भारतातील ढोंगी धर्मनिरपेक्षता

Primary tabs

संन्यस्त खड्ग's picture
संन्यस्त खड्ग in काथ्याकूट
8 May 2017 - 3:49 pm
गाभा: 

भारतातील धर्मनिरपेक्षता ही केवढी मोठी ढोंगबाजी आहे, हे पुढील उदाहरणांवरून लक्षात येईल.

१. ‘भारतात ८० टक्के हिंदु असूनही हिंदूंचे आराध्यदैवत श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्या जन्मदिनी केंद्रसरकारने अनिवार्य सुटी घोषित केली नाही; मात्र सौदी अरेबियात जन्मलेले महंमद पैगंबर यांच्या जन्मदिनी, तसेच येशू ख्रिस्त यांना सुळावर देण्याच्या दिनानिमित्त मात्र अनिवार्य सुट्या घोषित करण्यात आल्या आहेत.
यामुळे ‘श्रीराम आणि श्रीकृष्ण ही पौराणिक पात्रे असून महंमद पैगंबर आणि येशू ख्रिस्त हे ऐतिहासिक पुरुष होते’, या धर्मनिरपेक्षवाद्यांच्या मताला अप्रत्यक्षपणे पुष्टी मिळते.

२. शासन हिंदूंची मंदिरे अधीग्रहित करते आणि त्याचा निधी वाटेल तसा वापरते. याउलट मशिदी, मदरसे, चर्च आणि अल्पसंख्यांकांच्या इतर धार्मिक वास्तू शासन कह्यात घेत नाही. त्यांना जनतेच्या करातून मिळालेल्या पैशांवर शासनाचे काहीच नियंत्रण नसते. पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये ‘हिंदूंची मालमत्ता शत्रूची आहे’, असे घोषित करून ती कह्यात घेण्याचे अधिकार शासनास आहेत. ‘धर्मनिरपेक्ष’ भारतात मात्र हिंदूंच्या बाबतीत असे चालू आहे.

३. भारतात समान नागरी कायदा नाही. शांतिप्रिय लोकाना एकाच वेळी ४ विवाह करता येतात आणि ३ वेळा ‘तलाक’ म्हणून घटस्फोटही देता येतो. हिंदूंमध्ये अशी काही प्रथा नाही. महिला अधिकार कार्यकर्ते याकडे लक्षही देत नाहीत.

४. हिंदूंचे ‘प्रयागराज’ या अतीमहत्त्वाच्या तीर्थक्षेत्राचे नाव ‘अलाहाबाद’ ठेवण्यात आले. काशी, अयोध्या, मथुरा ही पवित्र स्थाने विटंबित करण्यात आली. देहलीतील रस्त्यांना अकबरसारख्या आक्रमणकर्त्याचे नाव देण्यात आले. औरंगजेब हा हिंदूंवर अत्याचार करणारा सर्वांत जुलमी शासक होता. त्याच्या दरबारात गुरु तेज बहादूर यांचे शीर उडवून हत्या करण्यात आली होती. या औरंगजेबाच्या कबरीवर लक्षावधी लोक त्याला श्रद्धांजली वाहतात.

५. तत्कालीन काँग्रेस शासनाने एन्.सी.इ.आर्.टी.च्या अभ्यासक्रमात खरा इतिहास दडपून आक्रमणकर्त्या मोगलांची माहिती देण्यासाठी पानेची पाने खर्ची घातली. दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप यांच्याविषयीचा इतिहास अवघ्या ६-७ ओळींत उरकला. रामायण आणि महाभारत यांचे भक्कम वास्तू-पुरावे उपलब्ध असतांनाही भारतीय शाळांत मात्र ‘आर्य आक्रमक होते’, अशा स्वरूपाचे शिक्षण दिले गेले.

६. इस्लामी शासनकाळातील आक्रमकांनी जी हिंदु मंदिरे उद्ध्वस्त करून तेथे मशिदी बांधल्या त्यांची एक मोठी सूची भारतीय पुरातत्व खात्याने वर्ष १९२४-२५ मध्ये प्रकाशित केली होती. त्याच्या आधारे श्री. सीताराम गोयल आदींनी संशोधन करून अशा मंदिरांची ६४ पानांची जिल्हानिहाय्य सूची सिद्ध केली आहे. त्यात सुमारे २ सहस्र मंदिरांची माहिती त्यांच्या स्थापनेच्या वर्षासह देण्यात आली आहे. काश्मीरमधील शेकडो मंदिरे विटंबित करण्यात आली; मात्र हा विषय कुठल्याही शासनाला महत्त्वाचा वाटला नाही.

