नातं..!

हर्षु's picture
हर्षु in जनातलं, मनातलं
23 Apr 2017 - 8:50 pm

नातं हे दोन व्यक्तींमध्ये असतं, मग ते कुठलेही असो. पण यातील मैञीच्या नात्यात आपण आपली सगळीच नाती जगु शकतो, बघु शकतो, आणि जेव्हा या सुंदर नात्यामध्येआपल्या नकळत का होइना पण, संध्याकाळच्या वेळी कमळ फुलावर बसलेला भ्रमर जसा सकाळपर्यंत त्यात कैद होतो, अगदी तसाच कटुपणा कैद होवु पाहतो तेहा मन नावाचा अवयव अगदीच हेलावुन जातो.
नातं जोडण्यासाठी जश्या दोन व्यक्ती लागतात, तसेच ते टिकवण्यासाठी सुद्धा दोघांचे प्रयत्न सुद्धा गरजेचे असतात. आणि जेव्हा एकच जण हे नातं टिकवण्यासाठी अकांताने प्रयत्न करतो व दुसरा फक्त याची जाणीव वा गरज नसल्यासारखा बघत राहतो, तेव्हा किती जरी लाडक असलं तरी ते ओझं होवुन बसतं. एक असं ओझ जे सोबत वागवता सुद्धा येत नाहि व आपल्या अती लाडीकपणामुळे खाली सोडुन सुद्धा देता येत नाहि, अशा वेळी हे नातं एकट्याने ओढण्याशीवाय दुसरा पर्यायच रहात नाही....!

हे ठिकाणविचार

प्रतिक्रिया

पैसा's picture

13 May 2017 - 8:04 am | पैसा

एकतर्फी नातं नुसतं ओढण्यात काही मतलब नाही. नव्हे, ते नातं नव्हेच. अशा वेळी स्वतः ची फसवणूक बंद करून पुढे चालू लागावे हे उत्तम.

"चलो एक बार फिरसे अजनबी बन जाए हम दोनो" म्हणत शिल्लक नसलेल्या नात्याचा निरोप घेणे आपल्या मनाच्या स्वास्थ्यासाठी आवश्यक असते.