फुसे
ते अल्कोहोल
शरीराबाहेर टाकण्याचे
काम चालू करतात.

आता म्हणाल,
फुप्फुसे तर
श्वसनाच्या कामात असतात.
आणि
दारू तर
तोंडावाटे प्यायली जाते,
मग इथे
फुप्फुसांचा काय उपयोग.?

तर....
त्या अल्कोहोलचे विघटन
शरीरात वेगेवेगळ्या प्रकाराने
केले जाते.
त्यात त्याचे
वाफ ह्या प्रकारातही
विघटन होते.
आणि
ती वाफ
फुप्फुसांच्या मार्फत
बाहेर टाकली जाते..!
त्यामुळेच
पोलीस
Breath Analyzer
वापरून टेस्ट घेताना
त्या गनमध्ये
श्वास सोडायला सांगतात.
त्या श्वासातल्या
अल्कोहोलच्या प्रमाणावरून
दारू प्यायली आहे
की नाही ते कळते..!

१.५ शहाणा's picture

14 May 2017 - 10:11 am | १.५ शहाणा

जर बायकोने "जरा जेवून घेता का " एवेजी " जरा घेवून जेवता का " असे म्हटल्यास किती भांडणे कमी होतील .....................

रातराणी's picture

15 May 2017 - 11:14 pm | रातराणी

=))