७. भारतात राममंदिरापासून ते रामसेतू, गीता इत्यादींना न्यायालयात आव्हान दिले गेले. भारतच असा एक देश आहे की, जेथे १०० कोटी हिंदूंच्या श्रद्धास्थानांना न्यायालयात आव्हान दिले जाते. शांतिप्रिय देशात कुराण अथवा पैगंबर यांना, पश्चिमी राष्ट्रात बायबल अथवा येशू ख्रिस्तास न्यायालयात आव्हान दिले गेल्याची घटना घडली आहे का ? तत्कालीन काँग्रेस शासनाने तर न्यायालयात ‘श्रीराम हे पौराणिक पात्र होते’, असे शपथपत्र दाखल केले होते. ख्रिस्ती मिशनरी तर ‘हिंदु धर्म हा खोट्या देवतांचा धर्म आहे’ असा प्रसार करतात, तर झाकीर नाईक सारखा हिंदुद्वेष्टा हिंदु धर्मातील देवतांचा अवमान करतो.
याउलट हिंदुत्वाचा प्रचार करणार्‍यांविरुद्ध द्वेष पसरवून त्यांच्यावर गुन्हे नोंदवले जातात.

८. बहुसंख्य हिंदूंनी शासनाकडे कररूपाने गोळा केलेला पैसा अल्पसंख्यांकांच्या योजनांवर व्यय होतो. बंगालमध्ये तर मशिदीतील इमाम, मुल्ला आदींना मासिक वेतनही दिले जाते.
हिंदु पुजार्‍यांना मात्र असे वेतन दिले जात नाही.

९. मानवाधिकार रक्षणाचे तथाकथित कार्यकर्ते हे महंमद अफझलसारख्या आतंकवाद्यांचेे समर्थन करणारे संकेतस्थळ अनेक वर्षांपासून चालवत आहेत. त्यांना साध्वी प्रज्ञा सिंह, स्वामी असिमानंद यांच्या मानवाधिकारांचे उल्लंघन मात्र दिसत नाही. गुजरात दंगली नंतर विस्थापित झालेल्यांची ते काळजी करतात; मात्र काश्मीरमधून विस्थापित झालेले ५ लाख काश्मिरी हिंदू आणि पाकिस्तानातून धार्मिक छळ सोसून भारतात आलेले विस्थापित हिंदू त्यांच्या खिजगणतीतही नाहीत.

१०. शासनाच्या कार्यक्रमात होणारी सरस्वती वंदना, नारळ वाढवणे, दीपप्रज्वलन आदी कार्यक्रम इस्लामविरोधी आहेत म्हणून कधीच सीमापार झाले आहेत. वर्ष १९९० मध्ये दूरदर्शनवर प्रसारित होणार्‍या ‘चाणक्य’ मालिकेतून भगवे ध्वज आणि अखंड भारताचा नकाशा हटवण्याचा आदेश देण्यात आला होता. शासकीय कार्यालयांत ‘इफ्तार पार्टी’ आयोजित करणे धर्मनिरपेक्षतेचे चिन्ह आहे; मात्र सत्यनारायण पूजा, देवतांची चित्रे लावणे म्हणजे जातीयवाद भडकवण्याच्या प्रकारात मोडते.

धर्मनिरपेक्षतेचा बकासूर अद्यापही त्याचे हातपाय पसरत आहे. तो भावी पिढीला कधी गिळंकृत करील, याची वाट हिंदू बहुधा बघत असावेत !’

*(आधारित)

प्रतिक्रिया

अभ्या..'s picture

8 May 2017 - 5:01 pm | अभ्या..

*(आधारित)

कशावर?

टवाळ कार्टा's picture

8 May 2017 - 6:25 pm | टवाळ कार्टा

असे नसते विचारायचे...नैतर हिंदुद्वेष्टे असा शिक्का मारायला काही मिपाकर तयारच असतात

अत्रे's picture

8 May 2017 - 7:21 pm | अत्रे
अभ्या..'s picture

8 May 2017 - 7:24 pm | अभ्या..

अर्रर्र र्र र्र र्र
.
उडणार म्हणा की हे पाकरु.

आयायायाया!!! हितुन उचललाय होय. मग तर प्रश्नच मिटला.उगाचच वेळ घालवला.

