डिप्रेशन/ मनोविकार

Primary tabs

सन्घमित्रा's picture
सन्घमित्रा in काथ्याकूट
10 May 2017 - 8:53 pm
गाभा: 

दिवासेंन दिवस नैराश्य /डिप्रेशन हा आजार समाजात वाढत चालला आहे . अनेक लोक ह्याने त्रस्त आहेत काहींना हेही माहित नाही कि ते ह्या आजाराचा शिकार आहेत . चांगले अलोपाथिक उपचार उपलब्ध आहेतच पण ह्या व्यतिरिक्त अजून काही उपचार पद्धती आहेत का ज्याने तात्काळ फरक पडेल .

प्रतिक्रिया

डिप्रेशन हा आजार वरवर साधा वाटला तरी रुग्ण आणि त्याचे नातेवाईक यांना उध्वस्त करणारा ठरू शकतो. त्यामुळे चांगल्या मनोविकार तज्ञांकडे जाणे आणि पूर्ण विश्वासाने ट्रीटमेंट पूर्ण करणे हा सर्वात योग्य उपाय वाटतो.

मितान's picture

10 May 2017 - 9:16 pm | मितान

अजून एक राहिलं - कोणतेही मनोविकार व्हायरल इन्फेक्शन सारखे अचानक आलेले व वाढलेले नसतात. त्यामुळे त्यावर 'तत्काळ' कमी होणारा उपाय नसतो.
विकाराचे स्वरूप, पातळी, रुग्णाचे व्यक्तिमत्त्व, इतर सहयोगी घटक या सर्वांचा विचार करून औषधे आणि थेरपी ठरवली जाते. यात औषधांनी 'बरे वाटण्याची' स्थिती लवकर आल्यासारखे वाटले तरी 'बरे होण्यासाठी' बराच काळ उपचार घ्यावे लागू शकतात.

सुबोध खरे's picture

11 May 2017 - 9:42 am | सुबोध खरे

कोणतेही मनोविकार व्हायरल इन्फेक्शन सारखे अचानक आलेले व वाढलेले नसतात. त्यामुळे त्यावर 'तत्काळ' कमी होणारा उपाय नसतो.
अगदी बरोबर.
मुळात नैराश्य हा आजार स्वतःला/ इतरांना जाणवण्यासाठी काही महिने किंवा वर्ष जावी लागतात. त्यामुळे काल पर्यंत चांगला होतो आणि एका रात्रीत सर्दी झाली असे काही नसते. शिवाय यावरील औषधोपचार हा हळू हळू आणि विचारपूर्वक करावा लागतो. औषधाची मात्रा हळूहळू वाढवावी लागते. आणि औषधांचे पूर्ण परिणाम जाणवू लागेपर्यंत तीन आठवडे कमीत कमी लागतात.
टोकाच्या नैराश्यामुळे आत्महत्या करण्यापर्यंत मजल गेली तर तातडीचा उपाय म्हणून मोठ्या मात्रेत औषधे किंवा ECT (इलेकट्रोकन्व्हलझिव्ह थेरपी) म्हणजेच सिनेमात अतिशयोक्ती करून दाखवतात तसे शॉक देणे. केले जाते. ECT चा परिणाम ताबडतोब जाणवू लागतो परंतु हा उपाय टोकाच्या नैराश्यासाठी राखून ठेवलेला आहे. आतापर्यंत (म्हणजे गेल्या पाच दशकात) ECT चे कोणतेही तात्पुरते किंवा कायम असे दुष्परिणाम जाणवलेले नाहीत.
रुग्णाला स्वतःला किंवा जवळच्या नातेवाईक/ मित्रांना नैराश्य आहे हे जाणवायला लागते तरीसुद्धा प्रत्यक्ष उपचार घेईपर्यंत साधारणपणे चार ते सहा महिने जातात. कारण मनोविकाराबद्दल आपल्या समाजात असणारे प्रचंड अज्ञान आणि त्याला लागलेला बट्टा. यातून जेंव्हा समाज पुढे येईल तेंव्हा नैराश्य हा आजार असलेले लोक जास्त लवकर उपचारासाठी येतील.

चित्रगुप्त's picture

12 May 2017 - 6:02 pm | चित्रगुप्त

मी स्वतः सुमारे बारा वर्षांपूर्वी बराच नैराश्यग्रस्त,निरुत्साही वगैरे झालो होतो. माझे एक वडिलधारे स्नेही त्याकाळी हैद्राबादेस रहात, त्यांना मी ईमेलने माझी स्थिती कळवली. पुढील वर्षभर आमचे ईमेलणे चालले, त्यात अनेक विषय चर्चिले गेले, शेवटी त्यांनी केलेली कारणमीमासा आणि त्यावरील उपाय (वस्तुस्थितीचे योग्य आकलन करून तिचा स्वीकार करणे, जीवनातील अपेक्षा कमी करणे वगैरे) मला पटले, आणि हळूहळू मी त्या स्थितीतून बाहेर पडलो. हा सर्व दीर्घ पत्रव्यवहार मराठीत टंकवून (कारण तेंव्हा ईमेलवर मराठी लिहीता येत नसल्याने इंग्रजीत लिहीत असू) मिपावर देण्यासारखा आहे, बघूया केंव्हा जमते ते.

