हरवले सापडले : एक विलक्षण अनुभव

कानडाऊ योगेशु's picture
कानडाऊ योगेशु in जनातलं, मनातलं
7 May 2017 - 10:44 pm

दिनांक ७ मे २०१७ वेळः साधारण रात्रीचे ८-३०

गेल्या काही तासांपूर्वीच ही घटना घडलेली आहे. पायाखालची जमीन सरकणे,जग स्वत:भोवती फिरणे पासुन ते हॅपी एंडीग पर्यंतचा विल्क्षण अनुभव ह्या घटनेने दिला. व दरम्यान देवावरची श्रध्दा अजुन मजबुत झाली.
झाले असे कि आज रविवार व घरी एकटा असल्याने संध्याकाळच्या जेवणाची सोय करण्यासाठी बाहेर पडलो.मागच्या महीन्याचे रेंटचे पैसेही घरमालकाला द्यायचे होते.रक्कम दहाहजारावर होती. पण आधी बाहेरची कामे उरकु व नंतर पैसे देऊ असा विचार करुन रक्कम पाकिटात ठेवली. जाताना नेहेमीप्रमाणे बर्म्युडा टी शर्ट अश्या टिपिकल घरगुती पेहेरावात गेलो. होण्डा अ‍ॅक्टीवा काढली. थोडा रिमझिम पाऊस पडत होता. तसाच बाहेर निघालो. बी.टी.एम मधल्या रोटी मने मधुन काही ज्वारीच्य भाकर्या घेतल्या व परत घरी निघालो. मध्येच विचार आला भाकरी सोबत कांदा लिम्बु असले तर मजा येईल जेवताना. रस्त्यात दिसणारी होपकॉम ची दुकाने टाळली व घराशेजारच्या रस्त्यावर काही ठेले आहेत तिथुन्च खरेदी करावी असा विचार केला. पाऊस थोडा थोडा पडतच होता व काही भागामध्यी वीज ही गेली होती. घराजवळच्या ठेल्याजवळ आलो व लिंबु खरेदी करण्यासाठी पाकिट काढायला खिशात हात घातला आणि हादरलो. खिशात पाकिट नव्हते.डिकिमध्ये चेक केले तिथेही नव्हते. अगदी हवालदील झालो. गाडीच्या चाकाखालची व माझ्या पायाखालची जमीन हादरणे म्हणजे काय प्रकार असतो तो अनुभव आला.खरेतर ह्य बर्य्मुडाचा खिसा तसा पाकिटाआठी अपरा होता व पाकिट पडु नये म्हणुन नेहेमी खबरदारी घ्यायचो पण ह्यावेळेला वेधळेपणा व अतिआत्मविश्वास दोन्हीही नडले. स्वतःवरच चरफडलो.तसाच परत आलेल्या मार्गावरुन गेलो. रस्त्यामधेय अगदी काळजीपूर्वक पाहत जसा आलो त्याच मार्गाने जात राहिलो. पाकिट कुठेही नव्हते. पुन्हा रोटी मने मध्ये आलो. तिथेही विचारले. नव्हते. परंतु ह्या दरम्यान मिपावरच हरवलेल्या वस्तु सापडण्यासाठीचा कार्तवीर्याजुनाचा मंत्र वाचला होता व मी सश्रध्द असल्याने साधारणप्णे रोज एकदा तरी असाच म्हणत होतो त्याचे आवर्तनावर आवर्तन चालु केले. ह्या मंत्राचा आधीही विलक्षण अनुभव आला होता. परंतु ह्यावेळेला परिस्थिती अगई बिकट होती. पाकिटात साधारण १२ ते १३ हजारापर्यंतची रक्कम होती. सोबत क्रेडीट कार्ड,डेबिट कार्ड्स, लायसन्स, पॅन कार्ड वगैरे तत्सम गोष्टीही होत्या. गोष्ट पैश्यांची तशी नव्व्हती पण हे कार्ड ब्लॉक