काहींच्या काही!!!अत्यंत पूर्वग्रहदूषित लेख. आपल्यावर अन्याय होतोय असं रडायचं ठरवलच तर मग बाकीच्या गोष्टींकडे डोळेझाक होणे हे आलंच. असो. पहिलाच मुद्दा चुकीचा आहे. गोकुळाष्टमी दिसते तुम्हाला. दसरा नाही दिसत, दिवाळी नाही दिसत, गणेशचतुर्थी नाही दिसत, होळी नाही दिसत. आणखी एक, हिंदूंचे प्रत्येक राज्यात वेगवेगळे मुख्य सण आहेत. त्यामुळे प्रत्येक राज्यात त्यानुसार सुट्टी दिलेली आहे. ओणम,पोंगल , गुढीपाडवा, उगादी, दुर्गापूजा हे त्या त्या राज्याचे सण आहेत.गुढीपाडवा युपीत नाही साजरा करत. गोकुळाष्टमी तामिळनाडूत इतक्या मोठ्या प्रमाणावर साजरी करत नाहीत. महाराष्ट्रात पण रामनवमी गणपतीसारखी मोठ्या प्रमाणावर साजरी होत नाही. या सुट्ट्या देण्यात अजिबात हिंदूंवर अन्याय वगैरे झालेला नाही. मुस्लिम सण हे अक्ख्या जगात तेच असतात त्यामुळे त्याला सरसकट सुट्टी मिळते हेच ख्रिश्चनांचं. ख्रिसमस जितका भारतात महत्वाचा तितकाच अमेरिकेत,तितकाच जर्मनीत.

धर्मनिरपेक्षता ढोंगबाजी आहे की नाही माहीत नाही. पण हिंदुराष्ट्रवाद ही कमाल ढोंगबाजी आहे.

टर्बोचार्जड फिलॉसॉफर's picture

8 May 2017 - 10:11 pm | टर्बोचार्जड फिलॉसॉफर

हिंदु पुजार्यांना मात्र असे वेतन दिले जात नाही.
>>>>>> आमच्या इथल्या कुलकर्णी पुजार्याने राम मंदिरात हयात घालवून पोरं अमेरिकेला धाडली.चारपाच वर्षांपुर्वी पोरंकडे गेलाभोता तेव्हा डॉलरमध्ये दक्षिणा मिळवल्याचे अभिमानाने सांगत फिरत होता.बाकी चालू द्या.

टर्बोचार्जड फिलॉसॉफर's picture

8 May 2017 - 10:12 pm | टर्बोचार्जड फिलॉसॉफर

गेला होता' असे वाचावे.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

8 May 2017 - 10:48 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

८० वा ९०च्या दशकात ईतिहासातले काहीही न कळणाराही तरूण तेव्हा असे लेख वाचून पेटून उठला असता रे सन्यस्ता. पण तो काळ गेला. आताचा काळ 'सबका साथ सबका विकासचा'. अफझलखानाने पाडलेल्या मंदिरांचा हिशोब लावण्यापेक्षा रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांचा हिशोब नगरसेवकांना विचारण्यात आजच्या पिढीला जास्त रस हो.

सौरा's picture

9 May 2017 - 12:08 pm | सौरा

एक नंबर..

दाह,

आपल्यावर अन्याय होतोय असं रडायचं ठरवलच तर मग बाकीच्या गोष्टींकडे डोळेझाक होणे हे आलंच.

हिंदूंच्या देवळांतला हिंदूंचा पैसा सरकार लुटतय ना? मशिदी आणि चर्चचा पैसा कधी ताब्यात घेतलाय? याला अन्याय नाहीतर दुसरं काय म्हणायचं?

आ.न.,
-गा.पै.

नावातकायआहे's picture

9 May 2017 - 6:14 am | नावातकायआहे

तात गेले, माय गेली, भरत आतां पोरका
मागणें हें एक रामा, आपुल्या द्या!
पादुका???

व्ही. डी. सी.'s picture

10 May 2017 - 12:14 pm | व्ही. डी. सी.

धर्मनिरपेक्षता या शब्दातच सर्व काही आले. उगाच धर्माचे नाव घेऊन धर्मा-धर्मात भांडणे लावणे ठीक नाही. मुस्लिमांनी आणि ख्रिश्चनांनी यांचे काय घोडे मारले आहे, हे यांनाच ठाऊक! त्यांचे सण हाताच्या बोटावर मोजण्या इतपत, आणि आपले सांगायचं नको! सरकार आपल्या सर्व सणांना सुट्ट्या देत बसले तर अर्धे वर्ष सुट्यातच निघून जायचे, नाही का? रविवारच्या सुट्ट्या, PL, SL, CL यांचाही उल्लेख इथे करावा लागेल.

अरूण गंगाधर कोर्डे's picture

11 May 2017 - 9:57 am | अरूण गंगाधर कोर्डे

आपली धर्मनिरपेक्षता योग्य आहे असे समजून चाललेले बरे.अन्यथा कोळसा उगाळावा तितका काळाच , असे म्हणावे लागेल.