स्काईपवर डायव्होर्स....एका बातमीवर विचारतरंग

बाजीगर's picture
बाजीगर in जनातलं, मनातलं
2 May 2017 - 7:53 pm

आज लोकसत्ता मध्ये हि बातमी वाचली.आयटी इंजीनियर्स असलेल्या नवराबायको बद्दल.
अगदी न राहवून विषय काढला
सगळं काही forced moves असल्याप्रमाणे एका अपरिहार्य शेवटाकडे (कि नव्या सुरवातीकडे) त्यांचे (वैवाहीक) जिवन गेले.

न तुम बेवफा हो,
न हम बेवफा है,
मगर क्या करे अपनी
राहे जुदा है...

करीयर मधील संधींचं आकाश खुणाऊ लागताच लग्न हे एक लोढणं वाटायला लागतं.आणि जर नवरा त्याला मिळणा-या करीयरसंधीस्थानस्थलांतर सहजपणे करत असला तर आपण का आपल्या स्वप्नावर पाणी सोडावे असे बायकोला वाटण्यात काय गैर.
हल्ली संधीस्थानं आंतरराष्ट्रीय असतात,
मग ओढाताण,भावनांची आंदोलने,इगो ची टक्कर(अभिमान पार्ट-3), शेवटी तुटणे.
( आयटी वाल्यांचे अमर्याद कामाचे तास पाहून यांना लग्नाची खरचं गरज आहे का असाच प्रश्न पडतो कि पाॅर्न पाहून यांच भागतं...)

चलो एकबार फिरसे,
अजनभी बन जाये हम दोनो..

सुदैवाने जस्टीस आधुनिक विचारांचे निघालेले दिसताहेत आणि स्काईपवर मुलाखत करुन निर्णय सुनावण्याचा स्तुत्य पायंडा पाडला. ( नो तारीख पे तारीख)

http://www.loksatta.com/pune-news/couple-takes-divorce-through-skype-in-...

रोटी कपडा और मकान या गरजा राहिल्याच नाहीत,मन आंतराष्ट्रीय ठिकाणं ,उच्चपगार,क्रेडीटकार्डवर माॅल्स मधे शाॅपींग चे मनसुबे करते का?

प्रेम का ऐसा बंधन है
जो बंध के फिर ना टूटे
अरे नौकरी का है क्या भरोसा आज मिले कल छूटे
कल छूटे
अम्बर पे है रचा स्वयम्वर फिर भी तू घबराये

तेरी दो टकिया दी नौकरी वे मेरा लाखों का सावन जाये,
हाय हाय ये मजबूरी
ये मौसम और ये दूरी

मुक्तकप्रकटनविचार

प्रतिक्रिया

आनन्दा's picture

2 May 2017 - 10:17 pm | आनन्दा

_/\_

पैसा's picture

2 May 2017 - 10:47 pm | पैसा

करार होता. तो मोडला. संपलं.

अधाशी's picture

3 May 2017 - 3:50 pm | अधाशी

काहिहि लिहिलय तुम्हि. नाहि आवडल

मनिमौ's picture

4 May 2017 - 2:25 pm | मनिमौ

आखिर केहना क्या चाहते हो

सच्चिदानंद's picture

4 May 2017 - 7:51 pm | सच्चिदानंद

आयटी वाल्यांचे अमर्याद कामाचे तास पाहून यांना लग्नाची खरचं गरज आहे का असाच प्रश्न पडतो कि पाॅर्न पाहून यांच भागतं...

स्फोटक विषय.. लग्नाची खरी गरज आणि 'पॉर्न पाहून भागतं' याचा संबंध तर अगदी बादरायण आहे.. (अर्थात सेक्स alternative to पॉर्न असा काही विचार असेल तर, 'पॉर्न पाहून भागतं' असं समजणार्‍यांचं नक्की कसं भागत असेल असाही एक प्रश्न आलाच मनात, पण तो वैयक्तिक होईल म्हणून सोडून देऊ.. )
सेक्ससाठी लग्न करतात असा विचार करणार्‍यांची तर आता कीव देखील वाटत नाही.
आणि उठसुट आयटी/ डॉक्टर / वकील यांच्याबद्दल सरकटीकरण करुन कमेंटा पास करणं एक फॅड वाटायला लागलं आहे. बाकी लोक काय अजून अश्मयुगात आहेत की दारिद्र्यरेषेखाली आहेत ?

जर नवरा त्याला मिळणा-या करीयरसंधीस्थानस्थलांतर सहजपणे करत असला तर आपण का आपल्या स्वप्नावर पाणी सोडावे असे बायकोला वाटण्यात काय गैर.

आणि हो, म्हणजे बायकांनी त्याग करत रहावा असं काही म्हणायचय का इथे तुम्हाला ? म्हणजे काय गैर हा उपरोधिक प्रश्न आहे की कसे ? हे स्पष्ट झालं म्हणजे त्याबद्दल पण बोलता येईल.

बाजीगर's picture

5 May 2017 - 7:43 am | बाजीगर

सर्व प्रतिक्रियांचे आभार,
सच्चीतानंद यांचे सविस्तर प्रतिक्रियेबद्दल विशेष आभार,
हा लेख समाजात होणा-याबदलाची घेतलेली नोंद होती.

"...गैर काय ?" हे सरळ अर्थानेच आहे.

आपण सगळे अॅडल्ट आहोत ,पाॅर्न चा मुद्दा offensive घेतला जावू नये. (@संपादक, "कि पाॅर्न पाहून यांच भागतं..." हे वाक्य काढून टाकावे हि विनंती)

मला बदलत्या परिस्थीतीचे हे फक्त निरीक्षण नोंदवायचे होते.जुन्या काळासारखी आपुलकी प्रेम वगैरे राहिले नाहि असे मला वाटले.

दु:ख नको तुटताना
अश्रु नको वळताना
मी मिटता लोचन हे उमलशील तू उरी