सर, तुम्हाला जमण्यासारखे असेल तर नक्की द्या. आत्यंतिक निराशेच्या गर्तेत सापडलेले आणि मह्णून जगण्यातील उत्स्सह घालब्वून बसलेले काही लोक ओळखीचे आहेत. त्यांना उपयोग झाला तर बरंच आहे. अर्थात तुम्हाला टंकनश्रम होतील हे मान्य पण तरी पहाच जमल्यास..

कवितानागेश's picture

11 May 2017 - 1:31 am | कवितानागेश

डॉ. बाख यांच्या फ्लॉवर रेमेडी मधली मस्टर्ड आणि स्वीट चेस्टनट हि २ औषधे उपयोगी ठरतात.
यांचे कुठलेही साईड इफेक्ट्स नाहीत.
त्याशिवाय इतर उपाय जाणकार सांगतीलच.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

11 May 2017 - 8:48 am | माईसाहेब कुरसूंदीकर

स्वतःकडून वा दुसर्याकडून भल्या मोठ्या अपेक्षा ठेवायच्या नाहीत व जास्तीत जास्त वेळ स्वतःला कामात गुंतवून घ्यायचे असे थोरल्या जाऊबाई नेहमी म्हणायच्या. मनोविकार जडलेल्या लोकांना हे आधी पटवून देणे गरजेचे आहे असे वाटते.

सुबोध खरे's picture

11 May 2017 - 9:33 am | सुबोध खरे

मनोविकार जडलेल्या लोकांना हे आधी पटवून देणे गरजेचे आहे असे वाटते.
माईसाहेब,
मनोविकार जडलेल्या लोकांचे दोन प्रकार असतात.
एक म्हणजे ज्यांना आपल्याला मनोविकार "आहे" हे जाणवत असते (insight) अशा लोकांना कळतंय पण वळत नाही अशी स्थिती असते.
आणि दुसरे ज्यांना आपल्याला मनोविकार आहे हे जाणवतच नाही/ पटतच नाही. अशा लोकांना तुम्ही काय समजावून देणार?
तेंव्हा तुमच्या थोरल्या जाऊबाईंना जरा समजावून सांगा कि असं कामात गुंतवून घेतल्याने मनोविकार जडत नाहीत किंवा बरे होतात,
इतकं सोपं नाहीये.

मार्कस ऑरेलियस's picture

11 May 2017 - 4:43 pm | मार्कस ऑरेलियस

मलातर आजकाल मिपावरील हे असले दोनोळी धागे पाहुन फार्फार नैराश्य , सॉरी सॉरी , डिप्रेशन येते बुवा =))))

सन्घमित्रा's picture

11 May 2017 - 8:21 pm | सन्घमित्रा

प्राणिक हिलिंगचा उपयोग होईल का ? पुण्यात कोणी आहे का ?

मुक्त विहारि's picture

9 Jun 2017 - 10:14 am | मुक्त विहारि

ते काय माहीत नाही?

आम्ही आपले डिप्रेशन आले की, गुरुंकडे जातो आणि २-३ जपमाळा ओढतो आणि मग सुक्ष्मात जातो. (आमची सौ. आणि तिच्या सुचना (आज्ञा?) हे आमच्या डिप्रेशनचे मुख्य कारण.....जरा कुठे मिपावर असलो की, नाश्ता करा, आंघोळीला जा, कांदे-बटाटे आणा, घर आवरा, सारखी कामे सांगत असते...अर्थात मी पण अशा अव्यावहारीक सुचनांकडे दुर्लक्ष करतो....नाही म्हटले तरी भारतीय पुरुष संस्कृतीचा अभिमान बाळगायलाच हवा.)

वरील प्रतिसाद हा विनोदी आहे..... (कधी कधी असे सांगणे भाग आहे.)

असो,

उत्तम विचार असलेल्या माणसांच्या संगतीत सदा सर्वदा असले की, कुठलाच मानसीक त्रास होत नाही.

मुक्त विहारि's picture

9 Jun 2017 - 10:17 am | मुक्त विहारि

ते काय माहीत नाही?

आम्ही आपले डिप्रेशन आले की, गुरुंकडे जातो आणि २-३ जपमाळा ओढतो आणि मग सुक्ष्मात जातो. (आमची सौ. आणि तिच्या सुचना (आज्ञा?) हे आमच्या डिप्रेशनचे मुख्य कारण.....जरा कुठे मिपावर असलो की, नाश्ता करा, आंघोळीला जा, कांदे-बटाटे आणा, घर आवरा, सारखी कामे सांगत असते...अर्थात मी पण अशा अव्यावहारीक सुचनांकडे दुर्लक्ष करतो....नाही म्हटले तरी भारतीय पुरुष संस्कृतीचा अभिमान बाळगायलाच हवा.)

वरील प्रतिसाद हा विनोदी आहे..... (कधी कधी असे सांगणे भाग आहे.)

असो,

उत्तम विचार असलेल्या माणसांच्या संगतीत सदा सर्वदा असले की, कुठलाच मानसीक त्रास होत नाही.

मनिमौ's picture

9 Jun 2017 - 2:48 pm | मनिमौ

मुख्य औषधोपचारा बरोबर रुग्णाचा किवा तुझा विश्वास असेल तर प्राणिक हीलिंग वापरून पहायला काही हरकत नाही

सायकियाट्रिस्टकडे गेल्यावर ते इतकी प्रचंड राक्षसी झोप आणणारी औषधं देतात की ती कोणत्याही नोकरी / बिझनेस / पोटापाण्याचा व्यवसाय करणार्याला वापरणं अशक्यच.