करणे पुन्हा नवीन कार्डासाठी विनंती करणे त्याचे सोपस्कार + पोलिस कंम्प्लेट ह्या गोष्टी ताण वाढवणार्या होत्या. मंत्रोच्चारण चालुच होते. आता काय करु शकतो ह्याचा विचार केला. आधी घरी जाऊन जेवावे मग पोलिस कंप्लेट करावी असा विचार केला. व मग घराकडे वळलो. घरापाशी जाणार्या लेन मधेय शिरलोच तेवढ्यात फोन वाजला. उचलला. पलिकडुन कन्नड मध्ये एक व्यक्ती बोलत होती.
योगेशचा फोन आहे का म्हणुन.?
होय. मी योगेशच.
कुठे आहात?
माझे पाकिट मिळाले का? - माझ्यातोंडुन अनवधानाने बाहेर पडले.
हो.कुठे अहात.?
अमुक अमुक ठिकणी. पण तुम्ही अहे तिथेच थांबा मी तिथे येतो. तुम्ही कुठे आहात.
तमुक तमुक ठिकाण. - हे ठिकाण माझ्या घरापासुन काही पावलांच्या अंतरावर होते.
जीव भांड्यात पडला. देवाचे मनोमन आभार मानले.मंत्रोच्चारण चालुच होते.
तसाच जिथे बोलावलो तिथे गेलो. काही सेकंदान्तर पुन्हा फोन आला. ती व्यक्ती तिथेच होती. एकुण चारजण होते. तिशीच्या आतले तरुण होते. पहिल्यांदी फोन न्बर कन्फर्म केला व जेव्हा खात्री पटली तेव्हा माझे पाकिट परत केले.
मी काही पैसे देऊ केले तेव्हा त्यांनी विनयाने ते नाकारले. मी म्हणालो पुढच्या आठवड्यात पार्टी देतो.
पाकिट कुठे मिळाले असे विचारल्याव्वर त्यांनी सांगितले कि जेवणासाठी आम्ही बाहेर पडलो तो रस्त्यावर पाकिट पडले होते रक्कम बाहेर पडली होती. आम्ही दुसर्या कोणाची नजर पडण्याअगोदर त्वरीत उचलली व पाकिटात काही माहीती मिळते आहे का ते पाहु लागलो. त्यांना तिथल्या एका आय होस्पिटलचे कार्ड मिळाले जिथे आय-टेस्ट करण्यासाठी अर्धांगिनीने पीडुन पीडुन मला जायला लावले होते. तिथे एक इमर्जन्सी कार्ड बनवले गेले होते व त्यावर माझे नाव व नंबर होता त्यावरुन त्यांनी मला फोन केला. अनेकवेळा त्यांचे आभार मानले. व घरी परत्लो.
पूर्ण घटना साधारण अर्ध्या तासाभरातच घडली असावी. एक्स्ट्रीम टेन्शन ते अगदी ताणरहीत मुकत अवस्था दोन्हीचा अनुभव घेतला.
घरी आल्यावर सर्वप्रथम देवासमोर अगरबत्ती लावली व तुपाचा दिवा लावला. सश्रध्द अंतःकरणाने नमस्कार केला.
बर्याच दिवसांनी एक पॉझिटीव फिलिंग आले होते.
मग पत्नीला फोन लावुन सर्व घटना सांगुन तिचे आभार मानले. ते कार्ड मिळाले नसते तर पाकिट इतक्या सहजगत्या मिळणे अवघड होते.
वडिलांची अध्यात्मात रूची असल्याने घरी वडिलांनाही फोन लावुन अनुभव सांगितला. वडील ही खुश व आनंदीत झाले.
त्यांनाही तो मंत्र पाठवायचा आहे.
घटना तशी अर्ध्यातासाचीच आहे पण तिने पुढील आयुष्यासाठी आवश्यक असलेली देवावरची श्रध्दा बळकट केली आहे.

