युरोपच्या डोंगरवाटा २: प्लीट्विच्का जेझेरा (Plitvice Lakes) उर्वरित भाग

Primary tabs

निशाचर's picture
निशाचर in भटकंती
3 May 2017 - 3:34 am

युरोपच्या डोंगरवाटा १: प्लीट्विच्का जेझेरा (Plitvice Lakes) भाग १

अप्पर लेक्सचा निरोप घ्यावासा वाटत नव्हता, पण जाणं भाग होतं. Lower Lakes were calling...

बोटीच्या धक्क्याशी आलो तर पुढची बोट निघणारच होती. पार्कमध्ये प्रवेश करून साडेतीन तास होत आले होते. एकदाच पाच मिनिटं बसून विश्रांती घेतली होती आणि झाग्रेबच्या बाजारात घेतलेले सुके अंजीर खाल्ले होते. आता पाय थकले होते आणि भूकही लागली होती. पोटपूजेची सोय 'उस पार'च होणार होती. तोपर्यंत निवांत बसलो.

.

.

'उस पार' कॅफेत खाण्यासाठी बर्गर, फ्राईज किंवा थंड सँड्विच एवढंच होतं. सँड्विच गरम करून देणार नाही, हे ही सांगण्यात आलं. क्रोएशियात एवढी गैरसोय कुठे झाली नव्हती. स्थानमाहात्म्य, दुसरे काय? सँड्विच खाऊन पुन्हा कॉफी नामे गरम पाणी प्यायल्यावर तरतरी आली. थोडा वेळ आराम केला.

लोअर लेक्ससाठी पुरेसा वेळ हातात नव्हता. H रूट हा बोटीच्या धक्क्यानंतर थोड्याच अंतरानंतर canyon च्या सुरुवातीला पाणी ओलांडून बराचसा canyon च्या वरून पूर्व बाजूने जातो, मग Veliki slap (“Great Waterfall”) च्या आधी पुन्हा पाणी ओलांडून धबधब्याशी जाऊन शेवटी परत पूर्व बाजूने St1 बस थांब्याशी येतो.

आम्हाला शॉर्टकट शोधणं भाग होतं. तिथल्या एका रेंजरला विचारलं. त्याने नेहमीच्या पायवाटेऐवजी दोन्ही बाजूंना पायर्‍या कुठे आहेत ते सांगितलं. तसं गेलो तर अंतर खूप कमी होणार होतं. एक ते दीड तासात तर बहुतेक सगळं पाहता येणार होतं. परत येताना एका गुहेतून पायर्‍या आहेत असं आधीही एका ठिकाणी वाचलं होतं. पण खडा चढ, आणि पावसात चिखलही असणार. या पायर्‍या नकाशातही नाहीत. रेंजरने व्यवस्थित माहिती दिली. मग त्याने सांगितल्याप्रमाणेच निघालो. आम्हाला canyon क्रॉस न करता वरून पश्चिम बाजूनेच जायचं होतं. शेवटी पायर्‍या उतरून Veliki slap पाहून मग पाण्यापर्यंत उतरून दरीतून काठाने थोडं चालल्यावर पाणी ओलांडून गेल्यावर लगेच गुहेतून डोंगर चढायचा होता.

पार्कच्या या भागाचं वैशिष्ट्य म्हणजे वरून दिसणारा एकात एक मिसळणार्‍या तलावांचा नजारा. सुरूवातीलाच एका view point ला उजवीकडे बघितल्यावर प्लीट्विच्काचा सगळ्यांत प्रसिद्ध देखावा दिसला.

.

डावीकडे canyon आणि छोटीमोठी तळी होती. पुढे जावं तसं समोरचं दृश्यही बदलत होतं.

.

.

.

.

वरच्या फोटोत दिसणार्‍या गुहेतून आम्हाला नंतर जायचं होतं! त्यामुळे खालच्या फोटोतील नागमोडी रस्त्याचं अंतर आणि नंतर गुहेच्या वरच्या भागापर्यंत येण्यासाठीचा वळसा वाचणार होता.

.

पायर्‍या उतरताना धबधबा दिसत तर नव्हता, पण आवाज येत होता. चिखल नसला तरी पालापाचोळा खूप होता. बाकीच्या वाटांसारखी इथे देखभाल करत नसावेत.

.

