शेअर मार्केट: सध्याची कंपनीची बाजारातील किंमत गुंतवणुकीस योग्य कि अयोग्य कसे ठरवावे?

Primary tabs

कुटस्थ's picture
कुटस्थ in काथ्याकूट
11 May 2017 - 4:40 am
गाभा: 

सध्या शेअर मार्केट बरेच तेजीत आहे. कुणी म्हणतय bubble आहे कुणी म्हणतय अजूनही संधी आहेत. योग्य कंपनीत गुंतवणूक करावी यात दुमत नाही परंतु ज्या किमतीत कंपनीचे शेअर विकत घेऊ ती किंमत पण महत्वाची. value investing वगैरे सर्व ठीक आहे पण सध्याची बाजारातली कंपनींची किंमत हि गुंतवणुकीस योग्य कि अयोग्य हे कसे ठरवावे? याचे काही सोपे गणित आहे का? अनेकदा research reports हे कंपनीचा परफॉरमन्स वरून आगामी काळातील EPS किंवा PE किती असेल याचा अंदाज बांधून किंमत ठरवतात. हि पद्धत किती योग्य आहे आणि असल्यास नक्की गणित कसे करावे याची माहिती कोणास आहे का? तसेच इतर काही पद्धती ज्यावरून कंपनीची बाजारातील किंमत गुंतवणुकीस योग्य आहे हे ठरवता येते याची कोणास माहिती आहे का?