मांडणीअनुभव

प्रतिक्रिया

पाषाणभेद's picture

7 May 2017 - 11:34 pm | पाषाणभेद

पैसे व पाकीट मिळाले हे छान झाले.
दिनांक ७ मे २०१७ म्हणजेच आजचीच घटना आहे. अन बंगलोर का? पाऊस का आहे तिथे.
देवावर श्रद्धा आहे ते चांगलेच आहे. आपणाकडूनही कधीतरी चांगले काम झाले असेल आणि आजचे पाकीट परत मिळणे हे त्याचेच फळ आहे.

कानडाऊ योगेशु's picture

7 May 2017 - 11:44 pm | कानडाऊ योगेशु

पाभे भाऊ. होय बेंगलोरमध्ये पाऊस आहे. अजुनही पडतो आहे पण तुरळक आहे. आताच दुपारी छतावर वाळत घातलेले कपडे घेऊन आलो. कडक उन्हात वाळलेले कपडे अगदी ओले झाले आहेत.

विलक्षण अनुभव.. नशीबवान आहात!!

या निमीत्ताने एक बेसीक प्रश्न. पॅन कार्ड आणि तत्सम सर्व कार्डे घेऊन फिरणे आवश्यकच असते का..? सगळ्या बँकांची डेबीट कार्डे एकाच पाकिटात घेऊन आपण का फिरतो..?

खिशात एक आयडी प्रूफ म्हणून ड्रायव्हिंग लायसन्स - तेच पत्त्याचा पुरावा म्हणूनही चालते आणि मुख्य खात्याचे डेबीट कार्ड व एखादे क्रेडीट कार्ड इतके पुरेसे होते नाही का..?

पॅन कार्ड खिशात सतत ठेऊन किती ठिकाणी दाखवावे लागते...?

कानडाऊ योगेशु's picture

8 May 2017 - 7:04 am | कानडाऊ योगेशु

मोदका,

पॅन कार्ड आणि तत्सम सर्व कार्डे घेऊन फिरणे आवश्यकच असते का..? सगळ्या बँकांची डेबीट कार्डे एकाच पाकिटात घेऊन आपण का फिरतो..?

येस. असा प्रकार चुकीचा आहे खरा पण ह्याखेपेला आळस व अतिआत्मविश्वास नडला. मी ही शक्यतो कमीत कमी कार्ड्स पाकिटात ठेवतो पण नोटाबंदीनंतर व आताही एकाच ए.टी.एम मधुन आवश्यक रकम १००/५०० च्या डिनोमिनेशनमध्ये मिळणे ह्याची गॅरंटी नाही म्हणुन काही दिवसांपूर्वीच रेंटचे पैसे + महीन्याभराच्या खर्चाहे पैसे काढायचे म्हणुन जवळपास ए.टी.एम असलेल्या बँकांची डेबिट कार्डस जवळ ठेवली होती व कार्डस पाकिटातुन परत काढायला आळस केला. पण ह्या घटनेतुन हा म्हत्वाचा धडा नक्की शिकलो. पाकिट मिळाल्यावर लगोलग नेहेमी न वापरात असणारी कार्ड बाजुला काढली.

खेडूत's picture

8 May 2017 - 2:30 am | खेडूत

नशीबवान आहात!
इतकेच म्हणता येईल. माझे केम्पेगौडा स्थानकावर २०१६च्या दिवाळीच्या पाडव्यादिवशी ९९०० रु चे बंडल गर्दीचा फायदा घेत मारले गेले ( कारण नव्याकोर्‍या बंडलातले १०० रु वापरले होते). २५ वर्षे सतत प्रवास केला तरी आयुष्यात हे प्रथमच झाले, पण मी शोधण्याचा प्रयत्न केला नाही. दिवाळीचा आनंद कमी होऊ द्यायचा नाही हे त्यावेळी जास्त महत्वाचे होते! जागरूक राहून हरवणे, विसरणे किंवा चोराला संधी न देणे हेच महत्वाचे. देवाधर्माशी याला जोडू नये असे वैयक्तिक मत. तुमच्या श्रद्धेचा आदर आहेच. आणि मीही काही पुरा नास्तिक नाही.

कानडाऊ योगेशु's picture

8 May 2017 - 6:56 am | कानडाऊ योगेशु

खेडूतजी, मी ही तसा अंधश्रध्द नाही आहे पण घटना घडल्याबरोबर पहिल्यांदी देवच आठवला. शालेय जीवनात जेव्हा एखादी समस्या उद्भवयाची तेव्हा बापाची कितीही भीती वाटत असली तरी तो सांभाळुन घेईल असा विश्वास असायचा तसाच प्रकार इथेही झाला. आधी लिहिल्याप्रमाणे कार्तवीर्याजुनाच्या मंत्राचा विलक्षण अनुभव आलेला होता त्यामुळे इथेही तसेच काहीतरी घडेल हा विश्वास मनात कुठेतरी होता आणि घडलेही तसेच. तसा मी अतिशय ताण घेणारा मनुष्य आहे आणि अश्या परिस्थितीत दरदरून घाम फुटणे,पाणीही गळ्याखाली न उतरणे असा प्रकार माझ्याबाबतीत घडतो. पण केवळ ह्या श्रध्देमुळेच आधी घरी जाऊन काहीतरी खाऊन घेऊ असा प्रॅक्टीकल निर्णय घेऊ शकलो. श्रध्देमध्ये विलक्षण सामर्थ्य आहे हे नक्की आणि हे वेळोवेळी प्रचीतीस आलेही आहे.