एकदाचे धबधब्याचे दर्शन झाले. आतापर्यंत बघितलेल्या पाण्यापुढे हा धबधबा नावालाच “Great Waterfall” वाटला.

.

.

.

आता पुन्हा पाण्याच्या जवळून भटकंती सुरू झाली.

.

.

.

.

.

.

.

.

गुहेच्या तोंडाशी हा बोर्ड होता. गुहेच्या आतल्या भागात वटवाघुळं असतात, तसेच छोटे लवणस्तंभही आहेत. पण त्यासाठी दिवसाउजेडी यावं लागतं.

गुहेत शिरल्यावर परत मागे वळून पाणी आणि झरे डोळे भरून पाहिले. पायर्‍या चढायला लागल्यावर The Lord of the Rings आणि गोल्लमची आठवण येणं साहजिक होतं!

.

गुहेतून बाहेर येऊन पुन्हा पायर्‍या आणि पायवाटेने चढून St1 बस स्टॉपशी आलो. वाटेत दुसर्‍या बाजूने लोअर लेक्स दिसले आणि थकवा पळून गेला.

.

.

पार्कच्या या भागासाठी सव्वा तास लागला होता. बसची थोडा वेळ वाट पाहावी लागली. एकदाचे बसने St2 ला आलो. तिथून परत प्रवेशद्वारापर्यंत जाताना मात्र पाय बंड पुकारत होते.

दोन्ही भागातील भटकंती मिळून अकरा किमी चालणं झालं होतं. विश्रांतीचा वेळ सोडून बसबोट प्रवासासकट पाच तास लागले होते. तरीही लोअर लेक्स घाईत बघितल्यासारखं वाटत होतं. पण पुन्हा कधीतरी नक्की जायचंय प्लीट्विच्का जेझेराला... फक्त हिरवाई असताना कि बर्फ असताना ते ठरत नाहीये...

.

प्रतिक्रिया

स्रुजा's picture

3 May 2017 - 5:05 am | स्रुजा

___/\___ पारणं फिटलं डोळ्यांचं

सुरेख, सुरेख! ते पाणी पाहून मला हिमालयामधील नद्यांची आठवण झाली अगदी :)

एस's picture

3 May 2017 - 11:55 am | एस

वा! सुंदर!

वेल्लाभट's picture

3 May 2017 - 12:26 pm | वेल्लाभट

मी इथे का नाहीये अत्ता या क्षणी????

शॅ!

दशानन's picture

3 May 2017 - 12:36 pm | दशानन

वाह!!
सुरेख फोटो!

डॉ सुहास म्हात्रे's picture

3 May 2017 - 1:46 pm | डॉ सुहास म्हात्रे

अप्रतिम निसर्गसौंदर्याचे अप्रतिम फोटो !

अभिजित वर्तक's picture

3 May 2017 - 2:56 pm | अभिजित वर्तक

अप्रतिम सौंदर्य --- पारणं फिटलं डोळ्यांचं

अभिजित वर्तक's picture

3 May 2017 - 2:57 pm | अभिजित वर्तक

अप्रतिम सौंदर्य --- पारणं फिटलं डोळ्यांचं

भ ट क्या खे ड वा ला's picture

3 May 2017 - 11:48 pm | भ ट क्या खे ड वा ला

फोटो , वर्णन दोन्ही ... भन्नाट...

भ ट क्या खे ड वा ला's picture

3 May 2017 - 11:49 pm | भ ट क्या खे ड वा ला

फोटो , वर्णन दोन्ही ... भन्नाट...

भ ट क्या खे ड वा ला's picture

3 May 2017 - 11:49 pm | भ ट क्या खे ड वा ला

फोटो , वर्णन दोन्ही ... भन्नाट...

संजय क्षीरसागर's picture

4 May 2017 - 2:57 am | संजय क्षीरसागर

पुन्हा कधीतरी नक्की जायचंय प्लीट्विच्का जेझेराला... फक्त हिरवाई असताना कि बर्फ असताना ते ठरत नाहीये...

हिरवाई असतांना जास्त मजा येईल.

प्रतिसादांसाठी सगळ्यांचे आभार!

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

6 May 2017 - 10:16 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

फोटो काय अप्रतिम आहेत. सुंदर.

पद्मावति's picture

7 May 2017 - 8:21 pm | पद्मावति

अप्रतिम!