सतिश गावडे's picture

8 May 2017 - 9:30 am | सतिश गावडे

तुमच्या श्रद्धेबद्दल आदर आहेच. मात्र माझ्या दृष्टीने हा त्या मंत्राचा परीणाम नसून तुमचे पाकीट एका भल्या माणसाला सापडले त्याचा परीणाम आहे.

काही वर्षांपुर्वी मी गावी गेलो असताना माझेही पाकीट हरवले होते. पैसे फार नव्हते, तीनेक हजार असावेत. मात्र इतर कुणाचेही असते तसे पॅन कार्ड, ड्रायव्हींग लायसन्स आणि बँकांचे कार्ड होते. खुप शोधाशोध करुन पाकीट सापडले नाही. नुकताच अमेरिकेहून आलेला असल्याने एका अमेरिकन बँकेचे क्रेडीट कार्ड होते. त्यांचा कस्टमर केअरचा नंबर मिळवून ते कार्ड ब्लॉक करताना प्रचंड दमछाक झाली.

काही दिवसांनी जवळच्या गावातील एका व्यक्तीने माझे रिकामे पाकीट दिले, रस्त्यावर सापडले असे म्हणून. पैसे आणि कार्ड गायब होते. फक्त पॅन कार्ड आणि इतर बिनकामाचे चिटोरे फक्त होते त्यात.

कानडाऊ योगेशु's picture

8 May 2017 - 3:45 pm | कानडाऊ योगेशु

तुमच्याही मताबद्दल आदर आहे गावडेसर.

मात्र माझ्या दृष्टीने हा त्या मंत्राचा परीणाम नसून तुमचे पाकीट एका भल्या माणसाला सापडले त्याचा परीणाम आहे.

भल्या माणसालाच पाकिट सापडणे हा त्या मंत्राचा परिणाम असु शकतो असेही म्हणता येईल.
इथे मतभेद होऊ शकतात पण पंधरा मिनिटात जी मनस्थिती अनुभवली त्यातुन केवळ त्या मंत्रामुळेच सावरु शकलो.
दहा हजारावरची रक्कम तशीच्या तशी मिळणे ही गोष्ट माझ्या दृष्टीने एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही.

ज्योति अळवणी's picture

8 May 2017 - 10:05 am | ज्योति अळवणी

नशीबवान आहात नक्की!

प्रकाश घाटपांडे's picture

8 May 2017 - 10:37 am | प्रकाश घाटपांडे

http://www.misalpav.com/node/26959 हा धागा आठवला.

कानडाऊ योगेशु's picture

8 May 2017 - 3:45 pm | कानडाऊ योगेशु

येस्स. घाटपांडेसर हाच तो धाग जिथुन मला हा मंत्र मिळाला होता.
मदनबाणांचे आभार मानायचे आहेत.

मस्त! मंत्राचा धागा बुकमार्क करून ठेवलाय. :)

पाकीट सापडले ते बरेच झाले. मागे एकदा माझे पाकीट हरवले होते ते कोणत्याही मंत्राचा वापर न करता सापडले :) म्हणजे ज्यांना सापडले होते त्यांनी संपर्क केला.

पैसा's picture

8 May 2017 - 1:51 pm | पैसा

नशीबवान आहात!

कानडाऊ योगेशु's picture

8 May 2017 - 3:54 pm | कानडाऊ योगेशु

गेलेला "पैसा" परत मिळाला. मंत्राची कृपा + नशीब असे नक्कीच म्हणता येईल.

रुपी's picture

8 May 2017 - 11:58 pm | रुपी

"रुपी" पण परत मिळाले का? ;)

पैसा's picture

9 May 2017 - 9:38 am | पैसा

=))

कानडाऊ योगेशु's picture

9 May 2017 - 9:39 am | कानडाऊ योगेशु

हा हा. हो "रूपी" पण मिळाले व अडनिड्या वेळी उपयोगी पडावी म्हणुन पाकिटात "चिल्लर"ठेवत असतो ते ही परत मिळाले.

पैसा's picture

9 May 2017 - 9:46 am | पैसा

पण आता पॅनकार्ड, आधार कार्ड वगैरे ओरिजिनल कार्ड्स पाकिटात ठेवू नका. त्याच्या कॉपीज करून मस्त लॅमिनेट करून घ्या आणि त्या ठेवा. माझ्या पेन्शन बँक अकाउंटला बर्‍यापैकी बॅलन्स असतो. त्याचे डेबिट कार्ड मी कधीही बाहेर नेत नाही. त्यातले पाच दहा हजार रुपये दुसर्‍या एका किरकोळ अकाउंटला ट्रान्सफर करत असते आणि ते रुपी कार्ड नेहमी माझ्याजवळ असते.

सतिश गावडे's picture

9 May 2017 - 11:43 am | सतिश गावडे

२ फेकटर ऑथेंटिकेशन आल्यापासून म्हणजेच कार्डावरील व्यवहारास पिन अनिवार्य झाल्यामुळे कार्ड सोबत बाळगण्याचा तसा विशेष धोका नाही.

कुणी जबरदस्तीने पिन टाकायला लावल्यास मात्र काही करता येणार नाही.

पैसा's picture

9 May 2017 - 5:47 pm | पैसा

पण कार्ड हरवले तरी ताबडतोब नंबर शोधून ब्लॉक करणे कटकटीचे होते. एकूणच सावधगिरी म्हणून कमी बॅलन्स असलेले कार्ड वापरायची मी सवय लावून घेतली आहे.

रेवती's picture

9 May 2017 - 1:15 am | रेवती

बरं झालं पैसे सापडले. मंत्रामुळे सापडले की नाही ते जाऊ द्या, माणसे बरी होती हे महत्वाचे.

अनिता's picture

9 May 2017 - 8:01 am | अनिता

मी म्हणालो पुढच्या आठवड्यात पार्टी देतो.

---> बंगलोर मधील मिपाकरा॓नी लक्श आसु द्यावे :)

टवाळ कार्टा's picture

9 May 2017 - 4:10 pm | टवाळ कार्टा

तर तर...कट्टा झालाच पाहिजे

उपाशी बोका's picture

9 May 2017 - 9:35 am | उपाशी बोका

दरम्यान देवावरची श्रध्दा अजुन मजबुत झाली.

कार्तवीर्याजुनाचा मंत्र वाचला होता व मी सश्रध्द असल्याने साधारणप्णे रोज एकदा तरी असाच म्हणत होतो त्याचे आवर्तनावर आवर्तन चालु केले.

देवावरच्या श्रध्देमुळे आणि त्या पॉवरफुल मंत्रामुळे खरंतर मुळात पाकीट हरवायलाच नको होते.

ते लोक भले होते म्हणून खरे तर पाकिट परत मिळाले. देवावरची श्रध्दा आणि मंत्राची कृपा हा सगळा मनाचा भंपक खेळ आहे.

संजय क्षीरसागर's picture

9 May 2017 - 11:11 am | संजय क्षीरसागर

लहान मुलांचं लक्ष डायवर्ट करायला दिलेल्या खेळण्यासारखा आहे. त्यानं नेगटीव विचार डोक्यात थैमान घालणं (काही काळ) थांबू शकतं. पण त्याचा आणि वस्तू सापडण्याचा अर्थाअर्थी संबंध नाही. शिवाय देवाचं अस्तित्त्व मानवी मनापलिकडे कुठेही नाही त्यामुळे वस्तू सापडायला देव मानला काय की नाही काय, अजिबात फरक पडत नाही.

वस्तू हरवल्यावर शांत चित्तानं विचार करु शकणारा, परिस्थिती जास्त सक्षमपणे हाताळू शकतो. शिवाय त्याला लेखात वर्णन केलायं तसा `विलक्षण मानसिक धक्का' बसण्याची शक्यता कमी उरते.

टवाळ कार्टा's picture

9 May 2017 - 4:11 pm | टवाळ कार्टा

+११११११ पण फक्त पहिल्या वाक्याला...